Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

हिमालयाची सावली; त्यागमूर्ती माता रमाई

आज २७ मे, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची पुण्यतिथी. ७ फेब्रुवारी १८९७ रोजी माता रमाई यांचा जन्म एका गरीब कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव…

जगासमोर हळूहळू एक असे संकट उभे राहत आहे, जिथे तीव्र उष्णता आणि दुष्काळ या दोन वेगळ्या आपत्ती राहिल्या नसून एकत्रितपणे मानवी जीवनावर घातक परिणाम करत आहेत. एका नवीन वैज्ञानिक अभ्यासानुसार…

विद्यार्थ्यांचा साकल्याने विचार कधी?

गेल्या काही वर्षांमध्ये या परीक्षेभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणाने एक भयंकर प्रश्न समोर आणला आहे. भारतातील विद्यार्थी हे शिक्षणव्यवस्थेचे केंद्र आहेत की व्यवस्थेच्या प्रयोगांचे बळी, असा प्रश्न पडतो. ‌‘नॅशनल टेस्टिंग…

चर्चगेट केंद्राचा विजेतेपदावर कब्जा

३४वी एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा मुंबई : ठाणे केंद्राचा झंझावात पहिल्या डावात १३८ धावांवर रोखल्यानंतर चर्चगेट केंद्राने ७ बाद ३७० धावांचा डोंगर उभा करत पहिल्या डावातील आघाडीच्या…

१ जून ते ३१ जुलैदरम्यान यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारणा अध्यादेश २०२१ च्या अनुषंगाने राज्याच्या सागरी क्षेत्रात यावर्षी १ जून ते ३१…

बाल गोपाळ-आयडियल व्यायामशाळेच्या उद्घाटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : बाल गोपाळ मित्र मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमाने काळेवाडी-काळाचौकी परिसरात व्यायामप्रेमी स्व. रामचंद्र कडवे स्मृती फोर स्टेशन मशीनसह सुसज्ज व्यायामशाळेचे शानदार उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते…

अवाडा ऑटर्स स्क्वॉश स्पर्धेत निरुपमाला अव्वल मानांकन

मुंबई, २४ मे: वांद्रे येथील ऑटर्स क्लबमध्ये सोमवारपासून खेळल्या अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेसाठी (२०२६) उत्तराखंडचा अंश त्रिपाठी आणि महाराष्ट्राची निरुपमा दुबे यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला मुख्य ड्रॉमध्ये…

एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धेला सुरुवात

मुंबई : बोरिवली पश्चिम येथे सुरु असलेल्या मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली पुरस्कृत ११ वी एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा पुरुष एकेरी गटाने सुरु…

डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंना रौप्यपदक

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रोईंग स्पर्धा पुणे : चंदीगड येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रोईंग स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय…

मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दणक्यात सुरुवात

वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबचा मीडिया टीमवर ४० धावांनी दमदार विजय मुंबई : दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट टर्फवर सुरू झालेल्या भव्य ‘महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’ने पहिल्याच दिवशी क्रिकेटप्रेमींना थरार, वेग आणि भन्नाट मनोरंजनाची मेजवानी दिली. महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुनील शिंदे व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी पार्क क्लबच्या कार्याध्यक्षा वरदा चुरी, मुंबई महिला क्रिकेटचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वेदक, वियोम फाऊंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर, महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल – स्टार सीसी, श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले आहे. इनडोअर क्रिकेटचा भन्नाट फॉरमॅट इनडोअर क्रिकेटमध्ये एका वेळी मैदानावर ८ खेळाडू खेळतात. प्रत्येक जोडीला २ षटके फलंदाजी करावी लागते, तर प्रत्येक खेळाडूला १ षटक गोलंदाजी करणे बंधनकारक असते. विशेष म्हणजे, फलंदाज बाद झाल्यास संघाच्या खात्यातून ५ धावा वजा होतात. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर सामना रंगतदार होताना दिसला. मीडिया टीमची उत्साही सुरुवात प्रथम फलंदाजी करताना मीडिया टिमच्या अंकुश धावरे (१५-५= १० धावा) व किरण महनवर (११-५= ६ धावा) यांनी १६ धावांची पायाभरणी केली त्यावेळी रोहन व ओमकारने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले. दुसऱ्या जोडीतील सिद्धेश कानसे (१२-५= ७ धावा) व निकुंज नाटेकर (७-१०= -३ धावा) यांना फक्त ४ धावांचीच भर घालता आली. यावेळी कुशने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले तर प्रसादाने निकुंजला एकदा बाद केले. त्यावेळी धावफलकावर २० धावा झाल्या होत्या. तिसऱ्या जोडीतील अतुल लोके  (१२-५= ७ धावा) व अन्वय सावंत (१०-५= ५ धावा) यांनी १२ धावांची भर घातली. यावेळी अजितने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले. तर शेवटच्या जोडीतील गणेश पुराणिक (६ धावा)  व कर्णधार रोहित नाईक (९-५=४ धावा) यांना आणखी १० धावा केल्याने संघाला ४२ धावांपर्यंत मजल मारता आली. यावेळी श्रेयसने रोहितला एकदा बाद केले. वियोम फाऊंडेशनकडून रोहन, ओमकार, कुश, प्रसाद, अजित आणि श्रेयस यांनी अचूक गोलंदाजी करत नियमित धक्के दिले. अनिकेत-प्रसाद-ओमकारची फटकेबाजी; वियोमचा विजय ४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वियोम फाऊंडेशनची सुरुवात डळमळीत झाली. पहिल्या जोडीने श्रेयस वैद्य (९-१०= -१ धावा) व खुश शहा (११-५= ६ धावा) अश्या ५ धावाच करता आल्या. याचे प्रमुख श्रेय गणेश व सिद्धेश च्या गोलंदाजीला दिले पाहिजे. गणेशने श्रेयसला एकदा तर सिद्धेशने दोन्ही फलंदाजांना १-१ वेळा बाद केले. दुसऱ्या जोडीतील रोहन गावडे (१५-५= १० धावा) व अजित सेठी (१० धावा) यांनी दमदार भागीदारी करत २० धावा केल्या. यातील रोहनला अन्वयने एकदा बाद केले तर निकुंजला कोणालाही बड करण्यात यश मिळाले नाही. तिसऱ्या जोडीतील अनिकेत माडीये (१८ धावा) व प्रसाद आंब्रे (१४ धावा) यांनी अंकुश व अतुलच्या गोलंदाजीवर तब्बल ३२ धावा कुटल्या व संघाला भक्कम केले. तर चौथ्या व शेवटच्या जोडीतील कर्णधार ओमकार पाटोळे (१८-५= १३ धावा) व सुभम गुरव (१२ धावा) यांनी २५ धावांची भागीदारी करत संघाला ८२ धावांपर्यंत नेले आणि ४० धावांनी शानदार विजय मिळवून दिला. 0000000000