Month: June 2026

 नारायणराव आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

– मुंबई महापौर चषक ॲक्रोबॅटिक्स  जिम्नॅस्टिक्स स्पर्धा मुंबई : यजमान श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स  जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेते पदाचा मान पटकावला. चेंबूर…

 भांडुपकरांची पाण्यासाठी वणवण

 पालिकेच्या निष्काळजीपणा विरोधात जल अभियंत्यांकडे धाव – डोंगराळ भागातील नागरिकांचा संताप उफाळला! मुंबई : भांडुप विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, विशेषतः डोंगराळ भागातील रहिवाशांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ते डोंगराळ भागात पोहोचत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पाणीपुरवठा व प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज वरळी येथे जल अभियंता दिलीप पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक सुरेश शिंदे,  नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, शाखाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत भांडुपमधील डोंगराळ भागात पाणी पुरेशा दाबाने पोहोचत नसल्याचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडण्यात आला. अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येला सामोरे जात असताना पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली. विशेषतः उंच भागातील वस्त्यांमध्ये नळांना पाणीच न येणे किंवा अत्यल्प दाबाने येणे ही बाब प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जल अभियंत्यांकडे डोंगराळ भागात पाणी वरपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पंपिंग व्यवस्था, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण तसेच कमी दाबाच्या भागांसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली. तसेच खालच्या भागातही जास्तीत जास्त आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भांडुपकरांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना पालिका प्रशासन मात्र केवळ बैठका व आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बैठकीत नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने कार्यवाही करून डोंगराळ भागातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आता पालिका प्रशासन प्रत्यक्ष कृती करून भांडुपकरांचा पाणीप्रश्न सोडवते की पुन्हा एकदा आश्वासनांचीच मालिका सुरू राहते, याकडे संपूर्ण भांडुपकरांचे लक्ष लागले आहे. 000000000 नरसोबावाडी, कोल्हापूर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम संघटनेच्या मान्यतेने कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ १० व्या श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे दि. ४ ते ६ जुलै २०२६ दरम्यान पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.   स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ₹१,१०,०००/- ची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरू केली असून त्याची लिंक संकेतस्थळावर देण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा. स्पर्धेत नावे नोंदविण्याची अंतिम मुदत दि. १४ जून २०२६ आहे.   मुंबईतील प्रवेश महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, आश्रय हॉटेलच्या मागे, सखाराम कीर मार्ग, राजा राणी चौक जवळ, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे सायं. ६ ते ८ या वेळेत स्वीकारले जातील. इतर सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंची नावे त्यांच्या जिल्हा संघटनेमार्फतच स्वीकारण्यात येतील.

मृतदेहाला मिळेना रस्ता!

 दिव्यात बिल्डरांच्या कथित दादागिरी विरोधात नागरिकांचा संताप दिवा : दिवा शहरातील बेडेकरनगर परिसरात राज वाघ यांचा मृत्यू झाला. पण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या वेळी रस्ता बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बेडेकरनगर येथील पाटील टॉवर आणि रविना अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या मार्गावरून वाहन किंवा रिक्षा नेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, एका मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणल्यानंतर अंत्ययात्रेसाठी त्याच मार्गाचा वापर करावा लागणार असल्याचे माहिती असतानाही संबंधित रस्ता लोखंडी रॉड टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अमोल केंद्रे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याला लावण्यात आलेले कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना एका युवकाने चावी आणून कुलूप उघडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “जिवंत माणसांनाच नव्हे तर मृतदेहालाही रस्ता नाकारला जात असेल तर ही अत्यंत अमानुष बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि जागा मालकांविरोधात पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच नागरिकांना मुक्तपणे रस्ता वापरण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे. अमोल केंद्रे, समाजसेवक, दिवा बिल्डरांची दादागिरी कधी बंद होणार.राज वाघ यांचे निधन झाले होते.अंतिम संस्कार करण्यासाठी बॉडी घेऊन जाण्याचा रस्ता बंद केला.पोलिस प्रशासनास कळवले,दिवा प्रभाग समिती यांना कळवले. बेडेकर नगर पाटील टॉवर येथे कित्तेक वर्षा पासून हिच परिस्थिती आहे.कोण बोलणार? गुंडागर्दी,हुकूमशाही सुरू आहे.माणुसकी जिवंत राहिली नाही.कायद्याचा धाक राहिला नाही.मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्यावर योग्य ती कारवाई करून हा रस्ता कायमचा खुला करावा.  

ठाणे मध्यवर्ती कारागृहात प्रसादिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन

ठाणे, महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभाग तसेच वै. प. पू. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी (देवाची) द्वारा संचालित “वारकरी आचारसंहिता परिषद, महाराष्ट्र” याचे  संयुक्त…

– कल्याणमध्ये कचऱ्यात सापडली नवजात मुलगी

 नवजात मुलीला फेकणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील चिकणीपाडा परिसरात कचऱ्यात सहा दिवसांची नवजात मुलगी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात राहणाऱ्या पूजा लावेकर या शाळेत काम करतात. सकाळच्या सुमारास त्या कचरा टाकण्यासाठी गेल्या असता एका पिशवीत ही नवजात मुलगी आढळून आली. त्यावेळी काही भटके कुत्रे या बाळाच्या आसपास फिरत होते. कुत्र्यांपासून बाळाला धोका असल्याचे लक्षात येताच पूजा यांनी तातडीने मुलीला उचलून घेतले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुलीला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून काही काळ तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, नवजात मुलीला अशा अवस्थेत टाकून जाणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

देवस्थान जमीन विधेयक स्थगितीचा निषेध

 किसान सभेची राज्यव्यापी आंदोलने ठाणे : शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात आणि देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क देणारे विधेयक तातडीने मंजूर करावे, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या…

ठाणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्याला वेग

 १.१६ लाख नागरिकांनी केली स्व-गणना ठाणे : केंद्र शासनाच्या ‘जनगणना २०२७’ मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात घर यादी व घरगणना (House Listing & Housing Census) या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून, स्व-गणना सुविधेला नागरिकांकडून…

– झाराप रेल्वे स्टेशनवरून होते हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक…!

– चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘उबाठा ‘ सेनेला आश्वासन…! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैद्यरित्या उत्खनन केले जात आहे. ‘उबाठा ‘सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर आणि पक्षाचे  प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. त्याबाबतचे लेखी निवदेन यावेळी त्यांना देण्यात आले. जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग कसा काय सुरु करण्यात आला.संबंधितांनी  उत्खनन आणि वाहतुकीसाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने घेतले आहेत का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करत  प्रति वर्षी २५ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे असा आरोप यावेळी  करण्यात आला. या माध्यमातून सिंधुदुर्गात मोठा खनिज घोटाळा होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बर्डे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या  तक्रारीची गंभीर दखल घेत उत्खननासाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने व इतर कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश खनिकर्म  अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकऱ्यांना  देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गेले दोन आठवडे कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन फार मोठ्या प्रमाणावर खनिज सदृश्य मातीची वाहतुक वास्को-गोवा येथे होत आहे. गेल्या दोन आठवड्यात १० ते १२ रेल्वे वॅगन  मालवाहतूक  दररोज भरुन ही खनिज सदृश्य माती नेली जात आहे. दिवसाला ५००-६०० डंपर भरुन आणण्यात येणाऱ्या खनिज सदृश्य मातीच्या  वाहतुकीमुळे झाराप येथील ग्रामस्थांना प्रदुषणाचा त्रास होत आहे. शिवाय या परिसरातील अरुंद रस्ते यामुळे अपघात होण्याची भिती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत  याकडे लक्ष वेधण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथून अवैद्यरित्या उत्खनन करुन ही खनिज माती आणली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर ही खनिज माती तळवणे, कोंडुरा भागातून आणण्यात येत आहे तर तिथे कुठल्याही शासकीय, प्रशासकीय परवानग्या न घेता तसेच कुठल्याही प्रकारचा पर्यावरण आघात अहवाल तसेच  जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग सुरु झाला आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठल्याही शासकीय प्रशासकीय परवानग्या न घेता होत असलेला अवैद्य मायनिंग उद्योग शासनाचा महसुल बुडवून सुरु आहे काय? असाही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी ‘एमआयडीसी’ क्षेत्रात रात्रीच्या अंधारात होत असलेल्या खनिज सदृश्य मातीच्या चोरीचा प्रकार उघड झालेला आहे. असे असताना झाराप रेल्वे स्टेशनवरुन नेण्यात आलेली हजारो टन खनिज सदृश्य माती ही  कुठल्या नियमांतर्गत नेण्यात आली आहे. हे जनतेला कळले पाहिजे. अशाच प्रकारे जिल्ह्यात जागोजागी होत असलेल्या बेकायदेशीर अवैध मायनिंग विरोधात देखील कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मिरा-भाईंदरमध्ये रेशनकार्डमधून हजारो नावे गायब

गरिबांच्या अन्नावर घाला मिरा -भाईंदर : मिरा-ईंदर शहरातील हजारो रेशनकार्डधारकांना नावावर अचानक ऑनलाइन प्रणालीतून गंडांतर आले असून, गेल्या ८ ते १० महिन्यांपासून केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डमधील हजारो नावे गायब झाल्याची…

कलेक्टर एनओसीसाठी म्हाडा रहिवाशांना पडतोय दीड लाखाचा अतिरिक्त भुर्दंड

केतन खेडेकर मुंबई -भायखळा घोडपदेव येथील न्यू हिंद म्हाडा कॉलनी येथील कलेक्टरवरील जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डवर अजूनही कलेक्टरचे नाव असल्याने महाराष्ट्र शासनाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिका हस्तांतर करण्यासाठी हेलफाटे मारावे लागत…