Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

बाबासाहेबांच्या विचारांच्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी सारख्या संस्था समाजाचा उत्कर्ष करतील- ॲड. संघराज रुपवते

बाबासाहेबांच्या विचारांच्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी सारख्या संस्था समाजाचा उत्कर्ष करतील- ॲड. संघराज रुपवते अनिल ठाणेकर ठाणे, मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात “अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी”चा तिसरा वर्धापन दिन सोहळा,संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक ज.वि.पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शानदारपणे साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्ता ॲडव्होकेट संघराज रुपवते यांनी अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या लौकिकाला साजेल असं,गालिब पासून वामनदादा कर्डक यांच्या शेरोशायरीची पाखरण करत ‘काव्यमय न्याय’देणारं भाष्य केलं. ते म्हणाले, ‘आजच्या नेत्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. परंतु अपरान्त सारख्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणाऱ्या साहित्यिक संस्था बाबासाहेबांचे विचार नक्कीच पुढे नेतील.’ अपरान्तचे सरचिटणीस पत्रकार संदेश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात चिपळूण,कणकवली आणि क्रांती भूमी महाड येथे भरवलेल्या तीन “सम्यक साहित्य संगीती” पुस्तक प्रकाशन,काव्य संमेलनं,अपरान्त विशेषांक वगैरे वाटचाली विषयी आढावा घेतला.केंद्रीय उपाध्यक्ष आणि  पदसिद्ध रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजय गमरे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले,”संस्था आणि व्हाट्सअप ग्रुप या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आजच्या वर्धापन दिनापेक्षा जिल्हास्तरीय कार्यक्रमाला भरपूर गर्दी असते. संघटनेची भरीव बांधणी अद्याप म्हणावी तशी झालेली नाही. ‘पुस्तक पूर्व प्रकाशन योजना’ अपरान्तच्या वतीने राबवली गेली पाहिजे.”कार्याध्यक्ष प्राध्यापक आनंद देवडेकर सर म्हणाले,”अपरान्त संस्था बुद्धिझम आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या मार्गानेच गेली पाहिजे. इतर संस्थेसारखी त्याची जडणघडण न होता. ध्येय आणि उद्दिष्ट लक्षात ठेवून संस्थेची वाटचाल केली पाहिजे.”आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पॅंथर आणि साहित्यिक ज.वि.पवार यांनी केंद्रीय कार्यकारिणी आणि उपस्थितांना भावनिक आवाहन केले. “तुम्ही सगळेजण चांगलं काम करीत आहात. माझ्या सहवासातल्या प्रत्येक लेखकाचं पुस्तक लवकरात लवकर आलं पाहिजे. मी अजूनही काम करीत आहे. करीत राहणार! परंतु इतक्या प्रदीर्घ वाटचालीने थकलो आहे. तरी तुम्ही माझ्या खांद्यावर उभे रहा.आणि अपरान्तच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचे दूरदृष्टीने व्हिजन पहा.मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करीन.”अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट संघराज रूपवते, विद्यमान संस्थापक अध्यक्ष ज.वी.पवार ,कार्याध्यक्ष प्रा.आनंद देवडेकर,ज्येष्ठ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रीधर पवार यांच्या अमेरिका स्थित आंबेडकरी चळवळ चालवणाऱ्या मुलीचे सृजनाचे दोन इंटरव्यू असलेले छोट्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले.

दिव्यांग मुलांसाठी निवारागृह, संस्थांना विशेष योजनांचा लाभ – संजय केळकर

दिव्यांग मुलांसाठी निवारागृह, संस्थांना विशेष योजनांचा लाभ – संजय केळकर अनिल ठाणेकर मुंबई : ठाण्यासह राज्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांची तपासणी करताना अनुदान रोखण्यात येऊ नये, ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थ्यांना निवारा गृहासाठी दिव्यांग कल्याण विभागाने कार्यवाही करावी, आदी मागण्या आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केल्या. दिव्यांगांचे सक्षमीकरण आणि पुनर्वसनासंदर्भात उपस्थित प्रश्नावर चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी विविध मागण्या मांडल्या. राज्य शासनाने दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि पुनर्वसनासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, परंतु त्या संस्थांपर्यंत पोहोचत नसल्याचे केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सध्या संस्थांची तपासणी सुरू असून ती किचकट न होता सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या या संस्थांकडे सहकार्याच्या भूमिकेतून पाहण्यात यावे, तपासणी करत असताना त्यांचे अनुदान सुरूच ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली असली तरी या विभागाला स्वतंत्र प्रभारी अधिकारी देण्यात आलेला नाही. या  अधिकाऱ्याची नियुक्ती कधी करणार, असे विचारताना केळकर यांनी सोयीच्या कारभारासाठी जिल्हानिहाय कार्यालये कधी सुरू करणार असा प्रश्नही उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी प्रलंबित विषय मार्गी लावण्यात येत असल्याची माहिती दिली. एमपीएससी परीक्षा झालेल्या असून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिव्यांग कल्याण विभागाला स्वतंत्र अधिकारी देण्यात येईल, असे मंत्री  सावे यांनी सांगितले. ठाण्यातील जागृती पालक संस्था गेली २५ वर्षे दिव्यांगांसाठी काम करत असून त्यांच्याकडे असलेले विद्यार्थी १८ वर्षांहून अधिक वयाचे आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी निवारागृह उभारण्यासाठी संस्था जागेच्या शोधात आहे. दिव्यांग कल्याण विभागाने याकरिता सहकार्य करताना अशा संस्थांसाठी विशेष योजना राबवण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.

सुधारणा विधेयक `ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या’च्या खडतर आयुष्याच्या वाटेवर नवीन आशेचा किरण – नरेश म्हस्के

सुधारणा विधेयक `ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या’च्या खडतर आयुष्याच्या वाटेवर नवीन आशेचा किरण – नरेश म्हस्के अनिल ठाणेकर नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या `ट्रान्सजेंडर व्यक्ती : हक्क-संरक्षण-सुधारणा विधेयक, २०२६’ या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर संसदेत चर्चा करतांना आज शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी या  ऐतिहासिक विधेयकाचे स्वागत करत शिवसेना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्षे दूर ठेवलेल्या ट्रान्सजेंडर बांधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणं ही काळाची गरज आहे. विकास हा तेव्हाच खरा ठरतो जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचतो, असे मत खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकाचे समर्थन करताना ठामपणे मांडले. यावेळी उपमुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या ‘महाराष्ट्र ट्रान्सजेंडर धोरण 2024’चा खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उल्लेख करत, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे या समाजाला विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असल्याचं सांगितलं. ओळखपत्र, रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे त्यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. या विधेयकातील तरतुदींमुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या घरातून किंवा समाजातून हाकलून देणं, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास अडथळा निर्माण करणं किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणं हा गुन्हा ठरणार आहे. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषणाविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आल्यामुळे या समाजाला सुरक्षिततेची नवी हमी मिळणार  असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत, ‘SMILE’ योजनेअंतर्गत गरिमा गृह, राष्ट्रीय ट्रान्सजेंडर परिषद, तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या सकारात्मक निर्णयांमुळे या समाजाचा आत्मविश्वास वाढत असल्याचंही खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलं. ट्रान्सजेंडर व्यक्ती हे आपल्या समाजाचाच अविभाज्य भाग असून त्यांना तिरस्कार नव्हे तर सन्मान मिळाला पाहिजे, असं मतही खासदार नरेश म्हस्के यांनी ठामपणे मांडलं.राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांनी एकत्र येत या विधेयकाला सर्वानुमते मंजुरी द्यावी, असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी करत, प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीचा सन्मान करणारा, समावेशक आणि संवेदनशील भारत घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न

‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न अनिल ठाणेकर सांगली, स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था संचलित, बाबा नाईक महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांच्या हस्ते झाले. बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. एम. एस. देशमुख यांनी भारताच्या ७९ वर्षांच्या कृषी प्रवासाचा आढावा घेतला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला पाटील होत्या. या सत्राचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद राठोड यांनी केले. प्रथम सत्र: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय ठिगळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. जयवंत इंगळे यांनी भूषवले. या सत्राचे आभार प्रो.डॉ.के.आर.गावडे यांनी मानले.द्वितीय सत्र: पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथील डॉ. कुलविंदर सिंग यांनी १९४७ मधील कृषी स्थिती आणि आजची शाश्वतता यातील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. मनोहर कोरे होते.या परिषदेसाठी तांत्रिक सहाय्य आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रो. डॉ. अनिल काटे आणि प्रा.डॉ. संदीप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस. डी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश कांबळे यांनी मानले. या ऑनलाईन परिषदेत देशातील विविध भागांतून प्राध्यापक आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी मनसे आक्रमक

 दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी मनसे आक्रमक मुंबई : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरु करण्यासाठी आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली…

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट ?

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट ? मुंबई : अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या मते यंदा केवळ २० टक्केच हापूस उत्पादन होणार आहे. त्यामुळे केवळ आंबा उत्पादकच नाही तर हापूसशी संबंधित सर्व पूरक व्यवसायांवरही मोठा परिणाम होताना दिसतोय. कोकणातील…

भोंदूबाबाच्या आहारी जाणाऱ्या केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी

भोंदूबाबाच्या आहारी जाणाऱ्या केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी राजन चव्हाण सावंतवाडी:  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी ठाकरे सेना आक्रमक बनली असून  सेनेच्या वतीने शहरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. अशोक खरात प्रकरणी आमदार दीपक…

धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा मिळणार नाही – सुप्रीम कोर्ट

धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा मिळणार नाही – सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली : “हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही”, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च…

भयंकर : भोंदूबाबा खरातने ५ नरबळी दिल्याचा संशय

भयंकर : भोंदूबाबा खरातने ५ नरबळी दिल्याचा संशय खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी   रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार ० हरिभाऊ लाखे नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातच्या रोज नवनवीन भानगडी उघडकीस येत आहेत. सिद्धी प्राप्त करण्यासाठी या…

नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही’

नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही’ स्लग- निरोप समारंभात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी स्वाती घोसाळकर मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत त्यांच्यासह इतर एकुण ९…