Month: April 2026

भरदिवसा घराचे कुलूप तोडून लाखोंची चोरी

कल्याण: भरदिवसा घर फोडून चोरीची मोठी घटना डोंबिवली पूर्व परिसरात उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे…

 तबेला मैदान-श्रमिक जिमखाना “हिरक महोत्सवी सोहळा-२०२६

अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई :- वरळी कोळीवाडा येथील अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकप्रिय आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तबेला मैदान-श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्गचा “हिरक महोत्सवी सोहळा” रविवार, ११ एप्रिल, सायंकाळी ५ ते १० या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पूर्वीचे मुंबई व आताच्या मुंबई शहरच्या सर्व वरिष्ठ पुरुष व महिला गटाच्या संघनायक व संघनायिकेंचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरच्या वरिष्ठ गटातील प्रथम संघनायकांना देखील यानिमित्ताने गौरविण्यात येईल. मुंबईची कबड्डी वाढविण्यासाठी ज्या संघटनानी सातत्याने स्पर्धा आयोजन केले अशा आर्य सेवा मंडळ(६१वर्ष), शिवनेरी सेवा मंडळ(५३वर्ष), अमर क्रीडा मंडळ, दादर(४३वर्ष)यांच्या बरोबरीने मातीची क्रीडांगण बनविणारे, ते क्रीडांगण एका हाती सरळ रेषेत आखणारा अशोक गुरव आदींचा सत्कार होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडून बरोबर महाराष्ट्रात गेली तीन तपे वास्तवास असलेली मोनिका बाकरे(नाथ) हिला देखील निमंत्रित करण्यात आले आहे. कबड्डी सलग चार दशकापेक्षा अधिक काळ खेळणारा विलास जाधव, बंगालला “टायगर” ही उपाधी मिळालेला वसंत सूद, ट्रॉफी बनविणारे हरीश परब, बनियान बनविणारे भुईम्बर आदी मान्यवरांचा सन्मान होणार आहे. कबड्डीच्या कठीण काळात खेळाडूंना वैद्यकीय सुविधा मिळवून देणारे हाड वैद्य, जेष्ठ पत्रकार, जेष्ठ कबड्डी समीक्षक, सर्वत्र कबड्डी पहाणारे चाहते आदी बरोबर शालेय स्तरापासुन खेळाडूंना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आदी मान्यवारांना पाचारण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारी हिंदमाता सेवा मंडळ, मुंबईत प्रथम जागतिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारी साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब, कबड्डीत रोख रकमेची व मोठी पारितोषिके देणाऱ्या संघटनाचा देखील या सोहळ्यात सन्मान होणार आहे. या सोहळ्याला क्रीडा प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जेष्ठ्यांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण निर्माण करावेत. असे आव्हान एका परिपत्रकाद्वारे मंडळाचे अध्यक्ष राणा प्रताप तिवारी यांनी सर्व प्रसार माध्यमा द्वारे केले आहे.

 कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी रिक्षा स्टँडवर चालकांकडून दादागिरी

अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आश्वासन कल्याण :  कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी रिक्षा स्टँडवर रिक्षाचालकांची मनमानी आणि दादागिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्टँडच्या आजूबाजूला येणारे दुचाकी चालक आणि खासगी वाहनातून येणाऱ्या प्रवाशासबोत स्टँन्डमधील रिक्क्षा चालक गैरवर्तन करतात, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक रात्रीच्या वेळी स्काय वाँक वरून येणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबातील सदस्य त्यांना घेण्यासाठी रिक्क्षा स्टँन्ड परिसरात आपल्या वाहनासह थांबतात. रिक्षाचालक  तेथे वाहने उभी करण्यास नकार देतात. रिक्षा स्टँडला आपली मालमत्ता समजून रिक्षाचालक सामान्य नागरिकांना तेथे वाहनासह थांबण्यास मज्जाव करत असल्याचा आरोप केला जात आहे. शनिवारी रात्री  येथील एका स्थानिक नागरिकाशी रिक्क्षा चालकांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. शरद शिंदे नावाचा व्यक्ती आपल्या मुलीला घेण्यासाठी स्कायवॉकजवळ पोहोचला असता, काही रिक्षाचालकांनी त्यांना तेथे थांबवण्यापासून रोखले आणि वाद सुरू झाला, शिंदे यांनी स्पष्टीकरण देऊनही रिक्षा चालक संतापला आणि त्याने दादागिरी केली असल्याचा प्रकार समोर आला. स्टँडवर प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जाते आणि चौथ्या राईडच्या नावाखाली लोकांना बराच वेळ ताटकळत बसवले जाते असा आरोप स्थानिकांनी केला आहे. एवढेच नाही तर वाहनचालक गणवेशाचे नियमही पाळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शरद शिंदे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे, वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी वाहतूक विभाग आणि आरटीओकडे केली आहे.

दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते लोकार्पण!

मुरबा गणपती भक्तांसाठी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे भक्तीचा आणि सुरक्षेचा संगम साधला : महेंद्रशेठ घरत पनवेल : मोरावे येथील मुरबा गणपती मंदिर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय होता. मात्र या होड्या छोट्या आहेत. गणेश दर्शन घेण्यासाठी प्रवास करताना अबाल-वृद्धांना, माय-लेकींना त्या धोकादायक असल्याचे महेंद्रशेठ घरत यांच्या लक्षात आले होते. मध्यंतरी एक होडी जरा कलंडली होती, साहजिकच भक्तांमध्ये भीती निर्माण झाली होती. महेंद्रशेठ घरत यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुरबा गणपतीचे दर्शन घेताना गणेशभक्तांना सुरक्षित प्रवासासाठी लाईफ जॅकेट आणि पॅसेंजर बोट द्यायची, असे त्यांनी सौभाग्यवती शुभांगीताईंसोबत मुरबा गणपतीचे दर्शन घेताना बोलून दाखवले होते. त्यामुळे गेल्या वर्षी २९ मे २०२५ रोजी पॅसेंजर बोट आणि लाईफ जॅकेट गणेशभक्तांसाठी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताईंनी आपल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दान केले होते. त्यानंतर अनेकदा त्यांनी त्या पॅसेंजर बोटीने प्रवास केला. तेव्हा भक्तांची संख्या वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी (ता.५) वर्षपूर्ती होण्यापूर्वीच संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत दुसरी पॅसेंजर बोट दिली. तिचे लोकार्पण महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोरावे गावातील मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी फक्त गणेशभक्त नाही तर सेवक आहे. त्यामुळेच भक्तांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेऊन दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला. आज तिचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. मी भक्ती आणि सुरक्षेचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे.” महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे. ते दर संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जातातच. तसेच बऱ्याच वेळा ते थेट मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतात. पनवेल तालुक्यातील, उलवे नोडमधील समुद्रकिनारी वसलेले मोरावे गाव. येथील मासेमारी करणाऱ्या तीन-चार तरुणांनी स्वकष्टाने चक्क समुद्रात मुरबा गणपतीचे मंदिर बांधले आहे. राज्य सरकार शिवस्मारक समुद्रात कधी बांधेल माहिती नाही, पण मोरावे गावच्या तरुणांनी भर समुद्रात गणपतीचे मंदिर बांधून मोठेच धाडस केले आहे. महेंद्रशेठ घरत हे दूरदृष्टीचे नेते आहेत. मोरावे गावातील मासेमारी करणारे तरुण स्वयंपूर्ण व्हावेत, त्यांची रोजीरोटी कायम चालली पाहिजे, ते आर्थिकदृष्ट्याही सक्षम व्हावेत, यासाठी त्यांनी आगामी काळात पर्यटनाद्वारे तरुणांना रोजगार कसा मिळेल, याचे व्हिजन डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून महेंद्रशेठ घरत यांनी रविवारी दुसरी पॅसेंजर बोट दिली. गणेशाचे निस्सीम भक्त असलेले महेंद्रशेठ घरत दर संकष्टी चतुर्थीला मुरबा गणपतीच्या दर्शनाला जातात. तेव्हा ते गणपतीचे मनोभावे दर्शन घेतात आणि फ्लेमिंगोंचे थवे पाहण्याचा विलक्षण आनंदही घेतात. राज्यातील कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला हे जमेल असे नाही, मात्र महेंद्रशेठ घरत यांनाच ते जमते. कारण खरा आनंद कशात आहे, याची मोजमापे त्यांनाच माहिती आहेत. महेंद्रशेठ घरत हे नुसते बोलत नाहीत तर करून दाखवतात. त्यांनी दोन पॅसेंजर बोट मुरबा गणपती मंदिराला दान करून आम्हाला उपकृत केले आहे. आम्ही त्यांचे कायमच ऋणी राहू. त्यामुळे आम्ही मुरबा गणपतीचरणी प्रार्थना करतोय, की गणराया, महेंद्रशेठ घरत यांना समाजकारण आणि सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी अखंड ऊर्जा प्राप्त होऊ दे, अशी भावना मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. यावेळी कॉंग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, अॅड. अविनाश ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, श्रीकांत घरत, रमेश घरत, तसेच एम. जी. ग्रुपचे सदस्य आणि हजारो गणेशभक्त उपस्थित होते.

१७ एप्रिलपासुन बोरिवली येथे रंगणार पाचवी अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धा 

मुंबई- मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत  स्कूल ऑफ एनवायरन्मेंट ऍण्ड आर्किटेक्चर( एक्सर…

 केआरपी XI चा समर व्हेकेशन क्रिकेट शिल्डवर झेंडा

 गौड युनियनवर ६ विकेटने मात; मनीष राव ‘मॅन ऑफ द मॅच’ मुंबई : इस्प्लनेड लिबरल्स क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित समर व्हेकेशन क्रिकेट शिल्ड टूर्नामेंटमध्ये केआरपी XI क्रिकेट क्लबने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.…

 आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा

जैन इरिगेशन ब संघाची मुंबई पोलीस ‘अ’ संघावर मात मुंबई :  राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर कंपनी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत जैन इरिगेशन ब संघाने ग्रेटर मुंबई पोलीस एससी अ संघाचा १५ धावांनी पराभव केला. मुंबई पोलीस एससी अ संघाने नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन ब संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी २० षटकांत ८ बाद १४३ धावा केल्या. त्यात विलोहित देसाईने सर्वाधिक (५४ धावा, ४७ चेंडू, ४ चौकार, १ षटकार) योगदान दिले. त्याला अनिरुद्ध नायरची (३९ धावा, ३१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) चांगली साथ लाभली. मुंबई पोलीस संघाकडून योगेश पाटीलने (४/२९) प्रभावी गोलंदाजी केली. ग्रेटर मुंबई पोलीस संघाला प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव १८.४ षटकांत १२८ धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून योगेश पाटील (३५ धावा, २२ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) आणि हर्ष साळुंखेने (२५ धावा, ९ चेंडू, ३ चौकार, २ षटकार) छान फटकेबाजी केली तरी सोहम सबनीस (२.४-०-१३-३) आणि हर्षल वाघमारेच्या (४–०-२४-२) अचूक माऱ्यासमोर अन्य फलंदाजांचा टिकाव लागला नाही. योगेश पाटील याला सामनावीर म्हणून प्रमुख पाहुणे महेंद्र अग्रवाल (ईडी-वित्त) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक; जैन इरिगेशन ब संघ – २० षटकांत ८ बाद १४३(विलोहित देसाई ५४, अनिरुद्ध नायर ३९; योगेश पाटील ४/२९) वि. ग्रेटर मुंबई पोलीस एससी अ संघ – १८.४ षटकांत सर्वबाद १२८ (योगेश पाटील ३५,  हर्ष साळुंखे २५; सोहम सबनीस २.४-०-१३-३, हर्षल वाघमारे (४–०-२४-२). निकाल: जैन इरिगेशन ब संघ १५ धावांनी विजयी. सामनावीर : योगेश पाटील. 00000000

Heading – कानपिल्लेवारच्या नाबाद शतकामुळे मारवाडी सीसीचा मोठा विजय

७६वी सालार जंग निमंत्रित क्रिकेट स्पर्धा २०२६ मुंबई: इस्लाम जिमखाना आयोजित ७६व्या सालार जंग निमंत्रण क्रिकेट स्पर्धेच्या (२०२६) पहिल्या फेरीच्या सामन्यात सोमवारी सलामीवीर प्रग्नेश कानपिल्लेवारच्या (नाबाद १०० धावा, ३६ चेंडू…

केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड

केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड महिला बालकल्याण समितीसाठी सारिका जाधव, शिक्षण मंडळासाठी भाजपाचे अभिजित थरवळ यांची निवड कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव  आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. या उमेदवारांनी 2 एप्रिलला आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केली होती. केडीएमसी मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आज या तिन्ही सभापती पदांसाठी निवडणूक अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशांत – सोनाली विजयी

रोटरी क्लब कॅरम स्पर्धा रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या ६ व्या राज्य मानांकन कॅरम…