Month: August 2026

ठाणे व कल्याण-डोंबिवलीच्या गतकापटूंची राज्यस्तरीय स्पर्धेकडे दमदार वाटचाल

कल्याण : अचीवर कॉलेज, कल्याण येथे ९ ऑगस्टला ठाणे जिल्हा गतका असोसिएशन व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका गतका असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय गतका निवड चाचणी उत्साहात पार पडली. या चाचणीत विविध…

 कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्या

मुख्यमंत्र्यांकडे सीटूची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : कोविड-१९ महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अंगणवाडी व मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचर तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा, अशी मागणी सीटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामविकास विभागाने १३ मार्च २०२० व २४ मार्च २०२० रोजी काढलेल्या सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांनी जनजागृती, महाआयुष सर्वेक्षण, आरोग्यविषयक उपाययोजना तसेच कोविडसंदर्भातील विविध कामे अहोरात्र आणि जीव धोक्यात घालून केली. या कर्मचाऱ्यांना नियमित मानधनाव्यतिरिक्त दरमहा ₹१,००० प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाच्या सूचनांनंतरही संबंधित कर्मचाऱ्यांना आजतागायत हा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषदांनी ही जबाबदारी ग्रामपंचायतींची असल्याचे सांगितले असून, ग्रामपंचायती निधीअभावी भत्ता देण्यास असमर्थ असल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड योद्धा म्हणून काम केलेल्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना परिपत्रकानुसार प्रत्येकी सुमारे ₹२४,००० इतका प्रोत्साहन भत्ता तातडीने मंजूर करून वितरित करण्याचे आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी सिटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे. ०००००

संघाच्या ‘हिटलरवादी सांस्कृतिक राष्ट्रवादा’विरोधात पर्यायी सांस्कृतिक राष्ट्रवाद उभारण्याची गरज : संभाजी भगत

ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक राजकारणाचा महत्त्वाचा भाग असलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा हिटलरवादी विचारसरणीवर आधारित असल्याचा आरोप लोकशाहीर संभाजी भगत यांनी केला. संघाला देशात विरोधी पक्ष नकोत, संघाचा संविधानाला…

 रिंग मेट्रो हा काय भातुकलीचा खेळ आहे का?

 मनोज प्रधान यांचा ठाण्यातील आमदारांवर घणाघात अनिल ठाणेकर ठाणे – ठाणेकरांची मागणी नसताना सत्ताधाऱ्यांनी रिंग मेट्रो प्रकल्प लादला आहे. सोशल मिडीयावर १०० टक्के लोक विरोध करीत आहेत. असे असताना, शहराचे प्रतिनिधीत्व करणारे तीन आमदार,  “हा प्रकल्प फेस्टिव्हल होणार नाही म्हणून पुढे सरकवा; सोसायटीच्या दारात स्टेशन नको म्हणून २०० मीटर पुढे न्या; कळवा- मुंब्रा येथे प्रकल्प न्या”, असे सल्ले देत आहेत. हा प्रकल्प म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. जर तुम्ही एखाद्या विदूषकाला निवडून दिले, तर सर्कसचीच अपेक्षा करा!, असा टोलाही प्रधान यांनी लगावला आहे. मनोज प्रधान यांनी रिंग मेट्रो रेल्वेला सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून उभारला जाणारा हा प्रकल्प ठाणे शहराच्या मूळावर उठणार आहे, असे प्रधान यांनी सप्रमाण पटवून दिले आहे. त्यावर ठाणे शहरातील तीन आमदारांनी तीन अव्यवहार्य सूचना केल्या आहेत. त्यावर प्रधान यांनी टीकेचा सूर आळवला आहे. प्रधान यांनी सांगितले की,  रिंग रेल्वेचा प्रकल्प हा ठाणे शहरासाठी जाहीर करण्यात आला आहे.  १२,२०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र, आपला पहिला प्रश्न आहे की,  हा प्रकल्प मागितला कुणी? ठाण्यातील कुठल्या नागरिकाला हा रिंग रेल्वे प्रकल्प पाहिजे?  सोशल मीडियावर बघितलं, तर १०० पैकी १०० कमेंट्स ह्या प्रकल्पाच्या विरोधात जातात. त्याचे कारण आहे की, मेट्रो लाइन चार आणि मेट्रो लाइन पाच गेले १० वर्ष चालू करू शकलेले नाहीत. आता ही नवीन रिंग रेल्वे तुम्ही सुरू करताय. आपण सुरूवातीलाच १,००० कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक बसेस घ्या आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करा, पण आपल्या सत्ताधाऱ्यांना त्यावर काहीच  बोलायचे नाही. काही ठाणेकर या प्रकल्पाला विरोध करीत असले तरी एका सोसायटीचे लोक,  आमच्या समोर स्टेशन नको, २०० मीटर पुढे स्टेशन घेऊन जा. दुसरे सोसायटी वाले सांगतात, या रस्त्यावर नका घेऊ, मागच्या रस्त्यावर नेऊन घ्या, असे म्हणत आहेत. हा अतिशय चुकीचा पायंडा पडतोय. १२,२०० कोटीच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही एक तर लोकांच्या सूचना – हरकती घेतल्याच नाहीत. लोकांना हा प्रकल्पच नको आणि भातुकलीसारखा खेळ सुरू केलाय. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, नियोजनशून्य विकास आम्हाला मान्य नाही.हा प्रकल्प राबविताना जे नियोजन करायचे होते ते करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प राबवित असताना प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. हा प्रकल्प २०२९ मध्ये पूर्ण होणार असल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी २०३५ पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणे शक्यच नाही. त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला हवेत. कारण, त्यांनी नागरिकांच्या सुचना – हरकती – सल्ले घेऊ, असे म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागतच आहे. परंतु, सुचना , हरकती येण्याआधीच जर कामे सुरू असतील तर फायदा कसा काय होणार?  त्यामुळे नागरिकांच्या हरकती, सुचना स्वीकारून त्यावर साधक – बाधक चर्चा झाल्याशिवाय प्रकल्पाचे कामच सुरू करू येऊ नये,  तसेच मेट्रो लाइन चार आणि मेट्रो लाइन पाच पूर्ण कार्यन्वित झाल्याशिवाय रिंग मेट्रोचा विचार  करू नये, अशी आमची मागणी असल्याचेही प्रधान यांनी म्हटले आहे.

‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत ठामपाच्या शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी तयार केल्या तिरंगा राख्या  विविध शाळांमध्ये स्थानिक नगरसेवकांची उपस्थिती ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत…

१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी पूर्ण केले प्रशिक्षण

 मराठीचे ज्ञान अनिवार्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होणार-  प्रताप सरनाईक अनिल.ठाणेकर ठाणे-१ मे पासून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप १७ ऑगस्टला ठाण्यातील राम गणेश…

राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत ३ हजारहून अधिक बालचित्रकारांनी साकारली कल्पक रंगचित्रे

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता आयोजित ‘बाल चित्रकला स्पर्धा’ या राज्यस्तरीय उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपल्या मनातील कल्पनांना रंगाच्या माध्यमातून चित्ररूप…

तायक्वांदो ग्रॅंडमास्टर संतोष गुलदेकर यांचे कोरिया, थायलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश

मुंबई. …नुकत्याच दक्षिण कोरिया आणि थायलंड येथे झालेल्या आंतर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ५३ वर्षीय तायक्वांदो ग्रॅंडमास्टर संतोष गुलदेकर यांनी शानदार कामगिरी करताना ३ रौप्य आणि १ कास्य पदकाची कमाई केली.…

 रायगड जिल्ह्यातील ३ अनाथ बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब

आदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे विशेष प्रयत्न अशोक गायकवाड रायगड-लिबाग : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रीआदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचे निर्देश दिले…

 विनायक निम्हण राज्य कॅरम स्पर्धा

– झैद – प्राजक्ताला विजेतेपद मुंबई : सोमेश्वर फाऊंडेशनच्यावतीने व नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तसेच झेनेटीक स्पोर्ट्सच्या सहकार्याने सनिज वर्ल्ड, सनी स्पोर्ट्स किंग्डम, पुणे येथे संपन्न झालेल्या कै. विनायक निम्हण तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या सागर वाघमारेचा १७-१२, १६-१२ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी झैदने मुंबईच्या प्रशांत मोरेचा १५-२५, २५-२२ व २५-१० असा तर सागरने पुण्याच्याच अभिजित त्रिपनकरचा २५-६, २५-१९ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा २५-१०, २५-११ असा सरळ दोन सेटमध्ये प्रभाव केला. तर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या मधुरा देवळेवर २३-१९, १७-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून आपल्या विजयावर शिक्कमोर्तब केला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी प्राजक्ताने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला २३-२१, १२-२५ व २५-६ असे तर मधुराने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणला २५-७, २१-१७ असे पराभूत केले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला रंगतदार तीन सेटमध्ये २४-१०, १४, २५ व २५-१२ अशी मात केली. स्पर्धेतील विजेत्यांना उद्दोजक मधुरा वाळुंज, ज्येष्ठ राष्ट्रीय विजेते व शिव छत्रपती पुरस्कारार्थी सुहास कांबळी यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर अहमद खान, यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव सुशील गुजर आणि राज्य कॅरम असोसिएशनचे सहसचिव आणि स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते उपस्थित होते. मधुरा वाळुंज यांनी खेळाडूंचे कौतुक करताना कै. विनायक निम्हण यांना क्रीडा क्षेत्राची आवड असून ते स्वता उत्कृष्ट कॅरम खेळत असत असे सांगितले. तर अरुण केदार यांनी प्रतिवर्षी कॅरम स्पर्धेचे आयोजन करत असल्याबद्दल सोमेश्वर फाऊंडेशन व स्पर्धेचे आश्रयदाते नगर सेवक सनी निम्हण यांचे विशेष आभार मानले. तसेच स्पर्धेचे नीट नेटके आयोजन केल्याबद्दल राज्याचे सहसचिव,सहकारी व स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते यांचे कौतुक केले. ००००