Category: ठाणे

Thane news

ठामपा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट ७४ टक्के – संजय केळकर

ठामपा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट ७४ टक्के – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे महापालिका निवडणुकीत  भाजपाने कमी जागा लढवत तब्बल ७४ टक्के स्ट्राइक रेट ठेवून ३८ पैकी २८ नगरसेवक निवडून आणले. या कामगिरीबाबत भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार संजय केळकर यांचे पक्ष वर्तुळात कौतुक होत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपची शिवसेना शिंदे गटाशी युती न होता स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका आमदार संजय केळकर यांची होती. मात्र प्रदेश स्तरावर ज्येष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने ठाण्यात युती धर्म पाळत निवडणूक लढवली. यासाठी निवडणूक प्रमुख म्हणून आमदार संजय केळकर यांची पक्षाने नियुक्ती केली.  केळकर यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळानंतर त्यांनी विधानसभेच्या आमदारकीची निवडणूक तीन वेळा जिंकली. त्यांची ठाणे शहरातील चौफेर विकासकामे आणि दीर्घकालीन सामाजिक कार्यावर खऱ्या अर्थाने ठाणेकरांनी पसंतीची मोहोर उमटवली. त्यांच्या मतदार संघात महायुतीचे ३५ पैकी ३१ उमेदवार निवडून आले. शहरात विविध क्षेत्रात केलेल्या कामांबरोबरच आमदार आपल्या दारी आणि जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या आणि गृहसंकुलांच्या अडचणी सोडवत शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी ठरले. या उपक्रमांना नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. याचा फायदा नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाला झाला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जागावाटपात १३१ पैकी किमान ५० ते ५५ जागा मिळाव्यात याबाबत संजय केळकर यांनी कायम आग्रह धरला होता. मात्र अवघ्या ४० जागा मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांची समजूत काढण्यात त्यांना यशही आले. अशात आणखी दोन जागा कमी झाल्याने भाजपाने ३८ जागांवर उमेदवार दिले. संजय केळकर यांनी यावेळी ज्येष्ठ नेत्यांचे सहकार्य घेत पक्षातील नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली. यात …सौ. यादव, उषा वाघ, अनिता ठाकूर, माधुरी मेटांगे, वैभव कदम, सीताराम राणे, विकास पाटील आदींचा समावेश होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील नाराजीची जागा उत्साहाने घेतल्याने प्रचारात आणि मतदानाच्या दिवशी त्यांचा सहभाग मोठा दिसून आला. शिवाय मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अशात आमदार संजय केळकर यांनी देखील प्रचार काळात नियमितपणे व्यक्तिशः नागरिकांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले, उमेदवारांच्या प्रचार रॅलीतून नागरिकांशी संवाद साधला. याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि भाजपचे ३८ पैकी २८ उमेदवार निवडून आले. हा स्ट्राइक रेट ७४ टक्के होता. विशेष म्हणजे नव्याने निवडून आलेले नगरसेवक हे वागळे इस्टेट, वर्तकनगर ते घोडबंदरपासून दिवा-शिळ या भागातील होते. त्यामुळे भाजप दुपटीने वाढल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. जागा जास्त मिळाल्या असत्या किंवा स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय झाला असता तर महापौरही भाजपचा झाला असता एवढे नगरसेवक निवडून आले असते, असा विश्वास कार्यकर्ते आता बोलून दाखवत आहेत. भाजपचे ठाणे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे यांनी देखील निवडणुकीत मोलाची भूमिका बजावली. उमेदवारांच्या प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला. त्यांनी आमदार निधीतून केलेल्या कामांचाही फायदा झाल्याचे नागरिकांच्या संवादातून दिसून आले.शहर अध्यक्ष संदीप लेले यांनीही पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला.एकूणच भाजपचे केवळ नगसेवकच वाढले नाहीत तर पक्षाला झालेले मतदानही लक्षणीय वाढले. याबाबत संजय केळकर यांनी ठाणेकरांचे आभार मानले. भाजपला वाढत असलेला जनाधार आणि यश पक्ष कार्यकर्त्यांसाठी आणि पुढील पिढीसाठी फायदेशीरच ठरणार आहे यात वाद नाही.

यूएईचे राष्ट्रपती हिज हायनेस शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर स्वागत केले. एकाच कारमधून प्रवास केला. भारत–यूएई मैत्री अधिक दृढ होण्याची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.

भिवंडीत राजकीय राडा अन् फ्रीस्टाईल हाणामारी

  भिवंडी : भिवंडीत भाजपा पक्षात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. भिवंडीतील प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांनी भाजपा आमदार महेश चौघुले…

भाजपाचा ठाणे महापौरपदावरही दावा

दोन वर्ष महापौर पद अन्यथा भाजपा विरोधात बसणार ०  मुंबई महापौरपदवरून तिढा कायम सिध्देश शिगवण ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने एकहाती बहुमत मिळवले असतानाही भाजपाने ठाणे महापौर पदावर दावा ठोकल्याने नवा…

‘लाल वादळ’ आज पालघरमध्ये थडकणार !

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंचा लाँग मार्च० मागण्यांसाठी अनिश्चित काळासाठी पालघरमध्ये धरणे आंदोलन अनिल ठाणेकर ठाणे : आपल्या न्याय मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल वादळ आज पालघरमध्ये थडकणार आहे. आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या लाखो लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढला. हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, रात्री मनोर येथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे. अखिल भारतीय किसान सभा (एआयकेएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (एडवा), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (एएआरएम) यांसारख्या संघटनाही मोठ्या संख्येने सामील झाल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि एडवाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, केंद्रीय समिती सदस्य, माकप राज्य सचिव आणि किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, केंद्रीय समिती सदस्य आणि सीटूचे राज्य सचिव, डहाणूचे दोन वेळा आमदार असलेले विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि एएआरएमचे राज्य निमंत्रक किरण गहला आणि इतर अनेक जण करत आहेत. उद्या सीपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चात सामील होतील. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे; सर्व देवस्थान, इनाम, वरकस आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे; मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे; स्मार्ट मीटर योजना रद्द करणे; पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे; चार श्रम संहिता रद्द करणे; वाढवण आणि मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे; पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे; शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य इत्यादी सुविधांमध्ये वाढ करणे.

मिरा-भाईंदरमध्ये फेब्रुवारीत मेट्रो धावणार – प्रताप सरनाईक

मिरा-भाईंदरमध्ये फेब्रुवारीत मेट्रो धावणार – प्रताप सरनाईक मिराभाईंदर, शहराच्या वाहतूक कोंडीपासून ते महिला सक्षमीकरणापर्यंतच्या २५ विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. चेना रिव्हर वॉटर फ्रंट रस्ता, शिवसृष्टी मार्ग, खाडी किनारा…

भाजपच्या विजयाबद्दल प्रश्नचिन्ह? 

भाजपच्या विजयाबद्दल प्रश्नचिन्ह? मिरा – भाईंदरमध्ये मनसेचा बॅनर वाद मिरा -भाईंदर :  मिरा – भाईंदरमध्ये मनसेने लावलेल्या बॅनरची चर्चा सुरू आहे. त्यात लिहिले आहे की, “भाजप जिंकला, पण मीरा-भाईंदर हरला.” हे बॅनर कालच लावण्यात आले. स्थानिक निवडणुकांनंतर मनसे समर्थकांनी बॅनर लावून म्हटले आहे की, ज्यात भाजपने महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या असल्या तरी, खऱ्या मुद्द्यांवर आणि विकासावर त्यांचा पराभव झाला आहे. मिरा -भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने प्रचंड विजय मिळवला, ९५ पैकी ७८ जागा जिंकल्या, तर शिवसेनेने तीन, काँग्रेसने १३ आणि एका अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली. हा निकाल येथील शहरात भाजपचा वाढता प्रभाव किंवा प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात होणारा घोटाळा दाखवतो. मनसेच्या या बॅनरवर सोशल मीडियावर असंख्य प्रतिक्रिया उमटल्या आहेत. समर्थकांचे म्हणणे आहे की भाजपचा विजय हा जनतेवरचा अन्याय आहे. हे बॅनर आणि ही विधाने निवडणूक निकालांचा परिणाम दाखवून देतात.

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे विनामूल्य आरोग्य शिबीर संपन्न

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे विनामूल्य आरोग्य शिबीर संपन्न ठाणे, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी ठाणे व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वावे येथे विनामूल्य आरोग्य…

नवी मुंबई महानगरपालिकेला नवी दिल्लीत राष्ट्रीय ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ प्रदान

नवी मुंबई महानगरपालिकेला नवी दिल्लीत राष्ट्रीय ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ प्रदान आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले अभिनंदन आणि मानले आभार अशोक गायकवाड नवी मुंबई : मालमत्ता कर व्यवस्थेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या व्यापक सुधारणा व नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमासाठी देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ नवी दिल्ली येथे १०४ व्या स्कॉच शिखर परिषदेत आज महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने हा पुरस्कार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांनी स्कॉच डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर कोच्छर यांच्या हस्ते स्विकारला. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा हा देशपातळीवर दखल घेत झालेला गौरव आहे. करभरणा करून शहर विकासात हातभार लावणा-या नागरिकांचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले अभिनंदन आणि मानले आभार ! नवी मुंबई महानगरपालिकेला लाभलेला राष्ट्रीय प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार’ हा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या माध्यमातून सुशासन, पारदर्शकता, तंत्रज्ञानाधारित करप्रणाली आणि उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन या निकषांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या उल्लेखनीय कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता कर सुधारणा उपक्रमाचा उल्लेख करावा लागेल, कारण हा प्रकल्प म्हणजे केवळ तांत्रिक बदल नसून नागरिकांचा विश्वास निर्माण करणारा आणि शहराच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मजबूत पाया आहे. त्यामुळे करभरणा करून शहर विकासात हातभार लावणा-या नागरिकांचे सर्वात मोठे योगदान असल्याबदद्ल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून आभार व्यक्त केले आहेत. मालमत्ता कर व्यवस्थेत आमुलाग्र व संरचनात्मक सुधारणा नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्वीच्या हस्तलिखित, त्रुटीपूर्ण व अर्धवार्षिक कर आकारणी प्रणालीऐवजी आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णतः नव्याने सूत्रबध्द व सुनियोजित रचना केलेली मालमत्ता कर प्रणाली अंमलात आणली. या प्रणालीअंतर्गत एकच निश्चित वार्षिक करबिल, शासकीय दरांवर आधारित स्वयंचलित करआकारणी, पारदर्शक व न्याय्य मूल्यांकन, नागरिकांना समजेल अशी सोपी कररचना यांची अंमलबजावणी करण्यात आली. नागरिकांचा सहभाग केंद्रस्थानी ठेवून राबवलेली डिजिटल प्रणाली मालमत्ता कर प्रणालीतील सुधारणांमध्ये सर्वसमावेशकतेला विशेष प्राधान्य देण्यात आले. नागरिकांसाठी एकाच वेळी ऑफलाईन व ऑनलाईन विविध माध्यमांतून कर भरण्याची सुविधा, क्यूआर कोडद्वारे सुलभ कर भरणा सुविधा देण्यात आली. महानगरपालिकेची www.nmmc.gov.in वेबसाईट, My NMMC ॲप, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड तसेच जीपे, फोनपे, पेटीएम अशा सर्व युपीआय सुविधा आणि व्हॉट्स ॲप चॅटबॉट अशा विविध प्रकारच्या करभरणा सेवा, जनजागृती मोहिमा व माहिती – आधारित थकबाकी वसूली मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे कर भरण्याबाबत नागरिकांचा विश्वास वाढून स्वयंस्फूर्त सहभाग लक्षणीयरित्या वाढला. भौगोलिक नोंदणी व माहिती शुद्धीकरणामुळे अचूकता मालमत्तांची अचूक ओळख सुनिश्चित करण्यासाठी मालमत्तांचे भौगोलिक स्थान नोंदविणे, पत्त्यांची पडताळणी व अद्ययावत नोंद, संपर्क क्रमांकांची खात्री, उच्च कर क्षमतेच्या मालमत्तांवर लक्ष केंद्रित कारवाई करण्यात आली. यामुळे करआकारणी व संकलनात अचूकता आणि पारदर्शकता वाढली. कर संकलनात ऐतिहासिक वाढ मालमत्ता कर सुधारणा उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये एकूण ४७८.३५ कोटींचे मालमत्ता कर संकलन नोंदविण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ५९ हजार ४२५ मालमत्तांकडून कर भरणा, चालू कर संकलन ४२७.२० कोटी, थकबाकी कर संकलन ५१.१५ कोटी, ऑनलाइन कर भरण्यात सुमारे चारपट वाढ, अशी उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे. शहराच्या विकासासाठी स्थिर आर्थिक पाया या सुधारणा प्रक्रियेमुळे महानगरपालिकेचा आर्थिक प्रवाह स्थिर झाला असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे. नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत विश्वास निर्माण होऊन तक्रारी व वादांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मालमत्ता कर भरणा प्रक्रियेत राबविलेल्या विविधांगी व्यापक सुधारणा व नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५ – सिल्व्हर’ प्रदान करून गौरविण्यात आले असून याव्दारे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

हळदी समारंभातील जेवण केल्याने ३० ते ४० लोकांना विषबाधा        

हळदी समारंभातील जेवण केल्याने ३० ते ४० लोकांना विषबाधा कल्याण : कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीतील बाविस्कर कुटुंबात शनिवारी रात्री हळदी समारंभा निमित्ताने जेवण जेवल्यानंतर ३०ते ४० जणांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने उपचारार्थ रूग्णालयात नेण्याचा बाका प्रसंग ओढावला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीमधील बाविस्कर कुटुंबात मुलीचा हळदी समारंभ शनिवारी होता. या समारंभा निमित्ताने रात्री आलेल्या पाहुणे आणि कुटुंबायांनी जेवण केल्यानंतर काही तासांनी उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने उपचारार्थ रूग्णालयात नेण्याचा प्रसंग ओढावला. या जेवणातील विषबाधेचा जास्त त्रास जेष्ठांना, बालकांना झाल्याचे समजते. यामध्ये ज्या मुलीची हळद होती ती, तिची आई, बहीण यांना देखील त्रास झाला. या धक्कादायक प्रकारामुळे रविवारी होणारा लग्न समारंभ कार्यक्रम रद्द करावा लागल्याचे कुटुंबियांच्या वतीने प्रसिध्दी माध्यामांना सांगितले. तसेच या घटना प्रकरणी  जेवणाच्या कंत्राटदारावर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत गुन्हा दाखल करून कारवाई ची मागणी केली असल्याचे समजते.