Category: मुंबई

Mumbai news

 मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये पाण्यात

 विकासाच्या नावाखाली भाजपाने मुंबई ‘बकाल’ केली – वर्षा गायकवाड* बीएमसीत ३० वर्ष सत्तेत राहून मलई खाणाऱ्या भाजपाने अक्कल शिकवू नये; रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले ? मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष मागील ३० वर्षांपासून सत्तेत आहे, यात २५ वर्षे शिवसेनेसोबतची युती आणि ज्या काळात निवडणुका झाल्या नाहीत त्या काळात प्रशासकांमार्फतही भाजपाची सत्ता होती आणि आत्ताही बीएमसीमध्ये भाजपाचीच सत्ता आहे तरीही, मुंबईच्या दुर्दशेला आपण जबाबदार नाही असे भासवून जबाबदारी झटकण्याचे काम भाजपा करत आहे, परंतु मुंबईला लुटून स्वतःचे खिसे भरणाऱ्या भाजपाला जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. मुंबईची वाताहत होण्यास भाजपाच जबाबदार आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला आहे. भाजपाचा सडकून समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका नालेसफाईवर दवर्षी १०० कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करते, इतर खर्च वेगळाच करत असूनही एक दोन पावसातच मुंबई जलमय होते, मोठ मोठे वृक्ष कोलमडून जिवीत व वित्त हानी होते, रस्ते खचतात, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, वाहतूक कोंडी होती. महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाचे नेते १०० टक्के कामे झाल्याचा दावा करतात पण मुंबईची अवस्था काही बदलत नाही. मुंबईकरांना दरवर्षी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महापौर स्वतःचे ‘रील्स’ बनवण्यात अधिक मग्न असल्याचे दिसत आहे, तर आयुक्तांनीही काहीही उल्लेखनीय काम केलेले नाही. गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनांची भाजप केवळ थट्टाच करत आहे.…

पुणे लिंक रोडखालील नाल्यातील अडथळे दूर करण्यासाठी महेश गायकवाड स्वतः उतरले नाल्यात

नाल्याच्या रुंदीकरणासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार कल्याण  : कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडखालून संतोषनगर प्रभागातून लोकग्रामकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या नाल्याची रुंदी व उंची वाढविण्याच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निधी मंजूर केला असला, तरी प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. या नाल्यात पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा केरकचरा, प्लास्टिक तसेच झाडांच्या मोठ्या फांद्या अडकून पाण्याचा प्रवाह खोळंबतो. परिणामी पावसाचे पाणी साचून संतोषनगर तसेच परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरत असल्याची समस्या निर्माण होते. रविवारी दुपारी शिवसेना संपर्क प्रमुख तथा प्रभागाचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते स्वतः नाल्याच्या तोंडाशी खाली उतरून अडकलेला केरकचरा व इतर अडथळे हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाल्यात मोठ्या प्रमाणात झाडांच्या जाड फांद्या अडकून राहिल्याने पाण्याचा प्रवाह पूर्ण क्षमतेने मोकळा होऊ शकला नाही. यावेळी बोलताना महेश गायकवाड म्हणाले की, “या नाल्याच्या रुंदीकरण व उंची वाढविण्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असला, तरी काम तातडीने सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी या कामाचा सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.” नाल्याचे रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडूनही करण्यात येत आहे. 0000

एमआयडीसी निवासी मध्ये घरफोड्या करणारे पाच जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

000000 कल्याण :   डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या दरोडेखोर टोळीने काही बंद फ्लॅट फोडून घरफोड्या केल्या आहेत. हे दरोडेखोर चेहऱ्यावर फडका लावून आले होते. त्यांच्याकडे…

एमआयडीसी निवासी भागात रविवार सुट्टीच्या दिवशी विजेचा खेळखंडोबा*

कल्याण :   डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात आज रविवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून विज पुरवठा खंडित झाला होता.  उच्च दाबाच्या वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्यामुळे किंवा स्पर्श झाल्याने स्फोट होऊन वीज पुरवठा खंडित होत…

Heading – नालेसफाईचे करोडो रुपये वाया

चार दिवसांच्या पावसामुळे खोटे दावे उघडकीस मिरा -भाईंदर शहरात मान्सून सुरू झाल्याने नाले साफसफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे, घाण पसरली आहे आणि सांडपाणी रस्त्यांवर वाहत आहे, ज्यामुळे महानगरपालिकेच्या साफसफाई प्रणालीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की शहरातील बहुतेक नाले आणि गटारे अजूनही गाळ आणि कचऱ्याने तुंबलेली आहेत. जर नाले वेळेवर आणि प्रभावीपणे स्वच्छ केले असते, तर पावसाचे पाणी नाल्यांमधून सुरळीतपणे वाहून गेले असते. याउलट, अनेक ठिकाणी घाणेरडे गटार रस्त्यांवर वाहत आहे, ज्यामुळे रहिवाशांना मोठी गैरसोय होत आहे. शिवसेना नेते सज्जी आयपी आणि शिवसेना प्रवक्ते रामभुवन शर्मा यांनी महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारावर गटार साफसफाईचे केवळ वरवरचे आश्वासन दिल्याचा आरोप केला आहे. रामभुवन शर्मा म्हणाले की, कंत्राटदाराने केवळ वरवरची स्वच्छता केली, पण वस्तुस्थिती अशी आहे की गटारांमध्ये आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण अजूनही तशीच आहे. त्यांनी असा आरोप केला की, गटार स्वच्छतेवर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांचा फायदा जमिनीवर दिसून येत नाही.

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे टनेल बोरिंग मशीनद्वारे विक्रोळी येथून उत्खननास सुरुवात  

मुंबई :    मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पहिले टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) आज, पाच जुलै 26  विक्रोळी शाफ्ट येथून बांधकामाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने बोगद्याच्या उत्खननाचे काम सुरू करणार आहे. एकूण 21 किमी लांबीच्या भूमिगत बोगद्यापैकी, मुंबईतील सावली (घणसोली) ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानचा 16 किमी लांबीचा भाग टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने बांधण्यात येणार आहे.           उर्वरित 5 किमी लांबीच्या भागाचे बांधकाम एनएटीएम पद्धतीने आधीच पूर्ण झाले आहे. (Tunnel…

लालपरीची ज्ञानयात्रा, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचे सुरक्षित पंख-प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे,  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ ही केवळ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी बस नसून, राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्याची विश्वासू जीवनवाहिनी बनली आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळ गेली अनेक दशके यशस्वीपणे पार पाडत असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. सरनाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी महामंडळाकडून शालेय वेळेत बसस्थानकांवर पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. हे कर्मचारी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमध्ये चढण्यास मदत करतात. तसेच, प्रवासादरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी एसटीने स्वतंत्र टोल-फ्री मदत केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. राज्यात दररोज सुमारे ३०,१७७ शालेय फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये, यासाठी एसटी महामंडळ विविध प्रवासी सवलतींच्या योजना प्रभावीपणे राबवत आहे. अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय शैक्षणिक सहलींसाठी ५० टक्के सवलत, मासिक विद्यार्थी पासवर ६६.६७ टक्के सवलत, तसेच उन्हाळी सुट्टी, परीक्षा, शैक्षणिक शिबिरे किंवा आजारी पालकांना भेटण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रवासासाठीही ५० टक्के सवलत देण्यात येते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातच २५.१३ लाख अहिल्याबाई होळकर पास आणि २७.९८ लाख विद्यार्थी मासिक पास वितरित करण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांसाठी NCMC स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियाही सुरू असून, त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक होणार आहे. याशिवाय कौशल्य सेतू अभियानांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासभाड्यात ६६.६७ टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच मानव विकास योजनेअंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ९६६ बसेसद्वारे ७३,६२१ मुलींना मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत शिक्षणातील समान संधीचे स्वप्न साकार करण्यात येत आहे. “एसटीची ‘लालपरी’ ही आज केवळ रस्त्यावर धावणारी बस नाही, तर ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांची सारथी, प्रत्येक पालकाच्या विश्वासाची हमी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत धावणारी ज्ञानगंगा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवण्याचे हे सामाजिक कार्य एसटी महामंडळ यापुढेही अधिक सक्षमपणे, संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने सुरू ठेवेल,” असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

१६२ कोटींना कंपनीची जागा विकून कंपनीला प्रचंड नफा , मात्र २४ कामगारांच्या मृत्यूनंतरही २४ कोटींची देणी मिळेनात!

अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे येथील ‘विंडसर मशिन्स लिमिटेड’ कंपनीच्या ९९ कामगारांची गेल्या २५ वर्षांपासून रखडलेली २४ कोटी रुपयांची थकबाकी आणि हक्काच्या पैशांची वाट पाहता-पाहता २४ कामगारांनी गमावलेला जीव, हा अतिशय गंभीर मुद्दा आज महाराष्ट्र विधान परिषदेत मांडला गेला. भाजपचे विधान परिषदेचे आमदार व माजी मंत्री  प्रमोद जठार यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून या अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष वेधले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने या ९९ कामगारांवरील अन्यायाचा विषय आमदार  प्रमोद जठार, तसेच कामगारमंत्री आणि कामगार सचिव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. सुराज्य अभियान याचा पाठपुरावा करत आहे. हा मुद्दा सभागृहात मांडताना आमदार जठार यांनी कंपनीकडून झालेल्या अन्यायी कारभाराचा पाढा वाचला. वर्ष २००० ते २०२६ या २५ वर्षांच्या काळात कंपनीने ९९ कामगारांना त्यांच्या पगार, ग्रॅच्युइटी आणि बोनस अशा नऊ वेगवेगळ्या घटकांच्या न्याय्य रकमेपासून वंचित ठेवले आहे. कंपनीने ठाण्यातील आपली मालमत्ता १६२ कोटी रुपयांना विकून प्रचंड नफा कमावला; मात्र ज्यांच्या कष्टावर कंपनी उभी राहिली, त्या वयोवृद्ध आणि आजारी कामगारांना केवळ ४.५ कोटी रुपयांची नाममात्र रक्कम देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. एवढेच नाही, तर कंपनीने कामगारांचे ७.४१ कोटी रुपये अनधिकृतपणे ‘राईट-बॅक’ (Write-Back) करून मोठी आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला. हक्काच्या पैशांची वाट पाहता-पाहता ९९ पैकी २४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित कामगार मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याची भीषण वास्तविकता त्यांनी सभागृहासमोर मांडली. आमदार जठार यांनी शासनाकडे ठोस मागण्या केल्या. कामगारांच्या हक्काची २४ कोटी रुपयांची संपूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने कृती करावी, या प्रकरणी विधान परिषदेचे उपसभापती यांच्या नेतृत्वाखाली कामगार प्रतिनिधी, कामगारमंत्री, कामगार आयुक्त आणि कंपनी व्यवस्थापन यांची तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी आणि कंपनीने केलेला पीएफ घोटाळा, तसेच आर्थिक गैरव्यवहारांची ‘आर्थिक गुन्हे शाखेमार्फत’ सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. आमदार जठार यांनी मांडलेल्या या वास्तवानंतर पीठासीन अधिकारी  संजय खोडके यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत कामगारमंत्र्यांना सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. यावर राज्याचे कामगारमंत्री फुंडकर यांनी सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे, असे सांगून पुढील कारवाईच्या दृष्टीने सभागृहाला आश्वस्त केले. या चर्चेअंती आमदार  जठार यांनी अन्यायग्रस्त कामगारांचे निवेदन कामगारमंत्र्यांकडे सुपूर्द केले. आता शासनाच्या या आश्वासनानंतर उर्वरित कामगारांना त्यांच्या हयात असताना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण कामगार वर्गाचे लक्ष लागून आहे.

दिवा शिवसेना युवतीसेनेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

दिवा : शिवसेना दिवा युवतीसेना आयोजित इयत्ता दहावी व बारावीतील यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात कल पार पडला. हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला असतानाही विद्यार्थी व पालकांनी…

नौपाड्यात स्पा व मसाज सेंटरवर कारवाई करावी – संजय वाघुले

0000000000 अनिल ठाणेकर ठाणे, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व स्पा व मसाज सेंटरची चौकशी करून गैरप्रकार करणारी सेंटर तत्काळ बंद करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दादा पाटील वाडी येथील एका कॉम्प्लेक्समधील सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिसांना निवेदन दिले. या वेळी नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, संतोष साळुंखे, प्रशांत कळंबटे, राजेश ठाकरे, सई कारुळकर, भाग्यश्री मुळे, राणी क्षीरसागर, भक्ती मोहिते, मनोज स्नेही, हिमांशू राजपूत आदी उपस्थित होते. यापूर्वी गेल्या वर्षी स्टेशनजीकच्या पॅराडाईज टॉवरमध्ये स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच शांत, सुशिक्षित नौपाड्यात गैरप्रकार रोखण्यासाठी दाद मागण्यात आली होती. संबंधित स्पा सेंटरला घर भाड्याने देण्याबाबतचा करार नोंदणीकृत केला आहे का, पोलिस स्टेशनकडून व्हेरिफिकेशन केले आहे का, संबंधित मसाज सेंटरकडे मसाज सेंटर व्यवसाय नोंदणीचा परवाना आहे का, याची चौकशी करावी. नौपाड्यातील सर्व स्पा सेंटरचे चालक व जागा भाड्याने देणारे मालक यांच्या भाडेकराराची तपासणी करून पोलिस चौकशी करावी. तसेच परिसरातील नागरिकांकडून तोंडी वा फोनवर तक्रार आल्यास तत्काळ दखल घ्यावी, पोलिसांच्या गस्ती पथकाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवावी, स्पा सेंटर व मसाज सेंटरला जागा भाड्याने देणाऱ्या मालकांनी पोलिसांकडून व्हेरिफिकेशन सर्टीफिकेट घेतले नसल्यास संबंधित मालकाविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 00000000000