एसएसईआय बुद्धिबळ स्पर्धेत दृष्टीदोष असलेल्या ६० खेळाडूंचा सहभाग
– शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या ३ऱ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजन कल्याण : वडाळा येथील शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटने आपल्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात दृष्टिहीन खेळाडूंसाठी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेने केली. हा कार्यक्रम ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड आणि ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत ३० विशेष बुद्धिबळ पटांवर एकूण ६० खेळाडूंनी सहभाग घेतला. अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रीकृष्ण प्रकाश हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केवळ वैद्यकीय उपचारांपलीकडे जाऊन पुनर्वसन, आत्मविश्वास वाढवणे आणि स्वावलंबी जीवन जगण्यास सक्षम करणे, या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब या उपक्रमात दिसून आले. या स्पर्धेने दृष्टिहीन खेळाडूंना – ज्यामध्ये एसएसईआयच्या पुनर्वसन आणि कमी दृष्टी सेवांमधील रुग्णांचाही समावेश होता अशांना एकत्र आणले आणि त्यांना त्यांचे बुद्धिबळातील कौशल्य, आत्मविश्वास तसेच जिद्द प्रदर्शित करण्यासाठी एक सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला; यापैकी काही खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील होते आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती.
कल्याणमध्ये पुन्हा कुत्र्यांची दहशत
चिमुकल्याच्या हाताचा खोलवर चावा कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात पाळीव कुत्र्याने एका चिमुकल्यावर केलेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साई शरण इमारतीत घडलेल्या या घटनेत कुत्र्याने चिमुकल्याच्या हाताचा जोरदार चावा घेतला. या हल्ल्यात त्याच्या हाताला खोलवर जखम झाली असून, जखम एवढी गंभीर होती की हाताचे मांस बाहेर आले. हल्ल्याची संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला इमारतीच्या परिसरात असताना अचानक पाळीव कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या हाताला जोरदार चावा घेतल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरातील नागरिकांनी पाळीव कुत्रे पाळताना आवश्यक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाते का, याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी लहान मुले व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी संबंधितांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने समोर येत असताना प्रशासनाने केवळ घटना घडल्यानंतर कारवाई न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
– ठाण्याच्या राजाने रचला इतिहास, सरावादरम्यान उभारले ९ थर
ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपखाडी, नामदेववाडी नाका येथे तब्बल ९ थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचला. गेल्या अनेक वर्षांपासून सरावाच्या ठिकाणी…
बीओबी टेबल टेनिस स्पर्धेत मिथुन, सुभ्रदिता विजेते
मुंबई: बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय टेबल टेनिस संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये मिथुन निमसटकरने पुरुष गटाचे तर सुभ्रदिता कर्माकरने महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. तोडीस तोड खेळ करीत रंगलेल्या अंतिम सामन्यात अखेर…
आयुक्तांच्या घराभोवती खड्ड्यांचे साम्राज्य
केडीएमसी प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप कल्याण : कल्याण-बिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांची डोकेदुखी वाढवली असून, आता मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत मार्गापर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे…
६७ महिन्यांपासून वेतन थकीत, कर्मचाऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू!
केशव बनसोडे यांच्या मृत्यूची चौकशी करून कुटुंबीयांना थकीत वेतन व आर्थिक मदत द्या — डॉ. डी. एल. कराड अनिल ठाणेकर ठाणे-जालना जिल्ह्यातील आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी केशव…
अजित पवार गटाला धक्का
ठाण्यातील युवक पदाधिकाऱ्यांचा डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार गटात प्रवेश अनिल ठाणेकर ठाणे- ठाण्यातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गळती लागली आहे. अजित पवार गटातील ओवळा – माजीवडा विधानसभा क्षेत्राचे युवक कार्याध्यक्ष फिरोज शेख आणि ब्लाॅक अध्यक्ष गोश्फाक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेला अनुसरून आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व स्वीकारून मोठ्याप्रमाणात युवक पक्ष प्रवेश करू लागले आहेत. आज युवक अध्यक्ष अभिजीत पवार, युवा नेते वीरू वाघमारे यांच्या पुढाकाराने अजित पवार गटातील ओवळा – माजीवडा विधानसभा क्षेत्राचे युवक कार्याध्यक्ष फिरोज शेख आणि ब्लाॅक अध्यक्ष गोश्फाक शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी माथाडी सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, ओबीसी सेलच्या महिलाध्यक्ष मनिषा पाटील, बिपीन गेहलोत आदी उपस्थित होते.
३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- महापौर शर्मिला पिंपळोलकर
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टिझर अनावरण सोहळयास अभिनेते आदिनाथ कोठारे, निलेश साबळे यांची उपस्थिती संपदा सावंत ठाणे (२४) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रविवार, ३० ऑगस्ट रोजी रंगणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. ‘धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये २५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दिपक जाधव, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते (श.प)अभिजीत पवार, नगरसेवक बाबाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त १ मनिष जोशी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, अभिनेते व निर्माता मंगेश देसाई आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टिझरचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते, अभिनेते नीलेश साबळे व आदीनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी-शर्ट व मॅरेथॉनच्या सन्मानचिन्हांचे अनावरण करण्यात आले. मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही २१ किलोमीटर पुरुष व महिला, १८ वर्षांवरील पुरुष १० किलोमीटर आणि १८ वर्षांवरील महिला १० किलोमीटर या प्रमुख गटांसाठी टाइम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. २१ किलोमीटर पुरुष व महिला गटातील स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन पुन्हा महापालिका भवन येथेच समाप्त होणार आहे. या गटासाठी प्रथम क्रमांकाला १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला ५० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकाला ३० हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकाला २० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय इतर आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. १८ वर्षांवरील महिलांसाठी १० किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार, तृतीय १५ हजार, चतुर्थ १० हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. १८ वर्षांवरील पुरुषांची १० किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन मिलेनियम टोयोटा येथे समाप्त होईल. या गटासाठीही प्रथम २५ हजार, द्वितीय २० हजार, तृतीय १५ हजार, चतुर्थ १० हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. १५ वर्षांवरील मुले-मुलींसाठी ५ किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन ते माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक या मार्गावर होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ८ हजार, द्वितीय ५ हजार, तृतीय ५ हजार ५००, चतुर्थ ५ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी ४ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ३ किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. या गटासाठी प्रथम ५ हजार ५००, द्वितीय ५ हजार, तृतीय ४ हजार ५००, चतुर्थ ३ हजार ५०० आणि पाचव्या क्रमांकासाठी ३ हजार रुपयांचे पारितोषिक आहे. शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. ६० वर्षांवरील महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी १ किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महापालिका भवन येथून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ठाणे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांत ३ किलोमीटरची स्पर्धा होणार आहे. महापालिका भवन येथून सुरू होऊन याच ठिकाणी या स्पर्धेचा समारोप होईल. या गटातील विजेत्यांना प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ‘रन फॉर फन’ ही १ किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. विजेत्यांना प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील स्पर्धक विजेता ठरला तरी पारितोषिकाची संख्या आणि रक्कम समान राहणार आहे. मॅरेथॉनमध्ये २५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याने स्पर्धा मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. धावपटूंना सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच होत असलेल्या या महापौर वर्षा मॅरेथॉनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ठाणेकरांनी या मॅरेथॉनकडे केवळ स्पर्धा म्हणून न पाहता शहराच्या क्रीडा संस्कृतीचा उत्सव म्हणून सहभागी व्हावे. शालेय विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने धावून मॅरेथॉनचा उत्साह वाढवावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.
प्रतीतीची एकहाती आघाडी तर मयांकचे वर्चस्व कायम
आशियाई कनिष्ठ क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा मुंबई, २४ ऑगस्ट: मुंबईतील आयटीसी मराठा शेरेटन येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ मुलींच्या क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत, अव्वल मानांकित डब्ल्यूएफएम प्रतीती बोरदोलोई हिने सातव्या फेरीत डब्ल्यूसीएम…
