Category: होम

मुंबई लाइट फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून फ्लोटिंग कॅनव्हास कंपनीच्या इमर्सिव्ह प्रोजेक्शन मॅपिंगसह कुलाब्यातील मुंबईचे ऐतिहासिक अफगाण चर्च उजळले. (छाया: शत्रुघ्न सिंग)

 गणेशोत्सवासाठी अधिकृत वीज जोडणी घ्या

महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन मुंबई: यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी वीज सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच उत्सव कालावधीत केवळ अधिकृत वीज जोडणीच (वीज कनेक्शन) घ्यावी, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात कोणतीही अप्रिय घटना वा दुर्घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्ते तसेच गल्लीबोळांतील विजेच्या तारांची (वीजवाहिन्या) उंची लक्षात घेऊनच गणेशमूर्तीची उंची व रथाची रचना निश्चित करावी. त्याचप्रमाणे मंडप आणि रोषणाईसाठी वीज संचाची मांडणी करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जावे. अपघात टाळण्यासाठी केवळ प्रमाणित आणि कुशल विजेच्या ठेकेदारांकडूनच हे काम करून घ्यावे. गणेश मंडळांसाठी वीज जोडणी घेण्याची प्रक्रिया महावितरणने अत्यंत सोपी केली आहे. मंडळांना महावितरणच्या अधिकृत मोबाईल अ‍ॅप किंवा ऑनलाईन संकेतस्थळावरून अर्ज करून त्वरित तात्पुरती वीज जोडणी मिळवता येणार आहे. सार्वजनिक सुरक्षेचा विचार करता कोणत्याही मंडळाने अनधिकृतपणे विजेचा वापर करू नये, तसेच विजेच्या तारा किंवा खांबाजवळ मंडप उभारताना पुरेशी काळजी घ्यावी, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

केडीएमसी महापौरांनी केली आधारवाडीतील आदिवासी वस्तीची पाहणी

पालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश कल्याण:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकाऱ्यांसह कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरातील आदिवासी वस्तीची पाहणी केली. पाहणीदरम्यान, रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळवण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. पाहणीदरम्यान, संकुलात वीज, पाणी, रस्ते आणि स्वच्छता यासंबंधी गंभीर समस्या उघडकीस आल्या. संकुलात सर्वत्र पसरलेली घाण आणि अव्यवस्था पाहून महापौर हर्षाली चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले आणि त्यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. महापौरांनी सांगितले की, रहिवाशांना केवळ आधारवाडीतच नव्हे, तर नगरपालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत. त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील पाहणी दौऱ्यापूर्वी संकुलातील सर्व प्रमुख समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या भेटीमुळे आदिवासी वस्तीला भेडसावणाऱ्या दीर्घकाळच्या मूलभूत सुविधांच्या समस्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

कल्याणमध्ये पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात

कल्याण : आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ, कल्याण यांच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी पारंपरिक उत्सव आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी गणेश घाट या मार्गावर…

जन्मभूमी कुठलीही असो, कर्मभूमी महाराष्ट्र आहे; मराठी भाषा जोडणारी–एकनाथ शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य कोणतेही राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या…

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; ३० हजार स्पर्धकांची नोंदणी

अनिल ठाणेकर ठाणे : येत्या ३० ऑगस्टला होणारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक स्पर्धकांनी…

खुटल (बा) मध्ये घरकुल घोटाळा!

पक्क्या घरवाल्यांना लाभ, बेघर गरिबांना डावलले राजीव चंदने मुरबाड :  तालुक्यातील खुटल (बा) ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेसाठी एकूण ३२५ लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत तयार करण्यात आली आहे. मात्र या यादीवर गावातील ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, ज्यांच्याकडे आधीच पक्के स्लॅबची घरे आहेत अशा सुस्थितीतील व्यक्तींची नावे घरकुलाच्या यादीत घेण्यात आली आहेत. तर ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, जे पत्र्याच्या झोपडीत राहतात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे अशा गरीब कुटुंबांची नावेच सर्वेक्षण यादीत घेतली गेली नाहीत. घरकुलासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण हे सरपंच, उपसरपंच, सदस्य, संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवक यांनी आपल्या नातेवाईकांना आणि मर्जीतील लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या बोगस कारभाराविरोधात ग्रामस्थांनी १८ ऑगस्टला झालेल्या बोगस ग्रामसभेबाबत भूमिपुत्र एल्गार संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव यांची भेट घेऊन झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर भूमिपुत्र एल्गार संघटनेने तात्काळ ग्रामपंचायतीच्या विरोधात पंचायत समिती मुरबाड येथे धरणे आंदोलन करण्याचे आयोजन केले. या आंदोलनात संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली की, गटविकास अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन फेर स्थळ पाहणी करून यादीची तपासणी करावी. यादीतील प्रत्येक लाभार्थ्याच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून पक्के घर असलेल्या अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळावीत आणि घर नसलेल्या खऱ्या गरजू कुटुंबांची नव्याने पाहणी करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा. या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे आणि किसळ ग्रामपंचायत सरपंच कॉ. कविता वरे यांनी जाहीर पाठिंबा दिला. या वेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव, तालुका अध्यक्ष जगदीश शिद, उपाध्यक्ष बुधाजी खंडागळे, तालुका प्रवक्ता बाळा दळवी, उपाध्यक्ष हरिश्चंद्र पादीर, कैलास खंडागळे, मारुती वाघ, सुरेश मोढवे, तानाजी भला, कांताराम पोकळा, पंढरीनाथ दळवी इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००००००

 महसूल लोक अदालत अभियान १ सप्टेंबरपासून

अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांची माहिती रायगड-लिबाग : अशोक गायकवाड महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने व जलदगतीने निकाली काढण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ मार्च या कालावधीत महात्मा जोतिराव फुले…

अचूक विम्यासाठी आता एआय चा वापर

रमेश औताडे मुंबई: इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सने व्यवसायातील विविध प्रक्रियांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ए आय वापर वाढविण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्सची निवड केली आहे. या तंत्रज्ञानामुळे विक्री प्रक्रिया अधिक वेगवान, कामकाज सुलभ आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. एजंटफोर्सच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद, विमा प्रस्तावांचे मूल्यांकन, ग्राहक सेवा आणि क्लेम प्रक्रियेत एआयचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या गरजांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. इंडियाफर्स्ट लाइफचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रुशभ गांधी यांनी सांगितले की, डिजिटल परिवर्तनामुळे विक्री प्रक्रियेत सुधारणा झाली असून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला झाला आहे. सेल्सफोर्स साऊथ एशियाचे अध्यक्ष व सीईओ अंशुमती भट्टाचार्य यांनीही एआयच्या मदतीने विमा व्यवसाय अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

दिव्यांग शाळा अनुदानासाठी डॉ. जितेंद्र ओव्हाळ आक्रमक

रमेश औताडे मुंबई : दिव्यांग शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर करून पात्र शाळांकडून प्रस्ताव स्वीकारले. मात्र आता अनुदानास पात्र असलेल्या शाळांची संपूर्ण यादी जाहीर न करता एक-एक प्रस्ताव मंत्र्यांच्या सहीसाठी पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली असून, वेळप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दिला आहे. कोणत्या नियमाच्या आधारे प्रस्ताव निवडक पद्धतीने मंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जात आहेत, याचा खुलासा दिव्यांग  कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला नाही. अनुदान हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि संस्थांच्या हक्काचा विषय आहे तो कोणाच्या कृपेवर किंवा निवडक प्रस्तावांच्या प्रक्रियेवर अवलंबून राहता कामा नये. दिव्यांग मंत्रालयाने तातडीने अनुदानास पात्र सर्व शाळांची यादी, पात्रतेचे निकष, प्रस्तावांची सद्यस्थिती आणि मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करावी. अन्यथा आंदोलन करणार असल्याचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले. 0000000