मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन संबंधित विभागाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जून महिन्यात शाळा सुरू होऊनही काही शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश व इतर साहित्य अद्याप मिळालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
संबंधित अधिकारी व साहित्य वाटपाची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराच्या कामकाजाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मिरजे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात आवश्यक असल्यास एस आय टी मार्फत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, तसेच विद्यार्थ्यांना गणवेश व इतर आवश्यक साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
