Category: महाराष्ट्र

Maharashtra News

आंबा पीक धोक्यात : नुकसान भरपाईसाठी देवगडचे आंबा बागायतदार एकवटले…!

आंबा पीक धोक्यात : नुकसान भरपाईसाठी देवगडचे आंबा बागायतदार एकवटले…! 18 फेब्रुवारीला जामसंडे येथे मेळावा…! देवगड (प्रतिनिधी )– बदलते हवामान हवामान आणि कीड- रोगांचा अनियंत्रित प्रादुर्भाव त्यामुळे यंदा हापूस आंबा…

परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लीम महापौर

परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लीम महापौर परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर विराजमान झाला. आज पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद…

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम व योजना राबवण्यास सुरुवात केली…

नाशिकमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक आणि सांस्कृतिक संमेलन

नाशिकमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक आणि सांस्कृतिक संमेलन हरिभाऊ लाखे नाशिक : शहरात प्रथमच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून हे संमेलन १४ फेब्रुवारी रोजी पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे होणार आहे. संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना आणि जिव्हाळा यांच्या पुढाकारातून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिवस भरगच्च असणार आहे. सकाळी ‘संस्कृती दर्शन’ फेरीने संमेलनाची सुरुवात होणार असून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत विविध सत्रे पार पडतील. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिका कुसुम आलाम असतील. उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खा. भास्कर,भगरे तसेच नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर या आमदारांसह माजी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, माजी महापौर रंजना भानसे, आदिवासी आयुक्त लीना बनसोड, उपायुक्त दिनकर पावरा, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, आदिवासी प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, इत्यादी उपस्थित राहणार आहेत. संमेलनात आदिवासींचे वास्तव जीवन साहित्यात आहे का ?, या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय लोहकरे असतील. डॉ. पद्माकर सहारे, डॉ. सुलतान पवार, डॉ. मधुचंद्र भुसारे, साहित्यिक रवी बुधर आणि लेखक राजू ठोकळ हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. मुलाखत सत्रात साहित्यिक देवचंद महाले विविध आदिवासी साहित्यिक, राजकारणी व कलाकारांच्या मुलाखती घेणार आहेत. महिला सत्राच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा चौरे असून या सत्रात आदिवासी महिलांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. यानंतर युवा कवी संतोष पावरा यांच्या सहभागातून नवोदित कवी संमेलन होईल. निमंत्रित कविसंमेलन ज्येष्ठ कवी तुकाराम धांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. याशिवाय सांस्कृतिक फेरी, लघुनाट्य, आदिवासी पारंपरिक नृत्य, चित्रप्रदर्शन आदी कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. काही लेखकांच्या पुस्तकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यातील आदिवासी साहित्य, संस्कृती आणि विचारप्रवाह यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाचा प्रारूप आराखडा आता 6०० कोटींचा…!

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाचा प्रारूप आराखडा आता 6०० कोटींचा…! दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार- पालकमंत्री नितेश राणे राजन चव्हाण सिंधुदुर्गनगरी-आता निवडणुका संपल्या आहेत.त्यामुळे येणाऱ्या तीन वर्षात आपल्याला जबाबदारीने काम करायचे आहे.नारायण…

  ‘राज ठाकरे पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरलेले दिसतात’

‘राज ठाकरे पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरलेले दिसतात’ माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी डिवचलं हरिभाऊ लाखे नाशिक : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. भगतसिंह कोश्यारी आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील व्याख्यानावर राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देत असताना कोश्यारी यांनी राज ठाकरेंना डिवचत त्यांच्यावर टीका केली. मुंबईतील नेहरू सेंटर येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या व्याख्यानाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष करून अभिनेते सलमान खान यांच्या हजेरीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे सर्व लोक संघाच्या प्रेमाखातर आले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता. राज ठाकरेंच्या या पोस्टबाबत भगतसिंह कोश्यारी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “व्याख्यानाला आलेले कुणीही पंतप्रधान मोदींना घाबरलेले नसावेत. मी राज ठाकरेंचा सन्मान करतो. मला वाटते, राज ठाकरे पंतप्रधान मोदींना खूपच घाबरलेले दिसतात. त्यांनी मोदींना घाबरू नये. त्यांनी मोदींच्या जवळ जायला हवे. जसे प्रभू रामजीसाठी सर्व प्रजा सारखीच होती, तसे पंतप्रधान मोदींसाठीही सर्व समान आहेत.” राज ठाकरे माझे लहान भाऊ भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले, “राज ठाकरे माझे लहान भाऊ आहेत. ते कणखर नेते आहेत. मी त्यांना सांगेन की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी घाबरू नये. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र या कर्मभूमीत राहता, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. घाबरायचे असेल तर चुकीच्या कामाला घाबरा.” भाषेच्या अस्मितेवर देशभरात जे तंटे सुरू आहेत, तो एकप्रकारचा आजार आहे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले होते. याबाबत प्रश्न विचारला असता कोश्यारी म्हणाले, मी आजघडीला भाजपाचा सदस्य नाही. मी राजकारणात सक्रिय नाही. तसेच मी संघाचा प्रवक्ताही नाही. त्यामुळे या बाबीवर मी उत्तर देऊ शकत नाही. मी अजित पवारांचा आदर करतो… अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरही कोश्यारी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी अजित पवारांचा खूप आदर करतो. अजित पवारांनी त्यांच्या टिकाकारांना कधीही वाईट म्हटलेले नव्हते. ते नेहमी प्रेमाने वागत. रोहित पवारांनी त्यांचे मुद्दे सरकारकडे मांडावेत.

चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या मशालीवर भाजपचे कमळ फुलले चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याचा अखेर सनसनाटी झाला. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत साथ देणार नाही असे सकाळच्या पत्रकार परिषदेत ठासून सांगणाऱ्या संजय राऊतांचे शब्द हेवेत विरत नाही तोच…

मुलाच्या लग्नाला यायचं हं !

मुलाच्या लग्नाला यायचं हं ! नवी दिल्ली : भारत रत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनी सहकुटुंब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आपला मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि त्याची होणारी पत्नी सानिया चांढोक यांच्या लग्नाचे औपचारिक निमंत्रण…

अजित पवारांचा घातच झाला ?

अजित पवारांचा घातच झाला ? ० रोहीत पवारांनी केले अपघाताचे पोस्टमार्टेम ० अजित पवारांना विमानाने जाण्यासाठी भाग पाडणारे ते दोन नेते कोण ? ० दादा गेले काही दिवस प्लास्टिक एवेजी काचेच्या बाटलीतून…

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरोग्य विद्यापीठाची उत्तम कामगिरी

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरोग्य विद्यापीठाची उत्तम कामगिरी नाशिक :  महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांकांचे पारितोषिक पटकावले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरविरुध्द झुंज देत असताना नाशिकच्या संघाने स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिला सामन्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विरुध्द ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात  योगेश राऊत ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. दुसऱ्या सामन्यात यजमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठावर २६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात  संदीप चौधरी ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. तिसऱ्या सामन्यात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचा ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात  पुष्कर तऱ्हाळ ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत साखळी फेरीतील अजेय घोडदौड नंतर आरोग्य विद्यापीठाचा सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुध्द झाला. नाशिकच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले होते. कोल्हापूरच्या संघाने हे लक्ष्य १९.५ षटकांत ८ बाद १५८ धावा करत गाठले. केवळ २ गडयांनी विजय मिळवत कोल्हापूरने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यापीठाच्या संघातील  पुष्कर तऱ्हाळ यांना मालिकेतील ’सर्वोत्तम गोलंदाज’ म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेतील येशात गोलंदाजीचा मोलाचा वाटा आहे.  पुष्कर तऱ्हाळ यांनी आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना स्पर्धेतील ’बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट’ (सर्वोत्तम गोलंदाज) या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या क्रिकेट संघात संघव्यवस्थापक राजेश पाटील व कर्णधार योगेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुष्कर तऱ्हाळ, संदीप चौधरी, पवन गोलवाल, राजेंद्र दिवे, प्रविण जगताप, महेंद्रनाथ चौधरी, नंदकिशोर ठाकरे, नंदकिशोर वाघ, विजय कुरकुरे, संतोष जढाळ, बबन कांगणे, सचिन शिराळ, मुकुंद मुळे आदी खेळाडू आहेत. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे विद्यापीठ परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.