Category: मुंबई

Mumbai news

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क

नदीपातळीवर सातत्याने लक्ष ठाणे- जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवले असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर जिल्हा आपत्ती…

साला…. एक फोन कॉल आदमी को ‘ कंगाल ‘ बना देता है !

  ‘ भारत पेट्रोलियम ‘ च्या निवृत्त कर्मचाऱ्याचे बँक अकाऊंट साफ ! १० लाख रुपये लंपास महानगर गॅस कंपनीच्या नावे फसवणूक दिवाकर शेजवळ मुंबई : मालाड ( पूर्व) भागात घडलेल्या…

‘ऑरेंज अलर्ट’’च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

३ दिवसांत २२२ मि.मी. पाऊस, कणकवलीत सर्वाधिक ३२० मि.मी. सिंधुदुर्ग : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६ जुलैला ऑरेंज अलर्ट, तर ७ व ८ जुलैला ‘यलो अलर्ट’ जारी…

संततधार पावसामुळे कौलारू घराचा भाग कोसळून महिला जखमी

कल्याण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगर परिसरातील एका कौलारू चाळीचा काही भाग कोसळून आशाबाई बाळकृष्ण गांगुर्डे या महिला गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे…

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पद रद्द

 महिन्याभरात नवीन नियुक्त्या होणार-पालकमंत्री डॉ. उदय सामंत अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी ही सध्याची पदे रद्द करुन येत्या महिन्याभरात नवीन नियुक्तीची यादी जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे १२ जुलैला संगीत कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा…

 १३ वर्षांखालील गटात दिविशा सिंग, रुद्र मनोहरला दुहेरी मुकूट

 योनेक्स सनराइज १ली महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर  निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा मुंबई: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित योनेक्स सनराइज पहिली महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत दिविशा सिंग आणि रुद्र मनोहरने १३…

 डोंबिवली-नेरूळसारखी दुर्घटना टळली

 गुरुदेव चौकातील धोकादायक ट्रान्सफॉर्मरची तक्रार; प्रशासन तातडीने हलले पाहणीनंतर महावितरणला त्वरित दुरुस्ती व सुरक्षेचे आदेश कल्याण : डोंबिवलीत करंट लागून महिलेचा मृत्यू आणि नेरूळ येथे उघड्या वीजतारा व पाण्यातील विद्युत प्रवाहामुळे दोन विद्यार्थ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील गुरुदेव हॉटेलजवळील संत रोहिदास महाराज चौकातील धोकादायक ट्रान्सफॉर्मरमुळेही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत तक्रारीची दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तातडीने दुरुस्ती व सुरक्षेचे आदेश दिले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा सहसंघटक रुपेश  भोईर यांनी संबंधित ट्रान्सफॉर्मरच्या धोकादायक स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने पाहणीची मागणी केली होती. त्यानंतर केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, ‘क’ प्रभागाचे क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर ट्रान्सफॉर्मर परिसरातील धोका लक्षात घेऊन महावितरणला लेखी पत्राद्वारे उघड्या वीजतारा इन्सुलेट करणे, ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करणे आणि परिसर सुरक्षित करण्याचे निर्देश देण्यात आले. रुपेश भोईर यांनी सांगितले की, डोंबिवली व नेरूळमधील दुर्घटनांतून धडा घेत पावसाळ्यात शहरातील सर्व उघड्या वीजतारा, ट्रान्सफॉर्मर आणि वीजखांबांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवितहानी टाळता येईल. प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून महावितरणने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात उघड्या वीजतारा, तुटलेले वीजखांब किंवा विद्युत पेट्यांमधून स्पार्किंग दिसल्यास त्याची तात्काळ माहिती महावितरणला द्यावी, जेणेकरून वेळेत आवश्यक उपाययोजना करता येतील.

शहरापासून खेड्यापर्यंत रोटरीची जलक्रांती

पर्जन्य जल संचायनाचे विविध प्रकल्प कल्याण : जलसंवर्धन ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून वर्षा जल संचयन ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कल्याण, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या पुढाकारातून शहरी भागात आणि ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागात प्रत्येकी एक अशा दोन वर्षा जल संचयन प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. शास्त्रीनगर सिव्हिल हॉस्पिटल व मीनाताई ठाकरे उद्यान डोंबिवली पश्चिम येथे वर्षा जल संचयन प्रकल्प यशस्वीपणे साकारण्यात आला आहे. तसेच, शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, मानेखिंड येथे रोटरी क्लब ऑफ कल्याण आणि ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने उपक्रम राबविण्यात आला आहे. अध्यक्षा रो. रुईता सपकाळे, सचिव जय राठोड, प्रकल्प प्रमुख आत्माराम घाणेकर आणि सह-प्रकल्प प्रमुख वैशाली परदेशी यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही प्रकल्प राबवण्यात आले. या प्रकल्पांमुळे दरवर्षी लाखो लिटर पावसाचे पाणी भूगर्भात पुनर्भरण होणार असून, त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास, भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास आणि पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत शास्त्रीनगर सिव्हिल हॉस्पिटल आणि मीनाताई ठाकरे उद्यान, डोंबिवली (पश्चिम) येथील इमारतींच्या छतावर पडणारे दरवर्षी सुमारे ३ लाख १५ हजार लिटर पावसाचे पाणी भूगर्भात रिचार्ज केले जाणार आहे. तसेच, शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, मानेखिंड येथील शाळेच्या इमारतीच्या छतावर पडणारे दरवर्षी सुमारे २ लाख ७० हजार लिटर पावसाचे पाणी भूगर्भात रिचार्ज केले जाणार आहे. हे पाणी अत्याधुनिक फिल्टर प्रणालीद्वारे शुद्ध करून आवश्यकतेनुसार वापरासाठी साठवले जाणार असून, अतिरिक्त पाणी भूगर्भात पुनर्भरण करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पावसाच्या पाण्याचा प्रभावी व शाश्वत वापर होणार असून, भूजल पातळी वाढण्यास व भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मोलाची मदत होणार आहे. विशेषतः मानेखिंड गावातील जलसुरक्षेला बळकटी मिळून स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा दीर्घकालीन लाभ होणार आहे. शास्त्रीनगर सिव्हिल हॉस्पिटल आणि मीनाताई ठाकरे उद्यान डोंबिवली पश्चिम पर्जन्य जलसंचयन या प्रकल्पाचे उद्घाटन नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याहस्ते करण्यात आले. डिस्ट्रिक्ट वॉटर अँड सॅनिटेशन सल्लागार हेमंत जगताप तसेच केडीएमसी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यांसह रोटरी क्लब ऑफ कल्याणचे दिलीप करडेकर, जयश्री करडेकर, पराग कापसे, घनश्याम गुप्ता, गौरव राय, माधवी कुलकर्णी हे सदस्य देखील उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा, मानेखिंड वर्षाजल संचयन प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला माजी जिल्हा गव्हर्नर  मिलिंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ब्लॉसम चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अश्विनी रणदिवे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता चौधरी उपस्थित होते.

उसरघरला थेट रस्त्यासाठी नागरिकांचा संताप

रेल्वे व केडीएमसी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी; तातडीने रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी कल्याण  : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या मौजे उसरघर गावातील नागरिक मागील काही महिन्यांपासून गावात जाण्याकरिता रेल्वे मोरीतून तसेच उड्डाणपुलावरून थेट पोहोच रस्ताच नसल्यामुळे रेल्वे केडीएमसी प्रशासना विरोधात आक्रमक झाले आहेत. उसरघर गावाच्या हद्दीलगत केंद्र शासनाच्या डीएफसीसी आयएल ( डेडिकेटेड फ्रेट रेल्वे कॉरिडोर ) या मालवाहू रेल्वे खालून ग्रामस्थांना येजा करण्याकरिता भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. परंतु या भुयारी मार्गात उन्हाळ्यामध्ये सुद्धा चार फूट पाणी साचलेला असतो आणि आता पावसात तर हा भुयारी मार्ग पूर्ण तुडुंब भरलेला आहे त्यामुळे या भुयारी मार्गातून येथील नागरिकांना येजा करता येत नसल्यामुळे अर्धा तास पायपीट करून रेल्वेच्या उड्डाण पुलावरून गावात प्रवेश करावा लागतो. तसेच याच रेल्वे मार्गालगत मध्य रेल्वेचे वसई कोपर पनवेल रेल्वेचे सुद्धा दोन मार्ग प्रस्तावित असून मध्य रेल्वेने तर भुयारी मार्गच अजून बनवलेला नाही.परंतु या दोन्ही भुयारी मार्गातून येजा करण्याकरिता रेल्वे रेल्वेच्या हद्दीपासून गावाच्या मुख्या रस्त्याला जोडण्याकरिता पोहोच रस्ता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुद्धा अजून बनवून दिलेला नाही. याच रेल्वे प्रशासनाने मानपाडा ते दिवा या रस्त्यातील उसरघर गावाच्या हद्दीत उड्डाण पुलाचे अलाइनमेंट चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे या उड्डाण पुलावरून खाली उतरल्यानंतर या गावातील नागरिकांना आपली वाहने वळवताना खूप कसरत करावी लागत. कधी कधी तर पाठीमागून येणारे वाहने सुद्धा एकमेकांना धडकत आहेत. शाळेच्या बसला तर अर्धा किलोमीटर पुढे जाऊन यूटर्न मारून यावं लागत आहे. मुळात इतिहास असा आहे की 1970 च्या दशकामध्ये प्रीमियर कंपनी या चार चाकी वाहन निर्मिती कारखान्याच्या स्थापनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने कारखान्याच्या सिमेलगतच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मानपाडा-संदप-उसरघर रस्त्याचे प्रयोजन करून दिले होते. हाच रस्ता थेट पुढे दिव्यातून ठाण्यापर्यंत जातो.या रस्त्याचे जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीने आज पर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात आली. एप्रिल 2018 मध्ये माय सिटी या प्रकल्पालगत येथील बांधकाम व्यवसायिकाने स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता वापरात असलेल्या अस्तित्वातील रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून भिंत घालण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलन करून हा खोदलेला रस्ता पुन्हा बुजवून पूर्वत केला होता. ‘ज्याप्रमाणे केंद्र शासनाच्या डीएफसीसीआयएल या मालवाहू रेल्वे प्रशासनाने उसरघर ग्रामस्थांकरिता भुयारी मार्ग बनवला आहे. तशाच प्रकारचा भुयारी मार्ग मध्य रेल्वेने सुद्धा तातडीने बनवून द्यावा.  पुढे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गावापर्यंतचा अर्धवट असलेल्या रस्ता पूर्ववत करून द्यावा. तसेच चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट करून तयार करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे योग्य पद्धतीने अलाइनमेंट करून ग्रामस्थांकरिता थेट गावात प्रवेश करता येईल असा रस्ता तयार करून द्यावा. अन्यथा हे चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट केलेल्या उड्डाणपुलामुळे उरलेली जागा बिल्डरला मिळावी याकरीता अधिकाऱ्यांनी केलेले हे संगणमत समजण्यात येईल आणि त्यांच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल’, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गजानन  पाटील यांनी दिला आहे.