Author: bittambatami.com

काशिमिरा पोलिसांची अमली पदार्थांचे व्यसन आणि सायबर गुन्हेगारीविरोधात मोठी मोहीम

मिरा – भाईंदर: पोलीस आणि सत्य फाऊंडेशनने मिरा -भाईंदर येथील काशिमिरा येथे अमली पदार्थ विरोधी आणि सायबर गुन्हेगारी जनजागृती मोहीम आयोजित केली. पोलिसांनी तरुणांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे, पालकांचा पाठिंबा घेण्याचे आवाहन केले आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजनांची रूपरेषा सांगितली. काशिमिरा पोलिसांनी अमली पदार्थांचे व्यसन आणि सायबर गुन्हेगारीविरोधात एक मोठी मोहीम सुरू करून जनतेमध्ये जनजागृती केली. काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, काशिमिरा पोलीस ठाणे आणि सत्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत, काशिमिरा येथील मुळशी कंपाऊंडमध्ये अमली पदार्थ विरोधी आणि सायबर गुन्हेगारी जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आणि पाठिंबा दिला. कार्यक्रमादरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणांना अमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली आणि त्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्यास प्रोत्साहित केले. पालकांनाही आवाहन करण्यात आले की, जर त्यांना त्यांच्या मुलांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाचा संशय असेल किंवा काही तक्रारी असतील, तर त्यांनी कोणत्याही भीती किंवा संकोचाशिवाय पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की, तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि संबंधित मुलांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक मदत पुरवली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, समाज आणि पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच अमली पदार्थांच्या व्यसनाच्या गंभीर समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकते. या प्रसंगी सायबर गुन्ह्यांबद्दलही जनजागृती करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक्स, ओटीपी फसवणूक, डिजिटल पेमेंट फसवणूक आणि सोशल मीडियाद्वारे होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी यावर जोर दिला की, जर कोणी सायबर फसवणुकीचा बळी ठरले, तर घाबरून जाण्याऐवजी त्यांनी तात्काळ पोलीस आणि संबंधित सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधावा, जेणेकरून वेळेवर कारवाई करता येईल. या कार्यक्रमाला स्थानिक रहिवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी काशिमिरा पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यात असे जनजागृती कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची विनंती केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, अमली पदार्थांचे व्यसन आणि सायबर गुन्हेगारीविरुद्ध जनजागृती हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे आणि या उद्देशाने अशा मोहिमा सुरूच राहतील. 0000

दिव्यातील खड्ड्यांविरोधात मनसेचे ‘खड्ड्यांची शांती’ आंदोलन

 ३० जुलैला नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन दिवा: दिवा शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. “खड्ड्यांची शांती” या आंदोलनाचे आयोजन गुरुवार, ३० जुलै, सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिवा (पूर्व) येथे करण्यात येणार आहे. मनसेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवा शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. या पार्श्वभूमीवर खड्ड्यांनाच विनंती करून नागरिकांना होणारा त्रास थांबवण्याचा प्रतीकात्मक संदेश देण्यासाठी “खड्ड्यांची शांती” आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात दिवा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी अधिक तीव्र करावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे.

‘कॉफी विथ कार्टूनिस्ट’ खुला पॉडकास्ट ठरला व्यंगचित्र रसिकांसाठी मेजवानी

मुंबई: मराठी म्हणी आणि वाक्प्रचार नव्या पिढीपर्यंत हसत-खेळत पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त सांताक्रूझ येथील ओला वाकोला बँक्वेट हॉलमध्ये ‘कॉफी विथ कार्टूनिस्ट्स’ हा…

भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने कामगारांना मिळवून दिले समान काम समान वेतन

 सचिव प्रकाश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश केतन खेडेकर मुंबई : आमदार भाई जगताप यांच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघ नेतृत्व करत असलेल्या आस्थापनापैकी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. (MSEDCL) रायगड विभागातील गोरेगाव व रोहा युनीटमधील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे ‘समान काम समान वेतन’ देण्यात यावे यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे सन २०२० मध्ये ठाणे औद्योगिक न्यायालयात दावा क्र.१६/२० व १२/२०१८ दाखल केला होता. औद्योगिक न्यायालय ठाणे यांनी दि. १८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. लि. गोरेगाव व रोहा युनिट मधील कंलाटी पद्धतीवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘समान काम समान वेतन’ देण्यात यावे तसेच त्यांच्या पगारातील तफावत सन २०१६ पासून ते आजतागायत द्यावी असा आदेश पारीत केला होता. या निर्णया विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. लि. (MSEDCL) ने मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन ३१७०/२०२५ व ३१७२/२०२५ अंतर्गत दावा दाखल केला होता. भरती बंदीमुळे नियमित कर्मचाऱ्यांची रिक्त पदे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून भरून घेत असताना त्यांच्याकडून समान स्वरूपाचे काम करून घेतले जात असेल तर नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील किमान वेतन देणे बंधनकारक आहे असा निर्णय मा. उच्च न्यायालयाने दिला. मान्न, वेतन फरकाची थकबाकी काम सुरू झाल्यापासून नव्हे, तर औद्योगिक न्यायाधिकरणाकडे संदर्भ दाखल झाल्याच्या तारखेपासूनच मिळेल, असे स्पष्ट करत न्यायालयाने औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्यायमुर्ति श्री. संदीप व्ही. मारणे यांनी महावितरण व भारतीय कामगार कर्मचारी महासंघ यांच्या याचिकांवर हा निर्णय दिला. भा.का.क. महासंघाचे सचिव प्रकाश शिंदे व कायदेतज्ञ जी. आर. नाईक, के. टी. विश्वनाथन, महासंघाचे कायदेविषयक सल्लागार अॅड. जी. एस. बज साहेब व महासंघाची कोर्ट ब्रिगेड यांचे कामगारांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. हा निर्णय देताना न्यायालयाने नमूद केले की, महावितरणने स्वतःच भरती बंदीमुळे मनुष्यबळाची कमतरता असल्याने कंत्राटी कामगार नियुक्त केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे हे कर्मचारी नियमित कर्मचाऱ्यांचीच कामे करत असल्याचे स्पष्ट होते. औद्योगिक न्यायाधिकरणाने नोंदविलेला हा निष्कर्ष चुकीचा असल्याचे दाखवण्यात महावितरण अपयशी ठरले.  न्यायालयाने या प्रकरणात महाराष्ट्र कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) नियम, १९७१ मधील नियमावर विशेष भर दिला. या नियमानुसार कंत्राटी कामगार नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करत असतील तर त्यांना त्याच दराने वेतन देणे ही वैधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा अधिकार केवळ ‘समान काम समान वेतन’ या घटनात्मक तत्त्वावर नव्हे तर थेट नियमांमधून मिळतो, असे न्यायालयाने याठिकाणी स्पष्ट केले. हा निर्णय कामगारांच्या बाजूने लागल्याने संपूर्ण कामगार वर्गाने भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे आणि आमदार भाई जगताप यांचे  मनापासून आभार मानले. ००००००००

उल्हासनगरात महिलांसाठी ‘मेनोपॉज जनजागृती व्याख्यान’ उत्साहात संपन्न

सुनिल इंगळे उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. हरकिरण कौर सोनिया धामी यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नांतून अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ४० वर्षांवरील…

कै. विमल मेहरा व कै.आशा मेहरा यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग.११७, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विक्रोळी विधानसभा आणि प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्था यांच्या तर्फे १० वी, १२ वी आणि पदवी परीक्षेत उत्कृष्ठ गुण संपादन करून उत्तीर्ण…

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

अविनाश उबाळे ठाणे : मुंबई व ठाणे महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. शहापुर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात प्रचंड पर्जन्यवृष्टी सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत १३७.६६ मीटर एवढी वाढ झाली आहे.असून भातसा धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात सततच्या पडणा-या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा देखील वाढत आहे.त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी,जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करणेसाठी, शनिवारी दुपारी १.०० वाजता भातसा धरणाचे पाच वक्रद्वारे ०.२५ मीटर ने उघडण्यात आले आहेत. परिणामस्वरूप भातसा धरणातून नदीमध्ये ८६.७६५ क्युमेक्स (३०६४.१०६ क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग प्रवाहीत झाला आहे. धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उघडण्यात आले असून १२४६.२६ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील तानसा,मोडकसागर,पाठोपाठ भातसा हे धरण देखील आता तुडुंब भरले आहे. शनिवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे तातडीने उघडले असून भातसा नदी किनाऱ्या लगतच्या साजीवली,सरलांबे ,तुते ,सावरशेत,सापगाव, खुटघर ,खुटाडी अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात शहापूर तहसीलदार यांना लेखी कळविण्यात आले आहे.असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता गणेश कचरे व सहाय्यक अभियंता शाम हंबीर यांनी मााहिती देेेताना सांंगितले.मुंबईला पाणी पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे.प्रतिदीन  २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९  मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्षघनमिटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चोरस किलोमिटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमिटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमिटर आहे.भातसाधरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राव्दारे १५ मेगावॅट एवढी विजनिर्मिती केली जाते शनिवारी भातसा धरण भरल्यानंतर जलपूूूजन करण्यात आले. ०००००

निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी काढली पारंपारिक वेशात आषाढी दिंडी

अनिल ठाणेकर ठाणे: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी येऊर अभ्यासिका आणि ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी व ठाणे स्टेशन कम्प्युटर क्लासेस येथून  दिंडी काढण्यात आली. यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मोठÎा उत्साहात पारंपारिक वेशात दिंडी सोहळा साजरा केला. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे ठाण्यातील अभ्यासिकांमधून विविध धार्मिक सण मोठÎा उत्साहात साजरे केले जातात. यंदाही येऊर अभ्यासिका आणि ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी व ठाणे स्टेशन कम्प्युटर क्लासेस,  डम्पिंग अभ्यासिका, लोकमान्य नगर अभ्यासिका, घोलाई नगर अभ्यासिका, दिघा अभ्यासिका, दिवा अभ्यासिका, मापानपाडा अभ्यासिका, भोलानगर अभ्यासिका, मुंब्रा अभ्यासिका येथून  दिंडी काढण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम “जय हरी विठ्ठल“ आणि “पांडुरंग हरी“ यांच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संतांचे विचार, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त एसएसटी महाविद्यालयाची अनोखी वृक्षदिंडी

 वारकरी परंपरेतून पर्यावरण संवर्धनाचा जागर सुनिल इंगळे उल्हासनगर :आषाढी एकादशीच्या निमित्ताने एसएसटी महाविद्यालयाने आपल्या स्थापनेपासून सातत्याने जोपासलेली वृक्षदिंडी यंदाही भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. भारतीय संस्कृती,…