Month: July 2026

पालकमंत्री नितेश राणेंमुळेच ८६ कोटींची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात

 जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे वक्तव्य ३५ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ सिंधुदुर्ग | राजन चव्हाण पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन २०२५-२६ च्या आंबा…

 आखाड्यातील हिऱ्यांना मिळाला आधाराचा हात

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ मुंबई : महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (यु डब्ल्यू एफ आय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘पैलवान दत्तक योजना २०२६–२७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी मलबार हिल येथील सेवा सदन बंगल्यावर शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ११ होतकरू पैलवानांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या कुस्तीला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या स्वप्नांना आता भक्कम आधार मिळणार आहे. या ११ मल्लांवर विश्वासाची मोहोर या योजनेत सोहम सुनील कुंभार, ज्ञानवी अर्जुन पाटील, संग्राम नितीन खुर्द, रणवीर समिंदर जाधव, श्रीकर भास्कर नायकवडी, वैष्णवी शंकर पाटील, वीरेन अरुण पाटील, हर्षल आनंद घाटके, विश्वजीत धर्मेंद्र सावंत, पियुष दादासो शेवाळे आणि व्यंकटेश चोरगे या ११ होतकरू पैलवानांची निवड करण्यात आली. आर्थिक आधारासह दर्जेदार प्रशिक्षणासाठी हा उपक्रम त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ५० पैलवान दत्तक घेण्याचा निर्धार मार्गदर्शन करताना गिरीशभाऊ महाजन म्हणाले, “महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक अडचणींमुळे मोठ्या संधींपासून दूर राहतात. ‘पैलवान दत्तक योजना’ ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून युवा पैलवानांच्या स्वप्नांना बळ देणारी सामाजिक चळवळ आहे. उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भविष्यात ५० पैलवान दत्तक घेण्याचा आमचा मानस आहे. निवड झालेल्या पैलवानांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे.” गरीबीमुळे स्वप्ने थांबता कामा नयेत युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष काझी अब्दुल मतीन यांनी सांगितले, या योजनेत निवड झालेली बहुतांश मुले शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. नव्या पिढीतील होतकरू पैलवान घडविणे हे आमच्या फेडरेशनचे ध्येय असून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रामीण कुस्तीला मिळणार नवे बळ देवाभाऊ केसरी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पटेल म्हणाले, पैलवान दत्तक योजना’ ही फक्त शिष्यवृत्ती योजना नाही. ग्रामीण भागातील कुस्ती संस्कृतीला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम आहे. समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान घडू शकतात. भविष्यात या योजनेचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात केला जाईल. शाहू महाराजांच्या विचारांना आधुनिक सलाम युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तसेच त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी पैलवानांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक आधार दिला. त्याच प्रेरणेतून आधुनिक काळात ही संकल्पना नव्याने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील होतकरू मुलांना दर्जेदार प्रशिक्षण, पोषण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल. दिग्गज मल्लांची उपस्थिती या सोहळ्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई), ट्रिपल महाराष्ट्र केसरी  विजय चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई) तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने युवा मल्लांचा उत्साह आणखी उंचावला. निवड समितीची महत्त्वपूर्ण भूमिका या योजनेसाठी भिमराव पाटील, समिंदर जाधव, रामदास देसाई, ज्ञानेश्वर आस्वले, जालिंदर देशमुख, संजय जाधव, राहुल जाधव, आनंदा पाटील आणि अभिजित पाटील यांनी निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्राच्या आखाड्यांना नवी ऊर्जा कार्यक्रमाला कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, पालक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी तसेच मोठ्या संख्येने युवा पैलवान उपस्थित होते. उपस्थितांनी पैलवान दत्तक योजना’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीला नवी दिशा देणारा आणि गरिबीतून झुंजणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या आयुष्याला नवी ताकद देणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा  विश्वास व्यक्त केला. 0000

विद्यार्थी आरोग्य शिबीर वह्या वाटप, गुणवंताचा सत्कार

रमेश औताडे मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी आरोग्य  शिबीर वह्या वाटप, गुणवंताचा सत्कार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते, महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, संस्थेचे अध्यक्ष व लेखक अशोकराव टाव्हरे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंचरे, वाफगाव प्राथमिक केंद्र वाफगावच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.मेघना जाधव,खेड ता.भाजपचे उपाध्यक्ष दिलीप माशेरे, कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टाव्हरे, खेड.ता.ख.वि.संघाचे संचालक संतोष गोरडे, ॲड.सुहास दौंडकर, प्रा.बाळासाहेब माशेरे, उद्योजक उमेश दौंडकर. भाऊसाहेब फुके, ॲड समीर गोडसे, नीलेश घोडके, समाजसेवक बाबा हजारे, पवना हाॅस्पीटलचे व्यवस्थापक भारत, दांगट आदी मान्यवर कनेरसर ता.खेड.जि.पुणे येथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधायक उपक्रम राबवित असताना पवना हाॅस्पीटल, प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव व स्टाफ यांचे आभार मानले.तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सेवाभावी उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.

जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या फिफा वर्ल्ड कप-२०२६च्या अंतिम सामन्याचे साक्षीदार ठरलेले महेंद्रशेठ घरत. न्यू जर्सीतील मेटलाईफ स्टेडियमवर पत्नी शुभांगीताई आणि पुत्र कुणाल यांच्यासह त्यांनी अर्जेंटिना–स्पेन लढतीचा अविस्मरणीय अनुभव घेतला.

 शासनाच्या निधीचा अनियमिततेमुळे म्हसा आरोग्य केंद्र बिनकामाचा?

 आदिवासींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम.. दखल घेण्याची काळाची गरज… राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील नऊआरोग्य केंद्रा पैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या म्हसा आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या आदिवासी बांधवाची पायपीट होऊ नये यासाठी शासनाने सन २०२२ मध्ये पाटगाव परिसरातील चाफेवाडी,गेटाची वाडी,बाटलीची वाडी.वाघाची वाडी अशा सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या आदिवासी बांधवांना स्थानिक ठिकाणी उपचार मिळावेत यासाठी सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून बांधलेले आरोग्य केंद्र ,गेल्या तीन वर्षांपासून धुळखात पडले असल्याने हजारो आदिवासी बांधवांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने आरोग्य विभागाचे कारभारावर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तालुक्यातील म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रात सुमारे सत्तर हजार लोकसंख्या असल्याने त्यांना छोट्या मोठ्या आजारावर उपचार घेण्यासाठी म्हसा आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लागते.त्यामुळे छोटे मोठे अपघात, सर्पदंश तसेच गर्भवती महिलांना तातडीचे उपचार वेळीच मिळत नसल्याने काहीना उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागला आहे.यावर पर्याय म्हणुन शासनाने पाटगाव परिसरातील अनेक आदिवासी वाड्या वर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांना तात्काळ उपचाराची सुविधा मिळण्यासाठी तेथे सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून प्रशस्त असे आरोग्य केंद्राची उभारणी केली.त्या ठिकाणी लाईट , पिण्याचे पाणी.तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांचे निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.तसेच त्या आरोग्य केंद्रात लागणाऱ्या मशिनरी पुरविल्या परंतु आरोग्य विभाग हे केंद्र सुरू करण्यात उदासीनता दाखवत असल्याने.सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मलेरिया टायफॉइड तसेच इतर आजारांनी डोके वर काढल्याने अनेक नागरिकांना त्याची बाधा झाली असुन ते आपल्या शेजारी मोफत उपचार मिळण्यासाठी बांधण्यात आलेले आरोग्य केंद्र धुळखात पडले असल्याने सुमारे पाच ते सात किलोमीटर ची पायपीट करून म्हसा येथे मोफत उपचारासाठी येतात,परंतु तेथे ही डॉक्टर नसल्याने खाजगी उपचार घेण्यासाठी भटकंती करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. या बाबतीत आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.. कोट पाटगाव येथील आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन ते तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य दोनअधिकारी यांनी वेळोवेळी वैद्यकीय अधिकारी.प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसा यांना दिलेले आहेत. त्यांनी अजुन ते सुरू का केले नाही,याचा लेखी खुलासा मागविण्यात येत आहे.  —-डॉ.श्रीधर बनसोडे.तालुका आरोग्य अधिकारी.पं. समिती मुरबाड. ००००००००००

– शिळफाटा- कल्याण फाटा चौकात लवकरच वाहतूक सिग्नल

 कोंडी व अपघातांवर उपाययोजना नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आरती परब दिवा: शिळफाटा-कल्याणफाटा परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर या दोन्ही महत्त्वाच्या चौकात वाहतूक सिग्नल यंत्रणा…

 विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा राष्ट्रवादी शरद पवार गटाने व्यक्त केला निषेध

 शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली मागणी कल्याण : दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व घटनेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जवाबदार असून त्यांनी आपली नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देत आपली मागणी लावून धरली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्यासह जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस रमेश साळवे, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्निल रोकडे, कार्याध्यक्ष रुपेश थळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे, नरेश वायले, अनिल सावंत, निखिल कदम, वैभव माळी, संगीता मोरे, शिल्पा कांबळे, प्रेरणा तांबे, भानुदास घुगे, स्वप्निल शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि युवकांचे भविष्य धोक्यात आलेले असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. स्पर्धा परीक्षांचे वारंवार पेपर फुटणे. भरती प्रक्रियेतील कठीण गैरव्यवहार ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पोलीस भरतीतील कथित अन्याय तसेच विद्यार्थी युवकांच्या प्रश्नांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकारने जबाबदारी टाळण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. तसेच देशातील 20 हून अधिक विद्यार्थ्यांनी या संदर्भात आत्महत्या केल्या असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देणे आवश्यक होते. परंतु असंवेदनशील सरकारने अद्याप पर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थी व युवकांच्या न्याय मागण्याबाबत सरकारची भूमिका निराशाजनक व अन्यायकारक असल्याची भावना समाजात वाढत आहे. या सर्व जनविरोधी आणि विद्यार्थ्यांच्या विरोधी धोरणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करत असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांनी सांगितले. यावेळी दिलेल्या निवेदनात  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. ज्या कंपनीने ब्लॅक लिस्टेड आहेत त्या व अशा कंपन्यांमधील संचालक असलेल्या संस्थांना काम देण्यात येऊ नये. एनटीए संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करावी. ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेमधील त्रुटी दूर करून पारदर्शक व विश्वासार्य प्रणाली लागू करावी. पोलीस भरती प्रक्रियेतील कथित अन्याय दूर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय जाहीर करावे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, ऑनलाईन घेण्यात येऊ नयेत व त्यासाठी कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मच्छीमारांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्री नितेश राणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक

पनवेल (प्रतिनिधी) – मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासोबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश…

कल्याण डोंबिवली महानगर साहित्य भारतीच्या वतीने कालिदास जयंती उत्साहात 

कल्याण : कल्याणच्या नमस्कार मंडळ सभागृहात रविवारी कालिदास जयंती कार्यक्रम पार पडला.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य भारतीच्या कल्याण-डोंबिवली महानगराचे अध्यक्ष प्रा. नारायण फडके हे होते. महानगर कार्याध्यक्ष अश्विनी मुजुमदार यांनी प्रास्ताविक…

 पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या : खासदार सुनील तटकरे, नारायण राणे यांचे प्रशासनाला निर्देश

 दिशा समितीच्या बैठकीत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर रत्नागिरी | अशोक गायकवाड राज्य आणि केंद्र शासनाच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम…