Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकुल

नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत देशात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले. मुस्लिम महिलांना वारसा हक्कात समान अधिकार मिळावेत, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान…

 मूळ भाजपा कार्यकर्ते व राणे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगणार…!

मूळ भाजपा कार्यकर्ते व राणे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगणार…! जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना पक्षविरोधी कारवाईबद्दल निलंबित करण्याची मागणी…! वेंगुर्ला (प्रतिनिधी)– सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघातील रहिवासी व स्वतःला भाजपचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख करून देणारे समीर रुक्मांगद कुडाळकर यांनी प्रदेश भाजपा अध्यक्षांकडे निवेदन सादर करून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि राणे समर्थक भाजपा नेते मनीष दळवी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. कट्टर राणे समर्थक असलेले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे दळवी यांच्या विरोधात मुळच्या भाजपा कार्यकर्त्यांनी सुरुंग पेरायला सुरुवात केली असून यामागे ‘त्या ‘अदृश्य शक्तीचा हात असल्याची चर्चा भाजपा कार्यकर्ते आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांमागे रंगली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारी निश्चित करण्याचे अधिकार पक्षाकडून मनीष दळवी यांना देण्यात आले होते. मात्र या अधिकारांचा वापर करताना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता काही निर्णय घेतले गेल्याचा आरोप कुडाळकर यांनी या निवेदनात केला आहे. या निर्णयांमुळे तालुक्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार असतानाही मनीष दळवी यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून निवडणूक अर्ज दाखल केल्याचे कुडाळकर यांनी निवेदनात म्हटले आहे. सुरुवातीला जिल्हा परिषदेसाठी आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाच्या आदेशानंतर आपण आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर मनीष दळवी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आडेली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली याकडे कुडाळकर यांनी लक्ष वेधले असून त्यामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यासोबतच वेंगुर्ला तालुक्यातील उमेदवारी वाटप, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवादाचा अभाव, तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना दिलेल्या छुप्या  पाठिंब्याबाबतही कुडाळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची पक्षाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे. निवडणूक काळात काही निर्णयांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या वेळीही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पुरेसे महत्व दिले नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. दरम्यान, कुडाळकर यांनी आपल्या निलंबनाबाबतही आक्षेप घेतला असून, त्यांनी पंचायत समितीची निवडणूक अपक्ष उमेदवाराविरुद्ध लढवली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पक्षातून केलेले त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात मनीष दळवी किंवा भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र स्थानिक पातळीवर या निवेदनाची चर्चा रंगली असून प्रदेशाध्यक्ष   याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जि. प. आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर या अदृश्य शक्तीने राणे समर्थकांचे वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आपले लक्ष वळवले असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ना अर्थ… ना संकल्प…  जयंत पाटीलांचा हल्लाबोल 

  मुंबई –     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ना ‘अर्थ’ आहे… ना कोणता ‘संकल्प’ आहे….या अर्थसंकल्पातून फक्त काँट्रॅक्टर लोकांचे भले होणार आहे आणि तेही फक्त मोठे काँट्रॅक्टर…

सिंधुदुर्ग भाजपात पेटलो आतलो बाहेरचो वाद !

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना पक्षविरोधी कारवाईबद्दल निलंबित करण्याची मागणी…! वेंगुर्ला (प्रतिनिधी)– सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय…

माथेरान नगरपरिषदेच्या कामकाजाबाबतीत स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर

माथेरान नगरपरिषदेच्या कामकाजाबाबतीत स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर मुकुंद रांजणे माथेरान: माथेरान नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासकीय राजवटीत अधिकारी, कर्मचारी वेळ मिळेल त्याप्रमाणे हजर राहून कार्यालयीन कामकाज कसेतरी पहात होते. चार ते पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने त्यावेळी या कार्यालयावर येथील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी अंकुश ठेवणे गरजेचे होते परंतु केवळ सभागृहात सदस्य पद नसल्याने प्रत्येकाचा अहंभाव आड येत होता. त्यामुळे गावातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या कार्यालयाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजच्या घडीला नगरपरिषदेत सत्ताधारी गट स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी सुद्धा तीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. दुपारी बारा वाजले तरी कुणी अधिकारी अथवा कार्यालयीन कामकाज पाहणारा द्वितीय श्रेणीतील अधिकारी वर्ग हजर नसतात. ज्या काही मुली मानधनावर कार्यरत आहेत त्याच काहिनाकाही कामे करत आहेत. नागरिकांना घरभाडे भरावयाचे असल्यास अथवा अन्य काही कामे करून घ्यावयाची झाल्यास अधिकारी नसल्याने नागरिकांना भर उन्हातान्हात  फेऱ्या माराव्या लागत आहेत. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी निदान यापुढे तरी अधिकारी वर्गावर अंकुश ठेवतील की नाही अन्यथा निश्चितच माथेरानचे भवितव्य अंधकारमय आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेकदा अमुक अधिकारी अलिबागला मिटिंगला गेलेत तर कुणी मंत्रालयात गेलेत अशीही उत्तरे ऐकावयास मिळतात. या सर्व कामानिमित्त जाणाऱ्या अधिकारी वर्गाची नोंद हलचल रजिस्टर मध्ये केली जात आहे की नाही, ही मंडळी खरोखरच मिटिंगच्या बहाण्याने कर्तव्य पार पाडतात की घरीच असतात असाही प्रश्न स्थानिकांमधुन विचारला जात आहे.

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी सोहळा आज लोकभवन येथे पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या…

मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक

पश्चिम विभाग आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक कल्याण: एच.एस.एन.सी. विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी पश्चिम विभाग आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ (पुरुष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठित स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले असून संघाची अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात एसएसटी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत पोटावाड याने प्रतिनिधित्व केले. अनिकेतने संघासाठी उत्कृष्ट खेळ करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. मुंबई विद्यापीठाच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट रणनीती, संयम आणि कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे संघाला पश्चिम विभागातील बलाढ्य विद्यापीठांमध्ये आपले स्थान सिद्ध करता आले. या कामगिरीमुळे आता मुंबई विद्यापीठाचा संघ अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणार असून देशभरातील विविध विद्यापीठांशी सामना करणार आहे. या संघासाठी मार्गदर्शक म्हणून अमित भोजने आणि मार्गदर्शक म्हणून उमेश सोनवणे यांची निवड झालेली आहे. अनिकेत पोटावाडच्या या उल्लेखनीय यशाबद्दल एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि क्रीडा विभागाने त्याचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

युद्धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गॅसची आणीबाणी

युद्धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात गॅसची आणीबाणी स्लग – केंद्र सरकारकडून गॅससाठी एस्मा कायदा लागू गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आधी घरगुती गॅसला प्राधान्य मग औद्योगिक वापरासाठी होणार…

पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे – हर्षाली चौधरी

पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे – हर्षाली चौधरी कल्याण: पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे आणि मुलीच्या करिअरला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन महापौर हर्षाली चौधरी यांनी केले.   कल्याण (प.) येथील सिटी पार्कच्या निसर्गरम्य परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सिटी पार्क मॅनेजमेंट यांच्या सयुक्त विद्यमाने ‘अहिल्या-जागर-स्त्री शक्तिचा’ या उक्तीनुसार आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. महिलांचे योगदान सेलिब्रेट करण्यासाठी हा कार्यक्रम करित आहेात ,सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महापालिका देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाची सुरवात सुमधुर उडत्या गाण्यांनी झाली. या सुरावटींवर तरुणाईने ठेका धरल्याने सर्व वातावरण या सुरांनी भारुन गेले. या कार्यक्रमात ‘स्टोरी ऑफ चेंज’ या आशयाखाली आज तक वृत्तवाहिनीच्या अनुजा धाक्रस, MD Miss India २०२० गजनंदीनी, ठाण्यातील पहिल्या स्टेशन मॅनेजर अपर्णा देवधर, पॉवर लिफटींग मध्ये गोल्ड मेडेल्स मिळवलेल्या गिरिजेश कुमारी, ठाणे जिल्ह्यातील नॅशनल कुस्ती पटू माधवी कुरले या महिलांचा सत्कार महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे हस्ते करण्यात आला. विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी बजावलेल्या या महिलांनी आपल्या मनोगतात उपस्थित सर्व महिलांना यशाचा अथक श्रमाने पाठपुरावा करणे बाबत संदेश दिला. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या आठ महिलांचा देखील सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे बचत गटातील स्वच्छता मार्शल म्हणून नेमणूक केलेल्या महिलांचा तसेच दामिनी पथकातील पोलिस मार्शलचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिका क्षेत्रातील निराधार महिलांना आणि बचत गटांना प्रातिनिधीक स्वरुपात अनुदानाचे वितरणही या वेळी करण्यात आले. यावेळी  करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने उपस्थित महिला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पालिका सदस्य रेश्मा निचळ, शितल मंडारी, अनघा देवळेकर, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड, रामदास कोकरे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबई मराठी पत्रकार संघात ‘एआय परिषद २०२६’ चे आयोजन

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे माध्यमविश्वात मोठे परिवर्तन घडत आहे. पत्रकारिता, कथाकथन आणि चित्रपट निर्मिती यामध्ये एआय च्या वाढत्या वापराचा वेध…