Category: मुंबई

Mumbai news

सरकारी बाबूंच्या हप्त्यांमुळे रस्त्यावरील अतिक्रमण कायम

सरकारी बाबूंच्या हप्त्यांमुळे रस्त्यावरील अतिक्रमण कायम प्रशासन लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अपघाताचा धोका रमेश औताडे मुंबई: राज्यातील प्रमुख शहरे आणि उपनगरांमध्ये रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक मोकळ्या जागांवरील अतिक्रमणांनी अक्षरशः विळखा घातला असून…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ संकल्प सादर करणार ?

  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं बारामतीत झालेल्या विमान अपघातामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्वता खुलासा केला आहे. अजित दादांनी…

उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचा होकार

आज पाच वाजता होणार शपथविधी ० महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरणार ० राष्ट्रीय अध्यक्षपदीही सुनेत्रा पवरांकडेच ० पार्थ पवारांची खासदारपदी वर्णी लागणार स्वाती घोसाळकर मुंबई  : अजित पवार यांच्या निधनानंतर…

महाराष्ट्र ओपन कॅरम स्पर्धेत तेलंगणाच्या के श्रीनिवासची आगेकूच

महाराष्ट्र ओपन कॅरम स्पर्धेत तेलंगणाच्या के श्रीनिवासची आगेकूच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपउपांत्य फेरी स्पर्धेच्या सामन्यात तीन सेटपर्यंतच्या…

एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत शालेय ४० खेळाडूंमध्ये रविवारी चुरस

एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धेत शालेय ४० खेळाडूंमध्ये रविवारी चुरस मुंबई : माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेत एमजेएससी ट्रॉफीसाठी १ फेब्रुवारी रोजी…

ग्राहकांची ऑनलाईन तक्रार प्रक्रिया ठप्प

ग्राहकांची ऑनलाईन तक्रार प्रक्रिया ठप्प रमेश औताडे मुंबई : कंझ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित स्वयंसेवी संस्थेची ग्राहकांसाठी हेल्पलाईन सेवा सध्या खंडित झाल्याने नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदवता येत नाही.…

सीटीसीच्या शताब्दी समिटला मुंबईत प्रारंभ

सीटीसीच्या शताब्दी समिटला मुंबईत प्रारंभ रमेश औताडे मुंबई : चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट्स या अग्रगण्य व्यावसायिक संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘द शताब्दी समिट सेंटेनरी कॉन्फरन्स’ या दोन दिवसाच्या भव्य परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. परिषदेचे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते इंडसइंड बँकेचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन डिझिग्नेट अरिजित बसू यांनी  भारताच्या आर्थिक प्रवासात लवचिक वित्तव्यवस्था व जबाबदार विकास या विषयावर बोलताना त्यांनी नैतिकता, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि व्यावसायिकांच्या जबाबदारीवर भर दिला. बदलत्या आर्थिक व व्यावसायिक वातावरणात कर, कायदा व लेखा क्षेत्रातील तज्ज्ञांनी तंत्रज्ञान, प्रशासन आणि उत्तरदायित्वाशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. शताब्दी समिट हे या दृष्टीने मार्गदर्शक ठरेल असे सीटीसीचे अध्यक्ष सीए जयंत गोखले यांनी सांगितले. उपाध्यक्ष सीए नेहा राजेन गडा, संयुक्त मानद सचिव सीए मेहुल शेट्टी व सीए अंकित संघवी तसेच मानद खजिनदार सीए वितांग शाह उपस्थित होते. शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष सीए विपुल चोक्सी यांनी सांगितले की, परिषदेत भांडवली बाजार, स्टार्टअप्स, जीएसटी, संबंधित पक्ष व्यवहार, कर नियोजन तसेच व्यावसायिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर सखोल चर्चा झाली.

  पालिकेच्या जागेच्या बदल्यात फेरीवाल्यांकडून हप्ता वसूली

पालिकेच्या जागेच्या बदल्यात फेरीवाल्यांकडून हप्ता वसूली मुलुंड म्हाडा कॉलनीत फेरीवाल्यांमुळे नागरीक त्रस्त पालिका अधिका-यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी मुंबई: निष्पाप लोकांचा जीव गेल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणेला जाग येत नाही. हे सर्व श्रुत आहे. भांडुपची दुर्घटना असो वा कुर्ल्यातील मारहाण प्रकरणानंतर फेरीवाल्यांवर युध्द स्तरावर कारवाई करण्यात आली. आता दोन्ही प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी ठाण मांडायला सुरवात केली आहे. याचा सर्वाधीक त्रास मुलुंडकरांना होत असून केवळ फुटपाथच नव्हे तर रस्त्यांवरही त्यांनी आपले बस्तान मांडुन ठेवले आहे. दिखाऊ पणाची कारवाई करणारी पालिका प्रशासन वारंवार कायदा मोडणा-या फेरावाल्यांवर कायमस्वरुपी कारवाई का करीत नाही असा प्रश्न नागरीक करीत आहेत. मुलुंड पश्चिम येथील महात्मा गांधी मार्गावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमनाबाबत नागरीकांनी केलेल्या तक्रारी नंतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र दुस-याच दिवशी फेरीवाल्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केले. दिखाऊ पणाची कारवाई करणारे पालिका प्रशासन अशा फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल का करीत नाहीत. असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. एम.जी. मार्गावर दुकानदार व फेरीवाल्यांनी फुटपाथ अडवून ठेवली आहे तर रस्तांवर बेकायदेशीर पार्किग मुळे पादचा-यांना रस्त्यावरुन चालावे लागते. त्यामुळे स्टेशनकडे येणा-या बेस्ट बसेसमुळे भांडुप सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अत्यंत अरुंद रस्त्यातून बेस्ट बसला मार्गक्रमण करावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा भागात फेरीवाल्यांनी व बेकायदेशीर पार्किंगवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरीकांना या भागातून चालणे अवघड होऊन गेले आहे. अशीच परिस्थिती मुलुंड पश्चिम येथील रामरतन त्रीवेदी मार्ग, एस.एल.मार्ग या ठिकाणी दिसून येते. मुलुंड पुर्व पश्चिम येथे तर अनेक ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र अशी पाटी लावण्यात आली आहे. विनोदाची गोष्ट म्हणजे फेरीवाले याच पाटीखाली आपला ठेला (दुकान) लावतात. त्यांना आता पालिकेच्या कारवाईची भीती राहिली नसून पालिका व फेरीवाल्यांमधील आर्थिक व्यवहारामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे फेरीवाले व नागरीक सांगतात. मुलुंड पुर्व येथील म्हाडा कॉलनी रिध्दी सिद्धी इमारती मधील दुकानदारांनी त्यांचे विक्रीचे सामान शटर बाहेर काढल्याने नागरीकांना या ठिकाणी चालता येत नाही. त्यातच फेरीवाल्यांचे अतिक्रमण व बेकायदेशीर पार्किंगमुळे शाळेत जाणा-या लहान मुलांना व पालकांना जीव धोक्यात घालून रस्तांवरुन चालावे लागते. दुकानदारांमुळे बेकायदेशीर पार्किंग ही येथील नागरीकांची डोकेदुखी ठरली असून अशाच पार्किंगमुळे म्हाडा कॉलनीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली केली जात असल्याचे नागरीक उघडपणे बोलतात. अनेकांनी तर पालिकेची जागा फेरीवाल्यांना चालविण्यासाठी दिली असून त्याबदल्यात महिना ठराविक रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाते. हा सर्व प्रकार म्हाडा कॉलनीत राजरोसपणे चालतो.  पालिका व पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली चालणा-या या हप्ते वसुलीवर कारवाई मात्र शुन्य असल्याचे नागरीक सांगतात. चाईनीस, पानीपुरी, नारीयळ पाणी व वडापावच्या फेरीवाल्यांकडून ही हप्ते वसूली केली जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पालिका व फेरीवाल्यांच्या आर्थिक उलाढाली पाहता पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांपासून ते सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी आता नागरीक करीत आहेत.

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा काढून अनपेक्षित सत्कार

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा काढून अनपेक्षित सत्कार रमेश औताडे मुंबई: कसारा रेल्वे स्थानकावर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष नारायण बागडे यांचा कार्यकर्त्यांनी अनपेक्षित व उत्स्फूर्त सत्कार केल्याचा प्रसंग घडला. विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना नसताना स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांच्या उपस्थितीची माहिती कशी मिळाली, याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. बागडे स्थानकावर आले असल्याची खबर लागताच कार्यकर्त्यांची फोनाफोनी सुरू झाली. काही क्षणांतच हार आणि शाल घेऊन कार्यकर्ते स्थानकावर दाखल झाले.  त्यानंतर  यांच्या गळ्यात पुष्पहार घालून व शाल देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने स्थानकावरील प्रवासीही क्षणभर थबकले. कार्यकर्त्यांचे प्रेम, आपुलकी आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा या क्षणातून स्पष्टपणे दिसून आली, असे बागडे यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले. हा संपूर्ण प्रसंग उपस्थितांनी पाहिलेला एक अविस्मरणीय क्षण ठरला.

 प्रसाद लाड यांनी बारामतीत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली

प्रसाद लाड यांनी बारामतीत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली तुम्हाला अशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, असे वाटले नव्हते— प्रसाद लाड मुंबई: ‘अशाप्रकारे बारामतीत येऊन, तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, अशी अजूनही कल्पना करवत नाही’ म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवार यांना बारामती येथे वाहिली श्रद्धांजली. यावेळी प्रसाद लाड यांनी शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सोबत आमदार चित्राताई वाघ, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.