युवा कुस्तीपटू सुरज मानेला रौप्य
ठाणे : पुण्यात ,वाघोली येथे संपन्न झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवान व क्रांतीअग्रणी जी.डि…
trendlyne-news
ठाणे : पुण्यात ,वाघोली येथे संपन्न झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवान व क्रांतीअग्रणी जी.डि…
निसर्ग एस आर गृहनिर्माण संस्थेचा आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई : सरकारने एस आर ए योजनेतून आम्हाला विकासकाच्या माध्यमातून घराचे स्वप्न दाखवले. आज १८ वर्ष झाली. बिल्डर आणि सरकारी बाबूंनी आम्हाला या स्वप्नातील घरापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे आता आमचा अंत सरकारने बघू नये अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा निसर्ग एस आर गृहनिर्माण संस्थाचे माजी मुख्य प्रवर्तक जोसेफ शांतीमानव यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. सायन कोळीवाडा येथे आमची हक्काची घरे होती. गगनचुंबी इमारती मध्ये स्वप्नातील घर मिळेल यासाठी एस आर ए चे सरकारी बाबू जे सांगतील ते कागदपत्र आम्ही दिले. आमची हक्काची घरे बिल्डर ने तोडली व गेल्या १८ वर्षापासूनच आमचा वनवास सुरू केला. भाडे दिले ते बंद अवस्थेत, टी डी आर साठी बिल्डर ने मंत्रालयातून स्वतःचे भले करून घेतले. करोडो रुपये या गगनचुंबी इमारतीमधुन बिल्डर कमवत असताना आम्हाला पत्रकार परिषद घेऊन न्याय मागावा लागत आहे. असे मोहन गुप्ता, गणेश बैजनकी, कैलास मेद, राजेश देवेंद्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल रमेश औताडे मुंबई : डॉ.आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळे सर्वांसाठी खुले करून समानतेचा ऐतिहासिक लढा उभारला होता. मात्र आजही सामान्य नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे शासनाने पाणी सर्वांसाठी मोफत केले तरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली शासनाकडून वाहिली गेली असे सिद्ध होईल. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे, भोजराज वैद्य, प्रमुख पाहुणे धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले.पुण्यशील बोदिले.अभिषेक मिश्रा, रोहित पांडे, राहूल द्विवेदी सतिश शुक्ला ,पवन वर्मा,शिबू पांडे, सुरेंद्र तिवारी अतुल गंगापूरकर उपस्थित होते. नारायण बागडे यांनी असे अनेक उपक्रम राबवत शासनाला वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र सरकार या सूचना अंमलात आणत नाही. याचे मोठे दुःख आहे असे धर्माजी बागडे यांनी सांगितले.
खासदार नरेश म्हस्के वाढदिवशी प्रत्यक्ष भेटणार नाहीत सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबविण्याचे आवाहन नवी दिल्ली – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाल्याने शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे संसदेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. या आदर्श निर्णयाचे अनुकरण करत खासदार नरेश म्हस्के यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी, २४ मार्च रोजी खासदार नरेश म्हस्के यांचा वाढदिवस आहे. कार्यकर्ते, हितचिंतक, मित्र परिवार दरवर्षी मोठ्या जल्लोषात खासदार नरेश म्हस्के यांचा वाढदिवस साजरा करतात. मात्र यंदा आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकत खासदार नरेश म्हस्के यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार नरेश म्हस्के यांना दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक हारतुरे घेऊन प्रत्यक्ष भेटीसाठी येत असतात. संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने खासदार नरेश म्हस्के हे दिल्लीत असून वाढदिवशी प्रत्यक्ष ठाण्यात कोणालाही भेटू शकणार नाहीत. वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबविण्याचे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता असल्याने कार्यकर्ते, हितचिंतक वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ऊर्जा देत असल्याने त्यांचा स्वीकार करत खासदार नरेश म्हस्के यांनी कार्यकर्ते, हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकाचे डॉ. ठरले गोरगरीबांसाठी देवदूत राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील अतिदुर्गम भागात आरोग्य देवदूत म्हणून डॉ. वर्षा तंत्रपाळे यांनी स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केली असल्याचे तेथील काही गरीब आदिवासी आणि जानकरां मधे सध्या चर्चा केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी मोधलवाडी या आदिवासी वस्तीतील पिंटू विठ्ठल भला वय ५ महिने या बाळाच्या छातीमध्ये पॉईंझन झाल्याकारणाने त्याला त्याच्या आई वडिलांनी अनेक हॉस्पिटल मध्ये दाखवून सुद्धा कुठलाही फरक पडला नाही. शेवटी बाळाला देवाच्या भरवशावर सोडून देतो असे निशब्द वाक्य आई वडीलांनी आपल्या काळजावर दगड ठेवून काढले. आता पुढे जे काही होईल ते आमच्या नशिबाने होईल असे बोलत त्यांनी आपल्या बाळाला घरीच ठेवले, वैद्यकीय मदत पथक धारखिंड येथील डॉ. वर्षा ओंकार तंत्रपाळे यांना सदरील बातमी समजता त्यांनी बाळाचे आई वडील यांना विश्वासात घेऊन त्यांना आधार दिला व बाळाला उपचार करण्यासाठीचे सर्व सुत्रे आपल्या हाती घेऊन बाळाला हॉस्पिटलला ऍडमिट करण्यासाठी राहत्या घरी मोधलवाडी येथे रुग्णवाहिका घेऊन स्वतः गेल्या तेथे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या मदतीने बाळाला अंबरनाथ येथे छाया हॉस्पिटल तेथून उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल येथे बालरोग तज्ञांना दाखवण्यासाठी नेले. सेंट्रल हॉस्पिटल येथील बालरोग तज्ञ डॉ.वैशाली पवार आणि डॉ. ऐश्वर्या मोरे यांनी प्राथमिक उपचार देऊन बाळाला पुढे सायन हॉस्पिटल मुंबई येथे संदर्भित करण्यात आले. तिथे काही महिने ऍडमिट ठेवून घरी पाठवण्यात आले. या सर्व प्रकारांमध्ये उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल येथील आर. बी. एस. के. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. शालिनी मोहोड यांचे मौल्यवान सहकार्य लाभले, आदिवासी दुर्गम भागामध्ये वैद्यकीय मदत पथकाचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा तंत्रपाळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्या बाळाचा जीव वाचल्याचे आई वडीलांनी मोठ्या अंतःकरणाने दैनिक बित्तंबातमी शी बोलताना सांगितले.
श्रीविश्वेश्वर सहकारी पतपेढीला आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त राजेंद्र साळसकर मुंबई : सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय विस्तारलेली तसेच तेली सेवा समाज संस्थापित श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई या पतसंस्थेला आदर्श पतसंस्था पुरस्कार -२०२५ ने नुकतेच सन्मानित कण्यात आले.या पतसंस्थेला रूपये २५ ते ५० कोटी आर्थिक उलाढाल असलेल्या गटामधून सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षासाठी द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.,मुंबई यांच्या विद्यमाने आदर्श पतसंस्था पुरस्कार -२०२५ हा पुरस्कार सोहळा सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील , पाचगणी रोडवरील “क्लाऊड मिस्ट हॉटेल”, येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये श्री विश्वेश्वर सह. पतपेढीचा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे आयुक्त अनिल कवडे,मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक तसेच बृहन्मुंबई नागरी सह. पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई चे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था ,पुणे दिपक तावरे तसेच महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सह.पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई या संस्थेचे अध्यक्ष जिजाबा पवार आदि मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष दिलीप केळंबेकर, खजिनदार किशोर रसाळ, संचालक सदस्य लऊ सकपाळ, प्रमोद सातार्डेकर, अनिल राऊत,कमलाकर शेलार, मुख्य व्यवस्थापक दर्शन राऊत यांनी हा सन्मान स्विकारला. तसेच या दैदिप्यमान सोहळ्यास विविध पतसंस्थांचे संचालक मंडळ सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार कर्जदार व हितचिंतक या सर्वांच्या बहुमुल्य सहकार्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे तसेच सदर पुरस्कार म्हणजे आपल्या सर्व सभासदांचा सन्मान आहे,अशी भावना पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप केळंबेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर उल्हासनगर : उल्हासनगर आगरी सेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय विठ्ठलजी तुकाराम जोशी यांच्या सातवे पुण्यस्मरण दिनानिमित्त ठाणे जिल्हा आगरी सेना नेते विजय जोशी यांनी किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते आयोजित करण्यात आलेले या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोतीबिंदू निदान, व निवडक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया ठेवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम माणेरेगाव येथील सोमेश्वर पॅलेस या ठिकाणी शुक्रवारी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तसेच ह. भ. प राजेश महाराज देसाई यांचे कीर्तन व प्रवचन ठेवण्यात आले होते. नागरिकांनी कीर्तन व प्रवचनला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती भाजप जिल्हा प्रमुख नंदू परब , शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, नगरसेवक महेशजी पाटील, निलेशजी शिंदे, नवीनजी गवळी, आगरी सेना कार्यअध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी ठाणकर, संघर्ष समितीचे सुमित वजे, संजय फुलोरे ,नगरसेविका पूजा गायकवाड, कविता म्हात्रे , सरोज रॉय, इंदिरा तरे, हेमलता पावशे आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती उल्हासनगर आगरी सेना तालुकाप्रमुख जितेंद्र जोशी यांनी दिली.
साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नगरसेविका अर्चना पाटील यांच्याकडून निवेदन आरती परब दिवा: साबेगाव खाडी परिसरात दिवा शहरासाठी स्वतंत्र व भव्य गणेश विसर्जन घाट तसेच दशक्रिया विधीसाठी घाट उभारण्याची मागणी पुढे आली असून, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांची नगरसेविका अर्चना पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रस्तावासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळ यांची परवानगी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. दिवा शहरातील वाढती लोकवस्ती आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सध्या शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातच योग्य व सुरक्षित विसर्जन व्यवस्था उभी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना खासदारांना समजावून सांगितली. या संकल्पनेचे कौतुक करत “ही चांगली आणि उपयुक्त योजना आहे,” असे मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संबंधित विभागाला याबाबत पत्र पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. माजी उपमहापौर तथा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील आणि विभाग प्रमुख नीलेश पाटील हेही उपस्थित होते. या प्रस्तावित घाटामुळे दिवा शहरातील नागरिकांना गणेश विसर्जन व दशक्रिया विधींसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि स्थानिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हिंदू नव वर्ष शोभायात्रेतून संस्कृती जतन आणि प्रसाराचा प्रामाणिक प्रयत्न मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येणारी हिंदु नववर्ष शोभायात्रा ही केवळ मिरवणूक नसून आपल्या संस्कृतीचे जतन आणि प्रसार करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्या परंपरा, वेशभूषा, वाद्ये आणि गुढी उभारण्याची परंपरा समाजासमोर जिवंत ठेवण्याचे हे माध्यम ठरले, अशा शब्दांत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे यांनी वायंगणकर साई स्पोर्ट्स क्लब चे राकेश गजानन वायंगणकर यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचा गौरव केला. जेष्ठ पत्रकार कै. विजय वैद्य आणि कर्ममूर्ती श्री महादेव रानडे यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली ही शोभायात्रा समाजातील एकात्मता आणि बंधुभाव वृद्धिंगत करणारी ठरली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत एकतेचा सुंदर संदेश दिला. लेझीम, ढोल, लाठीकाठी, बाईक रॅलीमुळे शिस्त व संघभावना वृद्धिंगत झाली. किंबहुना ती तरुण पिढीला योग्य दिशा देणारी ठरली. बोरीवली पूर्व येथील वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या सौ. पल्लवी राकेश वायंगणकर, रुचिता व हर्षिता वायंगणकर यांच्या नियोजनातून ही भव्य दिव्य शोभायात्रा निघाली. या स्पोर्ट्स क्लब तर्फे लाठीकाठीचे मोफत प्रशिक्षण दिले जात असताना मुलांचे मनगट आणि हृदय देव, देश आणि धर्मासाठी प्रखर व्हावे हेच ध्येय समोर ठेवण्यात येते. शंखनाद, ढोल-ताशे आणि भगव्या ध्वजांनी परिसर दुमदुमला. अजय गजानन वायंगणकर व पूजा अजय वायंगणकर यांच्या शंखनादाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. सुविद्या प्रसारक संघाचे मंगुभाई दत्ताणी हायस्कूल येथील विद्यार्थी, ढोल-ताशा व लेझीम पथकांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. मुख्याध्यापिका सुनिता कामटे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विनोद जाधव यांचे योगदान यासाठी मोलाचे ठरले. स्थानिक महिला, संस्था, मंडळे आणि ओम साई सेवा मंडळ यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य दिव्य झाला.
विलेपार्ले येथील कामगार मेळाव्याला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती मुंबई प्रतिनिधी: भाजपा कामगार आघाडी, मुंबई यांच्या वतीने आयोजित कामगार मेळावा व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम विलेपार्ले येथील विश्वकर्मा बाग सभागृहात भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी तसेच भाजपा मुंबई सचिव आचार्य पवन त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर यांची मुंबई उपाध्यक्ष, विश्वकर्मा बाग चे अध्यक्ष तसेच सुतार-कारपेंटर समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे तुषार कथ्रेचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेले संजय पराडकर यांची मुंबई सचिव, तसेच फेरीवाल्यांच्या समस्यांसाठी कायम अग्रेसर असलेले प्रकाश वाकाणी यांची मुंबई उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बीमल बुटा, प्रवीण बोरानिया, निलेश परब आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा मुंबईच्या नव्या नियुक्तीनंतर कामगार आघाडीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच मेळावा ठरला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. आमदार पराग अळवणी म्हणाले, ‘भाजपा कामगार आघाडी ही केवळ संघटना नसून कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी एक मजबूत शक्ती आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कार्य अधिक बळकट करून कामगारांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवाव्यात.’ आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले, “भाजपाचे प्रत्येक कार्यकर्ते हे समाजाशी जोडलेले आहेत. कामगार आघाडीच्या माध्यमातून आपण कामगारांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करणे आवश्यक आहे.’ कामगार नेते अभिजीत राणे म्हणाले, ‘मुंबईतील कामगार वर्गाच्या सशक्तीकरणासाठी भाजपा कामगार आघाडी कटिबद्ध आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या बळावर आपण अधिक व्यापक स्तरावर कामगारांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करू.’ कार्यक्रमास मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले आणि आगामी काळात संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.