Month: July 2026

खाद्यपदार्थांच्या आड लपवून मद्याची आलिशान वाहनातून तस्करी

 खाद्यपदार्थांच्या आड लपवून मद्याची आलिशान वाहनातून तस्करीSlug – उत्पादन शुल्क विभागाची कारवाई  ३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट मद्याची वाहतूक करणारी वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे ३४ लाख ८४ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आलिशान वाहनांतून खाद्यपदार्थांच्या आडून अवैध मद्याची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज पालघर जिल्ह्यातील जव्हार खानवेल रोड, विशाल ढाब्याच्या समोर, जव्हार तसेच जव्हार-खंबाळे रोडवर, रातुना फाटया जवळ, रातुना वडवली जव्हार…

 ‘खजाना – अ फेस्टिव्हल ऑफ गझल्स’चा रौप्यमहोत्सवी सोहळा २४-२५ जुलैदरम्यान मुंबईत

 महोत्सवातून झालेले निधीसंकलन ‘सीपीएए’ आणि ‘पीएटीयुटी’च्या समाज कार्यासाठी मुंबई : दिवंगत पद्मभूषण पंकज उधास यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘खजाना – अ फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. २४ आणि २५…

 दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे माझे कर्तव्य : महेंद्रशेठ घरत 

 शेलघरच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जतच्या विद्यार्थ्यांना दफ्तर-छत्रीचे वाटप उलवे : ‘दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची वानवा असते. त्यामुळे अशा शाळेत जाणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे दफ्तर, छत्री यांसारख्या प्राथमिक सुविधा देण्याचा गेली १५ वर्षे मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. कर्जत तालुक्याशी आपले वेगळे नाते आहे’, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कर्जत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. पनवेल तालुक्यातील शेलघरच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जत येथील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दफ्तर आणि छत्रीचे मंगळवारी वाटप करण्यात आले. कर्जत येथील रायगड जिल्हा परिषदेच्या खांडस, तुंगी, आंबेरपाडा, काठेवाडी, तेथील अंगणवाडी आदी सहा शाळांतील ३५० विद्यार्थ्यांना यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, शुभांगीताई घरत यांच्या वतीने हे शैक्षणिक दान करण्यात आले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांचे कुटुंबीय हिरीरीने सहभागी झाले होते. यावेळी कर्जतच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनीही भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, “महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे दानशूर समाजात आहेत, याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहेत.” यावेळी राम म्हात्रे, वासंती म्हात्रे, गुलाबशेठ घरत, ललिताताई घरत, श्रीकांत घरत, मिनाक्षी घरत, शकुंतलाताई ठाकूर, बानुबाई भगत, यशवंत ढोंगे आणि एम. जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते. 000000000 00000000 000000000

संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार

नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) या रिक्त पदावर सरळ सेवेने नवनियुक्त झालेले संजू उत्तम चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. नवी…

– स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार

 शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश मुंबई : राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती आणि आज तात्काळ सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलैला या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून अजितदादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला आहे. परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती २२ जुलैला राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे.याशिवाय सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जयंती साजरी होणार आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वर्गीय अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांना जनमानसात हक्काचे ‘दादा’ म्हणून स्थान मिळाले. शासनाचा हा निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीला दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे.यामुळे आता दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर दादांच्या लोकसेवेचा वारसा अधिकृतपणे आठवला जाणार आहे.

महावितरणतर्फे विरारमध्ये स्मार्ट मीटर जनजागृती मेळाव्याचे आयोजन

विरार : महावितरणच्या विरार विभागामार्फत नालासोपारा (पूर्व) व आचोळे शहर परिसरातील वीज ग्राहकांसाठी १६ जुलैपासून सलग ३ दिवस स्मार्ट मीटर जनजागृती मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे. हा मेळावा महावितरणच्या नालासोपारा…

कंत्राटी पद्धत रद्द करून कामगारांना कायम करा

 सीटूची राज्य सरकारकडे मागणी अनिल ठाणेकर ठाणे-राज्यातील खाजगी उद्योग, सरकारी व निमसरकारी विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू असलेली कंत्राटी पद्धत तातडीने रद्द करून त्या जागी कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना…

– मुसळधार पावसातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पांडुरंग भुवड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

ठाणे : मुसळधार पावसादरम्यान आरटीओ परिसरात झाड कोसळून धर्मवीर नगर येथील रहिवासी स्व. पांडुरंग भुवड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले-जाधव…

वालधुनी उड्डाणपुलावर पुन्हा मोठी दुर्घटना टळली;

 आठवडाभरात दुसऱ्यांदा हाइट बॅरिकेट्स तुटले,  वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा संताप कल्याण : कल्याणमधील वालधुनी उड्डाणपुलावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा पुलावरील हाइट बॅरिकेट्स भरधाव वाहनाच्या धडकेत तुटून पडल्याची घटना बुधवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्या वेळी वाहतूक कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव टेम्पोने पुलावरील हाइट बॅरिकेट्सना जोरदार धडक दिली. धडकेमुळे बॅरिकेट्स तुटून थेट रस्त्यावर कोसळले. यापूर्वीही १० जुलै रोजी याच ठिकाणी अशीच घटना घडली होती. मात्र, त्या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने पुन्हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वालधुनी उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही मोठी वाहने सर्रास येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक जागरूक नागरिक रोहित डोळस यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, “अवजड वाहनांना बंदी असतानाही ती पुलावर येतातच कशी? वाहतूक पोलिसांचा वचक का नाही? एकाच आठवड्यात दोनदा बॅरिकेट्स तुटणे हा प्रशासकीय निष्काळजीपणाचा कळस आहे. प्रशासन नेमके कोणाच्या बळीची वाट पाहत आहे?” यावेळी त्यांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत. पुलावर केवळ नावापुरते बॅरिकेट्स न बसवता मजबूत हाइट-रिस्ट्रिक्शन स्ट्रक्चर उभारण्यात यावे, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांची नियमित गस्त ठेवावी आणि अवजड वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वालधुनी उड्डाणपुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.