अंतर्गत कॅरम स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात अंतर्गत कॅरम स्पर्धा उत्साहात नवी मुंबई : सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात १७ ते २१ मे दरम्यान पुरुष व महिला…
trendlyne-news
सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात अंतर्गत कॅरम स्पर्धा उत्साहात नवी मुंबई : सानपाडा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात १७ ते २१ मे दरम्यान पुरुष व महिला…
रमेश औताडे मुंबई : विविध समाजघटकांना जातीय अन्यायाचे चटके सहन करावे लागले होते. त्या सर्व पीडित समाजघटकांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका विचारमाळेत गुंफून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. मात्र आज उपवर्गीकरणाच्या नावाखाली हे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, त्याला वेळीच लगाम घालण्यासाठी राज्यभरात “अनुसूचित जाती समन्वय अभियान” राबविण्यात येणार असल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर करण्यात आली आहे. २५ मे रोजी नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त “अनुसूचित जाती ऐक्य संदेश दिवस” साजरा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाजघटकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडू शकते, हा धोका विविध घटकांना समजावून सांगण्यावर या अभियानाचा भर असणार आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात साहित्यभूषण अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव, जिल्हा सांगली येथे कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चोंडी येथे अभियान राबविण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात पोचिराम कांबळे यांच्या जन्मगाव तैरभुनी, जिल्हा नांदेड येथे कार्यक्रम होणार असून, चौथ्या टप्प्यात प्रथम अस्पृश्य परिषदेमुळे ऐतिहासिक ठरलेल्या सुकळी मानगाव, जिल्हा कोल्हापूर येथे अभियानाचा समारोप होणार आहे. या अभियानाद्वारे अनुसूचित जातींमध्ये सामाजिक ऐक्य, समन्वय आणि संविधानिक हक्कांविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रदेश जनसंपर्क प्रमुख डॉ. श्रीकृष्ण बेडसे यांनी माध्यमांना सांगितले. 00000000000
सरकारी कारवाईत अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल कल्याण : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्ल्याणी नजीकच्या खजुरीनगर परिसरात अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी गेलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण निष्कासन पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २२ मे रोजी घडली. या घटनेत महिला अधिकाऱ्यांना धक्का बुक्की करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने खजुरीनगर परिसरातील अनधिकृत चाळीचे बांधकाम हटविण्याची कारवाई सुरू केली होती. कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र सकाळच्या सुमारास काही महिलांनी अचानक आक्रमक भूमिका घेत कारवाईला विरोध सुरू केला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आणि महिलांनी थेट महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला चढविला. यावेळी महिला अधिकारी यांच्याशी झटापट करीत धक्का बुकक्की केल्या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आल्याचे समोर आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून संबंधित महिलांविरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी टिटवाळा पोलीस तपास करीत आहे. 00000000000
नगरसेवक राहुल कोट यांच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीची मोठी कारवाई; २८० रूम्स, ६० जोते जमीनदोस्त कल्याण : बल्याणी परिसरातील अनधिकृत चाळींबाबत स्थानिक नगरसेवक राहुल कोट यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर केडीएमसी प्रशासनाला मोठी कारवाई करावी लागली. शुक्रवारी केडीएमसीच्या ‘अ’ प्रभागातील खजुरी नगर, बल्याणी परिसरात धडक मोहीम राबवत तब्बल २८० रूम्स आणि ६० जोत्यांवर बुलडोझर चालवत ती जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे, ‘अ’ प्रभागाचे सहायक आयुक्त जयवंत चौधरी, ‘ड’ प्रभागाचे उमेश यमगर, ‘क’ प्रभागाचे धनंजय थोरात, ‘फ’ प्रभागाचे प्रसाद ठाकूर तसेच ‘ग’ प्रभागाचे जयराम शिंदे यांच्यासह मोठा अधिकारी वर्ग आणि पोलीस बंदोबस्त या मोहिमेत सहभागी होता. एक पोकलेन आणि चार जेसीबीच्या सहाय्याने सकाळपासून सुरू असलेली कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे, बल्याणी परिसरातील बेकायदा चाळींमुळे गुन्हेगारी आणि अनधिकृत वास्तव्यास खतपाणी मिळत असल्याचा गंभीर आरोप करत नगरसेवक राहुल कोट यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच आयुक्तांना निवेदन देत बेकायदा बांधकामे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत पालिकेने मोठी कारवाई केल्याने राहुल कोट यांच्या मागणीला काही अंशी यश मिळाल्याची चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे. दरम्यान, कारवाईदरम्यान काही ठिकाणी नव्याने बांधलेल्या खोल्यांमध्ये नागरिक तात्पुरते वास्तव्यास असल्याचे चित्र दिसून आले. मात्र, प्रशासनाने कोणताही दबाव न घेता सर्व बांधकामांवर हातोडा चालवला. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
काही मेल-एक्स्प्रेस गाड्या १० दिवस शॉर्ट टर्मिनेट राजेंद्र साळसकर मुंबई : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) मार्फत सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी ) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक…
आगरी समाजाच्या विकासाला माझे सर्वप्रथम प्राधान्य : महेंद्रशेठ घरत उलवा : कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वातानुकूलित भव्य सभागृहाचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शनिवारी शानदार उदघाटन करण्यात आले. या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे आदी मान्यवर उपस्थित होते. कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे संपूर्ण अत्याधुनिक नूतनीकरण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी १२ लाख ५० हजार रुपये सढळ हस्ते केलेल्या देणगीतून करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. “महेंद्रशेठ घरत हे आगरी समाजातील आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करणारे अवलिया आणि दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत, याचा कर्जतच्या आगरी समाजाला अभिमान आहे,” असे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मला आगरी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आपला समाज मेहनतीने आणि सन्मानाने जगण्याला अधिक प्राधान्य देतो. कुणापुढे कारण नसताना झुकत नाही. ताठ कण्याचा आपला समाज मला प्रिय आहे. त्यामुळे आगरी समाजाच्या उत्कर्षासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करतो. समाजाच्या मागे मी कायमच खंबीरपणे उभा आहे आणि राहीन. कर्जतचा आगरी समाज संघटित होऊन समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कर्जतच्या आगरी समाजावर माझे विशेष प्रेम आहे. त्यांच्यासाठी माझा मदतीचा हात कायमच राहील. मी जागतिक पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे जगभर फिरतो; परंतु मी माझ्या गावाच्या विकासाबाबत संवेदनशील आहे. आज राज्यात रोल मॉडेल ठरेल, असा माझ्या शेलघर गावाचा सुनियोजित विकास मी करून घेतला आहे. आज तिथे ग्रामस्थांना बोट ठेवायला जागा नाही. मी जिल्हा परिषद सदस्य असताना गावोगावी जलकुंभ बांधून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतविला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर अभ्यास करून अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आणि विकासात्मक कामे करून घेतली. रायगडमध्ये सी. डी. देशमुख यांच्यानंतर मी जगाच्या व्यासपीठावर नावलौकिक मिळवतोय. तिथेही मी त्या त्या देशांच्या कामगार नेत्यांवर वचक ठेवून आहे.” या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे, कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, नितीन धुळे, रेश्माताई जोशी, मंगेश म्हसकर, विपूल पाटील, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. हा समारंभ हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृह नेरळ-बोपेले येथे पार पडला. यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष नागो गवळी, एकनाथ धुळे, सावळाराम जाधव, कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय गवळी, उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, किरीट पाटील, वैभव पाटील, निखिल ढवळे आणि एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जितेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले, तर भरत भगत यांनी प्रास्ताविक केले. 00000000
अंथरुणाला खिळलेल्यांसाठीही विशेष सेवा रमेश औताडे मुंबई : वाढते शहरीकरण, तुटत चाललेली संयुक्त कुटुंब व्यवस्था आणि वृद्धांकडे होणारे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर गुजरातमधील राजकोट येथे उभारण्यात आलेला “सद्भावना वृद्धाश्रम” अनेक निराधार वृद्धांसाठी आशेचा किरण ठरत आहे. “जगातील सर्वात मोठा वृद्धाश्रम” असा दावा करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये निराधार, आजारी, अंथरुणाला खिळलेले तसेच कर्करोग आणि कोमाग्रस्त वृद्धांना पूर्णपणे मोफत निवारा, वैद्यकीय उपचार आणि मानवी आधार दिला जात आहे. विनुभाई बघुभाई नारोळा यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या वृद्धाश्रमात वृद्धांना केवळ राहण्याची सोय नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली जात आहे. तब्बल ४०० खाटांची व्यवस्था असलेल्या या प्रकल्पात सध्या ७०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक राहत असून, अनेक वृद्धांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माणुसकीचा आधार मिळत आहे. वृद्धाश्रमामध्ये नियमित आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, मानसिक समुपदेशन, पौष्टिक आहार, औषधोपचार आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून, प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र सेवा देत आहेत. कर्करोग आणि कोमामध्ये असलेल्या रुग्णांसाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे संस्थेने सांगितले. संस्थेच्या माहितीनुसार, वृद्धाश्रमात धर्म, जात, भाषा किंवा आर्थिक स्थिती न पाहता गरजू वृद्धांना प्रवेश दिला जातो. “प्रत्येक वृद्धाला कुटुंबासारखी वागणूक मिळाली पाहिजे,” या भावनेतून संपूर्ण प्रकल्प उभारण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. या परिसरात मोठे सभागृह, वाचनालय, आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी जागा तसेच विरंगुळ्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वृद्धांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात. समाजातील नागरिकांनी निराधार, असहाय्य किंवा अंथरुणाला खिळलेले वृद्ध आढळल्यास त्यांना सद्भावना वृद्धाश्रमात आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. “कोणीही वृद्ध एकटा राहू नये,” हा संदेश देत हा प्रकल्प सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. 0000000000
कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगीधाम चौक ते सिटी पार्क कडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रटीकरणाचे काम सुरु असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे काम पुर्ण होण्यासाठी शिवसेना नगरसेविका अनघा देवळेकर यांनी अधिकारी आणि,कार्यकर्ता सह पाहणी…
खासगी एजन्सीद्वारे थेट लिलावाची मोहीम ठाणे : शहरातील रस्ते आणि मोकळ्या मैदानात वर्षानुवर्षे पडून असलेल्या बेवारस व नादुरुस्त वाहनांवर आता ठाणे महापालिकेने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. खासगी एजन्सीच्या माध्यमातून वाहनमालकांचा शोध घेऊन नोटिसा बजावल्या जाणार असून, प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित वाहनांचा थेट लिलाव करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे. ठाणे शहराच्या रस्त्यावर आणि मोकळ्या मैदानात पडून असलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे शहराचे विद्रूपीकरण होण्याबरोबरच वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिकेने पुणे महापालिकेच्या धर्तीवर नियोजनबद्ध मोहीम हाती घेतली आहे. पालिकेकडून यापूर्वी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही रस्त्यांवरील भंगार वाहनांचा प्रश्न कायम राहिला होता. त्यामुळे आता ‘मे. गंगामाता वाहन शोध संस्था’ या खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित संस्थेकडून वाहनांचा तपशील शोधणे, मालकांशी संपर्क साधणे, नोटिसा बजावणे, आरटीओकडून माहिती मिळवणे तसेच पुढील लिलाव प्रक्रिया राबवणे अशी संपूर्ण जबाबदारी पार पाडली जाणार आहे. सध्या ठाणे महापालिकेकडून उचलण्यात आलेली अनेक बेवारस वाहने पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील बाटा कंपाऊंड, खारेगाव पारसिकनगर तसेच मुंब्रा अग्निशमन केंद्रामागील मोकळ्या जागेत ठेवण्यात आली आहेत. या वाहनांची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, वाहनांचे नंबर उपलब्ध नसल्यास इंजिन किंवा चेसिस क्रमांकावरून मूळ मालकांचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर वाहनमालकांना दोन वेळा नोटीस पाठवली जाईल. तरीही वाहन हटवले नाही, तर संबंधित वाहनांचा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत दर ठरवून लिलाव करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक परवानग्या संबंधित संस्थेने घेतल्या असून, ठाणे महापालिका, आरटीओ आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जाणार आहे. वाहतूक व्यवस्थेला दिलासा पालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ रस्त्यांवरीलच नव्हे तर विविध प्राधिकरणांकडून जप्त करून वर्षानुवर्षे पडून असलेल्या वाहनांचीदेखील याच माध्यमातून विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे शहरातील मोकळ्या जागा उपलब्ध होण्याबरोबरच वाहतूक व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांना इशारा महापालिकेने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, रस्त्यांच्या कडेला दीर्घकाळ नादुरुस्त अवस्थेत उभी असलेली वाहने संबंधित मालकांनी स्वतः हटवावीत. अन्यथा पालिका ती वाहने उचलून नेऊन त्यांचा लिलाव करणार आहे. काय असेल प्रक्रिया? वाहनांचे नंबर, इंजिन व चेसिस क्रमांकावरून मालकांचा शोध आरटीओकडून वाहनमालकांची माहिती संकलित वाहन मालकांना दोन वेळा नोटीस प्रतिसाद न मिळाल्यास वाहनांचा लिलाव लिलावातून मिळणाऱ्या रकमेतील हिस्सा पालिका, वाहनमालक आणि एजन्सीकडे जाणार ००००००
१ जूनपूर्वी गाळेधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे नियोजन ठाणे : गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनाने आता मार्केट परिसराच्या पुनर्वसनासाठी ‘मिशन क्लिनिंग’ मोहीम हाती घेतली आहे. यासाठी तब्बल ९० कामगार दोन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर राडारोडा हटविणे आणि साफसफाईचे काम सुरू असून १ जूनपर्यंत १५५ गाळेधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. गुरुवारी पहाटे गावदेवी भाजी मार्केटला भीषण आग लागून संपूर्ण परिसर हादरला होता. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे (४२) आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर (५५) यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर तीन अग्निशमन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. आपत्कालीन सेवा आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षण रकमेत वाढ करण्याबाबतही पालिका लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच नुकसानग्रस्त गाळ्यांचे पंचनामे सुरू असून त्यानंतर नुकसान भरपाई प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सध्या गावदेवी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात साफसफाई सुरू आहे. त्यानंतर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि फायर ऑडिट करण्यात येणार आहे. ऑडिट अहवालानुसार आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी आणि विद्युत यंत्रणेची कामे पूर्ण झाल्यानंतर गाळेधारकांना पुन्हा त्याच जागेवर स्थलांतरित करण्यात येणार आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले अग्निशमन केंद्र अधिकारी सुजीत पाष्टे (४०), सहाय्यक केंद्र अधिकारी प्रशांत मुथ्या (४३) आणि अग्निशमन प्रणेता समीर जाधव (४३) यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिघांची प्रकृती स्थिर असून सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ०००००००