Category: मुंबई

Mumbai news

येऊरमधील अनधिकृत बंगले पुन्हा चर्चेत

अनधिकृत नळजोडणी, बंगल्याची वन विभाग आणि महापालिकेकडे कागदोपत्री नोंदच नाही ठाणे : येऊर आणि अनधिकृत बंगले यांची सांगड जुनीच आहे.  अनधिकृत नळ जोडणी, स्विमिंग पूल आणि महिन्याला हजारो रुपयांची कमाई करून देणाऱ्या बंगल्याची महापालिका सोडाच पण आदिवासींच्या वन जमिनीवर बांधलेल्या बंगल्याची वन विभागाकडेही कुठलीही कागदोपत्री नोंदच नसल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. सर्वश्री गणेश टाक, गौतम मोरे, संजय पडवळ आणि हितेश राठोड या चौघा मित्रांनी २०१०-११ दरम्यान वन विभाग शेणाचा पाडा येथील जागा भूमापन क्र न स ७ उपविभाग १५(७/१७) ही १० गुंठे  जागा विकत घेतली होती. त्यानंतर काही वर्षांनी गणेश टाकने हितेश राठोडला त्याचे पैसे परत दिले. यादरम्यान घेतलेल्या जमिनीत भराव टाकून त्याठिकाणी बोअर वेल, वृक्षारोपण केले होते. नंतर गणेश टाकने इतर दोघांना डावलून त्याठिकाणी जलतरण तलाव असलेल्या हेरंब फार्म नावाचे पक्के अनधिकृत बांधकाम केले. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या पाणी विभागाचा कंत्राटदार असलेल्या गणेश टाकने या फॉर्ममध्ये १इंची पाण्याची पाईप लाईनही जोडून घेतली. बेकायदेशीर असलेला हा फॉर्म शनिवार – रविवार भाड्याने देऊन महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहे. या बंगल्यासंदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली असता, या बंगल्याची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचे ठाणे महापालिका आणि वन विभागाने लिहून दिले आहे. महापालिकेचा हजारो रुपयांचा महसूल बुडवणारा गणेश टाक हा महापालिकेचा कंत्राटदार असल्याने त्या बंगल्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. 00000000000

कोकणातील आंबा  उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडू दिलासा मिळणार !

नवी दिल्ली : कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्राचे…

– बोरिवली –बांदा स्लीपर कोच सेवा तातडीने सुरू करा

 मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) व कोकण जनविकास समितीची मागणी मुंबई, दि. (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बोरिवली ते बांदा ही स्लीपर कोच बस सेवा मागील दोन वर्षांपासून कोणतेही ठोस कारण न देता अचानक बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगर परिसर व कोकणातील हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई परिसरात हजारो कोकणवासी रोजगार, शिक्षण व व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. सण-उत्सव, सुट्ट्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत कोकणात जाण्यासाठी बोरिवली–बांदा स्लीपर कोच सेवा ही त्यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था होती. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असलेली ही सेवा अचानक बंद झाल्याने प्रवाशांना खाजगी बससेवांचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. विशेषतः वरिष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. खाजगी वाहतूक सेवांमध्ये वाढलेले दर आणि अपुरी सुविधा यामुळे सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) कडे सदर बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती. जनतेच्या या तीव्र भावना व अडचणी लक्षात घेऊन मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) व कोकण जनविकास समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅन्सी डेपो, बोरिवली येथे भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी बोरिवली–बांदा स्लीपर कोच बस सेवा तसेच बोरिवली–मालवण बस सेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले. एसटी महामंडळाचे अधिकारी जाधव यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करत सदर बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. “सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, सुलभ व परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी आहे. कोकणवासीयांच्या भावना व गरजा लक्षात घेऊन ही सेवा तातडीने सुरू करण्यात यावी,” अशी भूमिका कोकण जनविकास समितीचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रकाश जाधव तसेच मासचे  कार्याध्यक्ष दिनेश राणे, उपाध्यक्ष डॉ. उत्तम महाडकर,उपाध्यक्षा चित्रा राणे,  कार्यकारिणी सदस्य रमेश बोरीचा तसेच नितांत पेडणेकर, दीपेश परब यांनी मांडली. 0000000

गाववाला पॅटर्नने पनवेल हादरले

– रिक्षाचालकाने मारला एसटी चालकाच्या डोक्यात हातोडा राज भंडारी पनवेल : शहरातील शिवशंभो नाका येथील सिग्नलजवळ एस टी बस आपल्या अंगावर येईल असा गैरसमज मानत बाळगून एसटी चालकाजवळ उद्धटपणे शिवीगाळ करीत एसटी बसमधून चालकाला खाली उतरण्यास भाग पाडून नंतर आपल्या रिक्षातील हातोड्याने एसटी बस चालकाच्या डोक्यात जबर प्रहार केल्याची घटना गुरुवारी भरदुपारी २ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास घडली. यावेळी इतर जागरूक नागरिकांनी रिक्षाचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत प्रथमदर्शी मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिवशंभो नाका (तक्का) येथील सिग्नल जवळ विलास म्हात्रे याने आपली रिक्षा (MH ४६ बीपी ४४८४) थांबविली. मात्र मागून येणाऱ्या विटा – मुंबई या बसने रिक्षाजवळ बस थांबाविल्यामुळे रिक्षा चालक विलास म्हात्रे याचा इगो दुखावला गेला. यावेळी माझ्या गाडीला ठोकला असतास म्हणून एसटी बस चालकाला अश्लील शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. यावेळी बसचालक बासमधून खाली उतरताच विलास म्हात्रे या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षामध्ये ठेवलेला हातोडा काढून बस चालकाच्या डोक्यात मारला. यावेळी बस चालक हा त्यांचक्षणी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. यावेळी जमलेल्या सुज्ञ नागरिकांनी दुसऱ्या एका रिक्षातून त्या चालकाला बसमधील वाहकासोबत प्राथमिक उपचारासाठी पनवेलमधील गांधी रुग्णालयात पाठवले. तसेच पोलिसांना पाचारण केल्यानंतर नागरिकांनी विलास म्हात्रे या रिक्षा चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. अद्यापही एसटी बस चालकाच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाली नसली, तरी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

‘सुपर डुपर’ या खुसखुशीत मराठी विनोदी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर

ठाणे : दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या ‘सुपर डुपर’ या खुसखुशीत कॉमेडी- ड्रामा शैलीतील चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा मराठी ZEE5 ने केली आहे. चित्रपटगृहांमध्ये यशस्वी प्रदर्शन आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद…

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंती दिनी केडीएमसीतर्फे अभिवादन

कल्याण : थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंती दिनी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर…

मुरबाडमध्ये ‘घोटाळेबाज बनकरी’ पुन्हा चर्चेत!

कोट्यावधींचा पाटबंधारे घोटाळा उघड, तात्काळ निलंबनाची मागणी! राजीव चंदने मुरबाड : मुरबाड पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागात ‘महाभ्रष्टाचार’ उघड झालाय  आणि या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहेत पुन्हा तेच वादग्रस्त नाव उपअभियंता जगदिश बनकरी. तालुक्यासाठी आलेल्या कोट्यावधींच्या निधीवर बनकरी आणि त्यांच्या शाखा अभियंत्यांनी थेट दरोडाच टाकलाय. कागदावर सिमेंट-काँक्रीटची उच्च दर्जाची कामं, पण प्रत्यक्षात? फक्त दगड-गोट्यांचा भरणा! आणि बिलं मात्र लाखोंची उचलली… ही शासनाची फसवणूक नाही तर जनतेच्या घामाच्या पैशाची खुलेआम लूट आहे! हा पहिलाच प्रकार नसून बोगस कामं, निधीचा अपहार, मोर्चे, उपोषणं… बनकरी यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. पण प्रत्येक वेळी ‘वरिष्ठांच्या आशीर्वादाने’ ते सहीसलामत सुटतात. मुरबाडकर विचारतायत – बनकरींना वाचवणारं ते ‘अदृश्य हात’ कुणाचे? यावर्षीही बनकरींच्या कृपेने बोगस कामांचा सपाटा सुरूच आहे. कार्यालयात शेकडो तक्रारींचा ढीग लागलाय. मात्र आता नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. बनकरीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लवकरच बेमुदत उपोषण छेडण्यात येणार असून त्याचं पत्र पंचायत समितीत धडकलं. वरिष्ठांचा आशीर्वाद’ म्हणजे नेमकं कोण?  यावेळी बनकरी वाचले तर रस्त्यावर उतरून मंत्रालय हलवू असा कडक इशाराच आता जबाबदार नागरिकांनी दिलाय.

प्रगणकांनी घेतले जनगणना विषयक प्रशिक्षण राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवा

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन अशोक गायकवाड नवी मुंबई : जनगणना २०२७ चे काम नियोजनबध्द रितीने सुरू असून प्रगणकांव्दारे घरोघरी जाऊन गृहगणना केली जात आहे. या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्र येथे १५० हून अधिक प्रगणकांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण फिल्ड ट्रेनर यांच्यामार्फत उत्तम रितीने पार पडले. प्रशिक्षणानंतर एपीएमसी, सिडको तसेच शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी समाधान व्यक्त केले आणि जनगणनेचे काम करण्यास स्वेच्छेने स्वीकृती दर्शवली. महाराष्ट्र राज्यामध्ये जनगणनेचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे काम दिनांक १६ मे पासून सुरू झाले आहे. हे काम दिनांक १४ जून पर्यंत सुरू असणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांना जनगणनेविषयक आपल्या घराची व कुटुंबाची सत्य माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या घरी येणारे प्रगणक हे शासकीय कर्मचारी असून या राष्ट्रीय कामामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे त्यामुळे नागरिकांनी त्यांचे स्वागत करावे आणि त्यांना आवश्यक संपूर्ण माहिती पुरवावी. ही माहिती राष्ट्रीय नियोजनाप्रमाणेच त्या त्या क्षेत्रामध्ये शासकीय योजना राबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आपल्या क्षेत्रातील विकास कामे ही या आकडेवारीवर अवलंबून असतात याची नोंद घ्यावयाची आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरी येणा-या प्रगणकाचे अधिकृत ओळखपत्र तपासून त्यांना आवश्यक माहिती पुरवावी आणि जनगणनेच्या राष्ट्रीय कामामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रमुख जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

स्वयंपुनर्विकासाला मुंबईत मोठ्या प्रमाणावर मागणी

दरेकर अभ्यास गटाच्या शिफारशीच्या अंमलबजावणीबाबत दरेकरांची मुंबई महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा राजेंद्र साळसकर मुंबई : दरेकर समितीच्या अहवालातील शिफारशी बाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची दरेकर समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण…

ठाण्यात ‘आशाये’ पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात

प्लास्टिक मुक्तीसाठी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा पुढाकार सिद्धेश शिगवण ठाणे :जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने “आशाये” हा पर्यावरणपूरक आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेण्यात आला…