मुसळधार पावसात महापालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा फिल्डवर
नवी मुंबई : नवी मुंबईत १ जुलैपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून ५ जुलैपासून अवघ्या पाच दिवसांत ७५२.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ताशी ६० ते ७०…
नवी मुंबई : नवी मुंबईत १ जुलैपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून ५ जुलैपासून अवघ्या पाच दिवसांत ७५२.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ताशी ६० ते ७०…
मारेकरी अटकेत सुनिल इंगळे उल्हासनगर: मागील भांडणाचे व एकमेकांच्या विरोधात केलेल्या केसच्या वादातून मनात राग धरून तरुणाला भर रस्त्यात अडवून त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी तातडीने त्या मारेकर्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री अकराच्या सुमारास कुर्ला कॅम्प रोड, कालीमाता मंदिरच्या मागे भर रस्त्यात व सुरू असलेल्या पावसात एका तरुणाने दुसऱ्या तरुणांवर धारदार चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करून त्या ठिकाणाहून पलायन केले. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटना घडलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी रक्ताच्या ठरवण्यात एक तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याच्या जवळच एक धारदार चाकू रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी सर्वप्रथम त्या जखमी तरुणाला जवळच असलेल्या बालाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्याची प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्याला उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या मयत झालेल्या तरुणाचे नाव सतनामसिंग लबाना असल्याचे व तो उल्हासनगरातील कॅम्प नंबर – ५ परिसरातील सेक्शन ३९ वीर तानाजी नगर या परिसरातला राहणारा असल्याचे समजले. सतनामसिंग याला जीव ठार मारून पळून गेलेल्या मारेकराचे नाव गुरप्रीतसिंग उर्फ अनिस करतारसिंग लबाना (१९ ) असून तो देखील वीर तानाजी नगर परिसरातली राहणार असल्याचे पोलिसांना समजले. त्याच दरम्यान हिल्लाईन पोलिसांनी अनिस लबाना याचा शोध घेऊन त्याला त्वरित ताब्यात घेऊन विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला धारदार चाकू व इतर वस्तू पंचनामा करून ताब्यात घेतल्या. याशिवाय या थरारक हत्याचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईल मध्ये चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे घटना घडलेल्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतनामसिंग लबाना याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने त्याचा भाऊ कुलदीप सिंग लभाना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुरुप्रीतसिंग उर्फ अनिस लबाना याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटने संदर्भात विठ्ठलवाडी पोलिसांनी केलेल्या चौकशीत अधिक माहिती मिळाली मयत सतनामसिंग व यातील आरोपी अनिस यांचे एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विरोधात पूर्वीपासून वाद आहेत. आणि त्याच्या नातेवाईकांनी मयत सतनामसिंग याच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली होती. त्यात त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो त्या केसमधून जामिनावर बाहेर आलेला होता. तेव्हापासून आरोपी व मयत यांच्या कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. अनिस लबाना याने मयत सतनामसिंग याच्यासोबत असलेल्या मागील भांडणाचे व एकमेकांचे विरोधात केलेल्या केसच्या वादाचे कारणावरून मनात राग धरून सतनामसिंग लबाना यांच्यावर धारदार चाकूने त्याच्या मानेवर छातीवर पोटावर व शरीरावर सापासाप वार करून त्याला जीवे ठार मारले आहे अशी माहिती तपासात पोलिसांना मिळाली आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे करीत आहेत.
दिनकर पाटील, शंकुतला खटावकर यांना जीवन गौरव मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार मुंबई : मैदानावर कबड्डीपटूंवर अन्याय होताच आपल्या लेखणीला धार देणारे, खेळाडूंचा आवाज दाबताच व्यवस्थेला जाब विचारणारे आणि कबड्डीपटूंच्या हक्कासाठी प्रसंगी व्यवस्थेशी दोन हात करणारे आणि कबड्डीतील अन्यायाविरुद्धचा संताप आपल्या बातम्यांमधून सातत्याने मांडणारे दै. ‘सामना’चे क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांच्या लढाऊ पत्रकारितेचा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने गौरव केला आहे. संघटनेने आपल्या २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत त्यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार जाहीर केला असून त्याचबरोबर आपल्या विविध पुरस्कारांचीही घोषणा केली. तसेच कबड्डीसाठी आयुष्य झिजवणारे दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना प्रतिष्ठेच्या कबड्डी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ज्येष्ठ खेळाडू, पंच, प्रशिक्षक, कार्यकर्ते, पत्रकार आणि गुणवंत कबड्डीपटूंवर यंदा पुरस्कारांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला आहे. येत्या १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती राज्य कबड्डी संघटनेने पत्रकाद्वारे दिली आहे. कबड्डी दिन पुरस्कार विजेते कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार : दिनकर पाटील (सांगली), शकुंतला खटावकर (पुणे). ज्येष्ठ पत्रकार : मंगेश वरवडेकर (दै. सामना), अलताफ कडकाले (दै. सकाळ) ज्येष्ठ कार्यकर्ते पुरस्कार : आत्माराम घेगडे, बंडूकांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंपी, वल्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल, विलास सावंत. ज्येष्ठ पंच पुरस्कार : प्रकाश मोरे, रविंद्र लाड, अरुण पवार, अनिल शेजवळ, सूर्यकांत मुटके, वाल्मिक बागुल,मधुकर साळुंखे, हिरामण भोईर, बाळकृष्ण कडूस, रामदास गोळे. ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार : सुरेश मोरे, शशिकांत कोरगांवकर, रवींद्र लवेकर,तुळसीदास रोकडे,ब्रह्मनाथ मेंगडे, सुदाम जोगदंड, अलका कारखानीस, मदन गायकवाड, रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार- दीपक कांदळगांवकर (उपनगर), डॉ. शिवशंकर कापसे (हिंगोली), अरुणा गावडे (कोल्हापूर) कृतज्ञता पुरस्कार- निवृत्ती देसाई, सोपान काकडे, सदानंद जोशी, अभिजित राणे. फिदा कुरेशी स्मरणार्थ ज्येष्ठ प्रशिक्षक- नारायण गायकवाड (ठाणे),सुहास कदम (मुंबई उपनगर) किशोर व कुमार गट शिष्यवृत्ती विजेते किशोर गट : सुरज राठोड (रत्नागिरी), प्रशांत अकीगे (कोल्हापूर), ध्रुव डोंगरे (पालघर). किशोरी गट : आरती खांडेकर (पुणे), सेजल काकडे (नाशिक), ज्ञानेश्वरी ढवण (अहिल्यानगर), कुमार गट : शुभम बिटके (पुणे), जीतसिंग सैनी (ठाणे), अतुल जाधव (परभणी). कुमारी गट : संजना भोईर (पालघर), वैभवी जाधव (पुणे), सानिका पाटील(सांगली).…
कामगारमंत्री आकाश फुंडकर यांचे कृती समितीला आश्वासन मुंबई: तज्ज्ञ समिती आणि कामगार संघटना यांच्यातील या विस्तृत चर्चेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांचा आणि सूचनांचा अंतर्भाव करून एक सर्वसमावेशक एकत्रित संयुक्त अहवाल तयार करण्यात येईल. हा अंतिम अहवाल पुढील मंजुरी आणि कार्यवाहीसाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात येईल, असे सुस्पष्ट आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळाने विधानभवनात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली त्यावेळी भारत सरकारच्या चार नवीन श्रम सहितांच्या अनुषंगाने राज्य सरकारने तयार केलेल्या, महाराष्ट्र वेतन संहिता नियम, महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, महाराष्ट्र व्यवसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता नियम आणि महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहीता नियम या चारही नियमावलीवर कामगार नेते आणि सचिवांची तज्ज्ञ कमिटी नेमून सविस्तर चर्चा करण्यात येऊन, संयुक्त अहवाल केंद्रीय श्रम मंत्रालयाला पाठवावा, अशी मागणी करण्यात आली. हा निर्णय घेण्यापूर्वी वरील नियमांची अंमलबजावणी राज्यात न करण्याचे आश्वासन विधान भवनमध्ये बोलावलेल्या कामगार नेत्यांच्या बैठकीत राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. या संयुक्त बैठकीचा अहवाल केंद्रीय कामगार नेत्यांना पाठविण्याचे निर्देशही सचिवांना दिले आहेत. केंद्र सरकारने चार श्रम संहिता देशात लागू केल्या आहेत. त्या संबंधातील नियमांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात करू नये, या मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने ३ जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची विधान भवननात भेट घेतली होती. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार कामगार नेत्यांच्या उपस्थितीत कामगार नेते आणि संबंधित सचिवांची विधान भवनात बैठक पार पडली. या बैठकीला कामगार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव दीपक पोकळे, स्वप्निल कापडणीस तसेच कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे डॉ. कैलास कदम, गोविंदराव मोहिते, विवेक मोंटेरो, संजय वढावकर, निवृत्ती धुमाळ, सुकुमार दामले, संतोष चाळके, उदय भट, बजरंग चव्हाण मुकेश तिगोटे आदी मान्यवर कामगार नेते उपस्थित होते. बैठकीदरम्यान कामगार मंत्री म्हणाले, नवीन श्रम संहितांच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. यासाठीच शासनाने मसुदा नियमावली जाहीर करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता राहावी म्हणून कामगार विभागाच्या वतीने चार स्वतंत्र तज्ज्ञ समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या तज्ज्ञ समित्यांनी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीसोबत समन्वय साधून सविस्तर चर्चा करावी. ही चर्चा केवळ नाममात्र न ठरता प्रत्येक मुद्द्यावर सखोल व्हावी, यासाठी कामगार विभागाने तातडीने बैठकांचे अधिकृत वेळापत्रक जारी करावे, अशा सूचना मंत्र्यांनी विभागाला दिल्या. या संवादाच्या माध्यमातून कामगार संघटनांनी मांडलेल्या सर्व रास्त मागण्या, सूचना आणि आक्षेप नोंदवून घेण्यात येतील. कामगारांचे हक्क आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेला कुठेही बाधा पोहोचणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल, असेही कामगार मंत्री म्हणाले.
दिल्लीत महाराष्ट्राचा डंका करंडक आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे सुपूर्त पुणे : भारतीय शालेय स्पर्धा महासंघाच्या शालेय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाची हॅटट्रिकचा पराक्रम महाराष्ट्राने केला आहे. विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या भारतीय शालेय स्पर्धा महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्राला विजेतेपदाच्या करंडकाने गौरविण्यात आले. शालेय खेळ महासंघाचे अध्यक्ष दिपक कुमार यांच्या हस्ते उपसंचालक संजय सबनीस, उपसंचालक उदय जोशी, सहाय्यक संचालक चंद्रशेखर साखरे व क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी राज्याचा वतीने विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. याप्रसंगी देशभरातील राज्य प्रतिनिधी उपस्थित होते. याबरोबरच महाराष्ट्र राज्याने शालेय आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवड चाचणीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ही राज्याचा गौरव करण्यात आला गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतही महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदाचा पराक्रम केला आहे. १८७ सुवर्ण, १६९ रौप्य, १९०कांस्य अशी एकूण ५४६ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक सेवा संचलनालय आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी यांनी सूपूर्त केला आहे. यावेळी उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अरुण पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अभिनंदन करून आयुक्त दिपक सिंगला म्हणाले की, वरिष्ठ, युवा गटाप्रमाणेच शालेय स्पर्धेतही महाराष्ट अव्वल आहे. या यशाचे खेळाडूंसह त्यांचे प्रशिक्षक, पालक, संघटक या सर्वांनीच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी खेळाडूंच्या पाठी शासन खंबीरपणे उभे असेल. हरियाणा ,दिल्ली या बलाढ्य संघांना मागे टाकून महाराष्टाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे. हरियाणाने १२१ सुवर्ण, ९६ रौप्य, ९६ कांस्य पदकांसह एकूण ३१३ पदके जिंकून दुसरे स्थान प्राप्त केले. दिल्लीचा संघ १०७ सुवर्ण, ११६ रौप्य, ९४ कांस्य पदकांसह एकूण ३१७ पदके जिंकून तिसर्या स्थानावर राहिला. स्पर्धेत महाराष्ट्राचे २५२८ क्रीडापटू सहभागी झाले होते. ४२ खेळातील १५५ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या यशाचा डंका देशभरात वाजला आहे. शालेय गट, १८ वर्षांखालील युवा गट व वरिष्ठ गटात विजेतेपदाची हॅटट्रिक महराष्ट्राने केली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,खेलो इंडिया युवा स्पर्धा प्रमाणेच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना क्रीडा व युवक सेवा संचलनालकडून रोख बक्षिस देण्याची परंपरा आहे. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे रू.११२५०, रू.८९५०, रू.६७५० तसेच सहभागी खेळाडूंनाही रू. ३७५० रूपयांचे रोख शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे.
मुंबई : दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा १५ वर्षीय आयुष्य कोल्हे याने यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप पडली आहे. इंग्लंडमधील लीड्स येथील डॉक्टर समीर पाठक जे तेथील क्रिकेट बियॉंड बाऊंड्रीज या…
पुण्यातील ३ऱ्या ऑस्ट्रेलियन लेव्हल-वाइज जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पुणे : पुण्यातील इन्फिनिटी जिम्नॅस्टिक एलएलपी येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या ऑस्ट्रेलियन लेव्हल-वाइज जिम्नॅस्टिक्स आमंत्रित स्पर्धेत पीटीकेएस (PTKS)च्या जिम्नॅस्ट्सनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि सातत्यपूर्ण…
दिवा : मुसळधार पावसामुळे शिळगाव स्मशानभूमी परिसरात निर्माण झालेल्या पाणी तुंबण्याच्या समस्येची नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना…
तीन वर्षांत लाभार्थ्यांना हक्काची घरे देण्याचा दावा ठाणे : अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक ६७ वरील एसआरए पुनर्विकास प्रकल्पाविरोधात करण्यात येणारे सर्व आरोप निराधार असून, विरोधकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी केला. प्रकल्पात लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत सामाजिक बांधिलकी जपत शाळा आणि धार्मिक स्थळाची मोफत उभारणी करण्यात येणार असल्याचाही दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला विकासक फैजल अन्सारी, मुख्य प्रवर्तक दत्ता कदम व सहपरिवर्तक उपस्थित होते. ठाण्याच्या लुईसवाडी, काजुवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक ६७ मधील झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या विविध आरोप-प्रत्यारोप आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काजूवाडी येथील आदिती डेव्हलपर्स कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. या झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्पात १७१ पात्र झोपडीधारक आणि एक मंदिर असे एकूण १७२ लाभार्थी आहेत. साऊथ फिल्ड रिॲल्टी एलएलपी या विकासकाची नियुक्ती प्रचलित सहकार कायदा आणि एसआरएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वसहमतीने करण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना ११ महिन्यांचे आगाऊ भाडे अदा करण्यात आले असून, उर्वरित भाड्याचे धनादेश एसआरए प्राधिकरणाकडे जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे भाड्याबाबत विकासका विरोधात कोणतीही तक्रार नसल्याचा दावा अशोक वैती यांनी केला. दरम्यान, आगाऊ भाडे स्वीकारल्यानंतरही येथील २६ झोपडीधारकांनी घरे रिकामी केली नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरोधात एसआरएच्या कलम ३३/३८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात आली. संबंधितांना योग्य सुनावणीची संधी देण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे तब्बल सहा महिन्यांचा विलंब झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या आदेशाविरोधात विरोधक प्रफुल्ल पांडुरंग कदम यांनी कोणतेही अपील दाखल केलेले नसुन स्थगिती आदेशही (स्टे) मिळवलेला नाही. तरीही कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, त्याचा अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करून अशोक वैती यांनी, “धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या प्रकल्पावर शिंदे साहेब स्वतः लक्ष ठेवणार आहेत, त्या ठिकाणी कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तर, पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पटलावर एसआरए प्रकल्पांबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांचा संदर्भ देत वैती म्हणाले की, काही प्रकल्पांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी असू शकतात; मात्र अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय झालेला नाही. तरीही दिशाभूल करणारे आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आरोप केल्यास संबंधितांविरोधात प्रशासकीय कार्यवाही तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही अशोक वैती यांना पत्रकार परिषदेत दिला. यावेळी संस्थेचे सहप्रवर्तक सिताराम कांबळे यांनीदेखील विकासकाविरोधात संस्थेची आणि रहिवाश्यांची कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. Box : एसआरए प्रकल्पाचे बुधवारी भूमिपूजन अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ह्या प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवारी ८ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होत असुन या प्रकल्पात सामाजिक बांधिलकी जपण्यात येत असल्याचे अशोक वैती यांनी सांगितले. तसेच, पुनर्वसनासोबतच इथे भव्य मंदिर व दहावीपर्यंतची शाळा मोफत उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येथील उद्यानाची व्याप्तीही वाढविण्यात येणार असून प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करून सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरणी रोहित पवार यांनी दिली शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट कल्याण : डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा, संध्याकाळ पर्यंत रमेश म्हात्रेला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिला. केडीएमसीच्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी बेदम मारहाण केल्यानंतर याचे तीव्र पडसाद उमटले असून या घटनेची महिती घेण्यासाठी आमदार रोहीत पवार डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आले होते यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलतांना रोहित पवार यांनी इथे कुठला आरोग्यमंत्री राज्यमंत्री आला का? श्रीकांत शिंदे आलेत का? रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष इकडचे आमदार आहेत. चौथ्यांदा निवडून आले असे असतांना ते तरी आलेत का पाठबळ देण्यासाठी असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. इलेक्शन आलं की एकमेकांच्या विरोधात खेळी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर येत नाहीत. असं असेल तर रवींद्र चव्हाण यांना पाचव्यांदा निवडून नाही दिले पाहिजे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं मात्र त्यांनी इथे येऊन डॉक्टर नर्सेस यांना पाठबळ द्यायला पाहिजे होतं., असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण झालेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना रोहित पवार यांनी भेटून त्यांची विचारपूस केली आणि धीर दिला. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाने या देवदूतांना केलेली मारहाण ही सत्तेची मस्ती आणि गुंडगिरी असून याविरोधात सरकारला कठोर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.