Category: होम

 पीटीकेएसची ऐतिहासिक कामगिरी, रिदम मामानियाचे रौप्यपदक

राष्ट्रीय आइस फिगर स्केटिंग स्पर्धा मुंबई : २५ ते ३० जून या कालावधीत देहरादून येथे आयोजित करण्यात आलेल्या २१व्या राष्ट्रीय आइस फिगर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल (पीटीकेएस) ने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. प्रथमच पीटीकेएसच्या खेळाडूने राष्ट्रीय आइस फिगर स्केटिंग स्पर्धेत सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. पीटीकेएसची खेळाडू रिदम हर्षन मामानिया हिने उत्कृष्ट कौशल्य, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर रौप्यपदक पटकावत संस्थेसह महाराष्ट्राचा गौरव वाढवला. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे पीटीकेएसच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून क्रीडाक्षेत्रात या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. रिदमच्या या ऐतिहासिक यशामागे सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, सातत्याने मार्गदर्शन करणे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे या माध्यमातून संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू सर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पीटीकेएसला राष्ट्रीय स्तरावर हे उल्लेखनीय यश मिळवता आले.

‘हेच होणे बाकी होते!’ नाशिकमध्ये ‘लज्जास्पद’ राजकारण

 महिला नगरसेविकांसमोर आई-बहिणीवरुन शिवीगाळ हरिभाऊ लाखे नाशिक – राजकारणात आता नीतीमत्ता, तत्वनिष्ठता, पक्षनिष्ठता, आचार-विचार या सर्व बाबी खुंटीला टांगल्या गेल्या असून कोणालाच त्याविषयी काहीही देणेघेणे नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. नाशिकसह जिल्ह्यातील राजकारणही त्यापासून दूर नाही. त्यामुळेच कालपर्यंत दुसऱ्या पक्षात असताना त्यांची भ्रष्टाचार, गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढण्याचे तसेच देशद्रोही ठरविण्यापर्यंत मजल गेलेल्यांना आपल्याच पक्षात सन्मानपूर्वक प्रवेश देण्यात राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना काहीही वाटेनासे झाले आहे. याचा परिणाम जो होणे अपेक्षितआहे, तोच होत आहे. लोकप्रतिनिधींकडून लोकशाहीचे ओंगळवाणे दर्शन घडविले जात आहे. महापालिकेच्या नवीन नाशिक प्रभाग समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आपल्यातील लज्जास्पद राजकारणाचे दर्शन घडविले. आणि सर्व नाशिककरांच्या माना खाली गेल्या. नवीन नाशिक प्रभाग समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला. सिडको परिसरातील दूषित पाण्याचा विषय चर्चेत आला. महिला नगरसेविका साधना मटाले यांनी दुषित पाण्याची बाटली आपल्याबरोबर आणली. सभापती बाळकृष्ण शिरसाट यांनी निवेदन खुर्चीत बसूनच स्वीकारावे, असा सल्ला अपक्ष नगरसेवक शहाणे यांनी सभापतींना दिला. त्यावरुन भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि शहाणे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. दोन्ही लोकप्रतिनिधी मधील शाब्दिक वाद चांगलाच चिघळला. बडगुजर आणि शहाणे यांच्यात महापालिका निवडणुकीपासून वाद आहेत. त्यामुळे त्याचे पडसाद वारंवार हे दोन्ही नगरसेवक जेव्हां समोरासमोर येतात, तेव्हा पडत असतात. प्रभाग समिती बैठकीत मात्र दोन्ही नगरसेवकांनी आपण किती असभ्य आहोत, हे दाखविण्याची जणूकाही स्पर्धाच सुरु केली. वैयक्तिक आरोपांमध्ये आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. एकमेकांच्या आईबहिणींचा उध्दार करण्यात आला. हे करताना सभागृहात अनेक महिला नगरसेविका उपस्थित असल्याचे भानही बडगुजर आणि शहाणे यांना राहिले नाही.आपण जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोकसेवक आहोत, हे विसरून दोन्ही लोकप्रतिनिधींनी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारणाचे दर्शन घडविले. इतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झाले. काही काळ प्रभाग समितीच्या बैठकीतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. नंतर बडगुजर आणि शहाणे यांनी सभागृहाची आणि उपस्थित सदस्यांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली. परंतु, नाशिककरांपुढे अशा असभ्य लोकप्रतिनिधींना निवडून देण्यात आपणही तितकेच दोषी आहोत, अशी अपरादपणाची भावना या प्रकारामुळे निर्माण झाली आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींवर कारवाई होणे आवश्यक आहे. परंतु, तसे होईलच याची हमी नाही. ००००००००००

माणगाव तालुका क्रीडा संकुल वर्षभरात पूर्ण होणार

 आदिती तटकरे यांची विधान परिषदेत माहिती अशोक गायकवाड मुंबई : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका क्रीडा संकुलाचे काम वर्षभराच्या आत पूर्ण करण्यात येणार असून, माणगाव येथे अत्याधुनिक सुविधा असलेले उप-विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अनिकेत तटकरे, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, माणगाव हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून, २०२० च्या चक्रीवादळात तालुका क्रीडा संकुलाचे नुकसान झाले होते. त्यानंतर विभागीय क्रीडा संकुलासाठी २४ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असून, ८५ कोटी रुपयांचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, खारघर येथे विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रस्तावामुळे हा विषय प्रलंबित राहिला. या कालावधीत माणगाव तालुका क्रीडा संकुलासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी २ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या कामाला गती देण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खारघर येथे विभागीय क्रीडा संकुल उभारले जात असले तरी माणगावमध्ये विशेष बाब म्हणून उप-विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल. या संकुलात स्विमिंग पूल, क्रिकेटसह विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माणगाव विभागीय क्रीडा संकुलासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. डोंगरी भागातील क्रीडा संकुलांच्या विकासासाठी विशेष धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच रत्नागिरीतील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधीच्या प्रस्तावाचा विचार करून आवश्यक तरतूद करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले. ००००००००००

धर्मवीर आनंद उद्यानात झाड पडले

कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील धर्मवीर आनंद दिघे उद्यानात सोमवारी एक झाड पावसामुळे कोसळले असून सुदैवाने त्यावेळी उद्यानात कोणी बाळ गोपाळ मंडळी आणि नागरिक उपस्थित नव्हते. सदर झाड हे…

Heading – ठाणे शहरात पावसाची रिपरिप सुरूच

 ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून दिलासा ठाणे, ठाणे शहरासह परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. सकाळपासूनच आकाश ढगाळ असल्याने वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत असल्याने शहरातील प्रमुख रस्ते ओलेचिंब झाले. कार्यालयीन वेळेत वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागला. काही ठिकाणी किरकोळ वाहतूक मंदावल्याचे चित्र दिसून आले. सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या मोठ्या घटना घडल्या नसल्या तरी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेतली. सततच्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली असून हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. पावसामुळे बाजारपेठांमध्ये काही प्रमाणात वर्दळ कमी झाली. छत्र्या आणि रेनकोटचा वापर करत नागरिकांनी आपली दैनंदिन कामे सुरू ठेवली. हवामान विभागाने पुढील २४ तासांत ठाणे, मुंबई आणि कोकणातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पाणी साचणाऱ्या भागात सावधगिरी बाळगावी तसेच स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

 केडीएमटीची बस सेवा सुधारण्यासाठी कडक पावले

 ६ अधिकाऱ्यांवर जबाबदारी, १२ निर्देशांची अंमलबजावणी कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) परिवहन उपक्रमाने (केडीएमटी) बस सेवा अधिक शिस्तबद्ध, वेळेवर आणि प्रवाशाभिमुख करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन व्यवस्थापकांच्या निर्देशानुसार बससेवेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सहा अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून डेपो पाळी प्रमुखांसाठी १२ कलमी निर्देशांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहाय्यक वाहन अधीक्षक (प्र.) दीपक चौधरी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सध्या केडीएमटीचे दैनंदिन बस वेळापत्रक ९०-०-८९ आहे. शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व नोकरदारांना वेळेत बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी रविंद्र संसारे, किशोर धारावणे, मनीष काळे, संदीप पेणकर, नरेश देहेरकर आणि शालिक टावरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार ड्युटीदरम्यान गणवेश परिधान करणे बंधनकारक राहील. महत्त्वाच्या फेऱ्यांसाठी चालक-वाहकांची वेळेत नियुक्ती करून बस नियोजित वेळेत डेपोतून रवाना करणे, शाळांच्या फेऱ्या कोणत्याही परिस्थितीत रद्द न करणे, बस उशिरा सुटल्यास कारणासह अहवाल सादर करणे, प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे, तिकीट मशीन व रोख रकमेची पडताळणी, महसुलातील तूट वरिष्ठांना कळविणे, अपघात किंवा बस बिघाड झाल्यास तातडीने उपाययोजना करणे, अस्वच्छ बस मार्गावर न पाठविणे, चालक-वाहकांच्या कागदपत्रांची तपासणी तसेच उपस्थितीची खातरजमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय सर्व बाबींची नोंद दैनंदिन तपासणी पत्रकात करावी लागणार असून बससेवेवर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. या उपाययोजनांमुळे केडीएमटीची सेवा अधिक कार्यक्षम होऊन प्रवाशांना वेळेवर आणि दर्जेदार बससेवा मिळण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. 00000000

बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागातील दोन अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे आणि…

 डोंबिवली मिडटाउन रोटरी क्लबचा ‘एग बँक’ उपक्रम

– बाल आरोग्यासाठी एक प्रभावी पाऊल कल्याण : डोंबिवली मिडटाउन रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत “एग बँक” हा नाविन्यपूर्ण उपक्रम १६ मार्च २०२४ रोजी सुरू केला. रोटेरियन मिलिंद मोहिते यांच्या संकल्पनेतून आणि रोटेरियन प्रदीप बुडबडकर यांच्या “Excellent Year” अध्यक्षीय कार्यकाळात या प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यानंतर हेमंत मुंडके, अनिल हिरावत आणि सध्याचे अध्यक्ष किशोर आढळकर यांनीही या उपक्रमाला मनापासून पाठिंबा दिला आहे. रोटरीच्या “Maternal and Child Health” या क्षेत्राशी सुसंगत असलेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रकल्प अध्यक्ष संतोष शृंगारपुरे व डिंपल शृंगारपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या उपक्रमाद्वारे जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली (पूर्व) येथील अनाथाश्रमातील ६ वर्षांपर्यंतच्या सुमारे ४० बालकांच्या प्रोटीनयुक्त आहाराची गरज भागवली जाते. गरजेनुसार १५० अंड्यांचे तुकड्यांमध्ये वितरण केले जाते. क्लब सदस्य, त्यांचे कुटुंबीय व मित्र यांच्या देणग्यांमधून हा प्रकल्प राबवला जात असून आजपर्यंत ५,००० हून अधिक अंड्यांचे वितरण करण्यात आले आहे. हा उपक्रम रोटरीच्या “Service Above Self” या मूलमंत्राचे जिवंत उदाहरण ठरत असून समाजासाठी समर्पित सेवाभावाची प्रेरणा देत आहे. ०९०००००

कृषी उत्पन्न बाजार समितीत केलेल्या बांधकामाला स्थगिती द्या

नगरसेविका नमिता पाटील यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी कल्याण: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारता केलेल्या बांधकामाला त्वरित स्थगिती देण्याची…

पल्स पोलिओ मोहिमेत १.१७ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

ठाणे- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये रविवार, २८ जूनला ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्याची व्यापक मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड,…