अनिल ठाणेकर
ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात २६ मित्रपक्षांच्या आघाडीचा खिचडी म्हणून उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी, ही खिचडी निष्ठावंतांची असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या भाषणामध्ये इंडिया अलायन्सचा उल्लेख २६ मित्र पक्षांच्या आघाडीचा खिचडी म्हणून केला होता. आमची ही खिचडी निष्ठावंतांची आहे.हे लक्षात ठेवा. ही आमची खिचडी एनडीए बरोबर असलेल्या महायुतीतील तीन पक्षांच्या बिर्याणीपेक्षा कितीतरी पटीने स्वच्छ, चवदार व पारदर्शक आहे. भारतातील नागरिकांना बिर्याणीपेक्षा खिचडी अधिक आवडते कारण ती पचविणे सोपे असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासारख्या अनुभवी वक्त्याने कोणतेही वक्तव्य करताना थोडे तरी भान बाळगावे, असा सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी दिला आहे.
