Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

भारतीय आर्थिक विकासदर वाढीवर जागतिक नाणेनिधी फिदा

भारत आर्थिक विकासाच्या आघाडीवर सातत्याने वेगाने प्रगती करत आहे आणि आता जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये त्याचा मजबूत दावा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानावर पोहोचल्यानंतर भारताने 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे ध्येय…

कर्जत मुरबाड राज्य मार्गावरील खड्ड्यांविषयी ग्रामस्थांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

कर्जत मुरबाड राज्य मार्गावरील खड्ड्यांविषयी ग्रामस्थांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट कार्यकारी अभियंता अरुण देवकाते यांनी दिले आश्वासन अशोक गायकवाड कर्जत: कर्जत मुरबाड राज्य मार्गावरील कर्जत तालुक्यातील कशेळे येथील मुख्य रस्त्यावर मागील…

ट्रम्प यांची अरेरावी आता ग्रीनलँडवर डोळा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अमेरिकेने तेलासाठ्यासाठी व्हेनेझुएला या छोट्याशा देशावर अरेरावी करून त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे अपहरण करून त्यांना अटक केली आणि स्वतःला व्हेनेझुएला या…

रिअल इस्टेट-तांबे चमकले; कच्चे तेल घसरले

अर्थनगरीत सरत्या आठवड्यामध्ये काही लक्षवेधी बातम्या ऐकायला मिळाल्या. पहिली महत्वाची बातमी म्हणजे बाजारात सोन्या-चांदीपाठोपाठ तांब्यालाही चमक लाभत असल्याने त्यात गुंतवणुकीला वाव आहे. दुसरी बातमी म्हणजे येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत…

ऍड. रेश्मा भोपी यांच्या कार्यालयाचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते उद्घाटन

ऍड. रेश्मा भोपी यांच्या कार्यालयाचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते उद्घाटन कल्याण: ऍड. रेश्मा गुरुनाथ भोपी यांच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.   कल्याण कोर्टा शेजारील कमर्शिअल सेंटरमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते फित कापून या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या दरम्यान आमदार राजेश मोरे यांचं भोपी दांपत्या कडून स्वागत करण्यात आले. तर आमदार मोरे यांनीही ऍड. रेश्मा भोपी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ऍड. रेश्मा भोपी या कल्याण जिल्हा फौजदारी न्यायालय वकील संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्ष पदाच्या उमेदवार असून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहनही आमदार राजेश मोरे यांनी केले आहे. याबाबत ऍड. रेश्मा भोपी यांनी आमदार राजेश मोरेंचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे वकील संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्ष पदावर निवडून देण्यासाठीही त्यांनी आवाहन केले आहे. अध्यक्ष पदावर निवडून दिल्यास वकिलांच्या न्याय हक्कासाठी लढणार व आवाज उठवणार असे यावेळी ऍड.रेश्मा भोपी म्हणाल्या. ऍड.रेश्मा भोपी यांच्या नव्या कार्यालयाच्या उदघाटनास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने वकील सहकाऱ्यांनी उपस्थित राहून भोपी यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उपस्थित महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचेही आयोजन ऍड.रेश्मा भोपी यांनी केले होते.

प्राथमिक विद्यामंदिरमध्ये अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे उपक्रमाचे आयोजन

प्राथमिक विद्यामंदिरमध्ये अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे उपक्रमाचे आयोजन कल्याण: प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड कल्याण या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांना चालना मिळणारे प्रयोग,प्रकल्प,कृती, नवी संकल्पना सादर करण्यासाठी कल्पकता हवी यासाठी अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सांघिक रित्या प्रकल्पाची मांडणी केली. अन्न व आरोग्य,वायु प्रदूषण, वाहतूक व दळणवळण, मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे या विषयावर प्रकल्प मांडणी मुलांनी केली. अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे या उपक्रमाचे उद्घाटन व परीक्षण धाकटे शहाडचे केंद्रप्रमुख रतिलाल चव्हाण व शीतल कोळी यांनी केले. शाळास्तरावर एकूण ७० प्रकल्पाची मांडणी करण्यात आली. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी चार प्रकल्पाची निवड करण्यात आली. संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर निलेश रेवगडे यांच्या कल्पक कल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला जातो. यामुळे मुलांना प्रत्यक्ष कृती करून प्रकल्प तयार करण्याचा आनंद मिळतो व वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध होण्यास मदत मिळते अशा उपक्रमामुळे बाल वैज्ञानिक शाळेमध्ये तयार होण्यास मदत होते.

व्यवस्थेतले उंदीर…

छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यात सुमारे सात कोटी रुपये किमतीचे 26 हजार क्विंटल धान गायब करण्यात आले. या घटनेने जनता हैराण झाली असली, तरी जिल्ह्याच्या पणन विभागातील अधिकारी या नुकसानीसाठी उंदीर, वाळवी…

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत असलेल्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे शैक्षणिक सत्र जानेवारी २०२६ करीता नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आलेले आहेत. तसेच जानेवारी २०२५ या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतलेला आहे; अशा विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाचीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठीची अंतिम मुदत ही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी. एड. (सेवांतर्गत), बी. एड. (विशेष) तसेच विज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांव्यातिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जानेवारी २०२६ या सत्राकरिता प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना नियमित पदवी सोवत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी घेता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापनेपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील विविध घटकातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय व खाजगी संवेत उच्चपदावर कार्यरत आहेत. मानाची पदे भूषवत आहेत. हे विद्यापीठ सर्वसामान्य ते विशेष पारंगत अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रवेशद्वार ठरत आलेले आहे. येथे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख तसेच वेब रेडिओ, दृकश्राव्य माध्यम व मोबाईलद्वारे देखील मार्गदर्शन केले जाते. दोन वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, दूरशिक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य यूजीसी मान्यताप्राप्त व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. विद्यापीठातर्फे सेनादल सैनिक, बंदीजन, कृषि सेवक, शेतमजूर आणि समाजातील इतरही घटक यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम आहेत. शिवाय ए.आय. डाटा सायन्स, सायबर ॲक्ट ते बीए, बीकॉम, एम. ए., एम. कॉम., एम. लिब., एम. सी. ए. यासह विविध व आधुनिक कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व शिक्षणक्रम नोकरदारांना आपली नोकरी व व्यवसायिकांना आपला व्यवसाय सांभाळून पूर्ण करता येतात. त्यामुळे संबंधित इच्छुकांना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची व सर्वार्थाने प्रगती साधण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने दिनांक २० जानेवारी २०२६ पासून विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत विविध ८८ शिक्षणक्रमांचे ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. त्यात प्रमाणपत्र – ३२, पदविका – ३०, पदवी – ११ व पदव्युत्तर १५ शिक्षणक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्र्माचे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. प्रवेशासाठीची अंतिम मुदत ही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विहित मुदतीत विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac  या वेबसाईटला भेट द्यावी. तेथे Admission  या पर्यायावरून Prospectus येथे विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (०२५३)२२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ या विद्यार्थी मदत केंद्रावरील दूरध्वनी क्र्मांकावर किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ अथवा ९२७२०४६७२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

वाहनांच्या ताफ्यावर मर्यादा, दहापेक्षा अधिक वाहनांना बंदी

जि. प. व पं. स. निवडणूक वाहनांच्या ताफ्यावर मर्यादा, दहापेक्षा अधिक वाहनांना बंदी जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी वापरणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या वाहनांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक मोटारगाड्या किंवा वाहने वापरण्यास बंदी घालणारे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. मा. भारत निवडणूक आयोगाने १३ जानेवारीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार, ५ फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या वाहनांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यात आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटारगाड्या किंवा वाहनांचा ताफा वापरण्यास मनाई केली आहे. हे आदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वतंत्रपणे पोहोचविणे शक्य नसल्याने पोलीस विभागामार्फत ध्वनीक्षेपकाद्वारे या आदेशांची जाहीर घोषणा व प्रसिध्दी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

टाटा मोटर्सकडून 1७ नेक्‍स्‍ट- जनरेशन ट्रक्‍स लाँच

टाटा मोटर्सकडून 1७ नेक्‍स्‍ट- जनरेशन ट्रक्‍स लाँच ठाणे : भारतातील ट्रकिंग क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल उचलत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक व गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने आज आपल्‍या 1७ ट्रक्‍सचा नेक्‍स्‍ट- जनरेशन पोर्टफोलिओ लाँच केला. हे ट्रक्‍स ७ टन ते ५५ टन कन्फिग्‍युरेशन्‍समध्‍ये उपलब्‍ध आहेत. यासह सुरक्षितता, नफा व प्रगतीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित केले आहे. या सर्वसमावेशक लाँचमध्‍ये ऑल- न्‍यू अझुरा सिरीज, अत्‍याधुनिक टाटा Trucks.ev श्रेणी आणि प्रस्‍थापित प्राइमा, सिग्‍ना व अल्‍ट्रा प्‍लॅटफॉर्म्‍समधील मोठ्या अपग्रेड्सचा समावेश आहे. जागतिक सुरक्षितता मानकांचे (ECE R29 ०3) काटेकोरपणे पालन करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे ट्रक्‍स उत्‍पन्‍न क्षमता वाढवतात, एकूण मालकीहक्‍क खर्च कमी करतात आणि वेईकल अपटाइम वाढवतात, ज्‍यामुळे वाहतूकदारांना मोठे यश मिळते. नवीन ट्रक्स लाँच करत टाटा मोटर्स लि.चे एमडी व सीईओ गिरीश वाघ म्‍हणाले, “भारतातील ट्रकिंग क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन होत आहे, ज्‍याला प्रगतीशील राष्‍ट्रीय धोरणे, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षित, अधिक स्‍वच्‍छ व अधिक कार्यक्षम लॉजिस्टिक्‍ससाठी वाढत्‍या मागणीने गती दिली आहे. टाटा मोटर्स मापदंड स्‍थापित करण्‍यामध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी आहे, जे उद्योगाच्‍या भविष्‍याला आकार देतात. लाँच करण्‍यात आलेल्‍या आमच्‍या नेक्‍स्‍ट- जनरेशन पोर्टफोलिओमध्‍ये ऑल- न्‍यू अझुरा सिरीज, दोन प्रगत उच्‍च- कार्यक्षम पॉवरट्रेन्‍स, आमच्‍या नवीन आय- एमओईव्‍ही आर्किटेक्‍चरवर आधारित भारतातील शून्‍य- उत्‍सर्जन इलेक्ट्रिक ट्रक्‍स व ट्रिपर्सची व्‍यापक श्रेणी, युरोपियन मानक केबिन्‍स व उद्योग- अग्रणी सुरक्षितता वैशिष्‍ट्यांमध्‍ये मोठ्या प्रमाणात अपग्रेड्स, अधिक पेलोड क्षमता आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश आहे, जे सर्व फ्लीट एज डिजिटल सेवांसह एकीकृत करण्‍यात आले आहेत. यासह आम्‍ही या वारशाला अधिक पुढे नेत आहोत. ‘बेटर ऑल्‍वेज’ तत्त्वामधून प्रेरित आमची नाविन्‍यतेप्रती अविरत मोहिम, स्‍थानिकीकरणाप्रती दृढ कटिबद्धता आणि ग्राहकांना यशस्‍वी करण्‍यावरील निरंतर फोकस ‘आत्‍मनिर्भर भारत’च्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहेत, ज्‍यामुळे शाश्वत गतीशीलतेमध्‍ये नेतृत्‍व करण्‍याप्रती भारताचा आत्‍मनिर्भरपणा व महत्त्वाकांक्षा अधिक दृढ झाली आहे.’’