Category: होम

जि. प. बांधकाम विभागात ‘साहेबा’च्या खोट्या सह्या करून काढली लाखोंची बिले!

 ‘त्या ‘ठेकेदारांना काळ्या  यादीत टाकणार…! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या बोगस स्वाक्षऱ्या करून अनेक कामांची लाखो रुपयांची बिले परस्पर काढल्याचा प्रकार उघडकीस आला असून हे प्रकरण दडपण्यासाठी आता जिल्हा परिषदेचे  काही पदाधिकारीच  पुढे सरसावले असल्याचे समजते. हे प्रकरण उघडकीस येताच या गंभीर प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून गुन्हे दाखल न करता हे प्रकरण परस्पर  मिटविण्यासाठी कांही पदाधिकारी प्रशासनावर दबावही  आणत आहेत असे समजते. विविध  विकास कामांवर जिल्हा परिषद कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करते जि. प.चा स्वनिधी, जिल्हा नियोजनच्या  माध्यमातून येणारा निधी, आमदार खासदार निधी याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होत असतो विकास कामे विविध विभागांची असली तरी बांधकाम विभागामार्फतच ही कामे केली जातात. अंदाजपत्रक तयार करणे त्याला मंजुरी देऊन निविदा जाहीर करणे प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देणे कामे प्रत्यक्ष सुरू करणे आणि ती पूर्ण करून घेणे तसेच झालेल्या बिलांची कामे झालेल्या कामांची बिले काढणे ही सर्व प्रक्रिया बांधकाम विभागामार्फत केला जातात या विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या शहीनेच स्वाक्षरीनेच ठेकेदारांची अंतिम बिले काढली जातात. मात्र गेल्या काही वर्षात विशेषता प्रशासकाच्या कारकीर्दीत असे बोगस व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहिती नुसार १५ ते २० कामांची बिले दोन -तीन ठेकेदार आणि एक ठेकेदार कम एजंट यांनी बांधकाम विभागातील काही कर्मचारी, लेखा अधिकारी आणि अभियंत्यांच्या सहाय्याने कार्यकारी अभियंत्याच्या खोट्या सह्या करून लाखो रुपयांची बिले परस्पर काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. जि प बांधकाम विभागात टक्केवारी दिल्याशिवाय कोणतेच काम मार्गी लागत नाही आणि केलेल्या कामाचा मोबदलाही मिळत नाही हे सर्वश्रुत आहे.आणि म्हणूनच या  साखळीतील संबंधित सर्वांचे भागवल्याशिवाय बिल मंजूरच होणार नाही हे अनेक ठेकेदारांना आता   पक्क माहित  झालं आहे. या भागवा -भागवीत बिलांवर अंतिम सही करणारा कार्यकारी अभियंता हा सर्वात मोठा वाटेकरी असतो. अर्थात हे सर्व त्या त्या कार्यकारी अभियंत्यावर आणि त्याच्या मागणीवर अवलंबून असतो मोठ्या साहेबांनी वाजवी स्वरूपात आपला वाटा मागितला तर ठीक, जर त्याने मोठे तोंड उघडले तर मात्र ठेकेदाराचे नफा-तोट्याचे गणित बिघडते. कार्यकारी अभियंत्याच्या बोगस सह्या करण्याचा प्रकार हा त्यातूनच घडला असावा अशी चर्चा आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपल्या सहकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले असून या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर  कारवाई करण्याच्या  सूचना दिल्या आहेत. बांधकाम विभागातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणातील काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे समजते. तसेच बांधकाम आणि वित्त विभाग या दोन्ही विभागांच्या कारभारावर  लक्ष ठेवण्यासाठी लवकरच त्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात येणार असल्याचे समजते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी कालपर्यंत आग्रही भूमिका घेणारे काही पदाधिकारी आता ‘बॅकफूट’वर आले असून हे प्रकरण मिटविण्याच्या  दृष्टीने कामाला लागले असल्याचे समजते.

माथेरान वीजवितरण विरोधातील मनसेचे उपोषण मागे

मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मधील सातत्याने गायब होत असल्यामुळे माथेरान मनसे पक्षाकडून येथील राम चौक येथे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते परंतु कर्जत विभागीय अभियंते चंद्रकांत केंद्रे यांनी लेखी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. माथेरान येथे सातत्याने गायब होत असलेल्या वीजे मुळे येथील स्थानिक व्यावसायिकांच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला होता त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये वीज वितरण कार्यालयाबाबत त्रिव्र नाराजी व्यक्त केली जात होती त्यामुळेच माथेरान नवनिर्माण सेनेचे माथेरान शहर प्रमुख संतोष कदम यांनी वीज वितरणाला सेवा अखंडित करण्याकरिता इशारा दिला होता परंतु या काळात वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याने आज त्यांनी माथेरान येथील श्रीराम चौक येथे आमरण उपोषण चालू केले होते परंतु त्यांच्या सर्व मागण्या या माननीय करण्यात आले होते व त्याचे लेखी पत्र अभियंते केंद्रे साहेब यांनी त्यांना दिल्यानंतर मात्रांचे नगराध्यक्ष  चंद्रकांत चौधरी यांच्या हातून ज्यूस घेत त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

नाले सफाईची हाथसफाई करणाऱ्या ठेकेदाराची पालिका अधिकाऱ्याला धमकी

ठेकेदाराविरोधात  पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून कामाचे बिल अदा करू नये स्थायी समिती सदस्यांची  मागणी कल्याण : कल्याण पूर्वेतील पालिकेच्या नाले सफाई कामाच्या ठेकेदाराने नाले सफाई किती याची कोणतीच माहिती संबंधित विभागाच्या…

– बोधगयाच्या धर्तीवर कल्याणच्या बुद्धभूमीचा विकास होणार

 मुंबईतील तीन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत ऐतिहासिक निर्णय; वादावर कायमचा तोडगा कल्याण : कल्याण-बिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून, या जागेचा विकास बिहारमधील जागतिक…

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील उपनगराचा राजा या भव्य गणेशोत्सवातील गणेशमूर्तीची पाद्यपूजा मोठ्या थाटामाटात, अभूतपूर्व उत्साहात भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी सपत्नीक तसेच नगरसेविका ॲड. सीमा शिंदे व किरण शिंदे या दांपत्यांनी केली. मोठ्या संख्येने श्रीगणेश भक्त यावेळी उपस्थित होते. मुंबई तील प्रख्यात मूर्तीकार विजय खातू यांच्या कन्या रेश्मा विजय खातू या ही भव्य मूर्ती साकारणार आहेत. (छाया : योगेश पाडलोसकर)

 केडीएमसीच्या कारवाईमुळे १,२०० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच केलेल्या कारवाईमुळे तिसाई शाळेत गोंधळ  कारवाई थांबवण्यासाठी प्रशासक आणि पालकांचे आवाहन कल्याण: कल्याण-बिवली महानगरपालिकेने कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरातील तिसाई शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या तिसाई शाळेची इमारत…

 आठवडी बाजार बंद करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की

केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा कल्याण : आठवडी बाजार तात्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  ‘ई’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आंदोलनात महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना (शिंदे) उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण  तालुका प्रमुख गजानन पाटील  यांनी केले. काळूबाई चौक येथून सुरू झालेला मोर्चा ‘ई’ प्रभाग कार्यालयावर धडकला. मात्र केडीएमसीमध्ये शिवसेना सत्तेत असतांना देखील प्रशासनावर अंकुश नसल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा यामुळे रंगली होती. आंदोलनकर्त्यांनी महापालिका हद्दीतील सर्व आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याची मागणी करत प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला. साप्ताहिक बाजारांमुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले की, गेल्या महिन्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आठवडी बाजार बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. आठवडी बाजारांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ०००००

 महावितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात खासदार नरेश म्हस्के आक्रमक

नवी मुंबई – ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होणं, केबल जळण्याच्या घटना, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड…

 शहर विकास विभाग, गावदेवी मार्केट आणि कळवा रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

 ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची मागणी ठाणे -ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागात नुकतीच लागलेली आग, गावदेवी मार्केटमधील भीषण दुर्घटना आणि कळवा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठाणे…