मध्य रेल्वेची युनियन बँकेवर मात
१५ वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा २०२६ मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) एलिट पुरुष गटाच्या सामन्यात मध्य रेल्वेने युनियन बँक ऑफ इंडियावर २-१ अशी मात…
१५ वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा २०२६ मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) एलिट पुरुष गटाच्या सामन्यात मध्य रेल्वेने युनियन बँक ऑफ इंडियावर २-१ अशी मात…
अशोक गायकवाड पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी गुरुवारी प्रभाग क्रमांक १४ मधील विविध ठिकाणी नालेसफाई व पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच नाल्यांमधील गाळ व अडथळे तातडीने दूर करण्यात यावेत, यासाठी महापौरांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. विविध ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत कामांची गुणवत्ता आणि गती यावरही त्यांनी भर दिला. प्रभागातील विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी भाजपाचे चारही उमेदवार सातत्याने पाठपुरावा करत येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे महापौर नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले. या पाहणी दौऱ्यावेळी पनवेल भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष सतिश पाटील, माजी नगरसेवक गणपत म्हात्रे, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, भाजपा पनवेल मंडल सरचिटणीस रुपेश नागवेकर, उपाध्यक्ष अतुल भगत, प्रभाग अध्यक्ष गणेश म्हात्रे, भाजपा नेते शैलेश म्हात्रे, रोहीत आठवणे, रुपेश आंबोलकर, अभिजित जाधव, सचिन गमरे, युवा मोर्चा अध्यक्ष कुणाल पाटील व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महानगरपालिका अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी सांगितले कि, प्रभाग १४ मधील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महापौर नितीनभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव जनतेसोबत उभा आहे.
नेते पदाधिकाऱ्यां सोबत सर्वसामान्य जनता देखील आंदोलनात सहभागी मुंबई : महागाईच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोरेगाव (पश्चिम) रोड ते रत्ना हॉटेल शेजारी केलेल्या एल्गार आंदोलनात नेते व पदाधिकाऱ्यांसोबत सामान्य जनता देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले. देशासह राज्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजी व सीएनजी गॅसची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे वाढत्या महागाईने कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला असून जीवनावश्यक वस्तूही महाग झाल्या आहेत या महागाईच्या विरोधात शिवसेनेने रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला असून गुरुवारी झालेल्या आंदोलनात पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता देखील आंदोलनात रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल पेटवून आंदोलनास सुरुवात केली गॅस चा बाटला ठेवत महागाई विरोधात घोषणा देऊ लागले त्याच बरोबर मोदी सरकारच्या विरोधात पोस्टर, बॅनर फडकावत ‘मोदी सरकार हाय हाय’ घोषणा दिल्या शिवसेना विभाग क्र. ३ च्या वतीने केलेल्या या आंदोलन शिवसेना नेते व माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई व शिवसेना नेते, विभाग प्रमुख, आमदार सुनिल प्रभू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार अनंत (बाळा) नर, विभाग संघटक शालिनी सावंत, विभाग समन्वयक दीपक सुर्वे,विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, प्रशांत कदम, विधानसभा संघटक राजू पाध्ये, नगरसेवक अंकित प्रभू , सुहास वाडकर, तुळशीराम शिंदे, जितेंद्र वळवी, कैलाशनाथ पाठक, नगरसेविका लक्ष्मी भाटीया, योगिता कदम, पुष्पा कळबें, लोणा रावत, शिवानी परब, सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह, जेष्ठ शिवसैनिक सर्व संलग्न संघटना कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते महायुती सरकारच्या विरोधात केलेल्या या आंदोलनात शिवसेनेचे विभाग प्रमुख आमदार सुनील प्रभू यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याने बैलगाडीतून प्रवास करीत आंदोलन करायचे ठरवले असता तेथेच स्थानिक पोलिसांनी त्यांना तसे करण्यास मनाई केली. यानंतर हातगाडी घेत आंदोलनास सुरवात केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुनील प्रभू यांनी सांगितले की आज सर्वसामान्य माणूस या महागाईच्या विळख्यात सापडला आहे. केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत लवकरात लवकर दरवाढ मागे घ्यावी तसे न केल्यास ठिकठिकाणी आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा मुलींच्या गटात सांगली, सोलापूर, धाराशिव व ठाणेची आगेकूच (स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीतून) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर…
– आनंद बाल शिबिरात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा चिमुकल्यांना संदेश पुणे.दि.३: शिवसेना भवन येथे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष आणि पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद बाल शिबिर’ उपक्रमात मंगळवारी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभागी होत बालचमूंशी संवाद साधला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी यावेळी नृत्य सादर करून व ओरिगामी कलेतून साकारलेल्या विविध कागदी वस्तू भेट देत डॉ. गोऱ्हे यांचे स्वागत केले. संवादादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी मुलांना भविष्यात काय बनायचे आहे, अशी विचारणा केली असता एअर होस्टेस, डॉक्टर, कलेक्टर, वकील, पोलीस अधिकारी, सैनिक आणि व्यावसायिक होण्याची स्वप्ने मुलांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याबरोबरच पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन ऐकण्याचा सल्ला दिला. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर राग मनात न ठेवता सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती जोपासावी, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना भवनात मुक्तपणे वावरणाऱ्या, खेळणाऱ्या आणि आनंदाने बागडणाऱ्या मुलांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने फुलून गेला होता. लहान मुलांचे खेळ आणि शिबिरे हा धर्मवीर आनंद दिघे यांचा आवडीचा विषय असल्याची आठवण करून देताना डॉ. गोऱ्हे यांनी ठाण्यातील आनंदाश्रमाप्रमाणेच पुण्यातील शिवसेना भवनातही लवकरच मोफत स्पोर्ट्स लायब्ररी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालकही उपस्थित होते. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी पालकांना मुलांसमोर मोबाईलचा अतिवापर टाळण्याचे आवाहन केले. मुलांसोबत प्रत्यक्ष संवाद वाढविणे आणि त्यांच्यासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सुधीर कुरुमकर, वैभव वाघ, संदीप शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांचा भोर-मुळशी विधानसभेच्या वतीने सत्कार दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांची सलग पाचव्यांदा विधान परिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेना भोर-मुळशी विधानसभेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख कांता पांढरे यांच्या हस्ते हा सत्कार झाला. यावेळी भोर-मुळशी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– शिवचरित्रातून युवकांना शिकण्यासारखे भरपूर मुंबई : आजकाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राच्या नावावर चुकीचा इतिहास शिकविण्यात येतो. ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीत त्या दंतकथा पुढे आणण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराज…
दोषींवर कडक कारवाई करून बुद्धभूमीचा पुनर्विकास करण्याची मागणी कल्याण : माजी सामाजिक न्याय मंत्री तथा विद्यमान खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून भीमशक्ती प्रदेश सरचिटणीस तथा महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ऍड. अपेक्षा दळवी व त्याचप्रमाणे भीमशक्ती कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष ऍड. अजिंक्य साळवे यांच्या माध्यमातून बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी घडलेल्या घटनेचा तीव्र कठोर शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करून बुद्धभूमीचा पुनर्विकास करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऍड.अपेक्षा दळवी यांनी दिला आहे. यावेळी भीमशक्ती संघटना जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. गुलाब खंदारे, फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते अरुण पाठारे, भीमशक्ती संघटनेचे ऍड. संजय जाधव, ऍड. पंकज कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शशांक जाधव, भीमशक्तीचे संकेत धनराव, अण्णा पंडित, मंगेश इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कल्याण परिसरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान आणि धार्मिक, सांस्कृतिक केंद्र असलेली ‘बुद्धभूमी’ याठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमुळे स्थानिक बौद्ध समाज आणि सर्वसामान्य जनतेच्या धार्मिक भावनांना तीव्र ठेच पोहोचली आहे. त्यामुळे याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करून दोषींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी. जागेचा पुनर्विकास शासकीय खर्चाने पुन्हा पूर्ववत करुन देण्यात यावे. भविष्यात अशा धार्मिक स्थळांची सुरक्षा राखण्यासाठी या परिसराला कायमस्वरुपी सुरक्षा पुरविण्यात यावी. जर ही कारवाई प्रशासकीय निष्काळजीपणामुळे किंवा दबावाखाली झाली असेल, तर संबंधित जबाबदार अधिका-यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. या मागण्यांची दखल घेऊन पुढील ७ दिवसांत योग्य ती कारवाई करावी. अन्यथा संपूर्ण कल्याण शहरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऍड. अपेक्षा दळवी यांनी दिला आहे. 0000000000
उष्मा आणि प्रदूषणाचे प्रमाण होणार कमी कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये ठेकेदारांकडून काँक्रिट रस्ते, नाले गटारी इत्यादी बनविताना त्यांना अडसर ठरणारी काही झाडे तोडण्यात आली तर काही झाडांच्या मूळ, खोडाला खोदकाम करताना धक्का बसल्याने ती पडली होती. काही झाडे ही भोवताली काँक्रिट अतिक्रमणाने वेढल्याने व खोडाला जखडून ठेवल्याने तसेच त्यामुळे पाणी न मिळाल्याने तर काही झाडे इतर अनेक कारणांनी मरणासन्न अवस्थेत झाली आहेत. या सर्व कारणांमुळे एमआयडीसी निवासी मधील असलेल्या झाडांची संख्या कमी झाली होती. याचा काही प्रमाणात फटका यावेळी विशेष उन्हाळ्यात येथील नागरिकांना जाणवला. मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी थोडा उष्मा आणि प्रदूषण वाढलेले दिसले. जागतिक पर्यावरण 5 जून याचे निमित्त साधून आणि त्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात एमआयडीसी निवासी मध्ये काही सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहेत. त्यामुळे काही कारणांने कमी झालेल्या या झाडांची कमतरता भरून काढण्याचा मनोदय या सामाजिक संघटनांनी घेतला आहे. कल्याण – शीळ आणि सर्व्हिस रोड मधील एमआयडीसीने दिलेल्या त्यांच्या ग्रीन बेल्ट मोकळ्या भूखंडावर नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास तर्फे शैल गंगा मिलापनगर शहरी वन प्रकल्प होत आहे. यामुळे एक प्रकाराचे छोटे देशी वृक्षांचे जंगल येथे निर्माण होणार आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या अधिवास या भागात वाढणार आहे. शिवाय कल्याण शीळ हायवे वरील वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण आणि वाहनांच्या कर्णकर्कश्य आवाजाचे प्रदूषण हे काहीसे कमी होणार असल्याने या शहरी वन प्रकल्पाच्या समोर राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा फायदा मिळणार आहे. निवासी विभागांतील प्रसिद्ध अशी सामाजिक संघटना असलेली शिवप्रतिमा मित्र मंडळ यांच्या तर्फे निवासी भागात सर्वेक्षण करण्यात येऊन जेथे झाडांची नितांत आवश्यकता आहे किंवा जेथे पूर्वी झाडे होती पण काही कारणाने ती तोडली किंवा पडली अशा जागी झाडे लावण्याचा संकल्प केला असून साधारण अंदाजे ५० झाडे लावण्याचे त्यांनी ठरविले आहे. विशेष म्हणजे शिवप्रतिमा मित्र मंडळाकडून ही झाडे सात ते आठ फूट उंच असलेली देशी झाडे लावण्यात येणार आहेत. मिलापनगर रेसिडेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि सायकल सखी ग्रुप यांच्या तर्फे पण निवासी परिसरात येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. एकंदर या संघटनांच्या वृक्षारोपणाने या निवासी नगरीचा सौंदर्यात वाढ होणार असून वाढत असलेली उष्णता/धग आणि प्रदूषणावर काहीसे नियंत्रण या वृक्षारोपणामुळे होणार आहे. 0000000
अशोक गायकवाड पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार १ जून रोजी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नवीन पनवेल शहराध्यक्ष अमोल राजन जाधव आणि दिव्यांग सेल नवीन पनवेल अध्यक्ष प्रथमेश भगवान भंडारे यांच्यावतीने नवीन पनवेल, सेक्टर ६ येथील रुषिवन व रुपवन या दोन्ही वृध्दाश्रमात जावून सभागृह नेता अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या हस्ते वृध्द पुरुष-महिलांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी या दोन्ही वृध्दाश्रमाचे संचालक संतोष पवार यांनी सभागृह नेता अॅड. प्रकाश बिनेदार यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या व तेथील महिलांनी औक्षणही केले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी सरचिटणीस प्रभाकर पवार, भाजपा उत्तर रायगड जिल्हा सदस्य श्याम साळवी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नवीन पनवेल शहराचे सरचिटणीस अॅड. शिवकुमार कांबळे, कोष्याध्यक्ष संतोष म्हस्के, सेलचे संयोजक विलास फडके, सागर येसनकर, जयेश कांबळे, साईनाथ भटकळ, अजिंक्य माने, भावेश बाईट, अनिकेत पंडीत, सुदेश तावडे, सुमित सकपाळ, कुणाल भंडारे आदि मान्यवर उपस्थित होते.