Month: August 2026

महेंद्रशेठ घरत यांनी ३५ जणांना घडवले नितांतसुंदर व्हिएतनामचे पर्यटन!

उलवे : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांचे अनोखे दातृत्व‌ सर्वपरिचित आहे. दुसऱ्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. ज्यांनी केवळ विमान हा शब्द…

नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीतून सीमांकन, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ठाणे: पर्यावरणाचे संवर्धन आणि कोळीवाड्यांच्या सिमांकनाच्या मुद्द्याचे पोस्टर हे चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच तर्फे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून काढलेले यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.  चेंदणी…

राष्ट्रीय क्रीडा दिनी ‘बदलते क्रीडा जगत’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पोईसर जिमखाना येथे २९ ऑगस्ट, सायंकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिकलबॉल खेळाचे भारतातील आद्य प्रवर्तक व ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील वालावलकर लिखित ‘बदलते क्रीडा जगत’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार व जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच प्रसंगी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. क्रीडाप्रेमी, खेळाडू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोईसर जिमखानाच्या वतीने करण्यात आले आहे.

आयुक्तांच्या दालनासमोर श्रमजीवी कामगारांचे धरणे आंदोलन

 गेल्या काही महिन्यांपासून वेतन थकले मिरा-ईंदर: मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) मुख्यालयात श्रमजीवी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक मोर्चा काढला. हा मोर्चा थेट आयुक्तांच्या केबिन समोर धडकला आणि कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी…

 उल्हासनगरात पुन्हा घुमला माता मंदिरातील घंटानाद

 सहा महिन्यांपासून बंद असलेली घंटा झाली मुक्त सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगरातील हिंदू समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेशी निगडित असलेल्या एका महत्त्वपूर्ण विषयावर अखेर तोडगा निघाला असून, मागील सुमारे सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेल्या देवी मंदिरातील घंटा पुन्हा वाजू लागल्याने परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. उल्हासनगर-१ येथील जय अंबे माता मंदिरात मंगळवारी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी आणि शिवसेना शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली हरजिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर यांनी या विषयात पुढाकार घेतला. हिंदू समाजाच्या श्रद्धेचा प्रश्न असल्याने त्यांनी मागे-पुढे न पाहता आवाज बुलंद करत मंदिरातील घंटा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमानंतर जय अंबे माता मंदिरात पुन्हा एकदा घंटानाद घुमला. मंदिरातील घंटा खुली करण्यात आली असून, लाऊडस्पीकरवर विधिवत सुंदरकांडाचा पाठ करण्यात आला. त्यानंतर माता राणीची महाआरती उत्साहात संपन्न झाली. यापुढे मंदिरात दररोज नियमितपणे आरती करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.महाआरती आणि सुंदरकांड पाठामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. सिंधी समाजातील स्थानिक नागरिकांनी विक्की भुल्लर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तहेदिलाने स्वागत केले. हिंदू समाजाच्या आस्था आणि धार्मिक श्रद्धेसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. या वेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी परिवहन सभापती संतोष पांडेय, उत्तर भारतीय शहर संघटक के. डी. तिवारी, म्हारळ युवासेना शहर अधिकारी अमित देशमुख, उपशहरप्रमुख जयकुमार केणी, अरुण तांबे, सुरेश सोनवणे, जितू उपाध्याय, नंदू भोईर, विभागप्रमुख विनोद सालेकर, प्रमोद पांडेय, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर मारसळे, कृष्णा सातपुते, विभाग संघटक आदेश पाटील, शिवसेना वैद्यकीय शहर समन्वयक बिपीन सिंग, महिला उपशहर संघटक शशिकला राजपूत, उपविभागप्रमुख विशाल आंबेकर, मुन्ना खान, सागर पगारे, संतोष पाठक, विक्की चौहान, समाजसेवक महेश यादव, ओमप्रकाश मिश्रा, रमेश सिंग चौहान (मिंटी), किशोर साळवी, राजेश त्रिपाठी, कुणाल सिंह, शिवम चुनिया आणि भावेश खत्री यांच्यासह स्थानिक शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी हिंदू समाजाच्या श्रद्धा आणि मंदिरांच्या पावित्र्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.या उपक्रमामुळे परिसरात एकच संदेश देण्यात आला की ‘श्रीराम मंदिराला कोणी रोखू शकले नाही, तर उल्हासनगरमध्ये हिंदू मंदिरातील आरती आणि श्रद्धेला कोण रोखणार?, मंदिर हे आमच्या श्रद्धेचे केंद्र आहे, आरती हा आमच्या भक्तीचा आवाज आहे आणि हिंदू समाजाच्या आस्थेचा सन्मान झालाच पाहिजे! हिंदुत्वाच्या विचारांसाठी, हिंदू समाजाच्या आस्थेसाठी आणि मंदिरांच्या सन्मानासाठी हरजिंदरसिंह उर्फ विक्की भुल्लर सदैव मैदानात राहतील’, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कुडाळ -कोल्हापूर अंतर होणार कमी…!

घोटगे -सोनवडे घाट मार्गाला केंद्राची अंतिम मंजुरी! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)–सिंधुदुर्ग- कोल्हापूर जोडणाऱ्या गेली कित्येक वर्षे रखडलेल्या घोटगे -सोनवडे घाट मार्गाला अखेर केंद्रीय पर्यावरण समितीने अंतिम परवानगी दिली आहे.  त्यामुळे आता या नव्या घाटाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी सदर घाट मार्गाला पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती आता केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याने प्रकल्पाला आता हिरवा कंदील मिळाला आहे खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे तसेच राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही मंजुरी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो असे राणे यावेळी म्हणाले या मार्गामुळे परिसराच्या विकासालाही मोठी चालना मिळेल हा घाट मार्ग पूर्ण करण्यासाठी स्थानिक तसेच राज्य पातळीवर आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलण्यात येतील आणि प्रकल्प मार्गी लावला जाईल असेही राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग कोल्हापूर जोडणाऱ्या या घाट  मार्गाचा प्रश्न १९८५ पासून प्रलंबित आहे. हा घाट मार्ग व्हावा ही तत्कालीन जि. प. सदस्य कै.महेंद्र नाटेकर यांची मूळ कल्पना. या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली घोटगे- सोनवडे व आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी अनेक आंदोलने उपोषणे, धरणा कार्यक्रम केले. मोर्चेही काढले. मात्र दिल्लीच्या पर्यावरण विभागात हा प्रकल्प मंजुरीसाठी अडकून पडला. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी गेली दोन वर्षे केंद्राकडे या संबंधात पाठपुरावा केला अखेर त्याला यश येऊन आता अंतिम मंजुरी मिळाली आहे. या घाट मार्गामुळे कुडाळ  घोटगे -सोनवडे ते कोल्हापूर हे अंतर तब्बल ४० किलोमीटरने कमी होणार आहे. दीड ते दोन तासात कुडाळ वरून कोल्हापूर गाठता येणार आहे. सह्याद्रीच्या रांगांमधील अनेक गावे  मुख्य विकास प्रवास सामील होणार आहेत. या घाट मार्गामुळे संपूर्ण कुडाळ मालवण या दोन तालुक्यांसह वेंगुर्ले आणि कणकवली तालुक्यातील अनेक गावे कोल्हापूरच्या अधिक जवळ येणार आहेत. भुदरगड (कोल्हापूर )ते कुडाळ (सिंधुदुर्ग) ही ब्रिटिश काळातील पाऊलवाट होती. २०२५ मध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशाने, प्रयत्नाने तांत्रिक सर्वेक्षण करून मार्ग निश्चित करण्यात आला. जुलै,२०२५ मध्ये स्थानिक आमदार डॉ. निलेश राणे यांनी दिल्लीत पर्यावरण विभागात अडकलेल्या या प्रकल्पाच्या अंतिम परवानगीसाठी  हालचाली सुरू केल्या. खासदार विद्यमान खासदार नारायण राणे यांनीही या प्रश्नाचा दिल्लीत जोरदार पाठपुरावा केला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही राज्य सरकारच्या पातळीवर त्याचा पाठपुरावा केला अखेर या तिघांनी दिल्ली गाठत पर्यावरण मंत्रालयाची अंतिम परवानगी मिळवली. १३ किलोमीटर लांबीच्या सोनवडे (कुडाळ)-शिवडाव (कोल्हापूर) या नव्या घाट  मार्गाला केंद्रीय पर्यावरण समितीची अंतिम मंजुरी मिळाली असून त्यासाठी १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा मार्ग बनवला जाणारा असून संपूर्ण वर्षभर या घाटातून प्रवास करता येणार आहे.

सामाजिक जाणीवेतून आंतरराष्ट्रीय मैदान बनवणार: अमरीश पटेल

मुंबई प्रतिनिधी :मुंबईतील तीन मैदानांची १६ एकर जागा श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (एसव्हीकेएम) ट्रस्टला देण्यात आल्याप्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून गैरसमजातून झाल्याचा दावा ट्रस्टचे अध्यक्ष अमरीश पटेल यांनी २६ ऑगस्टला ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खुलासा केला. यावेळी विरोधकांकडून वारंवार मुख्यमंत्र्यांनी ट्रस्टला भूखंड मोफत देण्यात आल्याच्या आरोपांचे अमरीश पटेल यांनी खंडन केले. तसेच एसव्हीकेएम ट्रस्टला भूखंड मोफत देण्यात आलेले नसून ते परवाना पद्धतीने मिळालेले आहेत. त्याचबरोबर या भूखंडांच्या जागेची मालकी सरकारचीच असल्याचेही यावेळी पटेल यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पटेल यांनी सामाजिक बांधिलकीतून मुंबईकरांसाठी काहीतरी देणे लागत असल्याच्या भावनेतूनच क्रीडा जगतासाठी उत्कृष्ट सुविधा देण्याची प्रामाणिक इच्छा असल्याने मुंबईत मोठे क्रीडांगण व्हावे, यासाठी भूखंडाचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच भूखंड वाटपाबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आल्याचे पटेल यांनी म्हटले. यावेळी पटेल यांनी, “मी जगातून गेल्यावरही मुंबईकर माझी आठवण काढतील, हीच माझी प्रामाणिक इच्छा असून याच उद्देशाने या भूखंडावर चांगले क्रीडांगण उभारण्याचा मानस आहे,” असे सांगितले. तसेच हे क्रीडांगण सर्व मुंबईकरांसाठी खुले राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच याप्रसंगी अमरीशभाई पटेल यांनी मुंबईत खेळाडूंना सातत्याने सराव आणि प्रशिक्षण घेता येईल, अशा दर्जेदार क्रीडा सुविधांची गरज अधोरेखित केली. “भारत २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धांचे तसेच इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर क्रीडा संस्कृतीही मजबूत करणे गरजेचे आहे. मुंबईतील तरुण खेळाडूंना चांगल्या सुविधा, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्यातून भविष्यातील विजेते घडू शकतात. याच उद्देशाने मुंबई उपनगरातील एक लाख तरुणांपर्यंत जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे पटेल यांनी म्हटले. दरम्यान, एसव्हीकेएम संस्थेने आतापर्यंत एकात्मिक क्रीडा परिसंस्था विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. मुंबईतील तरुणांना क्रीडा क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने सप्टेंबर २०२५ मध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. सात संस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला, तर चार संस्थांचा अंतिम मूल्यांकनासाठी विचार करण्यात आला. एसव्हीकेएमने एकूण महसुलातील ५० टक्के हिस्सा देण्याची सर्वाधिक बोली सादर केली असल्याचे संस्थेने म्हटले आहे. मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा देण्याचा संस्थेचा उद्देश असून, मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (एसव्हीकेएम) शहरातील तीन ठिकाणी क्रीडा सुविधांचा विकास आणि व्यवस्थापन करणार आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डन आणि अंधेरीतील डी. एन. नगर येथील सिमेंट गोडाऊन या तीन ठिकाणांचा त्यात समावेश असून, या जागांचे एकूण क्षेत्रफळ १६ एकर नसून १४.११ एकर आहे. या तिन्ही जागांची मालकी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे (म्हाडा) कायम राहणार आहे. एसव्हीकेएमला म्हाडाच्या जागा ३ वर्षांसाठी, तर मुंबई महापालिकेचे क्रीडा संकुल १० वर्षांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने मर्यादित कालावधीसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे जागांचे कायमस्वरूपी हस्तांतरण संस्थेकडे झालेले नसून, मालकी मुंबई महापालिका आणि म्हाडाकडेच राहणार असल्याचे एसव्हीकेएमने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पांतर्गत स्थानिक नागरिक, मुले आणि युवा खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. भारतीय खेळ खो-खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, अॅथलेटिक्स, टेनिस, बास्केटबॉल, पिकलबॉल, तसेच इनडोअर जिम्नॅशियम आणि इनडोअर खेळांच्या सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारा भांडवली खर्च, संचालन आणि सुविधांच्या विकासासाठीचा सर्व देखभाल खर्च एसव्हीकेएम करणार आहे. अंधेरीतील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त ४० ते ५० प्रमाणित प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी, समन्वयक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्त करण्याचे प्रस्तावित आहे. एसव्हीकेएमच्या म्हणण्यानुसार, संस्थेच्या क्रीडा उपक्रमांमध्ये सध्या १४८ हून अधिक क्रीडा प्रशिक्षक कार्यरत आहेत. दरम्यान, या तीन जागांचे एकत्रित क्षेत्रफळ १६ एकर नसून १४.११ एकर असल्याचेही एसव्हीकेएमने स्पष्ट केले आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे क्षेत्रफळ ११.५७ एकर, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डनचे ०.९२ एकर आणि डी. एन. नगरमधील जागेचे १.६२ एकर आहे. एसव्हीकेएमची खेळाबद्दल दूरदृष्टी आणि कटिबद्धता • २०३६ मध्ये भारत ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. • ऑलिंपिक स्पर्धा भारतात होणार असतील, तर त्यासाठी सक्षम क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. • त्यामुळे सर्वोत्तम आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा तयार होणे आवश्यक आहे. • मुंबईतील खेळाडूंना सर्वोत्तम क्रीडा सुविधा आणि प्रशिक्षण मिळावे, यासाठी एसव्हीकेएम ही तयारी करत आहे. 0000

लाडकी बहिण योजनेसाठी मागासवर्गीय समाजाच्या बहिण-भावांवर अन्याय का?

मुंबई : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्षाबंधनापूर्वीच १५०० रुपये जमा होण्यास सुरु झाले आहेत पण यासाठी सामाजिक न्याय विभागातून ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आला…

 कल्याणमध्ये युवक काँग्रेसची महागाई विरोधात ‘अंत्यसंस्कार यात्रा’

 तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत सरकारची काढली अंत्यसंस्कार यात्रा कल्याण : कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने साखरेच्या दरवाढीविरोधात तहसील कार्यालयावर  ‘अंत्यसंस्कार यात्रा’ काढण्यात आली. साखर आणि साखरपिकाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुगर डॅडी असा उल्लेख असलेला बॅनर हातात घेऊन भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढती महागाई सरकारने कमी करावी अशी मागणी यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांनी केली. यावेळी कॉंग्रेसच्या गटनेत्या तथा महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. साखर महागली, चहाचा गोडवा पळाला, भाजप सरकारच्या कारभाराने जनतेचा खिसा मात्र जळाला. आता चहात साखर टाकायची की साखरेसाठी कर्ज काढायचं? असा उपरोधिक टोला लगावत साखर आणि साखरपिकाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. ऊस शेतकऱ्याचा, साखर जनतेची, पण दरवाढीचा फटका जनतेच्या खिशाला. गोड बोलणाऱ्या सरकारने साखर मात्र कडू केली. महागाईच्या या तडाख्याला आता युवक काँग्रेस सडेतोड उत्तर देत जनतेच्या हक्कासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांनी दिली.

 गरीबाच्या घराची जबरदस्तीने तोडफोड केल्याचा आरोप

नगरसेवक महेश गायकवाड विकासकावर संतापले; ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गंगाराम राठोड यांचे घर पाडले कल्याण : कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात गॅस कंपनी जवळ सोसायटीच्या विकासकामादरम्यान एका गरीब कुटुंबाच्या घराची कथितरित्या जबरदस्तीने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली विकासक संतोष केंगळे यांनी गंगाराम राठोड यांच्या घराची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राठोड कुटुंब गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून या घरात वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले. तोडफोडीच्या कारवाईत घरातील संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाल्याने गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत विकासकाच्या कारवाईबाबत तीव्र संताप व्यक्त केला. “मी कोणत्याही गरीबावर अन्याय होऊ देणार नाही. विकासाच्या नावाखाली गरीबांच्या घरांवर कारवाई करून त्यांच्या हक्कांवर गदा आणली जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली. तसेच विकासक आणि त्यांना कथितरित्या राजकीय पाठबळ देणाऱ्यांच्या दादागिरीविरोधात आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी करणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. पीडित गंगाराम राठोड आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, विकासक संतोष केंगले यांनी महेश गायकवाड यांनी आपल्यासोबत मारहाण केल्याचा तसेच जातिविषयक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. घटनेमुळे परिसरात नाराजीचे वातावरण असून, पोलीस आणि प्रशासनाकडून या प्रकरणात कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बातमी लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.