Month: April 2026

शिक्षकांना मिळणार थकबाकी!

शिक्षकांना मिळणार थकबाकी! मुंबई पालिका प्रशासनाकडून प्रलंबित मागण्या मान्य मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची जून-जुलैपासून थकबाकी देण्यात येणार आहे. त्याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून असलेली प्रवास भत्त्याची मागणीही मान्य करण्यात आली असून पुढील महिन्यात याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात श्रमिक पालिका शाळेतील शिक्षकांना मासिक २,७०० प्रवास भत्ता मिळतो. तर प्राथमिक अनुदानित शाळेतील २,५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अवघा ६०० रुपये प्रवास भत्ता मिळतो. पण यावर तोडगा निघाला असून महापालिकेने प्रवास भत्ता देण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती कामगार नेते प्रशांत पाटील यांनी दिली. उत्कर्ष सभा यांच्या पदाधिकाऱ्यांची कामगार नेते प्रसाद लाड, बाबा कदम, भालचंद्र साळवी, प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर, उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर यांच्या सोबत बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासनाने काही प्रलंबित मागण्या मान्य केल्या. पालिकेच्या अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आला. पण अद्याप सातवा वेतन आयोगाची थकबाकी मिळालेली नाही. मात्र या बैठकीत जून-जुलैपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता देण्याचे मान्य केले आहे.

फुले – आंबेडकर – गाडगे महाराज यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला

फुले – आंबेडकर – गाडगे महाराज यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला सुनील कदम यांचे प्रतिपादन अभिनव महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह अरविंद जोशी मिरा – भाईंदर : ‘महात्मा फुले हे त्या काळातील मोठे उद्योजक होते. ते रोड कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी मुंबईतील अनेक इमारती बांधल्या. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त काम फुले यांनी केले. शेतमालाच्या मार्केटिंगचं काम त्यांनी केलं. समाजातील अंधश्रद्दा दूर करण्याचं काम  फुले, संत गाडगे महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. फुलेंच्या कार्याचा गौरव म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. संत गाडगे महाराजांनी देव दगडात नाही, तर माणसात आहे हे सांगितलं. या महापुरुषांचा विचार आजच्या परिप्रेक्षात समजून घ्यावा लागेल,’ असे प्रतिपादन समान संधी अभियानाचे प्रणेते सुनील कदम यांनी केले. भाईंदर येथील अभिनव महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात आला होता, त्यानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र गीतानंतर पाहुण्यांचा परिचय प्रा. राजेश सोनवणे यांनी करून दिला. त्यानंतर प्रा. वैष्णवी पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी कॅप्टन अजित खेडकर, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष किरण पाटील व प्राचार्य डॉ. ऑल्विन मेनेजिस यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास मिडिया विभाग प्रमुख प्रा. उत्तम भगत यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी उपस्थित होते. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अमोल पाटील, कार्यवाह मंगेश पाटील, सहकार्यवाह प्रकाश पाटील, खजिनदार अशोक पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष विष्णू पाटील तसेच सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ठाण्यात भव्य ‘महिला मेळावा’ संपन्न

सामाजिक समता सप्ताहानिमित्त ठाणे :- अनुसूचित जाती, जमाती आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संपूर्ण राज्यात ८ ते १४ एप्रिल…

इंदू मील मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास महायुती सरकारकडून वेळकाढूपणा, ठोस धोरण व योग्य नियोजन नसल्याने स्मारकास विलंब- वर्षा गायकवाड.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार फक्त अदानी अंबानीसाठी असून देश विकण्याचे काम बिनबोभाट सुरु आहे. सरकारकडे कोणतेही निश्चित धोरण, नियोजन व आर्थिक शिस्त नसल्याने अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होत…

केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

अग्निशमन सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कल्याण:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये २०० हुन अधिक सायकलिस्टने भाग घेतला. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरवात करण्यात आली.  १४ एप्रिल ते २० एप्रिल देशभर अग्निशमन सप्ताहाचं आयोजन केले जाते. केडीएमसी अग्निशमन दलाकडून सप्ताह साजरा केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.  रक्तदान शिबीर, सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना अपघात कसे टाळावे, आपत्कालीन परिस्थिती आली तर काय करावे याबाबत जनजागृती करण्यात आली. ०००००००

ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा, प्रभादेवी-२०२६.

मुंबईतील वरळी येथे आजपसून होणाऱ्या पहिल्या पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर. वरळीकरांना प्रो-कबड्डी स्टार खेळाडू्नच्या खेळाची मेजवानी पुढील चार दिवस मिळणार. मुंबई :- ओम् ज्ञानदीप मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १४ एप्रिलला सुरु होणाऱ्या हंगामातील पहिल्या पुरुष व्यवसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली. युवा पलटण विरुद्ध स्वामी समर्थ स्पोर्टस्, आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध न्यू इंडिया एन्शुरन्स या दोन लढातीने या स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्ताने ओम् ज्ञानदीप मंडळाने प्रभादेवी, वरळी येथील कबड्डी रसिकाना प्रो-कबड्डी स्टार खेळाडूचा खेळ प्रत्यक्ष पहाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. वरळी, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावरील मॅटच्या २ क्रीडागणावर ही स्पर्धा संध्याकाळी ६ ते १० या वेळेत प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येईल. या स्पर्धेची तयारी जोमाने सुरु असून स्पर्धेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून ओम् ज्ञानदीप मंडळाचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या स्पर्धेचे उदघाटन स्थानिक विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे व आमदार महेश सावंत यांच्या हस्ते संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १८ व्यावसायिक पुरुष संघांची ६ गटात विभागणी करण्यात आली. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. स्पर्धेची गटवारी आज प्रसार माध्यमाकरिता एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली. पुरुष व्यावसायिक गट विभागणी :- १) अ गट :- १) युवा पलटण, २) मुंबई पोष्टल, ३)स्वामी समर्थ स्पोर्टस्. २) ब गट :- १) भारत पेट्रोलियम, २) पश्चिम रेल्वे, ३) न्यू इंडिया एन्शुरन्स.…

युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केली ‘प्रताप सरनाईक प्रीमिअर लीग’ची घोषणा!

अनिल ठाणेकर ठाणे: मैदानात उडणारी धूळ, प्रेक्षकांचा चित्कार आणि बॅटमधून सुटलेले ते सणसणीत चौकार-षटकार यांच्या साक्षीत मीरा-भाईंदर शहराच्या क्रीडा इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप  सरनाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, मीरा-भाईंदर शहरात क्रिकेटचा आतापर्यंतचा सर्वात भव्य उत्सव रंगणार आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या तर्फे ‘प्रताप सरनाईक प्रीमिअर लीग (PSPL)’ या ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, भाईंदर पश्चिम येथे २४ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान पार पडणार असल्याची घोषणा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. ही स्पर्धा केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून, यात संपूर्ण भारताची ‘क्रिकेट क्रेझ’ पाहायला मिळणार आहे. मीरा-भाईंदर शहरात साकार होणारी ही स्पर्धा केवळ खेळ नसून एक उत्सव आहे. एका बाजूला भारतातील कानाकोपऱ्यातून आलेले १६ दिग्गज ऑल इंडिया संघ आपली ताकद दाखवतील, तर दुसऱ्या बाजूला ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील १६ स्थानिक संघ आपल्या मातीतील टॅलेंट सिद्ध करतील. या स्पर्धेत एकूण ३२ संघ आपले कसब पणाला लावणार आहेत. ऑल इंडिया टीम्स च्या विजयी संघाला २१ लाख रुपयांचे परितोषिक, रनरअप संघाला ११ लाख रुपयांचे परितोषिक तसेच मॅन ऑफ दि सिरीजला लॅविश चारचाकी गाडी तर बेस्ट बॅटसमॅन, बेस्ट बॉलर आणि इमर्जिंग प्लेअरला शानदार दुचाकी पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. त्याचप्रकारे ठाणे, मीरा-भाईंदर स्पर्धेतील १६ संघातील विजयी संघाला ५ लाख रुपये पारितोषिक, रनरअपला ३ लाख रुपये पारितोषिक, मॅन ऑफ दि सिरीजला शानदार दुचाकी तर बेस्ट बॅटसमॅन, बेस्ट बॉलर आणि इमर्जिंग प्लेअरला २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त होणार आहे. २४ ते २९ एप्रिल या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (भाईंदर प.) येथे क्रिकेटचे मैदान ताऱ्यांनी लखलखणार आहे. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड-मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवणार आहेत. यावेळी बोलताना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणतात कि, ‘खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘प्रेसिडेंट कप’ च्या यशानंतर, आता पीएसपीएलच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना थेट राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. ही स्पर्धा मीरा-भाईंदरच्या क्रीडा संस्कृतीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल. खेळ रंगणार, रेकॉर्ड हि तुटणार. स्थानिक क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची आणि आपली जादू दाखविण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. मीरा-भाईंदरच्या क्रीडा इतिहासात ही स्पर्धा सुवर्णअक्षरांनी लिहिली जाईल” असा विश्वास युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. क्रिकेट रसिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. ०००००

वाशी येथे राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला सुरुवात

नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी येथे ६० व्या सिनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेला आज सकाळी ९…

बालवीर स्पोर्ट्स क्लब चेंबूर, अंबिका सेवा मंडळ कुर्ला संघ विजेते

कुमार गट प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धा मुंबई : राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, गौरीशंकर क्रीडा मंडळ कुर्ला आणि कुर्ला क्रीडा केंद्र कुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी…

क्रॉस मैदानावर रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या टी-२० स्पर्धेला दमदार सुरुवात उपशीर्षक :

उद्घाटन सोहळा बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर व प्रशिक्षक नौशाद खान यांच्या हस्ते संपन्न मुंबई : रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित पुरुष/महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२६-२७ ला आज १३ एप्रिल रोजी चर्चगेट येथील क्रॉस मैदानावर…