Category: मुंबई

Mumbai news

प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी

  २,५०० नागरिकांनी घेतला विविध शासकीय सेवांचा लाभ कल्याण : जीवनदीप महाविद्यालय, गोवेली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने व सुलभ पद्धतीने मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शुक्रवारी पार पडलेल्या या शिबिरात सुमारे २,५०० नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. या शिबिराचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार कथोरे म्हणाले, “शासकीय योजना व दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागू नयेत; त्यांना तात्काळ आणि सुलभ सेवा मिळणे गरजेचे आहे.” या शिबिरामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर दाखला, रेशन कार्डवरील नाव बदल व इतर दुरुस्त्या (पुरवठा विभाग), सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज व मंजुरी, महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध योजनासेवा प्रभावीपणे पुरविण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ दाखले वितरित करण्यात आले. या प्रसंगी ठाण्याचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, प्रांत अधिकारी विश्वास गुजर, सहायक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर, प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर तसेच टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, महसूल, वन व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, तसेच पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश टेंभे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जीवनदीप संस्थेचे संचालक प्रशांत घोडविंदे, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बृहन्मुंबई गुजराती समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष आणि ज्यांच्यावर कादंबरी, डॉक्युमेंटरी व नाट्यकृती निर्माण झाली आहे असे विक्रमादित्य डॉ. हेमराज शाह यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृहात ‘हेमूदादा’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात…

मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वा-यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस कोकणातील आंबा व काजू बागायतदार धडक देणार आहे.  या मोर्चास सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देवून सहभागी व्हावे याकरिता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे , कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाने झालेल्या नुकसानीत हेक्टरी ५ लाख व ३ लाख रूपये नुकसान भरपाई मागणीसाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. राज्य सरकारने हेक्टरी २२ हजारांची मदत जाहीर करून बोळवण केली आहे. यामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानभरपाई बाबत राज्य सरकारने आज अखेर कोणतेही पंचनामे अथवा प्रशासकीय आदेश दिलेले नाहीत. एकीकडे २५ हजार कोटींचा कुंभमेळा ३५ हजार कोटी व ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ १ लाख कोटींपर्यंत खर्च करण्यास मान्यता दिली जात आहे. मात्र दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर,ठाणे जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असताना राज्य सरकार आंबा बागायतदार शेतकऱ्यांची चेष्टा करू लागले आहे. यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी गिरगांव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी मा. खासदार राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे , कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या सर्वांनी या मोर्चात सहभागी होवून लढा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. यावेळी रत्नागिरीचे आमदार बाळा माने , सुशांत नाईक, गणेश गायकर , किरण टेंभुलकर ,अजय तेली यांच्यासह कोकणातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील सोनार समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक-पंकज भोयर

मुंबई / रमेश औताडे राज्यांतील गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून काही मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. लवकरच एक बैठक घेऊन मागण्या पूर्ण करू. असे आश्वासन सहकार राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने मुंबईत आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले. सोनार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करून न्याय मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आमदार चित्राताई वाघ यांनी विधान भवनात सोनार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यावर मार्ग काढण्यासाठी खूप पाठपुरावा केला. सोने गहाण ठेवण्याच्या प्रकियेत हा घटक खूप महत्त्वाचा असतो, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले. प्रमुख मार्गदर्शक संजीव खडके, अध्यक्ष डॉ राजेंद्र दिंडोरकर, कार्यकारी सचिव सतीश पितळे, खजिनदार दीपक देवरुखकर, सल्लागार भरत ओसवाल, पद्मिनी ताई शंकरशेट आदी मान्यवर उपस्थित होते.

विलेपार्ल्याला साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेती प्रकल्प

मुंबई: महापौर आणि उपमहापौर आयुक्तांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई  विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत…

 महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

 महानगर पालिकेच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून शाबासकी अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी भरभरुन शाबासकी दिली. विद्यार्थ्यांनी राजस्थानचे चरी नृत्य ‘केसरीच्या बालमा’ या गीतासह सादर केले तसेच ओडिशाचे संबलपुरी ढलकाई नृत्य लोकगीतासह सादर केले. भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता. भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा, नृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. ही विविधता हीच देशाची शक्ती आहे. संपूर्ण देश फुलांच्या हराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा विकसित भारत या संकल्पने मागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी दोन्ही राज्यांचे सौंदर्य, इतिहास, वारसा, स्वातंत्र्यलढा, संस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले. यावेळी ‘म्हारो राजस्थान’ हे राजस्थानचे व ‘बंदे उत्कल जननी’ हे ओडिशाचे राज्यगीत ऐकविण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकर, समितीचे सदस्य, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ अविनाश ढाकणे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ प्राची जांभेकर उपस्थित होते. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (प्रशासन) करुणा वावडणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत दिग्गज संघांची धडक

युवा पलटन, भारत पेट्रोलियम, मुंबई पोस्टलसह ११ संघांची पुढील फेरीत मजल मुंबई :प्रभादेवी येथे आयोजित ‘ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा-२०२६’ स्पर्धेत दिग्गज संघांनी दमदार कामगिरी करत बाद…

विश्व् विजेत्या प्रशांतची हार तर सौरभ मते पहिल्यांदाच उपांत्य फेरीत दाखल

 राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन वाशी येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ६०…

अपयश ही यशाची पहिली पायरी असते – वेंगसरकर

मुंबई, 16 एप्रिल :  अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी नवीन पनवेल येथील त्यांच्या अकादमीच्या मैदानावर झालेल्या एच. डी.एफ.सी. कप साठी खेळविण्यात आलेल्या १२…

 महिला शक्तीचा दमदार ‘स्मॅश’

ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या अजिता रवींद्रन व समृद्धी सिंह यांची सुवर्णमयी कामगिरी! मुंबई व भुवनेश्वर येथे पार पडलेल्या विविध प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करत ठाण्याच्या क्रीडा विश्वात अभिमानाची नोंद केली आहे. अनुभवी खेळाडू अजिता रवींद्रन आणि उदयोन्मुख तारा समृद्धी सिंह यांनी आपल्या सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाने “महिला शक्ती”ची ताकद पुन्हा अधोरेखित केली. मुंबई येथे झालेल्या ३२व्या जी. डी. बिर्ला मेमोरियल ओपन व्हेटरन मास्टर्स इंटर-क्लब बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मध्ये ४५ वर्षांवरील महिला एकेरी गटात अजिता रवींद्रन हिने सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत तिने सोनल बट्टड हिच्यावर १५–१०, १५–७, १५–१३ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत नामिता मेहता-विजयकर यांच्याविरुद्ध २१–१४, १५–२१, २१–११ अशी चुरशीची लढत जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत अव्वल मानांकित पूजा झलानी हिच्याविरुद्ध २४–२६, २१–१९, २१–१८ असा थरारक विजय मिळवत अजिताने आपले अनुभव, संयम आणि जिद्द सिद्ध करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. दरम्यान, भुवनेश्वर येथे ७ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या ऑल इंडिया पब्लिक सेक्टर बॅडमिंटन स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची समृद्धी सिंह हिने दुहेरी यश मिळवत आपली चमकदार कामगिरी नोंदवली. तिने सी.ए.जी. संघाचे नेतृत्व करत संघ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले, तसेच वैयक्तिक प्रकारात महिला दुहेरी गटात रौप्यपदक जिंकत “डबल बोनान्झा” साध्य केला. तिच्या खेळातील आत्मविश्वास, कोर्टवरील हालचाल आणि निर्णायक क्षणांतील स्थैर्य विशेष उठून दिसले. या यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील खांडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सुरू असलेल्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील प्रशिक्षण व्यवस्थेचा मोठा वाटा आहे. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड, वरिष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले तसेच प्रशिक्षक टीमच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर यश मिळत आहे. या यशाबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपआयुक्त मीनल पलांडे यांनी अभिनंदन करताना सांगितले, “ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील महिला खेळाडू सातत्याने उच्च पातळीवर कामगिरी करत आहेत. अजिता रवींद्रन व समृद्धी सिंह यांचे यश हे ठाण्याच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतिबिंब आहे आणि भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायम राहील,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची राष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक दृढ झाली असून, महिला खेळाडूंच्या या यशामुळे ठाण्यातील क्रीडा चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे.