Category: होम

heading- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज

 ३० हजारांहून अधिक पोलिसांच्या निवासाचे नियोजन पूर्ण हरिभाऊ लाखे नाशिक :  आगामी नाशिक-बकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवास व्यवस्थेचे नियोजन अंतिम टप्प्यात आणले आहे. विविध शासकीय कार्यालये, पोलिस आस्थापना, धर्मशाळा, ट्रस्टच्या इमारती…

धारावीचा मास्टर प्लॅन जाहीर करा

 झोपडपट्टीवासीयांना ५००, तर चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या मुंबई: आशिया खंडामधील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकासाचे काम अदानी उद्योग समूहाच्या अदानी नवभारत डेवलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने सुरु केलेले आहे. परंतु या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन अजूनही धारावीकरांसमोर ठेवलेला नाही.यामुळे धारावी झोपडपट्टीवासियांमध्ये प्रचंड नाराजी आहे.म्हणून अदानी समुहाने हा मास्टर प्लॅन धारावीकरांसमोर ताबडतोब जाहीर करावा अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव यांनी केली आहे. माटुंगा लेबर कॅम्प सेक्टर-१ येथील आनंद ग्राहक सोसायटीमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयतर्फे धारावी पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर  धारावीतील संभाव्य   विस्थापन विरोधात आंबेडकरी समाजाची जनजागृती बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना संजय भालेराव यांनी ही मागणी केली. धारावीचा   मास्टर प्लॅन जाहीर करुन धारावी झोपडपट्टी मधील  प्रत्येक रहिवाशाच्या पुनर्वसनाची लेखी व कायदेशीर हमी द्यावी. झोपडीधारकांना किमान प्रत्येकी ५०० चौरस फुटांचे घर, तर चाळी-इमारती व इतर मालमत्तांमधील रहिवाशांना किमान १,००० चौरस फुटांचे घर देण्यात यावे. या प्रमुख  मागण्या मान्य होईपर्यंत रहिवाशांनी अदानी कंपनी बरोबर कोणताही करार करू नये, असे आवाहनही संजय भालेराव यांनी केले. धारावीमधील गणेश नगर आणि मेघवाडी परिसरातील झोपड्या अदानी कंपनीने अलीकडेच तोडल्या.या कारवाईचा संदर्भ देत बैठकीत सर्वच वक्त्यांनी चिंता व्यक्त केली. या कारवाईमुळे माटुंगा लेबर कॅम्प मधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे भालेराव यांनी सांगितले. आपली  झोपडी चाळ इमारत यांचे सर्वेक्षण झाले म्हणजे पुनर्वसनाचा हक्क निश्चित झाला असे होत नाही. घर, मालमत्ता आणि पुनर्वसनाचा हक्क स्पष्टपणे निश्चित झाल्याशिवाय रहिवाशांनी घाईघाईने अदानी कंपनीच्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी करू नये,” असे आवाहनही संजय भालेराव यांनी सांगितले. या बैठकीस काँग्रेस नेते महेंद्र साळवे, रीडन फर्नांडो,अनिल साळवे, गणेश सवने, भाई गणेश बच्छाव, विकास कापडे, महेश रामटेके, संभाजी देठे, सुरेश सावंत यांच्यासह रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीची सुरुवात   शाहीर  कॉ. सुरेंद्र बर्वे यांच्या पोवाड्याने झाली.  सूत्रसंचालन अनिल भंडारे यांनी केले. धारावीतील झोपडपट्टीवासियांचे  पुनर्वसन कुठे होणार, संक्रमण व्यवस्था काय असेल, तसेच चाळी व सरकारी मालमत्तांमधील रहिवाशांचे हक्क काय असतील, याबाबत लेखी करारात  स्पष्टता आवश्यक असल्याचे उपस्थित वक्त्यांनी  नमूद केले. रेल्वेच्या जमिनीवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाला मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. काही रहिवाशांना घर रिकामे करण्यासाठी तीन महिन्यांचे भाडे, दलाली आणि प्रवास खर्चाच्या स्वरूपात मदत दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, अशा तात्पुरत्या आर्थिक मदतीमुळे ‘की-टू-की’ पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नसल्याची भूमिका या बैठकीत उपस्थितांनी मांडली.

 महानगरपालिका शाळेच्या नव्या इमारतीच्या छताला पडल्या भेगा

पाण्याची गळती, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मिरा -भाईंदर: काशिमीरा येथील दचकुल पाडा येथे महानगरपालिका शाळा क्रमांक ३५ जवळ विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या नवीन शाळेच्या इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन होण्यापूर्वीच तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या छताला मोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगांमधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे बांधकामाच्या मजबुतीबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. नगरसेवकांनी घटनास्थळाला भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. ही बाब समजल्यावर, काँग्रेसचे नगरसेवक आणि गट नेते जय ठाकूर आणि भाजपचे नगरसेवक अनिल भोसले हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संयुक्तपणे पाहणी केली. यावेळी, दोन्ही नगरसेवकांनी बांधकामाचा दर्जा आणि कामाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. जय ठाकूर यांनी पर्यवेक्षकाला घटनास्थळी बोलावून तड्यांबद्दल चौकशी केली. पर्यवेक्षकाने तडे जलरोधक (वॉटरप्रूफिंग) करण्याची शिफारस केली. नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेने शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचे काम ज्या कंत्राटदाराला दिले होते, त्याने कथितरित्या हे काम एका उप कंत्राटदाराला दिले. तपासणीत काही बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोपही उघड झाले आहेत कोट मी बांधकामाचा दर्जा आणि कथित नियमभंगाबद्दल महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करणार आहे. संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणे अत्यावश्यक आहे. ही विद्यार्थ्यांची सुरक्षितता, जीवन आणि मालमत्तेशी संबंधित एक गंभीर बाब आहे. अनिल भोसले, नगरसेवक, भाजप कोट शाळेची इमारत पूर्ण होण्यापूर्वीच छताला तडे जाणे आणि पाणी गळणे ही एक गंभीर बाब आहे. याचा परिणाम भविष्यात इमारतीच्या मजबुतीवर होऊ शकतो. शिवाय, महानगरपालिकेला नंतर दुरुस्तीसाठी पुन्हा पैसे खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. जय ठाकूर, नगरसेवक, काँग्रेस

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची एपीआयच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

अशोक गायकवाड मुंबई : असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राष्ट्रीय महत्त्वाची दोन वैद्यकीय प्रकाशने राज्यपालांना भेट दिली. यामध्ये प्रौढांच्या लसीकरणासंदर्भातील तज्ज्ञांचे एकत्रित मार्गदर्शन आणि शिफारशी असलेल्या ‘प्रौढ लसीकरणाबाबत एकत्रित तज्ज्ञ मार्गदर्शक सूचना २०२६’ या प्रकाशनाचा समावेश आहे. हे प्रकाशन इंडियन मेडिकल असोसिएशनने विविध वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने प्रसिद्ध केले आहे. दरवर्षी विषाणूजन्य संसर्गामुळे देशात सुमारे पाच लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यापैकी अनेक मृत्यू लसीकरणाच्या माध्यमातून टाळता येऊ शकतात, अशी माहिती डॉ. वोरा यांनी दिली. दुसरे प्रकाशन ‘दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकार मार्गदर्शक २०२६’ या शीर्षकाचे असून, भारतातील दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकारांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशींचा त्यात समावेश आहे. या आजाराचे योग्य निदान कसे करावे आणि प्रभावी उपचारपद्धती कोणत्या असाव्यात, याबाबत या प्रकाशनातून मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. राकेश बडदे, डॉ. मिलिंद नाडकर्णी, डॉ. अमित सराफ, डॉ. जयस लेले, आशुतोष पांडे तसेच झायडस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती दलाल यांच्यासह संस्थेचे अन्य सदस्य उपस्थित होते.