Author: bittambatami.com

 मयंक आणि प्रतीतीने मारली बाजी

एशियन ज्युनियर क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा भारताचा डबल धमाका मुंबई : अंधेरी येथील आयटीसी मराठा शेरेटन येथे झालेल्या एशियन ज्युनियर क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदके जिंकून दुहेरी यश साध्य केले. मयंक चक्रवर्ती आणि प्रतीती बोरदोलोई यांनी अनुक्रमे खुल्या (ओपन) आणि मुलींच्या गटातील विजेतेपदे पटकावले. संपूर्ण स्पर्धेत अव्वल मानांकित मयंकने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत नऊ फेऱ्यांच्या ओपन स्पर्धेत ७.५ गुणांसह प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकले. रशियाच्या आर्टेम पिंगिनने ७ गुणांसह रौप्यपदक मिळवले, भारताच्या दक्ष गोयलने ६.५ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. प्रतीतीने नऊ फेऱ्यांत ७.५ गुण मिळवून मुलींच्या गटात बाजी मारली आणि भारताचे दुहेरी सुवर्णयश पूर्ण केले. कझाकस्तानच्या मारिया खोल्याव्हकोने ७ गुणांसह (विजेत्यापेक्षा अर्धा गुण कमी) रौप्यपदक तर भारताच्या निवेदिता व्ही. सी. हिने ६.५ गुणांसह कांस्यपदक मिळवले. पदकांशिवाय, ही स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी अत्यंत फायदेशीर ठरली; कारण त्यांनी प्रतिष्ठित ‘फिडे’ किताब आणि ‘नॉर्म्स’ मिळवले. ‘ओपन’ गटाचा विजेता मयंक चक्रवर्ती – जो आधीच ‘जीएम-इलेक्ट’ (ग्रँडमास्टर होण्याच्या मार्गावर) आहे – याने विजेतेपदाच्या कामगिरीद्वारे आणखी एक ‘ग्रँडमास्टर नॉर्म’ मिळवला. कांस्यपदक विजेता दक्ष गोयल याने ‘फिडे मास्टर’ किताब तसेच ‘इंटरनॅशनल मास्टर नॉर्म’ मिळवला. मुलींच्या गटातील विजेती प्रतीती बोरदोलोई हिच्यासाठी ही स्पर्धा दुहेरी आनंदाची ठरली. सुवर्णपदकाव्यतिरिक्त, तिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ किताब आणि ‘वुमन ग्रँडमास्टर नॉर्म’ देखील मिळवला. रौप्यपदक विजेती कझाकस्तानची मारिया खोल्याव्हको हिने ‘डब्ल्यूआयएम’ नॉर्म मिळवला, तर कांस्यपदक विजेती भारताची निवेदिता व्ही. सी. हिनेही ‘डब्ल्यूआयएम’ नॉर्म मिळवला. एकूण पदक तालिकेत भारताचे वर्चस्व दिसून आले; यजमान देशाने ‘क्लासिकल’ स्पर्धेतील सहापैकी चार पदके – दोन सुवर्ण आणि दोन कांस्य – आपल्या नावे केली. रशिया आणि कझाकस्तान यांनी प्रत्येकी एक रौप्यपदक जिंकून उर्वरित पदके विभागून घेतली. एका शानदार समारोप सोहळ्यात आशियाई बुद्धिबळ महासंघाचे सचिव हिशाम अल-ताहेर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले आणि स्पर्धेची योग्य सांगता झाली. ‘आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा २०२६’ चे आयोजन ‘ऑल इंडिया चेस फेडरेशन’ आणि ‘आशियाई बुद्धिबळ महासंघ’ यांच्या वतीने ‘महाराष्ट्र बुद्धिबळ संघटने’ने केले होते. 0000

कुकू कोहली यांचे निधन; अजय देवगणला दिला होता पहिला ब्रेक

संपदा सावंत मुंबई :  ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला ‘फूल और कांटे’ चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे दिग्दर्शक कुकू कोहली यांचे मंगळवारी वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कुकू कोहली यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांना मोठा धक्का बसला. पतीच्या अंत्यदर्शनावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाइकांनी त्यांना सावरले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती त्यांचे मित्र आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी दिली. कुकू कोहली यांच्या अंत्ययात्रेला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता विकी कौशल, स्टंट दिग्दर्शक शाम कौशल आणि अशोक पंडित यांच्यासह अनेकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. ‘अवतार कोहली’ या नावाने जन्मलेल्या कुकू कोहली यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. १९७१ मध्ये राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९९१ मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि अजय देवगणच्या कारकिर्दीला दमदार सुरुवात झाली. यानंतर त्यांनी ‘कोहराम’ आणि १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुहाग’सारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘सुहाग’मधून अजय देवगण आणि अक्षय कुमार ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र आली होती. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वो तेरा नाम था’ हा त्यांच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट ठरला. कुकू कोहली यांच्या पश्चात पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी तसेच पहिल्या पत्नी रीता कोहली यांच्यापासून झालेल्या दोन मुली पूजा आणि करिश्मा असा परिवार आहे.

सिंधुदुर्ग जि.प. शाळांमध्ये पाणी-वीज मुबलक; इंटरनेटचा मोठा अनुशेष

१,३२३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा; मुलींच्या स्वच्छतागृहांची उपलब्धता ९७.२ टक्के राजन चव्हाण सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मूलभूत सुविधांच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती समाधानकारक असली, तरी इंटरनेट सुविधेच्या बाबतीत जिल्हा राज्याच्या सरासरीपेक्षा…

आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ हजार विद्यार्थ्यांची ‘आनंद चित्रकथा’

ठाणे : २६ ऑगस्ट धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आनंद चित्र कथा’ स्पर्धा संपन्न झाली याचे आयोजन बारटक्के फाऊंडेशन आणि येवनेट मल्टिमीडिया प्रा.…

मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व व्हीलचेअर वाटप

मिरा-भाईंदर : माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चतर्फे निःशुल्क आरोग्य, नेत्र व कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने ४०…

रेतीबंदर विसर्जन घाटावरील स्थानिक भूमिपुत्रांना विमा संरक्षण व मानधन द्या – नजीब मुल्ला

अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा-मुंब्रा परिसरातील विविध विसर्जन घाटांवर दरवर्षी गणेशमूर्ती व देवीमूर्ती विसर्जनाची सेवा करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना विमा संरक्षण, मानधन तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष व ठाणे महापालिकेचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. याबाबत २४ ऑगस्टला आयुक्तांना दिलेल्या निवेदनात मुल्ला यांनी म्हटले आहे की, ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा-मुंब्रा परिसरातील विविध विसर्जन घाटांवर दरवर्षी ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातून हजारो गणेशमूर्ती व देवीमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. विशेषतः रेतीबंदर विसर्जन घाटावर गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्र निःशुल्कपणे विसर्जनाची सेवा बजावत आहेत. गणेशमूर्ती व देवीमूर्तींचे विसर्जन करताना अनेकदा मोठ्या व वजनदार मूर्ती पाण्यात नेण्याचे काम करावे लागते. त्यामुळे या युवकांना मोठी जोखीम पत्करावी लागते. त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षा साधने, बचाव पथक, वैद्यकीय सुविधा किंवा विमा संरक्षण उपलब्ध नसल्याने दुर्घटना घडल्यास संबंधित युवकांच्या कुटुंबीयांसमोर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्षे निःस्वार्थपणे सेवा बजावणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना अपघाती विमा संरक्षण, आवश्यक सुरक्षा साहित्य, लाईफ जॅकेट, वैद्यकीय सुविधा तसेच पिण्याचे पाणी, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या युवकांनी बजावलेल्या सेवेला योग्य मोबदला म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना योग्य मानधन देण्यात यावे, त्यांच्या योगदानाची दखल घेऊन प्रशस्तिपत्र देण्यात यावे, अशीही मागणी नजीब मुल्ला यांनी केली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेतीबंदर तसेच इतर विसर्जन घाटांवरील स्थानिक भूमिपुत्रांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. स्थानिक भूमिपुत्रांची सेवा ही केवळ परंपरा नसून ठाणे शहराच्या गणेशोत्सवातील महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या श्रमांचा सन्मान करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे, अशी भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली आहे.

न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

अशोक गायकवाड मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मंगळवारी राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली. लोकभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल ज‍िष्णु देव वर्मा यांनी न्या. सुनील शुक्रे यांना पदाची शपथ दिली. न्या. शुक्रे यांची नियुक्ती २०२३ च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार करण्यात आली असून ही नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल, त्या दिवशीपर्यंत असेल. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य भास्कर जाधव, मावळते लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे अन्य सदस्य तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी न्या. सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात वंदेमातरम, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर समारोप वंदेमातरम व राष्ट्रगीताने झाला. न्यायमूर्ती (निवृत्त) सुनील शुक्रे यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९६१ रोजी झाला. त्यांनी १९८० साली पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून एलएलबी पूर्ण केले आणि नागपूर विद्यापीठातून घटनात्मक कायद्यात एलएल.एम. पदवी मिळवली. न्यायिक सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. कोल्हापूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रजिस्ट्रार (प्रशासन), महाराष्ट्र न्यायिक अकादमी, उत्तन (ठाणे) येथे सहसंचालक, तसेच नागपूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केले. मार्च २०११ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल म्हणून पदभार स्वीकारला आणि २०१३ मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे (एमएसबीसीसी) अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. ०००००००००००

ऊसतोडणी मजुरीवाढीचा त्रिपक्षीय करार न झाल्यास कोयता हातात घेणार नाही, गाव सोडणार नाही – डॉ डी एल कराड

अनिल ठाणेकर ठाणे-मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथे ऊस तोडणी वाहनधारक, मुकादम व ऊस तोडणी मजुरांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये हंगाम सुरू होण्यापूर्वी मजुरी वाढी चा त्रिपक्षीय करार न झाल्यास संप…

तरुणांचा असंतोष हा बेरोजगारी, अन्याय, दडपशाही आणि संस्थांच्या ऱ्हासातून- नेहा बोरा

अनिल ठाणेकर मुंबई : तरुणांचा असंतोष हा केवळ एखाद्या दिवसाच्या आंदोलनातून निर्माण झालेला नसून, बेरोजगारी, अन्याय, दडपशाही, संस्थांचा ऱ्हास आणि दीर्घकाळ साचत गेलेल्या अस्वस्थतेचा परिणाम आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा…