पत्रकार आरती मुळीक परब यांना मातृशोक
पत्रकार आरती मुळीक परब यांना मातृशोक दिवा, दि. २५ मार्च : पत्रकार आरती मुळीक परब यांच्या आई कै. सौ. लक्ष्मी चंद्रकांत मुळीक परब यांचे दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सायन…
trendlyne-news
पत्रकार आरती मुळीक परब यांना मातृशोक दिवा, दि. २५ मार्च : पत्रकार आरती मुळीक परब यांच्या आई कै. सौ. लक्ष्मी चंद्रकांत मुळीक परब यांचे दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सायन…
बंद असलेल्या बसेस ची वाहतूक पुन्हा सुरु करा शिवसेनेची मागणी मुंबई: देवीपाडा व जय महाराष्ट्र नगर, टाटा विद्युत संग्राही केंद्र, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील नागरिकांसाठी असलेली मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) बस क्र.२९९ व बस क्र. २९3 या बेस्टची बंद असलेली सेवा पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा १२ व १४ च्या वतीने करण्यात आली. ही बंद असलेली सेवा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी मागाठाणे डेपो प्रमुख जितेंद्र सामंत यांना भेटून लोकांच्या समस्या सविस्तर सांगितल्या व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मागाठाणे विधानसभा निरीक्षक, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मागाठाणे विधानसभाप्रमुख रेखाताई बोऱ्हाडे, उपविभागसंघटक सिमीतिनी नारकर, वैभवी तावडे, शाखाप्रमुख सचिन मोरे, माधुरी खानविलकर, वनिता दळवी, प्रतीक चव्हाण, दिनेश विचारे, मूर्तिकार नंदकिशोर शिवलकर, विजया गायकवाड, सीमा सानप, मंगल करडे, कौस्तुभ खानविलकर उपस्थित होते.
जलसंपदा अधिकाऱ्यांचा मृद-जलसंधारणात नियमबाह्य समावेश? पदोन्नतीसाठी ‘५० लाखांचा दर’ चर्चेत; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही चौकशी लांबणीवर मुंबई : राज्यात जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागात नियमबाह्य पद्धतीने समावेश करून त्यांना…
३० कलाकारांची अभूतपूर्व ऐतिहासिक शास्त्रीय स्वरमैफल ‘अर्घ्य २०२६’ पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत रंगली मुंबई: बांद्रा येथील बालगंधर्व रंगमंदिरात ‘अर्घ्य इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फाईन आर्ट फाउंडेशन’तर्फे आयोजित ‘अर्घ्य २०२६’ ही भव्य आणि ऐतिहासिक शास्त्रीय संगीत स्वरमैफल अत्यंत उत्साहात आणि रसिकांच्या दादेत पार पडली. संध्याकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात तब्बल ३० कलाकारांनी एकत्रित सादरीकरण करत एक अद्वितीय सांगीतिक अनुभव प्रेक्षकांना दिला. या विशेष स्वर मैफिलीत सतारवादक पं. रवी चारी, प्रख्यात गायक पं. राम देशपांडे, बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी, तबलावादक पं. योगेश साम्सी आणि पखवाजवादक श्री कृष्णा साळुंके या पाच दिग्गज कलाकारांनी आपल्या शिष्यांसह एकाच मंचावर सादरीकरण करत गुरु-शिष्य परंपरेचा भव्य आविष्कार साकारला. विविध घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या कलाकारांनी राग आणि ताल यांच्या शाश्वत संगमातून एक सुरेल, समन्वयपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारी ‘सिम्फनी’ साकारली. या कार्यक्रमाला पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची मुख्य अतिथी म्हणून लाभलेली उपस्थिती ही मैफलीची विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची आणि आध्यात्मिक अधोरेखित अर्थ प्राप्त झाला. आजच्या काळात फ्युजन संगीताचा प्रभाव वाढत असताना ‘अर्घ्य २०२६’ने शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीताचा एक भव्य आणि सखोल पर्याय रसिकांसमोर यशस्वीपणे मांडला. अनेक वाद्ये आणि स्वर एकत्र आणत तयार झालेल्या या संगीतमय संवादाने श्रोत्यांना भावनिक आणि ध्यानमग्न अनुभव दिला. ही केवळ एक मैफल नसून भारतीय संगीत परंपरेचा एक जिवंत उत्सव ठरला. ‘अर्घ्य २०२६’ने परंपरा, विद्वत्ता आणि भक्तिभाव यांचा संगम घडवत रसिकांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला.
उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २ एप्रिलला गडकरीमध्ये रंगतदार प्राथमिक फेरी ठाण्यात उत्साहात संपन्न ठाणे : सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा यांच्या सहकार्याने मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट आयोजित उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची रंगतदार प्राथमिक फेरी ठाण्यात उत्साहात पार पडली. अंतिम फेरी २ एप्रिलला सकाळी ११ वाजल्यापासून गडकरी रंगायतन, ठाणे येथे पार पडणार आहे. २२ मार्च रोजी गडकरी रंगायतन, तालीम हॉल मध्ये उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांचे वय हे ५० किंवा त्यापेक्षा जास्त असावं, या विशेष नियमामुळे ही स्पर्धा इतर स्पर्धांपेक्षा वेगळी ठरत आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून ठाणे, नवी मुंबई, मुंबई, चिपळूण, अलिबाग, नाशिक, सोलापूर, सातारा, कल्याण, पुणे इथल्या एकूण १५ संघांनी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. सॉफ्ट कॉर्नरचे एमडी आणि सीईओ दिलीप कुलकर्णी, त्यांच्या पत्नी आणि मुलासह स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि अनोख्या स्पर्धेचे कल्पनासूचक रवी मिश्रा देखील प्राथमिक फेरीतील एकांकिकांचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित होते. प्राथमिक फेरीसाठी एकांकिका, नाटक, सिनेमा, मालिका या क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाचा अनुभव असलेले विशाल कदम आणि विनोद जाधव हे परीक्षक होते. वयाची पन्नाशी उलटल्यानंतर राहून गेलेल्या किंवा जबाबदाऱ्यांमुळे मागे ठेवलेल्या इच्छा आणि कलागुणांना पुन्हा एकदा नव्याने वाव देता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांच्या जोश आणि उत्साहात आपण कुठे मागे पडतोय असेही होऊ नये म्हणून खास या वयोगटासाठी ही स्पर्धा आणि त्याला नवीन संहिता, उत्तम अभिनय याद्वारे मिळालेला प्रतिसाद याचे दोन्ही परीक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आणि सहभागी संघांना प्रोत्साहन दिले. तरुण वयात अनुभवलेला किंवा काही कारणास्तव राहून गेलेला रंगमंचावर प्रयोग सादर करण्याचा जोश अनेक वर्षांनी पुन्हा अनुभवता आला, अशा प्रतिक्रिया अनेक स्पर्धकांनी दिल्या. त्याचबरोबर स्पर्धेच्या आयोजनाचे आणि नियोजनाचे सुद्धा कौतुक केलं. स्पर्धेला आलेल्या प्रतिसादाचं कौतुक करत ही स्पर्धा अजून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावं, अशी इच्छा स्पर्धेचे आयोजक मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे प्रमुख प्रफुल्ल गायकवाड, कल्पिता पावसकर आणि शिशिर कोण्णुर यांनी व्यक्त केली. प्राथमिक फेरीतून प्राण, मुंबई – ‘साठी’, कला संस्कृती, ठाणे – ‘आर्टिकल २१’, रंगा थिएटर्स, ठाणे – ‘तरुणाई’, मित्र सहयोग, ठाणे – ‘अनोळखी’, ठाणे आर्टगिल्ड – ‘ती येते आणिक जाते’ या पाच एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. दमदार नाट्यप्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी शिशिर – ९९२०१३७८०५, प्रफुल्ल – ९००४९१२४६८, कल्पिता – ९१६७२४६८३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
गावदेवी मंडईत दहशत, भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला भाजप नगरसेवक संजय वाघुले यांची कठोर कारवाईची मागणी ठाणे : महापालिकेच्या गावदेवी मंडईत काही समाजकंटकांमुळे दहशत पसरली असून, एका समाजकंटकाने भाजी विक्रेत्यावर सोमवारी दुपारी हल्ला केला. या हल्ल्यात भाजी विक्रेता जखमी झाला आहे. या प्रकाराने विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी आरोपीविरोधात व प्रवेशद्वार बळकावणाऱ्या बेकायदा विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गावदेवी भाजी मंडईच्या प्रवेशद्वारावर बेकायदा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मंडईत ये-जा करणाऱ्या ग्राहकांनी तक्रार केल्यास, बेकायदा विक्रेत्यांकडून ग्राहकांना शिविगाळ केली जाते.त्यातील एक विक्रेता समाजकंटक नवनाथ वायकर याच्या आईचे मंडईत गाळे आहेत. मात्र, त्याच्याकडून व त्याच्या काही साथीदारांकडून प्रवेशद्वारालगत दुकाने उभारून अधिकृत भाजी विक्रेत्यांवर दादागिरी केली जात आहे. तसेच अनेक गाळेधारकांना मारहाणही करण्यात आली, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. गावदेवी मार्केटमध्ये किशोर नऱ्हे यांचे तीन गाळे आहेत. तर मार्केटमध्येच नवनाथ वायकर याच्या आईच्या नावावरील तीन गाळे आहेत. त्याच्याबरोबर अनेक गाळेधारकांचे सातत्याने वाद होत आहेत. मार्केटमधील एक जादा गाळा किशोर नऱ्हे यांच्या नावावर आहे. त्याच्या ताब्यावरून नवनाथ याच्याकडून धमक्या दिल्या जात होत्या. मार्केटमध्ये दिसल्यास जिवंत सोडणार नाही, अशी त्याने धमकी दिली होती, असे किशोर नऱ्हे यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. गावदेवी मंदिराबाहेरील श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्ताने गाळेधारकांकडून बुधवारी वर्गणी जमा केली जात होती. त्यावेळी नवनाथ याने किशोर नऱ्हे याच्यावर शहाळे सोलण्याच्या सुऱ्याने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. नवनाथ याने गाळेधारक अलका काजळे व प्रमिला कोल्हे यांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच पंकज काजळे यांनाही मारहाण केली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे गावदेवी भाजी मंडईमध्ये घबराट पसरली आहे. गावदेवी मंडईतील मूळ विक्रेते हे बेकायदा विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे हैराण झाले आहेत. या अतिक्रमणांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला.
ग्रामीण विकास, डिजिटल पारदर्शकता, सामाजिक सक्षमीकरणाला गती देणारा रु. ११६.९९ कोटीचा अर्थसंकल्प – रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या हा अर्थसंकल्प केवळ निधी वाटपाचा दस्तऐवज नसून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सक्षम, सुरक्षित आणि स्वावलंबी बनविण्याचा संकल्प आहे. सर्वांगीण ग्रामीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा, जलसुरक्षा व शाश्वत कृषी, सामाजिक सक्षमीकरण आणि डिजिटल पारदर्शक प्रशासन या पाच प्रमुख तत्वांवर आधारित हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. ई-गव्हर्नन्स व डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले. सन २०२६-२७ या वर्षासाठी एकूण अंदाजपत्रकीय जमा रु. ११६.९९ कोटी इतकी असून एकूण खर्च रु. ११६.९३ कोटी प्रस्तावित करण्यात आला आहे. वर्षअखेरीस रु. ५.८४ लाख इतकी शिल्लक अपेक्षित आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाने, उपायुक्त पशुसंवर्धन वल्लभ जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुल, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे आदी अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा मूळ अर्थसंकल्प बुधवार, २५ मार्चला सकाळी ११ वाजता बी. जे. हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्याकडे अर्थसंकल्पाची प्रत सुपूर्द केली. राज्यातील नागरी व ग्रामीण संस्कृतीचा समतोल साधत ठाणे जिल्हा परिषद ही विकासाच्या दृष्टीने अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. अशा या जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७चा मूळ अर्थसंकल्प सादर करताना मला अभिमान वाटतो. या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विकासाचा प्रत्येक पैलू लक्षात घेऊन रचनात्मक व परिणामकारक नियोजन करण्यात आले आहे. पंचायत सशक्तीकरण, ग्रामीण आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ठाणे जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळाले आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागासाठी रु. १.१५ कोटी तर संकीर्ण सामान्य प्रशासनासाठी रु. २.६१ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी रु. ११.३६ कोटी तर प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी रु. २.०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी बांधकाम विभागासाठी सर्वाधिक रु. १९.८७ कोटी निधी देण्यात आला आहे. लघुपाटबंधारे व जलसंधारण विभागासाठी रु. २.४८ कोटी, तर आरोग्य विभागासाठी रु. ३.७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी रु. २ कोटी निधी प्रस्तावित आहे. कृषी विभागासाठी रु. ३.७४ कोटी तर पशुसंवर्धन विभागासाठी रु. ३.७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागासाठी रु. ९.७९ कोटी व दिव्यांग कल्याणासाठी रु. ३.०५ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी रु. ४.८९ कोटी तर ग्रामपंचायत विभागासाठी मुद्रांक शुल्क वाटपासाठी रु. ३७.५० कोटी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी रु. ३.६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वित्त विभागासाठी विविध प्रशासकीय बाबींसाठी सुमारे रु. ०.६७ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारे सर्व विभागांना समतोल निधी वाटप करून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी माहिती दिली आहे.
बेकायदेशीर कर्जवसुलीविरोधात अॅड. श्वेता सराफ उतरल्या रस्त्यावर अनिल ठाणेकर ठाणे, ठाण्यातील अॅड.श्वेता सराफ यांनी सार्वजनिक रस्त्यांवर कार्यरत असलेल्या बेकायदेशीर कर्ज वसुली एजंटांच्या वाढत्या उपस्थिती बद्दल कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एक गंभीर चिंता औपचारिकपणे व्यक्त केली आहे. रस्त्यावर बेकायदेशीर पद्धतीने कर्जवसुली करणार्या एजंटांविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. काही अज्ञात व्यक्ती वाहन क्रमांकाची यादी घेवून रस्त्यावर वाहनचालकांना अडवून जबरदस्तीने कर्जवसुली करण्याचा प्रयत्न करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. काही अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या मधोमध वाहने थांबवत आहेत, नागरिकांशी वाद घालत आहेत आणि बळजबरीने व बेकायदेशीर मार्गांनी कर्जाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. संबंधित पोलीस अधिकार्यांकडे एक लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यात असे नमूद केले आहे की, अशी कृत्ये बेकायदेशीर असून ती छळवणुकीच्या स्वरूपाची आहेत आणि सार्वजनिक सुरक्षा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करतात. वसुली एजंटांना रस्त्यावर वाहने थांबवण्याचा किंवा वसुलीसाठी बळाचा वापर करण्याचा कोणताही अधिकार नाही. वकील श्वेता सराफ यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि रस्त्यावर कोणतीही अज्ञात व्यक्ती अशी कृत्ये करताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी यावर जोर दिला की, जबाबदार नागरिक म्हणून आपण कोणतीही बेकायदेशीर कृती सहन करू नये, जरी ती कर्ज थकवणार्यांशी संबंधित समस्या असली तरी. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीचा छळ किंवा बेकायदेशीर वागणूक दिली जाऊ शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.
कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी गुलदस्त्यात, महसूल विभागाची तिजोरी रिकामीच राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील शेकडो विट भट्टी मालकांना मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडुन किती राॅयल्टी वसुल केली हे गेली दोन वर्षांपासून गुलदस्त्यात असल्याने महसुल विभागाची तिजोरी रिकामीच असल्याचे दिसून येत असल्याने महसूल विभागाचे शेतच कुंपण खात असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.. मुरबाड तालुक्यातील शेकडो विट भट्टी मालक हे आक्टोबर नोव्हेंबर मध्ये विट भट्टी चा व्यवसाय सुरू करत असतात .हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ते प्रथम आपली जागा अकृषिक करतात.तसेच विट उत्पादनासाठी लागणारी माती शासन दरानुसार तहसीलदार कार्यालयाकडे राॅयल्टी भरतात.सालाबादप्रमाणे हे व्यावसायीक तहसीलदार कार्यालयात न चुकता आपली राॅयल्टी भरत असतात.परंतु सन २४-२५ या वर्षात तालुक्यातील शेकडो विट भट्टी मालकांनी राॅयल्टी भरली नसल्याने तहसीलदार कार्यालयाकडून सुमारे १७५ व्यवसायीकांना जुलै २०२५ राॅयल्टीची दंडात्मक नोटीस देण्यात आली.ती कारवाई गुलदस्त्यात असताना चालू वर्षी केवळ १९ व्यवसायीकांना नोटीस पाठवुन कागदी घोडे नाचवत असल्याचा प्रकार केला आहे. एक प्रकारे त्यांना सवलत देण्यात आल्याने शेकडो विट भट्ट्यांचे माध्यमातून सालाबादप्रमाणे तहसीलदार कार्यालयात जमा होणारे कोट्यवधी रुपये गेले कुठे? हा संतप्त सवाल उपस्थित केला जात असल्याने शासनाला विविध योजना राबविण्यासाठी लागणारा निधी मिळविण्यात महत्वाचा दुवा असलेला असलेला महसूल विभागच या राॅयल्टी चे माध्यमातून शासनाचे तिजोरीची लुटमार करत असेल तर महसुल विभागाचे शेतच कुंपन खात असल्याचे स्पष्ट होत आहे. विट पिकवण्यासाठी लागणारा दगडी कोळसा दररोज हजारो टन विक्री होत असुन त्याला कोणत्याही प्रकारची राॅयल्टी आकारली जात नाही. सध्या मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते पेव्हर ब्लॉक ने तयार केले जात असल्याने.तालुक्यात ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉक चे तसेच सिमेंट पोल.व सिमेंट प्लेट तयार करण्यासाठी लागणारी खडी ,व रेती शेकडो ब्रासने वापरली जात असुन या व्यवसायीकांवर देखील राॅयल्टी आकारली जात आहे. मी किरकोळ विटांचे उत्पादन करतो तरी जबरदस्तीने राॅयल्टी घेतली.तिचे चलन भरणा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातुन संमती पत्र मिळत नाही. परंतु जे विट भट्टी मालक केवळ शंभर ब्रास राॅयल्टी काढतात आणि सुमारे पंचवीस ते तीस लाख विटांचे उत्पादन घेतात.त्यांना आजपर्यंत तहसीलदार कार्यालयाकडून राॅयल्टी दिली नाही. एक विट भट्टी मालक. याबाबत गौण खनिज दक्षता पथकाने निरिक्षक संजय जाधव व उपविभागीय अधिकारी कल्याण.विश्वास गुजर.यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.
एकनाथ शिंदे यांचे हस्ते, २९ मार्चला गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा भव्य अमृतमहोत्सवी सत्कार अनिल ठाणेकर ठाणे, आपल्या गायकीने मराठी गढल सातासमुद्रापार पोहोचविणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा निमित्त ‘स्नेहगझल’ या भव्य सोहळ्याचे आयोजन २९ मार्च, दुपारी ४.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमराव पांचाळे यांचा सत्कार करण्यात येणार असून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रख्यात गायक पद्मश्री सुरेश वाडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या सोहळ्याच्या निमित्ताने गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॅा. भाग्यश्री पांचाळे यांची मराठी आणि उर्दू गझलांची भावरम्य स्नेहमैफिल होणार आहे.मराठी गझलला केवळ महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार पोहोचविणारे, मराठी गजलला आपल्या कतृत्वाने नावलौकिक मिळवून देणारे गझलनवाज पं. भीमराव पांचाळे ३० मार्चला अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. गझल सम्राट सुरेश भटसाहेबांनंतर मराठी गझलला सुवर्णकाळ प्राप्त करून देण्याचे प्रामाणिक काम त्यांनी केले आहे. मराठी गझलला सातासमुद्रापार नेले. तिला लोकप्रियता मिळवून दिली. गझल कार्यशाळा, गझल मुशायरे, गझल मैफिली आयोजित करून मराठी गझल लोकप्रिय करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मराठी गझलला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये अखिल भारतीय मराठी गझल संमेलने आयोजित केली. या प्रवासात त्यांना अनेक साथीदार मिळाले. त्यांच्या साथीने हा गझलप्रवास अधिक व्यापक आणि समृद्ध होत गेला. त्या सर्व जुन्या-नव्या साथीदारांच्या साक्षीने हा साहळा नटणार आहे. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी मराठी गजलसाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल राज्य आणि केंद्र शासन तसेच अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने भारतरत्न लता मंगेशकर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या सोहळ्याचे निमित्त साधून गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॅा. भाग्यश्री पांचाळे यांची मराठी आणि उर्दू गझलांची भावरम्य मैफिल आयोजित करण्यात आली असून ही मैफिल सर्वांसाठी विनाशुल्क आहे. या मैफिलीच्या सन्मानिका राम गणेश गडकरी रंगायतन येथे उपलब्ध असणार आहेत. तरी गझल रसिकांनी या मैफिलीचा लाभ घ्यावा असे आवाहन गझलनवाज भीमराव पांचाळे सत्कार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.