Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

अलविदा आशाताई…सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन

अलविदा आशाताई…सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन स्लग – उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली स्वाती घोसाळकर मुंबई : उरले उरात काही आवाज चांदण्यांचे , आकाश तारकांचे उचलून रात गेली या केव्हातरी…

वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी

वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी   मुंबई : राज्य सरकारकडून वराह पालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वराह पालनासंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर  आणि मंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला…

चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज

चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवरीस अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र प्रशासन,  मुंबई महापालिका व पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत. चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जी/उत्तर विभागातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क व आसपासच्या परिसरात सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक तयारी करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून उंच टेहळणी मनोरेही उभारले आहेत. याशिवाय ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, २० मेटल डिटेक्टर आणि ३० हँडहेल्ड मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी अनुयायांसाठी सुमारे ५०० मीटर अंतरावर दुतर्फा पडदे लावण्यात आले आहेत. आरोग्य सेवांसाठी ३० वैद्यकीय अधिकारी आणि ७० सहाय्यक कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून पाच रुग्णवाहिका, एक अतिदक्षता रुग्णवाहिका तसेच दादर चौपाटीवर सुरक्षेसाठी रेस्क्यू बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे.

“सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन

“सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन जयंत चाचरकर यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात ‘सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम’ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुंषगाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” ही विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड जयंत चाचरकर यांनी दिली आहे. इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने बऱ्याचदा मागासवर्गीय विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती उद्भवते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर असा बिकट प्रसंग येऊ नये व त्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये. यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळवले आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरीत अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी

कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात

कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात इकोची सिमेंट मिक्सरला धडक, भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू कल्याण : कल्याण मुरबाड मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोमवारी घडली. एक सिमेंट मिक्सर आणि काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रायते पुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको गाडीचा सकाळी ८.३० च्या सुमारास अपघात झाला. गाडीतील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामध्ये ८ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून मृतदेह गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आली. प्रवाशांनी भरलेली इको कार मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 1२ प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने केले. टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला? हे अद्याप समजू शकलेले नाही. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. या मृतांमध्ये प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने, वय २1 वर्ष, देवगाव मुरबाड, भूषण घोरपडे, वय ४९ वर्ष, अंधेरी मुंबई. तहसीलदार कार्यालय मुरबाड या कार्यालयात महसूल सहाय्यक, जिजा गोविंदा केंबारी, वय ५० वर्ष, टेंभरे मुरबाड, अनंता पवार, साखरे मुरबाड, दीपक गवळी, राहणार कल्याण, गणपत जैनू मधे, वय ३२ वर्ष, देवराळवाडी मुरबाड, स्नेहा मोहपे, वय अंदाजे २२ वर्ष, मानसी मोहपे, वय अंदाजे २० वर्ष, प्रथमेश मोहपे, वय अंदाजे 1७ वर्ष हे तिघेही एकाच कुटुंबातील  नारायणगाव मुरबाड येथील आहेत. तर अन्य दोन व्यक्तींची ओळख पटवणे सुरू आहे. कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावर सकाळी रायते परिसरात झालेल्या अपघतात प्राथमिक माहिती नुसार नऊ प्रवासी मृत्यूमुखी झाले आहेत. या अपघातातील इको संर्वगातील वाहनाची सर्व कागदपत्रे वैध्य आहेत, आरटीओ इनस्पेक्टर यांनी घटनास्थळी पोहचत माहिती घेऊन याबाबत सविस्तर अवहाल तयार करणार आहोत. अनधिकृत प्रवासी वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ बाबत आरोप असल्याच्या बाबत अवैध वाहतूक संदर्भात आरटीओकडून कारवाई केली जाते अशी प्रतिक्रिया कल्याण उप प्रादेशिक अधिकारी अशुतोष बारकुल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तर रायते येथील महामार्गावर झालेल्या भीषण अपघाता संदर्भात, रायते येथील ग्रामस्थ संतोष सुरोशी यांनी प्रतिक्रिया दिली की, रायते, पिंपळोली ग्रामस्थांनी रस्त्या संदर्भात निवेदन देखील दिले होते. रस्त्याचे काम अर्धवट असून, दिशा दर्शक फलक लावले नाहीत, वाहतूक सुरु करू नका असे असून देखील मिक्सर अवजड वाहनांची होणारी वाहतूक पाहता आरटीओचे नियंत्रण नाही यामुळेच आजच्या या भीषण अपघातात निष्पाप लोकांचे बळी गेले असल्याचा आरोप करत  शासनाचा  धिक्कार करतो अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष सुरोशी यांनी दिली. तर एनएच ६१ महामार्गावर रायते येथे इको आणि मिक्सर या वाहनांच्या अपघाततील इको मधील प्रवाशांचे मृतदेह गोवेली शासकीय रूग्णालयात आणले असून ११ मृतदेह असल्याची प्रतिक्रिया कल्याण ग्रामीण डीवायएसपी अनिल लाड यांनी दिली.

आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया कागदपत्र पडताळणीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत

आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया कागदपत्र पडताळणीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व नियम २०११ अंतर्गत आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये प्रवेशस्तर वर्गात २५% जागा वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम फेरीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस १० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी अॅलॉटमेंट लेटर, हमीपत्र व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शासनाने २० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. ही पडताळणी कै. शंकरराव झुंझारराव मनपा शाळा क्रमांक १, गांधी चौक, बारदान गल्ली, कल्याण पश्चिम येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वेळेत (शासकीय सुट्ट्या वगळून) करण्यात येणार आहे. ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रेच ग्राह्य शासनाच्या निर्देशानुसार पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अपलोड केलेली मूळ कागदपत्रेच पडताळणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रतींसह छायांकित प्रतींचे दोन संच सोबत आणणे आवश्यक आहे. पालकांनी आरटीई पोर्टलवरून अॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून निर्धारित कालावधीत पडताळणी पूर्ण करून आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणसंबंधित कडक अंमलबजावणी करण्यात यावी

बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणसंबंधित कडक अंमलबजावणी करण्यात यावी डॉ डी एल कराड यांची मागणी अनिल ठाणेकर नाशिक, शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार तसेच युवकाचा धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसात एकूण ९ गुन्हे दाखल असून ६ संशियतांना अटक केली आहे. हे एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे. बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा,अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य, संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली हे स्वागतार्ह आहे.  तक्रारदारांमध्ये ८ महिला तर १ पुरुषाचा समावेश आहे. युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची तक्रार आहे. या कंपनीतील महिलांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु वरिष्ठांनी तक्रारीची दखल घेतली नाही. नाशिक जिल्ह्यात व शहरात अनेक उद्योग व आस्थापनांमध्ये महिला कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु कायद्यानुसार अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या नाहीत असे दिसून आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून ज्या आस्थापना मध्ये महिला कर्मचारी काम करतात त्या आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन झाली पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही करणे आवश्यक आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा.या बाबत वरील मागणी करण्यात आली.यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली मा. विकास माळी साहेब,कामगार उपायुक्त, नाशिक व मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सिताराम ठोंबरे, ॲड. तानाजी आप्पा जायभावे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे,कॉ मोहन जाधव, संतोष कुलकर्णी, गौतम कोंगळे, छाया जाधव, विजया टिक्कल, कॉ हिरामण तेलोरे, युवराज पाटील उपस्थित होते.

“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याची मुदत वाढ

“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याची मुदत वाढ ठाणे : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त (२०२६-२७), सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने साकार होत असलेल्या “क्रांतीसूर्याचं देणं” या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. राज्यभरातील कवी-लेखकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विनंतीचा विचार करून, आता कविता पाठविण्याची अंतिम मुदत  २४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. या ऐतिहासिक काव्यप्रकल्पासाठी कवींनी समता, सामाजिक न्याय, मानवता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य, त्यांचे मौलिक विचार, विविध सत्याग्रह आणि विशेषतः महाडच्या चवदार तळ्याची क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न, विचारप्रवर्तक आणि मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या कवितांमधून केवळ निवडक आणि दर्जेदार कवितांचीच निवड करण्यात येणार असून, कविता स्वतःची, मौलिक व अप्रकाशित असणे अनिवार्य आहे. तसेच, प्रथम सहभाग नोंदविणाऱ्या कवींना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रा. आशा रणखांबे (सार्थक साहित्य प्रकाशन) तसेच साहित्यिक नवनाथ रणखांबे ९९६७४३५०३२ / ९९६७४८०९३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

निलिकॉन कंपनीतील कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ मिळणार

निलिकॉन कंपनीतील कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ मिळणार कामगारांतर्फे संजय वढावकर यांचा सत्कार अनिल ठाणेकर ठाणे, रायगड जिल्ह्यामधील रोहा येथील निलिकॉन कंपनी व्यवस्थापन आणि  जनरल मजदूर सभेच्या वतीने नुकत्याच झालेल्या वेतन करारानुसार कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ व इतर सुविधा मंजूर झालेल्या आहेत. त्यानिमित्ताने कंपनीतील कामगारांनी संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर आणि अध्यक्षा संज्योत वढावकर यांचा जाहीर सत्कार केला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. कामगारांना मिळालेल्या भरघोस पगारवाढीमुळे  ठाणे येथील जनरल मजदूर सभेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.  आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, कामगारांची एकजूट,  संयम आणि संघटनेवरील विश्वास यामुळेच हा वेतन करार संपन्न झाला. कारखाना टिकला तरच कामगार टिकेल, अशी  स्पष्ट भूमिका मांडून  त्यांनी आपली संघटना ही कामगारांच्या न्याय हक्कासाठी  कायम खंबीरपणे उभी राहील. धाटाव एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये संघटनेने आत्तापर्यंत अनेक यशस्वी वेतनकरार केले असून, टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी नोकऱ्या मिळवून देण्याचे काम केले आहे. संघटनेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर यांनी सांगितले की,  कामगारांनी संघटित राहून  आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे,  तरच आपणास न्याय मिळेल. सदर सत्कार सोहळ्यास शामकांत जोशी, जगदीश उपाध्ये, सुहास खरीवले, प्रशांत शेट्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत कोतवाल यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन निलिकॉन कामगार सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले होते. हा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष भरत कोतवाल, उपाध्यक्ष जनार्दन राजीवले, सेक्रेटरी एच.पी. वर्मा तसेच नितीन रटाटे, अनंता ढमाल, चिंतामणी साळस्कर, लक्ष्मण भोकटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मिरा-भाईंदरच्या विकासाचा मार्ग मोकळा करा – प्रताप सरनाईक

मिरा-भाईंदरच्या विकासाचा मार्ग मोकळा करा – प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर : मुंबईच्या वेशीवर असलेल्या आणि झपाट्याने विस्तारणाऱ्या मिरा-भाईंदर शहराचा रखडलेला विकास पुन्हा रुळावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पाऊले उचलली आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला विकास आराखडा अद्याप अंतिम न झाल्याने अनेक विकासकामे रखडली असून, नागरिकांना त्याचा थेट फटका बसत आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि प्रलंबित नागरी प्रकल्प लक्षात घेता, महानगरपालिकेचा ‘सुधारीत विकास आराखडा’ (DP) शासन स्तरावर तातडीने अंतिम करावा, अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मिरा- ईंदर शहराची मूळ विकास योजना १९९७ आणि २००० मध्ये मंजूर झाली होती. वाढत्या गरजा लक्षात घेऊन १५ ऑक्टोबर २०१५ रोजी सुधारीत आराखड्याचा इरादा घोषित करण्यात आला.…