Month: July 2026

‘चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार’ पुस्तकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

 व्यंगचित्रांच्या माध्यमातून म्हणी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मुंबई : महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक ठेव्याचा भाग असलेल्या जुन्या मराठी म्हणी आणि वाक्प्रचार नव्या पिढीपर्यंत सोप्या, रंजक पद्धतीने पोहोचावेत या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार’ या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. सांताक्रूझ येथील ओला वाकोला बँक्वेट हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, पुस्तकाचे संपादक संजय मिस्त्री, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आणि पुस्तकाचे प्रकाशक संदेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकात प्रशांत कुलकर्णी, प्रभाकर वाईरकर, संजय मिस्त्री, चारूहास पंडित, विश्वास सूर्यवंशी, योगेंद्र भगत, विवेक प्रभूकेळूसकर, उमेश कवळे आदी महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली म्हणी आणि वाक्प्रचारांवरील चित्रे समाविष्ट आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “हजार काम एक चित्र करते आणि हजार अनुभवांचे ज्ञान एक म्हण देते. पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीतीने जसे नीतीमूल्ये शिकवली, तसेच काम या म्हणी आणि वाक्प्रचार करतात. जे सांगायला निबंध लिहावा लागेल ते एका ओळीची म्हण सांगते.” आजच्या पिढीपासून हा अमूल्य ठेवा दूर होत चालला आहे. तो पुन्हा रुजविण्यासाठी व्यंगचित्र हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, असे मत पुस्तकाचे प्रकाशक संदेश चव्हाण यांनी व्यक्त केले. जुन्या काळातील म्हणी हसत-खेळत, हलक्या-फुलक्या पद्धतीने नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हाच या पुस्तकामागचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले. हे पुस्तक अॅमेझॉनवर तसेच ओला वाकोला बँक्वेट, सांताक्रूझ येथे उपलब्ध आहे. पुस्तकासाठी ९७०२3८६७६७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

दिव्यांग मुलांना ब्लाइंड काठी भेट

पारनेर : जिल्हा सहकारी बँक व जीएस महानगर बँकेचे दिवंगत माजी अध्यक्ष अॅड. उदयराव गुलाबराव शेळके यांच्या जयंतीनिमित्त  मुंबईतील शेकडो दिव्यांग मुलांना काठी वाटप (ब्लाइंड स्टीक) करण्यात आले. जीएस महानगर बँकेच्या…

रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठदान- आरती साळवी

मुंबई : रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान असून नागरिकांनी रक्तदान जरूर करावे असा सामाजिक संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या मुंबई महिला अध्यक्षा आरतीताई साळवी यांनी अजित दादा पवार…

– जागतिक कांदळवन दिनी तरुणाई मैदानात, प्रशासन मात्र गायब!

 कांदळवन वाचवा… पर्यावरण वाचवा… भविष्यातील पिढ्या वाचवा! – पर्यावरणीय गुन्ह्यांच्या निष्पक्ष तपासासाठी युवकांचे पोलिसांना शांततापूर्ण साकडे मिरा – भाईंदर जागतिक कांदळवन दिनानिमित्त आज भाईंदर (पूर्व) येथील जैसल पार्क खाडी परिसरात फॉर फ्यूचर इंडिया, मँग्रोव्ह फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कांदळवन स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानामध्ये १०० हून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे ७५० किलोहून अधिक कचरा कांदळवनातून बाहेर काढला. या उपक्रमात पाटकर कॉलेज NSS युनिट, LRMC कॉलेज NSS युनिट, रॉयल कॉलेज NSS युनिट, तसेच शहरातील अनेक विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, युवक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागानेही या अभियानात सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना कांदळवनांचे पर्यावरणीय, जैवविविधता, हवामान बदल नियंत्रण तसेच किनारपट्टी संरक्षणातील राष्ट्रीय व जागतिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण परिसर स्वच्छ करून कांदळवन संवर्धनाचा संदेश देण्यात आला. स्वच्छता अभियानानंतर उपस्थित पर्यावरणप्रेमी युवकांनी पर्यावरणीय गुन्ह्यांच्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. विशेषतः मिरा-भाईंदर परिसरातील कांदळवन नाश प्रकरणांमध्ये दाखल झालेल्या एफआयआर व आरोपपत्रांमधील कथित प्रक्रियात्मक त्रुटी, तपासातील विसंगती आणि मुख्य आरोपींना वगळल्याच्या आरोपांमुळे युवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. युवकांनी निदर्शनास आणून दिले की, काही प्रकरणांमध्ये मुख्य आरोपींना वगळून इतर व्यक्तींवर जबाबदारी टाकल्याचा संशय निर्माण होतो, तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले आहे का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणांमध्ये पारदर्शक, निष्पक्ष आणि कायद्यानुसार तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी सांगितले की, भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशन आणि नवघर पोलीस स्टेशन येथील पर्यावरणीय गुन्ह्यांशी संबंधित दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये तपासातील अनेक विसंगती प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला असून, यासंदर्भात एसीपी, डिसीपी, अडिशनल सीपी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी देऊनही अद्याप समाधानकारक कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. उपस्थित युवकांनी स्पष्ट केले की, हा उपक्रम पोलिसांविरोधातील आंदोलन नसून, पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास अधिक निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावा यासाठी केलेले शांततापूर्ण आवाहन आहे. पर्यावरणीय गुन्ह्यांमध्ये कोणालाही अभय मिळू नये, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि तपास प्रक्रियेवर जनतेचा विश्वास कायम राहावा, हीच या उपक्रमामागील भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता अभियानानंतर युवकांनी हातात विविध जनजागृतीपर फलक घेऊन पोलिसांना शांततापूर्ण पद्धतीने साकडे घातले. “निष्पक्ष तपास करा, पर्यावरणाला न्याय द्या”, “पोलीस जागे व्हा, पर्यावरण वाचवा”, “पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास पारदर्शक करा”,…

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांमध्ये हिवताप, डेंग्यु आजारांबाबत जनजागृती

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येणार हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विठ्ठल रूक्मिणी मंदिरांच्या आवारात व परिसरात तेथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबीरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांनी कुकशेत येथील विठ्ठल रूक्मिणी मंदीर परिसरात आयोजित शिबिराला भेट देऊन त्याठिकाणी मांडलेल्या प्रदर्शनाची पाहणी केली व आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या शिबिराच्या मांडणीबद्दल समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विभागांमध्ये असलेल्या २१ विठ्ठल मंदिरांमध्ये हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन करुन त्याठिकाणी भेट देणा-या एकूण ११२०९ भाविकांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच ४५ भाविक नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे याठिकाणी ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात कशी असतात हे दाखवून तसेच डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून डासोत्पत्ती होऊ नये याकरिता घराभोवती व घारंतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने, उदा. पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने झाकून ठेवणे, त्याचप्रमाणे पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे तसेच आठवड्यातून एक दिवस त्या स्वच्छ करून कोरड्या ठेवणे, घराभोवतालचे वा गच्चीवरील भंगार साहित्य, टायर्स नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे, ताप येताच त्वरित डॉक्टरांना प्रकृती दाखवून त्यांचा सल्ला घेणे याबाबत जनजागृती करण्यात आली. नमुंमपा आरोग्य विभागामार्फत हिवताप / डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी जागरूक राहून आपल्या घरातील व घराभोवतालची डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे आणि आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावर भंगार – टाकाऊ साहित्य पडलेले असल्यास त्यात पावसाचे पाणी साचून डासोत्पत्ती होऊ शकते हे लक्षात घेत ते नष्ट करावे आणि हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालण्यासाठी आपलेही सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन महापौर सुजाता सुरज पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी लुटला पावसाळी सहलीचा आनंद  गाणी, नृत्य खवय्यांची धूम धमाल मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांची पावसाळी सहल कर्जत येथील एंजल रिसॉर्ट येथे गेली होती. या सहलीसाठी गेलेल्या दोन बसमध्ये ५५ महिला व ४५ पुरुष सभासद असे एकूण १०० सभासद सहभागी झाले होते. सानपाडा येथील विरंगुळा केंद्राच्या कार्यालयाजवळून बस सुटण्यापूर्वी सहलीत सहभागी झालेल्या सर्वांना गुळाचा चहा देण्यात आला. बसमध्ये बसल्यानंतर प्रत्येकाला पाण्याची बाटली व  थोडासा नाष्ता म्हणून सुकामेवा  देण्यात आला. महिलांचा सहभाग असल्यामुळे बसमध्ये अगदी आनंदाने गाणी म्हणत अडीच तासात कर्जत येथे रिसॉर्टवर बस पोहोचल्या. रिसॉर्टवर आगमन झाल्यानंतर  सर्वांनी नाष्ता घेतला. त्यानंतर तेथील सदनिकांमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर तरणतलावात बहुतेक सभासदांनी पोहण्याचा आनंद घेतला. काहींनी चांगले नृत्य केले. दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमांमध्ये महिलांची संगीत खुर्ची घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला. मुंबईला परत निघण्यापूर्वी रिसॉर्ट मालकांनी सर्वांना गरम भजी आणि चहा दिला. सर्व ज्येष्ठ नागरिक पावसाळी सहलीचा आनंद लुटत प्रवास करत नवी मुंबईला सुखरूपपणे पोहोचले. ज्येष्ठ नागरिकांच्या या एकदिवशीय सहलीमध्ये संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, नाट्यकलाकार, अभिनेते व संघाचे माजी अध्यक्ष राम काजरोळकर, संघाचे सचिव जगदीश एकावडे खजिनदार महादेव पाटील उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे सीमा बोराडे सहसचिव राजेंद्र कदम राजाराम घोलप,  संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम,  माजी उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, डॉ.  विजया गोसावी, माजी सचिव चंद्रकांत पारपिल्लेवार,  माजी खजिनदार विष्णूदास मुखेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

अगं आई अहो आई’मध्ये कौटुंबिक नात्यांचा हळवा प्रवास

 मराठीची नवी ओरिजिनल सीरिज २४ जुलैपासून संपदा सावंत Zee5 मराठीने आपल्या आगामी ओरिजिनल सीरिज **‘अगं आई अहो आई’**चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला असून, ही सीरिज २४ जुलै २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार…