नगरसेवक रफिक शेख यांची  मागणी

मुंबई प्रतिनिधी

जानेवारीमध्ये माझ्या प्रभागात मालाड येथे एका इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्या स्फोटाचे परिणाम इतके गंभीर होते की दुसऱ्या मळ्यापर्यंत या स्फोटाची झळ पोहोचली होती. या स्फोटामुळे एकूण सात लोक जखमी झाले होते. त्यानंतर त्यातील पाच जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकी घटना अशी झाली की जेव्हा हा स्फोट झाला त्यानंतर या सगळ्या जखमी रुग्णांना त्वरित एका लोकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुविधा मिळाली परंतु त्या रुग्णालयामध्ये बर्न ओढ नसल्याने तेथे त्यांचा इलाज होऊ शकला नाही. त्यांना त्वरित शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथे देखील बर्न वॉर्ड  हा कार्यान्वित नव्हता. त्यामुळे येथील रुग्णांना पुन्हा साधी वैद्यकीय सुविधा पुरवून त्यांना पुन्हा कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या रुग्णालयात देखील बर्न वॉर्ड कार्यान्वीत नसल्याने या रुग्णांना पुन्हा केम रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या रुग्णालयातून चार रुग्णालयात शिफ्ट करण्यामध्ये रुग्णांचा फार मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. यामुळे या रुग्णांना त्वरित उपचार न मिळाल्याने या रुग्णांचा जीव जातो असं माझा गंभीर आरोप आहे. या रुग्णालयातून विचार देण्यासाठी या रुग्णांकडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले. हे फार दुर्दैवी आहे. एकाच कुटुंबातील पाच जण जर जखमी असेल तर ते रुग्णांना डिस्चार्ज देण्यासाठी पैसे कसे देणार. तरी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वार्डामध्ये अशा भाजलेला रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयात एक पॉलिसी आणावी जेणेकरून प्रत्येक रुग्णांना त्वरित आणि लवकर योग्य उपचार मिळेल  अशी मागणी नगरसेवक रफिक शेख यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *