Category: महाराष्ट्र

Maharashtra News

खाडीच्या पाण्यात सापडला अर्धवट सडलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह

उल्हासनगर  दि.१७ ( सुनिल इंगळे ) : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीच्या पाण्यात अर्धवट सडलेल्या अवस्थेत एका बेवारस अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना पोलिसांना मिळून आला आहे. त्या इसमाची…

शिवीगाळीच्या व्हिडिओवरून भाजपा-शिवसेना आमने सामने

अरविंद जोशी मिरा -भाईंदर : शिंदे गटातील शिवसेनेच्या एका अधिकाऱ्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर असभ्य टिप्पणी करत आणि त्यांना शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या…

 सलमान खान, आमिर खान यांच्या चित्रपटांऐवजी रणवीर सिंग, विकी कौशल यांचे चित्रपट पहा!

मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान हरिभाऊ लाखे नाशिक –महाराष्ट्रातील भाजपमधील हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा म्हणून ओळख निर्माण करणारे मंत्री नितेश राणे हे कायमच वादग्रस्त ठरत आले आहेत. हिंदू राष्ट्र म्हणून एक…

वन्यजीव-निसर्ग-साहस’ व्याख्यानमाला रंगली

– दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश कळवा: निसर्ग, आकाश आणि वन्यजीव यांच्यातील नातं अधिक संवेदनशीलतेने जपण्याची गरज अधोरेखित करत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.…

दिव्यांग मुलांची विशेष सहल!

मती मंद मुलांच्यात कार्य करणाऱ्या विश्वास संस्थेच्या मुलांची सहल, नेरळ येथील बेंद्रे वेद ऍग्रो फार्म मध्ये १४ एप्रिलला संपन्न झाली आहे.  या सहलीचे नियोजन आणि आयोजन अशी संपूर्ण जबाबदारी ‘जिज्ञासा’ संस्थेने…

वृक्षतोडी विरोधात हरकतींचा पाऊस

– पंचवटीतील प्रस्तावित वृक्षतोडीवर शंभरहून अधिक हरकती हरिभाऊ लाखे नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पंचवटी परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात नागरिकांनी हरकतींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. रस्ते रुंदीकरणासाठी तब्बल ५८४ वृक्ष तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर शंभरहून अधिक हरकती प्राप्त झाल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. वृत्तपत्र सदस्यता तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ट असतानाच महापालिकेने नव्याने पंचवटीतील नांदूर गाव ते नांदूर नाका आणि नांदूर नाका ते जत्रा चौक या मार्गावर १९७ वृक्ष, पेठ रोड ते आरटीओ कॉर्नर, आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी स्कूल आणि नीलगिरीबाग या मार्गावर ३८७अशा प्रकारे एकूण ५८४ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. रस्ते रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याचा दावा प्रशासनाने केला असून, संबंधित वृक्षांवर लाल खुणा करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी प्राथमिक खोदकामालाही सुरुवात झाली आहे. या वृक्षतोडीवर हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी नागरिकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले गेले आहेत. विशेषतः करंज, कडुनिंब, आंबा, जांभूळ, गुलमोहर, सोनमोहर, बकुळ, बेल यांसारख्या वृक्षांच्या तोडीला विरोध होत आहे. काही वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला, तरी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड पर्यावरणासाठी घातक ठरेल, अशी भूमिका हरकतदारांनी घेतली आहे. यापूर्वी तपोवन येथे साधुग्रामसाठी प्रस्तावित औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी १८२५ वृक्ष तोडीचा मुद्दा गाजला होता. तो सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यातच आता पंचवटीतील नव्या वृक्षतोडीच्या प्रस्तावामुळे पर्यावरणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी लवकरच होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते. नागरिकांच्या आक्षेपांना कितपत न्याय दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 लग्नाच्या आश्वासनांनी लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

‘लुटेरी दुल्हन’सह दोन जणांना अटक मिरा -भाईंदर : लग्नाची आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या एका संघटित टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका कारवाईत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी खोट्या लग्नाच्या नावाखाली नवऱ्याकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. सेवकुमार बंगपांडी (५३), यांना आरोपींनी लग्नासाठी उपलब्ध असलेली एक महिला शोधून देण्याचे आश्वासन देऊन फसवले. आरोपींनी त्या महिलेचे फोटो पाठवले, तिच्याशी संवाद साधला आणि तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली, आरोपींनी पीडिताला विविध बँक खात्यांमध्ये अंदाजे ₹४४,६५० जमा करण्यास फसवले. त्यानंतर आरोपी महिलेने (बनावट वधू) त्यांचा विश्वास संपादन केला आणि पीडिताच्या घरातून अंदाजे ₹४७६,००० किमतीचे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून पसार झाली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी नेहा उर्फ जया (वय ३२) आणि नाशिक येथील रहिवासी केसरीमल लक्ष्मीलाल रांका (वय ४५) यांचा समावेश आहे. दोघांना १३ एप्रिल २०२५ रोजी अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, आरोपींनी अहमदनगर, मुंबई (जोगेश्वरी, बोरिवली) आणि जळगाव यांसारख्या जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारच्या फसवणुकी केल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलीस इतर संभाव्य पीडित आणि टोळीच्या उर्वरित सदस्यांचा शोध घेत आहेत.

सासऱ्यांनी दिलं आयुष्याचं अनमोल गिफ्ट

दुर्मिळ किडनी ट्रान्सप्लांट, जावयाला मिळालं नवजीवन मिरा – भाईंदर : नात्यांची खरी ताकद काय असते, हे दाखवून देणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका सासऱ्यांनी आपल्या जावयाला नवजीवन मिळावे म्हणून स्वतःची किडनी दान केली. माणुसकी आणि नात्यांच्या भावनेचा हा सुंदर संगम मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स, येथे पाहायला मिळाला, जिथे डॉक्टरांनी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ३९ वर्षीय रुग्ण, जो मधुमेहाने त्रस्त होता आणि शारीरिकदृष्ट्याही खूप अशक्त झाला होता, तो बराच काळ किडनी फेल्युअरशी झुंज देत होता. कुटुंबात योग्य डोनर मिळत नव्हता. अशा वेळी ५५ वर्षीय सासऱ्यांनी पुढाकार घेत आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला—जरी त्यांचा ब्लड ग्रुप वेगळा होता (एबी पॉझिटिव्ह डोनर ते बी पॉझिटिव्ह रुग्ण). या प्रकरणाबद्दल बोलताना वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे नेफ्रॉलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. पुनीत भुवानिया यांनी सांगितले की, हा केस वैद्यकीय आणि मानवी अशा दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत विशेष आहे. इतक्या उच्च अँटीबॉडीज असताना एबीओ इनकम्पॅटिबल ट्रान्सप्लांट करणे खूप आव्हानात्मक असते, पण सासऱ्यांच्या निःस्वार्थ निर्णयामुळे हे शक्य झाले. ते पुढे म्हणाले की, हा “एबीओ इनकम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट” होता, जो सामान्य ट्रान्सप्लांटपेक्षा अधिक धोकादायक असतो. शरीरातील अँटीबॉडीज नव्या किडनीला नाकारू शकतात, ज्यामुळे इन्फेक्शन आणि गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी आधी विशेष “डिसेन्सिटायझेशन” प्रक्रिया करून अँटीबॉडीजची पातळी कमी केली आणि त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया पार पाडली। ऑपरेशननंतर अवघ्या एका महिन्यातच सकारात्मक परिणाम दिसून आले—रुग्ण आता डायलिसिसमुक्त झाला आहे, त्याचे वजन वाढत आहे आणि तो हळूहळू सामान्य आयुष्याकडे परतत आहे. विशेष म्हणजे किडनी दान करणारे सासरेही पूर्णपणे निरोगी आहेत. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारतीय कुटुंबांची मुळे अजूनही घट्ट आहेत। सासरा आणि जावई हे नातं अनेकदा औपचारिक मानलं जातं, पण इथे ते वडील-मुलाच्या नात्यात बदलले.  ही घटना आपल्याला एकच संदेश देते—जीवन कितीही आधुनिक झालं तरी नात्यांची ऊब, त्याग आणि प्रेम हेच आपल्या संस्कृतीचं खरं बळ आहे. 00000000000

नाशिक कुंभभेळ्यासाठी २५०० जादा बसेस धावणार

नाशिक कुंभभेळ्यासाठी २५०० जादा बसेस धावणार हरिभाऊ लाखे नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. २०२६-२०२७ या वर्षी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विविध धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नियमित बससेवेव्यतिरिक्त दोन हजार ५०० पेक्षा अधिक बससेवेचे नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. कुंभपर्वात पर्वणींना अधिक महत्व असते. भाविकांची संख्या प्रत्येक पर्वणीला २० लाखांहून अधिक राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. येणारे भाविक खासगी वाहनाने, रेल्वे तसेच बसने येतील. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बाहेर गावहून येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाच्या ताफ्यात या काळात जिल्ह्यातील विविध आगारासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दोन हजार ५०० जादा बस मागविण्यात येणार आहेत. या बस चालविण्यासाठी २० हजारांहून अधिक कर्मचारी सेवा बजावणार आहेत. नाशिक तसेच त्र्यंबकमध्ये पर्यटक तसेच भाविक खासगी वाहनांनी दाखल झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन बाहेरगावाहून येणारी खासगी वाहने तसेच महामंडळाच्या बस या थेट त्र्यंबक तसेच नाशिकमध्ये दाखल न होऊ देता ती बाहेर कुठे थांबविता यावीत, यासाठी वाहनतळाचे नियोजन सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळ, नाशिक महानगरपालिका, पोलीस विभाग, त्र्यंबक नगर परिषद, नाशिक प्राधिकरण, कुंभमेळा आयुक्त यांच्या वतीने सध्या नाशिक तसेच त्र्यंबक या ठिकाणी खासगी वाहने कुठे उभी करता येतील, यासंदर्भात तसेच वाहनातून उतरलेल्या पर्यटकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून अमृत स्नानासाठी घाट परिसरात ने-आण करण्याची व्यवस्था याचे नियोजन सुरू आहे. या वाहनांमुळे शहर परिसरासह त्र्यंबक नगरीत वाहतूक कोंडी होऊ नये, याकरीता नियोजनावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, महामंडळाच्या वतीने २० हजार कर्मचाऱ्यांसाठी वेगववेगळ्या मंगल कार्यालय, लॉन्स यासह अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. मागील कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभ पर्वणीसाठी येणाऱ्या बसेस, खाजगी वाहने पहिने नजीक थांबवल्या जात होत्या. तेथुन राज्य परिवहन महामंडळाच्या बस या काही विशिष्ट अंतरावर भाविकांना सोडत. एक किलोमीटर अंतर पायी चालावे लागत हाेते. नाशिक मध्येही याच धर्तीवर नियोजन होते. यंदा भाविकांची तसेच पर्यटकांची पायपीट थांबवण्यासाठी प्रशासन काय करत या कडे सर्वांचे लक्ष आहे.

 वेंगुर्ला शहरात होणार  ‘नमो उद्यान’

नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन  वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक होणार आहे. शासनाच्या  योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटनामध्ये देखील वाढ होणार आहे. म्हणून राज्यात आदर्श ठरेल असे दर्जेदार ‘नमो उद्यान’ साकारुन प्रथम क्रमांक मिळविण्याचे आवाहन जिल्ह्याचे  पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले. वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील भटवाडी येथे या ‘नमो उद्यान’चा भूमिपूजन समारंभ राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दर्जेदार व सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देणारे ‘नमो उद्यान’ विकसित करा. या आराखड्यात पर्यावरणपूरक नियोजन, नागरिकांसाठी विरंगुळ्याची आधुनिक साधने तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा यांचा समावेश या उद्यानात करण्यात येणार असून, हा प्रकल्प राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्यासह नगरसेवक, स्थानिक नागरिक उपस्थित होते.  नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पालकमंत्री राणे यांचे स्वागत केले. सुहास गवंडळकर, गौरी मराठे व स्थानिक नागरिकांच्या वतीने राणे यांचा सन्मान करण्यात आला.