Month: July 2026

गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला संजय राऊतांनी शोधून द्यावे-गिरीश महाजन

हरिभाऊ लाखे नाशिक : खासदार संजय राऊत यांना गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर कुठे दिसत आहेत ? त्यांनीच ते शोधून द्यावेत. स्वतः काही करायचे नाही आणि काहीही बोंब ठोकतात. त्यांच्या मागे आता कोणी उरलेले नाही. पंतप्रधानांपासून ते सरन्यायाधीश, निवडणूक आयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाटेल ते बोलणे, हा एकच गुणधर्म त्यांच्याकडे उरला आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. राऊत यांच्या जिभेला हाड नाही, हा त्यांचा ‘मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट’ आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. भाजपचे संकटमोचक मंत्री महाजन यांनी रविवारी नाशिक येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कुंभमेळ्याची सर्व कामे ही गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला दिल्याच्या राऊत यांच्या आरोपांवर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, राऊत यांच्या आरोपांना फार उत्तर देण्याची गरज नाही. पूर्वी ‘हम दो, हमारे दो’ चालत होते, पण आता ठाकरे गटात ‘उद्धवजी, आदित्यजी आणि त्यांचे हे एक अपत्य (संजय राऊत)’ एवढेच उरले आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. नाशिकमधील नगरसेवकांच्या संभाव्य फुटीवर मंत्री महाजन म्हणाले की, मला याची पूर्ण कल्पना नाही, पण सध्या ठाकरे गटाकडे शिल्लक तरी कोण राहिले आहे, त्यांची महापालिका नाही, १७ पैकी एकही आमदार नाशिकमध्ये निवडून आला नाही, नगरपालिका त्यांच्याकडे नाही. भविष्यात त्यांचे काहीच दिसत नाही. त्यांचे भविष्य आता २ ते ५ टक्केही उरलेले नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष बुडवला, हेच त्यांच्यासाठी काफी आहे, असे सांगत त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकनाथ खडसे यांनी केलेल्या दाव्यांवर मंत्री महाजन म्हणाले की, मी कधीच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नव्हतो. खडसेसाहेब पूर्वी शर्यतीत होते आणि ते स्वतः तसे म्हणायचे. मी कधीही असा दावा केला नाही. तसेच, खडसेंना अमित शाह यांचा फोन आल्याच्या मुद्द्यावर त्यांची दिल्लीसोबत डायरेक्ट ‘हॉटलाइन’ आहे, असे ते स्वतःच म्हणायचे. आम्ही छोटे लोक आहोत, त्यामुळे त्या हॉटलाइनबाबत आम्ही न बोललेलेच बरे असा टोला त्यांनी यावेळी लगावला. आमदार बच्चू कडू हे महायुतीचे मोठे नेते आहेत. ते रोज काही ना काही बोलत असतात, त्यांना काही तरी झाले असेल. हे काही असे लोक आहेत की त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे, असे म्हणत मंत्री महाजन यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले. ००००००००

 ३४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था व सातारा जिल्हा रहिवासी संघाच्या वतीने दिवा : अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था आणि सातारा जिल्हा रहिवासी संघ (दिवा शहर) यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य…

– अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती चे प्रकाशन नागपूरमध्ये

– साहित्य भारती आणि साईज्योती पब्लिकेशन्स चे आयोजन नागपूर: ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती भाग १ भाग २ आणि भाग ३ चे प्रकाशन गुरुवार दिनांक १६ जुलै  २०२६ रोजी सायंकाळी  ६ वाजता नवदृष्टी सभागृह, अंध विद्यालय परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर येथे होणार आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, विदर्भ प्रांत, आणि साईज्योती पब्लिकेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे हस्ते हे प्रकाशन होणार असून माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवन चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवारीलालजी पुरोहित हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रकाश एदलाबादकर पुस्तकांवर भाष्य करणार आहेत. आपल्या ५४ वर्षाच्या पत्रकारिता आणि सामाजिक जीवनाच्या कालखंडात ज्या अनेक मान्यवर व्यक्तींशी अविनाश पाठक यांचे व्यक्तिगत संबंध आले आणि ते उभयपक्षी जपले गेले, अशा एकूण  ५१ मान्यवर व्यक्तींवर अविनाश पाठक यांनी लेख लिहिले असून त्याचे संकलन तीन भागात साईज्योती पब्लिकेशन ने “आयुष्यातले सांगाती” भाग १, २ आणि ३ असे प्रकाशित केले आहेत. या ५१ मान्यवर व्यक्तींमध्ये माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले, गिरिजा कीर, नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगपती शक्तीकुमार संचेती, पत्रकार मा.गो. वैद्य, संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला, प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी, पत्रकार नीला उपाध्ये, सुरेश द्वादशीवार, श्रीपाद सहस्रभोजने, राम खांडेकर, अनंत तरे, डॉ. तनुजा नाफडे, दत्ता मेघे, डॉ. प्रफुल्ल मोकदम, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत. प्रमिलाताई मेढे, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, चैनसुख संचेती, डॉ  विश्वास मेहेंदळे, सुधीर गाडगीळ, डॉ उदय निरगुडकर, हंसराज अहिर, वामनराव चोरघडे, मारोती चितमपल्ली, शुभांगी भडभडे, भगतसिंह कोशियारी, उल्हास पवार, न्या. विकास सिरपुरकर, डॉ वि.भि.कोलते, गोपीनाथ मुंडे, प्रा बी.टी.देशमुख, डॉ श्रीकांत जिचकार, वसंतराव साठे, डॉ मनोहर पिंगळे, अभिनंदन थोरात, गंगाधरराव फडणवीस,दत्ताजी डिडोळकर, कवी अनिल, डॉ मधुकर आष्टीकर, प्रतापदादा सोनवणे,नीतिन केळकर,सद्गुरुदास महाराज, डॉ प्रमोद कोलवाडकर या मान्यवरांचा समावेश आहे. या तीन भागांना डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे आणि अजय संचेती यांच्या प्रस्तावना आहेत. अविनाश पाठक यांची यापूर्वी एकूण पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात डावपेच, शह काटशह आणि सत्तेच्या सावलीत हे तीन राजकीय कथासंग्रह, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, थोडं आंबट थोडं गोड आणि हितगुज हे ललित लेखांचे संग्रह, दाहक वास्तव, मागोवा घटितांचा, काल प्रवाहाच्या वळणांवरून आणि दृष्टीक्षेप हे वैचारिक लेखांचे संग्रह, काळ्या कोळशाची काळी  कहाणी हे देशातील गाजलेल्या कोळसा घोटाळ्यावरील पुस्तक, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी, आणि मराठी वांङमय व्यवहार: चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक यांचा समावेश आहे. यातील काही पुस्तके विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहेत. या समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रकांत लाखे, कार्याध्यक्ष डॉ शेखर भुसारी, महामंत्री विनय माहुरकर साईज्योती पब्लिकेशन चे ज्योती खापेकर,  गणेश राऊत प्रभृतींनी केले आहे. 0000000000

उल्हासनगरातील आरओ व पाणी जार प्रकल्पांच्या चौकशीची मागणी

सुनिल इंगळे उल्हासनगर : युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी उल्हासनगर शहरातील आरओ व पाणी जार प्रकल्पांची सखोल तपासणी करून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

– ठाण्यात रंगणार कलगीतुऱ्याचा थरार

लोककला रसिकांसाठी पर्वणी अनिल ठाणेकर ठाणे : कोकणातील पारंपरिक लोककलेचा अनोखा ठेवा असलेल्या ‘कलगीतुऱ्या’चा थरार आता ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शुक्रवार, १७ जुलै, सायंकाळी ७.३० वाजता भव्य कलगीतुऱ्याच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाबाबत लोककला रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या बहारदार सामन्यात कलगीवाले शाहीर संदीप मोरे आणि तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमन यांच्यात सवाल-जवाब, हजरजबाबी फटकेबाजी, उत्स्फूर्त सादरीकरण आणि पारंपरिक लोककलेचा रंगतदार आविष्कार पाहायला मिळणार आहे. पारंपरिक कलगीतुऱ्याचा वारसा आधुनिक सादरीकरणातून अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे. अतुल कदम आणि सुनील कदम यांच्या निर्मितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकरभाई सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, तिकिटांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कार्यक्रम हाऊसफुल होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, माजी महापौर अशोक वैती, युवासेना अधिकारी ऋषिकेश माने, अभिनेते मंगेश देसाई, भाऊ कदम, गौरव मोरे, उद्योजक विकास दाभाडे तसेच समाजसेवक संदीप बिरवटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे, कलगीतुऱ्याच्या इतिहासात प्रथमच १० भाग्यवान प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. कोकणच्या मातीत रुजलेली ही समृद्ध लोककला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि नव्या पिढीने तिचा वारसा जपावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. लोककलेची आवड असलेल्या प्रत्येकाने या सांस्कृतिक मेजवानीला उपस्थित राहून कलाकारांना उत्स्फूर्त दाद द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करा-वर्षा गायकवाड

मुंबई : महाराष्ट्रात ख्रिश्चन विवाह निबंधक (Registrar) नसल्याने या समाजातील विवाह व विवाह संबंधित कामे खोळंबली आहेत. विवाद निबंधक नसल्यामुळे मुंबई विभागाला प्रशासकीय विलंबाचा सामना करावा लागत आहे. सरकारने तातडीने…

समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक व महिला प्रतिनिधींचा समावेश करा – माकप

अनिल ठाणेकर ठाणे : समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक व महिला प्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी–मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मरियम ढवळे, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, रेहाना शेख यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात समान नागरी कायद्याचा (Uniform Civil Code) मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील कायदा करण्याचे संकेतही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. सर्व जाती-धर्मांतील महिलांना समान न्याय, समान हक्क आणि सामाजिक न्याय मिळावा, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, पोटगी अशा नागरी बाबींमध्ये महिलांना समान हक्क आणि न्याय मिळण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा झाल्याच पाहिजेत. समान नागरी कायद्याच्या कोणत्याही चर्चेच्या केंद्रस्थानी सर्व जाती-धर्मांतील महिलांचे हक्क, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष मूल्ये असली पाहिजेत. मात्र, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीची रचना पाहता तिच्या सर्वसमावेशकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. समान नागरी कायद्याबाबत देशभरात सर्वाधिक चर्चा ज्या मुस्लिम समाजाच्या वैयक्तिक कायद्यांच्या संदर्भात होत असते, त्या मुस्लिम समाजातील कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी किंवा सामाजिक तज्ज्ञ यांना समितीत स्थान देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, पारशी तसेच इतर संबंधित अल्पसंख्याक समाजांचेही प्रतिनिधित्व समितीत दिसून येत नाही. याशिवाय, सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या अधिकारांच्या दृष्टीने काम करणाऱ्या महिला प्रतिनिधींनाही समितीत स्थान देण्यात आलेले नाही. अशा महत्त्वाच्या विषयावर तयार होणारा कायदा व्यापक सामाजिक स्वीकारार्हता मिळवायचा असेल, तर त्याच्या मसुदा प्रक्रियेत सर्व संबंधित समाजघटकांचा सहभाग आवश्यक आहे. विशेषतः मुस्लिम समाजातील जाणकार कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी आणि सामाजिक तज्ज्ञ, तसेच सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समितीत समावेश करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कायद्यात महिलांच्या सामाजिक न्याय, समान हक्क आणि घटनात्मक संरक्षणासंबंधी अधिक प्रभावी तरतुदी करता येतील. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र शासनाकडे पुढील मागण्या करीत आहे: समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजातील पात्र कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी व सामाजिक तज्ज्ञांचा तातडीने समावेश करावा. सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींना समितीत स्थान द्यावे, जेणेकरून कायद्यात महिलांच्या सामाजिक न्यायाची प्रभावी हमी देणाऱ्या तरतुदी समाविष्ट करता येतील.ख्रिस्ती, पारशी तसेच इतर संबंधित समाजघटकांचेही प्रतिनिधित्व समितीत सुनिश्चित करावे.समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवावी.सर्व संबंधित धार्मिक, सामाजिक, महिला व कायदेविषयक संघटनांशी व्यापक सल्लामसलत करूनच अंतिम मसुदा तयार करावा. कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करण्याऐवजी भारतीय राज्यघटनेतील समानता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या आधारे कायदा तयार करावा. लोकशाही व्यवस्थेत अशा स्वरूपाचा व्यापक परिणाम करणारा कायदा लोकसहभाग, संवाद आणि सर्वसमावेशकतेच्या आधारेच तयार झाला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने समितीची पुनर्रचना करून त्यामध्ये मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक आणि सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  करत आहे. 00000000000