रमेश औताडे
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित अलीकडील घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते जगदीश कुमार इंगळे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे.
इंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संबंधित घटनेमागील वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष तपासणी होऊन सत्य समोर आणावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संबंधित घटनेबाबत अधिकृत तपास यंत्रणांकडून कोणताही अंतिम निष्कर्ष जाहीर झालेला नसल्याने, घातपात किंवा अन्य कोणत्याही कारणांबाबत निश्चित दावा करण्यात आलेला नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकले नाही असे सांगत बिगर सातबारा शेतकरी संघटनेने या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *