Category: मुंबई

Mumbai news

 महागाईने त्रस्त जनतेवर पेट्रोल-डिझेलची दरवाढ अन्यायकारक

वर्षा गायकवाड यांचे प्रतिपादन मुंबई : महागाईने जनता त्रस्त असताना पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. मागील ११ दिवसात पेट्रोल डिझेलचे दर प्रति लिटर ८ रुपयांनी वाढले आहेत. ही इंधन दरवाढ सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करणारी असून  केंद्रातील भाजपा सरकारने ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. इंधन दरवाढीवर बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे पेट्रोल डिझेलचा आवश्यक तेवढा साठा देशात आहे हे सांगत होते. पण विधानसभा निवडणुका होताच पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरु केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार असा इशारा दिला होता आणि राहुल गांधी पुन्हा एकदा खरे ठरले, मोदी सरकारने निवडणुका होताच इंधन दरवाढ केली. मागील महिन्यातच एलपीजी सिलेंडरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती तर दुप्पट केल्याने हॉटेलसह खाद्य पदार्थ बनवणारे छोटे व्यवसाय संकटात आले व खाद्य पदार्थांचे दरही वाढले आता पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, त्यामुळे महागाई आणखी वाढेल. युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंह यांनी सबसीडी देऊन जनतेला दिलासा दिला आणि महागाईची झळ बसू दिली नाही, पण मोदी सरकार मात्र जनतेला कोणत्याच प्रकारे दिलासा देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई, बेरोजगारी, यासह जनतेच्या प्रश्नात काहीच स्वारस्य नाही. जनता पिचलेली असताना पंतप्रधान मात्र विदेशी दौरे करत चॉकलेट वाटत फिरत आहेत, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पेट्रोलचा पर्याप्त साठा आहे हे सांगत आहेत पण राज्यातील काही भागात पेट्रोल पंप बंद आहेत. आजच काही प्रसारमाध्यांनी मुंबईतील दादर सायनमध्येही पेट्रोल पंप बंद असल्याच्या बातम्या दिल्या. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या झळा राजधानी मुंबईपर्यंत पोहचल्या तरी मुख्यमंत्री फडणवीस जागे झालेले दिसत नाहीत. खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल डिझेलची टंचाई होणार नाही व महागाईची झळ जनतेला पोहचणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.. 00000

राज्यपालांच्या पुढाकाराने आजपासून ‘टीबीमुक्‍त मुंबई’ अभियान

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका आज मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत २६ मेला सकाळी ११ वाजता…

वेदांश कुशवाहाचा चुरशीच्या लढतीत विजय

आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई : वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेच्या (२०२६) पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ६४ फेरीमध्ये जेएसडब्ल्यूच्या वेदांश कुशवाहाने आपला संघ सहकारी आयुष वर्माचा चुरशीच्या लढतीत ११-४, १४-१२, १३-१५, ११-८ असा पराभव केला. राऊंड ऑफ ६४ फेरीच्या आणखी एका सामन्यात, अव्वल मानांकित उत्तराखंडच्या अंश त्रिपाठीने अदीव देवैयावर ११-३, १२-१०, ११-४ असा सहज विजय नोंदवून पुढील फेरीत प्रवेश केला. निकाल – पुरुष मुख्य ड्रॉ (राऊंड ऑफ ६४): १-अंश त्रिपाठी विजयी वि. अदीव देवैया ११-३, १२-१०, ११-४; वेदांश कुशवाहा विजयी वि. आयुष वर्मा ११-४, १४-१२, १३-१५, ११-८; संकल्प आनंद विजयी वि. मिशाल दारूवाला 11-5, 11-8, 11-8; कुणाल सिंग विजयी वि. अजय देशमुख ११-५, ११-४, ११-६; शाहबाज खान विजयी वि. कृष्ण दरवाडा ११-६, ११-८, ११-४; वेदांत पटेल विजयी वि. दिना करण 11-1, 11-4, 11-1; आर्यमान सिंग विजयी वि. उत्सव सेन११-८, ११-९, ११-८; प्रदीप मलिक विजयी वि. आदित्य शेट्टी ११-२, ११-२, ११-०; हर्ष राणा विजयी वि. अजिंक्य पाटील 11-3, 11-3, 11-8. ००००० Unit-7

वेदांश कुशवाहाचा चुरशीच्या लढतीत विजय

आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई : वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेच्या (२०२६) पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ६४ फेरीमध्ये…

ओंकार टिळकची अपयशी झुंज

 एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली पुरस्कृत बोरिवली येथील मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन येथे सुरु असलेल्या ११ व्या एम सी एफ राज्य…

वैभव, ओम समर्थ, श्री समर्थ, व ओम साईश्वरची विजयी सलामी

 कुमार-मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने ओम समर्थ भा. व्या. मंदिर आयोजित कुमार-मुली (ज्युनिअर- १८ वर्षाखालील) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व…

ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा ‘स्मॅश’ दबदबा

 – महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा ३ सुवर्णपदके तर एका ब्रॉंझ पदकाची कमाई” मुंबई येथील वरळीच्या  विलिंग्टन जिमखाना  येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा उल्लेखनीय आणि दिमाखदार कामगिरी करत ३ सुवर्ण पदके आणि १ कांस्य पदकाची कमाई केली. राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने पदकांची कमाई करत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीने महाराष्ट्रातील अग्रगण्य बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र म्हणून आपला ठसा अधिक अधोरेखित केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत सराव करणाऱ्या खेळाडूंनी ही यशस्वी कामगिरी नोंदवली. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर घाटणेकर,  अक्षय देवलकर,  मितेश हाजीरनीस,  राजीव गणपुळे,  एकेंद्र दर्जी,  प्रसेनजीत शिरोडकर आणि  देवांग दलाल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळाडू सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आहेत. १९ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात सानिध्य एकाडे याने शानदार खेळ करत सुवर्ण पदक पटकावले. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यापूर्वी सानिध्य आणि त्याच्या जोडीदाराने उदयान साळुंखे व सारा साळुंखे यांचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत सर्थक नलावडे व दितीशा सोमकुवर यांच्या विरोधात रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात २१-१४, २०-२२, २१-१८ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत ओजस जोशी व तन्वी घरपुरे यांच्या विरोधात पहिला गेम गमावल्यानंतर सानिध्यने दमदार पुनरागमन करत १२-२१, २१-१७, २१-१७ असा विजय मिळवला. अंतिम सामन्यात सयरा आणि सयाजी शेलार या जोडीवर २१-१४, २१-११ असा सरळ गेममध्ये विजय मिळवत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. १९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात प्रथम मानांकित आर्यन बिराजदार आणि अर्जुन बिराजदार या जोडीने संपूर्ण स्पर्धेत अक्षरशः वर्चस्व गाजवत सुवर्ण पदक पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी आदित्य पुजारी व प्रसन्न मन्ना यांचा २१-१०, २१-१६ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत अभिक शर्मा व स्वरित सातपुते या जोडीवर २१-१२, २१-१३ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात आयुष अडे आणि तनय मेहेंदळे यांच्या विरोधातही त्यांनी आक्रमक आणि नियंत्रित खेळाचे प्रदर्शन करत २१-१२, २१-१४ असा दिमाखदार विजय मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली. तर अपूर्व दवाडते याने मिश्र दुहेरी गटात कांस्य पदकाची कमाई करत अकॅडमीच्या पदकतालिकेत आणखी भर घातली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असून, ठाणे शहराच्या क्रीडा क्षेत्राचा लौकिक उंचावत आहेत. खेळाडूंमधील शिस्त, मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन यामुळे अकॅडमी महाराष्ट्रातील यशस्वी बॅडमिंटन केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे. या स्पर्धेच्या यशामुळे सदर वर्षाच्या बॅडमिंटन खेळाच्या हंगामाची दणदणीत सुरुवात झाली आहे आणि या पुढील हंगामात केवळ राज्य नव्हे तर राष्ट्रीय  स्तरावर देखील ठाणे शहराचे नाव आपण मोठे करू असा विश्वास खेळाडूंनी व्यक्त केला आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी समाधान व्यक्त करत आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त  मीनल पलांडे यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आर्यन, विराज, योगेश, राजेश, सेजल, तन्वी, रुबी ठरले सर्वोत्तम लिफ्टर

 मुंबई महापौर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुंबई : कीर्ती कॉलेज , वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) येथे मुंबई महानगरपालिकेच्या सौजन्याने आणि मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई महापौर चषक…

मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने व खयालग्रुप यांच्या वतीने ५० वर्षावरिल पुरुष व महिला एकेरी कॅरम स्पर्धा ३० मे ते ३१ मे रोजी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलनात घेण्यात येणार आहेत. तरी उपनगरातील खेळाडूंनी २६ मेपर्यत संतोष चव्हाण मो. नं  ९७६९२९२९२६ यांच्या बरोबर संपर्क साधावा.

– वियोम फाऊंडेशन विरुद्ध ऑसम अंधेरी यांच्यात अंतिम लढत

 मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा  श्रेयसची घातक गोलंदाजी; ४ बळी घेत वियोमला फायनलमध्ये पोहोचवले मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट टर्फवर सुरू असलेल्या भव्य ‘मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’त आता अंतिम सामन्याची रंगत शिगेला पोहोचली आहे. पहिल्या उपांत्य फेरीत ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने अत्यंत थरारक लढतीत ओर्नेट क्रिकेट क्लबवर शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी निसटता विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबने एसएसए स्टायकर्सवर १४ धावांनी दणदणीत विजय नोंदवत अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल – स्टार सीसी आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने ओर्नेट क्रिकेट क्लबवर ४९-४५ असा थरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ओर्नेटच्या आकाश आणि रजनीश यांनी २४ धावांची दमदार सुरुवात करून संघाला भक्कम पाया रचून दिला. त्यानंतर अभिजित आणि कमलेश यांनी १४ धावा जोडल्या, तर अक्षिश आणि अश्विन यांनी १२ धावांची भर घातली. मात्र शेवटच्या जोडीतील घसरणीमुळे ओर्नेटला ४५ धावांपर्यंतच मजल मारता आली. ४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑसम अंधेरीकडून मोनू आणि मयांक यांनी १७ धावांची सुरुवात केली. त्यानंतर रोहित आणि अहमद यांनी १८ धावा फटकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑसम अंधेरीने ४९ धावा करत अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबने एसएसए स्टायकर्सवर ४२-२८ असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या वियोमने सुरुवातीपासून एसएसएवर दबाव निर्माण केला. एसएसएच्या पहिल्या जोडीतील नितीश आणि सिकंदर यांना खातेही उघडता आले नाही. त्यानंतर विल्सन आणि विजय यांनी १४ धावा केल्या, तर नितीन आणि विश्वनाथ यांनी २९ धावांची आक्रमक भागीदारी केली. मात्र शेवटच्या जोडीतील सुयोग आणि संदेश यांना श्रेयस आणि शुभम यांच्या अचूक गोलंदाजीसमोर मोठा फटका बसला आणि संघ २८ धावांवर रोखला गेला. वियोमकडून श्रेयसने ४ बळी घेत सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी केली, तर रोहनने २ बळी घेतले. प्रसाद आणि शुभम यांनी प्रत्येकी १ बळी घेत महत्त्वाचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना अनिकेत माडीये आणि रोहन गावडे यांनी १५ धावांची सावध सुरुवात करत वियोमला स्थिरता मिळवून दिली. त्यानंतर श्रेयस वैद्य आणि अजित सेठी यांनी १० धावांची भर घालत विजयाचा पाया मजबूत केला. कर्णधार ओमकार पाटोळे आणि प्रसाद आंब्रे यांनी संयमी फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. अखेरीस शुभम गुरव आणि सिद्धेश घोगरे यांनी ७ महत्त्वाच्या धावा जोडत संघाला १४ धावांनी शानदार विजय मिळवून दिला. आता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वियोम फाऊंडेशन आणि ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लब यांच्यात विजेतेपदासाठी जबरदस्त लढत रंगणार असून, क्रिकेट प्रेमींमध्ये या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.