Month: April 2026

महिला आरक्षणाच्या आडून देश फोडण्याचा भाजपाचा डाव

 भाजपाकडून संविधानाच्या गाभ्यावर थेट हल्ला – वर्षा गायकवाड.  (राजेंद्र साळसकर) मुंबई-हिला आरक्षणावरून भाजपा व सत्ताधारी पक्षातील काही घटक पक्षांनी जे आकांडतांडव सुरु केले आहे ते चुकीचे आहे. काँग्रेस पक्षाचा महिला आरक्षणाला…

लोककेंद्रित भूसंपादनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

२१६ एकर जमीन संमतीने संपादित मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या लोककेंद्रित व पारदर्शक सहभागात्मक भूसंपादन धोरणाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत रायगड जिल्ह्यातील नव्या ग्रोथ सेंटरसाठी तब्बल २१६ एकर…

मुंबईत खून, कोलकात्यात अटक

खेरवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई मुंबई: मुंबईच्या बांद्रा पूर्व येथील कल्पतरू स्पार्कल परिसरात झालेल्या अभिनवकुमार याच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना यश आले आहे. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी मुख्य आरोपीला ६० तासांच्या आत पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या १३ एप्रिल रोजी दुपारी २:२० च्या सुमारास अभिनवकुमार याला काही अज्ञात इसमांनी गाठून त्याच्या मानेवर चाकूने वार केले होते. या हल्ल्यात अभिनवचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, मृत अभिनव याचे प्रितीकुमारी नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, प्रितीकुमारीच्या घरच्यांनी तिचे लग्न निरजकुमार बिलास चौधरी (३१) याच्याशी ठरवले होते. प्रितीकुमारीने या लग्नास विरोध केल्याने निरजकुमारच्या मनात अभिनवबद्दल प्रचंड राग होता. याच रागातून निरजकुमारने आपल्या साथीदारांच्या मदतीने अभिनवची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी निरजकुमार हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता. तो सतत आपले लोकेशन बदलत होता. त्याने मुंबई ते कोलकाता प्रवासादरम्यान पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ३ ते ४ वेळा ट्रेन बदलल्या. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांचे एक पथक नागपूरला तर दुसरे कोलकात्याला रवाना झाले. अखेर आरोपी कोलकाता येथून विमानाने दिल्लीला पळण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी CISF च्या मदतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परमजीतसिंग दहिया, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ८) मनीष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त (खेरवाडी विभाग) संजय गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या तपासात पोलीस निरीक्षक सविता माळी, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल आटोळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप लोंढे, पोलीस उपनिरीक्षक चेतन पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय घोसाळकर, पोलीस हवालदार ठोंबरे, पोलीस हवालदार ठाकरे, पोलीस शिपाई गायकवाड, पोलीस शिपाई अमित शिंदे आणि पोलीस शिपाई प्रसाद पडवळकर या सर्वांचा सहभाग होता.

 अवैध वाळू आणि वाहतुकीविरुद्ध खुद्द जिल्हाधिकारी उतरल्या मैदानात…!

 एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत काल जिल्हाधिकारी स्वतः मैदानात उतरल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत बेकायदा वाळू वाहतूक करणारे 1५ डंपर पकडण्यात आले. हे ऑपरेशन काल एका रात्रीत पार पडले. काल रात्रीपासून सुरु झालेली ही धडक मोहीम पहाटेपर्यंत सुरु होती. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उप -जिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे   यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत ही व्यापक मोहीम राबवली. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार त्या त्या   तालुक्यांतील तहसिलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेत सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे तहसिलदार सूर्यकांत पाटील, कणकवलीचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे, मालवणचे तहसिलदार गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे तहसिलदार ओंकार ओतारी तसेच कुडाळचे तहसिलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता. कारवाई दरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला.  आचरा–कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने २ वाहने ताब्यात घेतली, तर देवलीमार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या ३ वाहनांवर वेंगुर्ल्याच्या  पथकाने कारवाई केली. कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने ३ वाहने पकडली, तोंडवली येथे सावंतवाडी पथकाने ३ वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ परिसरात कुडाळ पथकाने ४ वाहने ताब्यात घेतली. अशा प्रकारे विविध ठिकाणी समन्वयाने करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी रात्री झाराप परिसरात भेट देत कारवाईचा आढावा घेतला.रात्रभर चाललेल्या या मोहिमेत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अनेक अवैध वाळू व्यावसायिकांना आपल्या वाहनातील वाळू टाकून पळ काढावा लागला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या.  प्रशासनाच्या या निर्णायक पावलामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला कायम स्वरूपी आळा बसेल की ही कारवाई एक उपचार ठरते हे आता पहावे लागेल.

कथीत सामाजिक कार्यकर्ता योगेश मुंढराचा सेक्स आणि ब्लॅकमेलिंगचा धंदा मुंब्रा पोलिसांकडून उद्ध्वस्त!

अनिल ठाणेकर ठाणे-सामाजिक कार्यकर्ता योगेश मुंढराचा सेक्स आणि ब्लॅकमेलिंगचा धंदा मुंब्रा पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून अश्लील व्हिडिओच्या जोरावर तरुणीचा छळ करणारा नराधम फरार झाला आहे.मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस २०२३…

निवडणुका संपल्या, आता संघटन बांधणीसाठी युवा सेनेने रणांगणात उतरावे-एकनाथ शिंदे

अनिल ठाणेकर मुंबई- ‘निवडणुका संपल्या, आता संघटना उभारणीच्या रणांगणात उतरा’, असा आक्रमक इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेवर मोठी जबाबदारी टाकली. “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान राबवत संघटना भक्कम करा आणि तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा ठणकावून संदेश त्यांनी वरळीतील राज्यव्यापी मेळावा( महायुवोत्सवात) दिला. “आम्ही चालतो ती वाट, आम्ही रचतो तो इतिहास; भगवा आमच्या रक्तात आणि श्वासात आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिस्तीचा ठसा प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यात दिसलाच पाहिजे, असे ठणकावून सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, संजय राठोड, योगेश कदम, खासदार मिलिंद देवरा, धैर्यशील माने, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आदी  मान्यवर उपस्थित होते. सकाळी सहा वाजल्यापासून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांनी “माझ्यासमोर युवा सेनेचे वाघ आणि युवती सेनेच्या वाघिणी बसल्या आहेत,” असे म्हणत अभिमान व्यक्त केला. युवा सेना ही केवळ संघटना नसून एक विचार आहे, असे सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या युवा सेनेने मराठी माणसाच्या हक्क, न्याय आणि रोजगारासाठी काम करावे, असे ते म्हणाले. तरुणांमध्ये क्रांती घडवण्याची ताकद असते, असे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर आणि भगतसिंग यांच्या उदाहरणांचा उल्लेख केला. “जोपर्यंत लक्ष्य गाठत नाही तोपर्यंत थांबू नका; मेहनत आणि संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही,” असा संदेश त्यांनी दिला. आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास सांगितला. अनेक संकटे, वादळे आणि दुःखांचा सामना करूनही ते खचले नाहीत. २०२२ मधील उठावानंतर शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे उभी राहिली आणि जनतेनेच खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध केले, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “४० पैकी एक जरी आमदार निवडून आला नसता तर शेती करायला गेलो असतो; पण ६० उमेदवार हे  आमदार निवडून आले,” असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याची जबाबदारी युवा सेनेवर असल्याचे सांगत त्यांनी हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे आवाहन केले. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असल्यामुळे भारत हा तरुणांचा देश असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आर्थिक महासत्तेकडे नेत असून तरुणांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री असताना “पायाला भिंगरी लावून” संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, असे सांगत त्यांनी विविध योजना राबवल्याचा उल्लेख केला. “लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ” ही ओळख माझ्यासाठी मोठी असल्याचे सांगत त्यांनी संपत्तीपेक्षा माणसे कमावणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.कार्यकर्त्यांना “तहान-भूक विसरून काम करा” असा संदेश देत त्यांनी लोकांमध्ये जा, त्यांच्या समस्या समजून घ्या, शेतकऱ्यांच्या बांधावर जा आणि त्यांच्या अश्रूंना हात द्या, असे आवाहन केले. अतिवृष्टीच्या काळात दसरा मेळावा न करता शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. “जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना” हे ब्रीदवाक्य त्यांनी अधोरेखित केले.“मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या देखील कार्यकर्ताच राहणार आहे ,” असे सांगत त्यांनी शिवसेना ही कार्यकर्त्यांचीच संघटना असून येथे कोणी मालक नाही, सर्व समान आहेत, असे स्पष्ट केले. कोणतेही पद किंवा आडनाव महत्त्वाचे नसून कुवत महत्त्वाची आहे. काम करणाऱ्यालाच संधी मिळते, असे त्यांनी अधोरेखित केले.सामान्य कुटुंबातील डॉ. ज्योती वाघमारे राज्यसभेवर पोहोचल्याचे उदाहरण देत त्यांनी शिवसेनेतून कोणालाही मोठी संधी मिळू शकते, असे सांगितले. मंत्री योगेश कदम यांसह अनेक कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख त्यांनी केला.तरुणांना रोजगाराबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा, असे स्पष्ट आवाहन केले. प्रशिक्षण (ट्रेनिंग) देणे आवश्यक असून उद्योगशीलता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून ३००० बसस्टॉपवर स्टॉल उभारून कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट, नाटक, वेब सिरीजसारख्या क्षेत्रांतही मराठी तरुणांनी पुढे यावे, त्यांना संरक्षण देण्याचे काम युवा सेनेने करावे असे ते म्हणाले.महिलांच्या सक्षमीकरणावर बोलताना त्यांनी महिलांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. महिला आरक्षण विधेयकाबाबत विरोधकांवर टीका करत काश्मीर खोऱ्यातही शिवसेनेने आंदोलन केल्याचा उल्लेख त्यांनी केला. वंचित, दुर्बल घटक, शेतकरी, महिला यांचा आवाज बना, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.शिक्षण व्यवस्थेतील बदलांबाबत युवकांनी सूचना द्याव्यात, असे सांगत त्यांनी संघटनात्मक कामांवर भर दिला. मतदार यादी अचूक ठेवणे, बीएलए-१ आणि बीएलए-२ प्रक्रियेत सहभाग घेणे, सदस्य नोंदणी वाढवणे आणि “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेचारशे कोटी रुपयांहून अधिक मदत देऊन हजारो लोकांचे प्राण वाचवल्याचा उल्लेख त्यांनी केला. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणात दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम परदेशात पाठवण्यात आली तसेच इंडोनेशियाशी संबंध दृढ करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.“खऱ्या सोन्याची झळाळी लपत नाही, तसेच खऱ्या विचारांची चमक लपत नाही,” असे सांगत त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा संदेश दिला.शेवटी “मेहनत करने से हर काम सफल हो जाता है… संघर्ष के बिना जीत नहीं मिलती,” असा संदेश देत त्यांनी भाषणाची सांगता केली.कार्यक्रमात बीच प्लीज इंडिया संस्थेचे अध्यक्ष मल्हार कळंबे आणि हॉटेल शौर्य वाडाचे मालक विकास हांडे यांना ‘शिवगौरव’ पुरस्कार देण्यात आला. युवा सेनेच्या नवीन संकेतस्थळाचे, ‘युवा स्क्वॉड’ उपक्रमाचे आणि नव्या युवागीताचे उद्घाटन करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

संजय शिरसाट यांचा अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून निषेध

कल्याण : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर बांधलेली असल्याने तिथे ‘आत्मे’ दिसतात आणि त्यामुळे पालिका कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण असून काम करणे कठीण जात आहे, असा अत्यंत अविवेकी, अवैज्ञानिक,…

राज्यातील सोनार समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक-पंकज भोयर

मुंबई / रमेश औताडे राज्यांतील गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनने सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून काही मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. लवकरच एक बैठक घेऊन मागण्या पूर्ण करू. असे आश्वासन सहकार राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने मुंबईत आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले. सोनार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करून न्याय मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आमदार चित्राताई वाघ यांनी विधान भवनात सोनार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यावर मार्ग काढण्यासाठी खूप पाठपुरावा केला. सोने गहाण ठेवण्याच्या प्रकियेत हा घटक खूप महत्त्वाचा असतो, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले. प्रमुख मार्गदर्शक संजीव खडके, अध्यक्ष डॉ राजेंद्र दिंडोरकर, कार्यकारी सचिव सतीश पितळे, खजिनदार दीपक देवरुखकर, सल्लागार भरत ओसवाल, पद्मिनी ताई शंकरशेट आदी मान्यवर उपस्थित होते.

बोस्टनमध्ये शेफ विष्णू मनोहर यांचा डंका

बोस्टनमध्ये शेफ विष्णू मनोहर यांचा डंका राजेंद्र हुंजे बोस्टन: भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आयुर्वेद आणि सात्विक आहार होय. आपण जे खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर आणि आरोग्यावर…