Category: होम

 साचल्याने पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढला

सुरुवातीची लक्षणे ओळखा, वेळेत उपचार घ्या – वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञांचा इशारा मिरा -भाईंदर : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना लेप्टोस्पायरोसिससह विविध जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. गटारे तुंबणे, रस्त्यांवर साचलेले दूषित पाणी आणि उंदरांसह इतर प्राण्यांच्या मूत्राने दूषित झालेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स,, मीरा रोड येथील हेड कन्सल्टंट – क्रिटिकल केअर, डॉ. अकलेश तांडेकर म्हणाले, “मुंबईसह मीरा-भाईंदर, वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा दूषित पाण्यातून चालताना त्वचेवरील जखम, खरचटलेली जागा किंवा डोळे, नाक आणि तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो. सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे, उलट्या आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात. अनेकजण हा साधा व्हायरल ताप समजून दुर्लक्ष करतात. मात्र वेळेत उपचार न झाल्यास हा आजार किडनी, यकृत आणि फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करू शकतो. काही रुग्णांना अतिदक्षता विभागात (ICU) उपचारांची गरज भासू शकते.” ते पुढे म्हणाले, “पूराचे किंवा साचलेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर पुढील दोन ते तीन आठवड्यांत ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान आणि योग्य अँटिबायोटिक उपचारांमुळे गंभीर गुंतागुंत टाळता येते.” ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास स्वतः औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जनजागृती, सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखणे आणि त्वरित वैद्यकीय उपचार घेणे हेच लेप्टोस्पायरोसिससारख्या गंभीर आजारापासून बचावाचे सर्वात प्रभावी उपाय आहेत.

कुडाळ व मालवण तालुक्यातील ६ प्रवासी मार्ग निवारा शेडसाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर…!

 आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाला यश ! सिंधुदुर्ग: गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील आंब्रड, आवळेगाव, माणगाव या ठिकाणच्या जीर्ण व नादुरुस्त झालेल्या शेडसाठी प्रत्येकी २० लाख याप्रमाणे एकूण १ कोटी २० लाख एवढा निधी पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता झाली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे, लवकरच जुन्या शेड हटवून नवीन बांधकामाला पावसाळ्यानंतर सुरुवात होईल असे एस.टी.प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान या निर्णयाचे संबंधित गावच्या रहिवाशांनी, ग्रामस्थांनी स्वागत केले असून  आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

महापौर सुजाता पाटील यांनी केली दुर्घटना स्थळांची व नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी

नवी मुंबई : पावसाळी कालावधीतील क्षेत्रीय स्तरावरील स्थितीचा प्रत्यक्ष आढावा फिल्डवर जाऊन घेताना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी शहाबाज बेलापूर व जुहूगाव वाशी या ठिकाणी घडलेल्या इमारत दुर्घटना स्थळांना…

निळ्या रंगाचं रासायनिक पाणी थेट रस्त्यावर

डोंबिवली एमआयडीसीमध्ये प्रदूषणाचा गंभीर प्रकार उघड कल्याण : एमआयडीसी परिसरात मुख्य गटारातून ओव्हरफ्लो होऊन निळ्या रंगाचं रासायनिक पाणी थेट रस्त्यावर वाहताना आढळलं. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा भारतीय जनता पक्ष जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा कल्याण जिल्हा सचिव आशुतोष सिंह यांनी दिला आहे. यावेळी भाजप जिल्हा सचिव दुर्गेश चव्हाण, भाजयुमो जिल्हा सचिव अभिषेक यादव उपस्थित होते.

महापौर पाहणी दौऱ्यात नाल्यावरील अतिक्रमण, भराव रडारवर

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा आणि  तुंबापुरी झालेल्या भागाचा दौरा करीत परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले. गेली दोन…

भर पावसात कल्याण पूर्व मधील वीज पुरवठा पूर्ववत

कल्याण : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील खंडित झालेल्या सुमारे ६ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा भर पावसात महावितरण कडून सुरळीत करण्यात आला आहे. महावितरण…

उन्हाळी सुट्टीत जनगणना करणाऱ्या शिक्षकांना मानधन व बदली रजा द्या

 महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना राज्याध्यक्ष सुधीर घागस यांची मागणी कल्याण : जनगणना-२०२७ च्या प्रथम टप्प्यात १ मे ते १५ जून या अधिकृत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत जनगणना कार्य करणाऱ्या राज्यातील शिक्षकांना तात्काळ मानधन अदा करावे तसेच नियमानुसार बदली रजा मंजूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी जनगणना संचालनालय, महाराष्ट्र राज्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, हजारो शिक्षकांनी स्वतःच्या वैधानिक उन्हाळी सुट्टीचा त्याग करून घरसूचीकरण, क्षेत्रीय पडताळणी, माहिती संकलन, पर्यवेक्षण तसेच जनगणना विभागाने सोपविलेली विविध कामे अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली. त्यांच्या योगदानामुळे जनगणना-२०२७ च्या प्रथम टप्प्याचे काम यशस्वीपणे पूर्ण होण्यास मोठी मदत झाली. भारताचे महापंजीयक व जनगणना आयुक्त यांनी २५ जूनला सर्व राज्यांना जनगणना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे मानधन कोणत्याही विलंबा शिवाय अदा करण्याचे निर्देश दिले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या २९ ऑक्टोबर २०१० च्या परिपत्रकानुसार उन्हाळी सुट्टीत जनगणना कार्य करणाऱ्या शिक्षकांना बदली रजा देण्याची स्पष्ट तरतूद असून, संबंधित शैक्षणिक वर्षात ती घेणे शक्य नसल्यास अर्जित रजा खात्यात जमा करण्याची व्यवस्था असल्याचे घागस यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे जनगणना-२०२७ मध्ये उन्हाळी सुट्टीत प्रत्यक्ष कार्य केलेल्या सर्व शिक्षकांना मंजूर मानधन तात्काळ अदा करावे, कोणताही पात्र शिक्षक लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री करावी तसेच सर्व पात्र शिक्षकांना नियमानुसार बदली रजा मंजूर करण्याचे आदेश तातडीने निर्गमित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. “जनगणना हे राष्ट्रहिताचे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून शिक्षकांनी नेहमीच शासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान राखत शासनाने न्याय्य व सकारात्मक निर्णय घ्यावा,” असेही राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी निवेदनात म्हटले आहे. तर “शिक्षकांनी राष्ट्रहितासाठी स्वतःच्या उन्हाळी सुट्टीचा त्याग करून जनगणना-२०२७ चे कार्य निःस्वार्थपणे पूर्ण केले आहे. त्यांच्या श्रमांचा सन्मान म्हणून मानधन आणि बदली रजा देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून नैतिक बांधिलकीही आहे. शासनाने याबाबत तातडीने न्याय्य निर्णय घ्यावा.” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना कल्याण-डोंबिवली महानगर जिल्हा कार्यवाह थॉमस शिनगारे यांनी दिली.

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांची शहरभर धाव

पूरग्रस्त व बाधित भागांची पाहणी, नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी सुनिल इंगळे उल्हासनगर : शहरात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार शासनाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे तसेच इतर आपत्कालीन घटनांची माहिती मिळताच आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने बचाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. अनेक ठिकाणी पडलेली झाडे हटविणे, धोकादायक फांद्या बाजूला करणे, वीजवाहिन्यांवरील अडथळे दूर करणे तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, वालधोनी नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नदीकाठील सखल भागांतील काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी संबंधित परिसरांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बाधित नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच महानगरपालिका आणि प्रशासनाच्या सर्व यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास दिला. आवश्यकतेनुसार तातडीने मदत व बचावकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळून घरांवरील पत्र्यांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी तहसीलदार कार्यालयामार्फत पंचनामे करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे व युवा समाजसेवक शिवाजी रगडे यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र नागरिकांना शासनाची मदत लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशीही त्यांनी विनंती केली. यावेळी नागरिकांना मुसळधार पावसाच्या काळात कोणताही धोका पत्करू नये, तुडुंब भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांपासून, ओढ्यांपासून तसेच धोकादायक झाडे व वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. कुठेही झाड पडण्याचा धोका, वीजवाहिन्यांवर झाडे, पाणी साचणे किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, पोलिस विभाग तसेच सर्व संबंधित यंत्रणा २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असून प्रत्येक तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. “नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका पत्करू नका. तुडुंब भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांपासून सुरक्षित अंतर राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्या. महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा आपल्या मदतीसाठी २४ तास सज्ज आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन युवा समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केले.