Category: होम

सर्व्हेनेच आमचा घात केला-भावना गवळी

यवतमाळ : यंदाच्या निवडणूकीत सर्व्हेनेच आमचा घात केला. सर्व्हेचे कारण पुढे करत माझे तिकीट कापले नसते तर मी दोन लाखांच्या फरकाने निवडूण आले असते असा घरचा अहेर यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी यांनी पक्षाला…

खोटे एक्झिट पोल दाखवून शेअर बाजारात करोडोंचा घोटाळा

राहुल गांधींचा मोदी, शाहंवर आरोप नवी दिल्ली : सोमवारी शेअर बाजार उघडण्यापुर्वीच खोटे एक्झिट पोल दाखवून शेअर मार्केट वधारून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि शहांवर केला…

राज्यात पावसाची दमदार हजेरी

पुणे : महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर आहे, मॉन्सून राज्यात दाखल झाला आहे. आज गुरूवारी मॉन्सून कोकणात आला आहे . रत्नागिरीसह पावासाने राज्यात आज दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात उष्णतेचा पाऱ्याने उच्चांक गाठला होता.. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले होते. मात्र आता मॉन्सुन दाखल झाल्याने नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकला आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे  महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल अतिशय हळू सुरू होती. केरळमध्ये काही दिवस मुक्काम होता. त्यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटकात काही काळ थांबला होता. आज मात्र त्याने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. हा मॉन्सून रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेढक, भद्राचलम, विजयनगर आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून पुढे सरकला आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यामध्ये आजपासून पुढील तीन-चार दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरूवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज गुरूवारी तर, शुक्रवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मीरा-भाइर्दंरमध्ये सोसायटीच्या सचिवावर गुंडाचा हातोड्याने हल्ला

मिरा-भाईंदर : मीरा भाईंदरमधील प्रकाश भवन या इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सचिव अनंत तिवारी (वय ५५) यांच्यावर पापू ऊर्फ अरविंद कदम या गुंडाने हतोड्याने हल्ला केला आहे. तिवारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली…

शिवप्रेमींची साक्षीने रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा

अशोक गायकवाड रायगड : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. संभाजी राजे छत्रपती आणि जिल्हाधिकारी किशन जावळे…

महाराष्ट्रात आरएसएस अॅक्शन मोडवर

स्वाती घोसाळकर मुंबई :  लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भाजपासह महायुतीचे पाणीपत झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक (आरएसएस) अक्शन मोडवर आले आहे. आरएसएसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्रातील या अपयशाबाबत चिंतन बैठक झाली. तब्बल दोन तास चाललेल्या…

वस्तुनिष्ठ मुल्यमापन होण्याची गरज..

भारतीय जनता पक्षाच्या पिछेहाटीची कारणमिमांसा.. भाग १ विशेष लेखमालिका… अखेर १८ वी लोकसभा आता गठीत होणार हे निश्चित झाले आहे. निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…

मे महिन्यात 1203 अनधिकृत झोपडयांवर अतिक्रमण विभागाची धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यावर धडक कारवाई करण्यात येत असून पावसाळापूर्व कालावधीत मे महिन्यामध्ये आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये प्राधान्याने डोंगर पायथ्याशी असलेल्या संभाव्य दरडप्रवण क्षेत्रातील झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त्‍ डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांच्या सहा.आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी यांनी अतिक्रमित झोपडपट्टी हटाव मोहीम प्रभावीपणे राबविली असून मे महिन्यात 1203 इतक्या मोठया संख्येने अनधिकृत झोपडया हटविलेल्या आहेत. यामध्ये बेलापूर विभागात दुर्गानगर, पंचशिल नगर, बेलापूर उड्डाणपूलाखाली, से.28 येथील विठ्ठल मंदिराच्या बाजूला अशा एकूण 251 अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई केलेली आहे. तसेच नेरुळ विभागात से.9 पाण्याच्या टाकीच्या बाजूला, महात्मा गांधीनगर बालाजी मंदिराच्या बाजूला अशा 90 अनधिकृत झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत. वाशी विभागामध्ये हायटेन्शन वायरच्याखाली, मुंबई – पुणे मार्गालगत वाशी गाव टोलनाक्याच्या बाजूला अशा दोन ठिकाणच्या 818 अनधिकृत झोपडयांवर कारवाई करण्यात आलेली आहे. घणसोली विभागात पामबीच मार्गालगत साईबाबा मंदिराजवळील 27 अनधिकृत झोपडया तसेच ऐरोली विभागात ठाणे बेलापूर रस्त्यानजिक भारत बिजली कंपनी समोरील रेल्वे रुळांनजिक अनधिकृतरित्या वसलेल्या 15 झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. दिघा विभागातही ईश्वरनगर आणि विष्णुनगर येथील 2 अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात पावसाळा पूर्व कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांतील 1203 अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आली असून पावसाळी कालावधीत नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास दुर्घटना घडू नये म्हणून डोंगर पायथ्याशी असलेल्या दरड प्रवण क्षेत्रातील झोपडपट्टया हटविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

नवनियुक्त खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, “वर्षा गायकवाड ही माझी लहान बहिण आहे, तिला लोकसभेत पाठवणार”, हा शब्द दिला होता, तो त्यांनी खरा करून दाखवला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपा उमेदवारांचा १६ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव करून २००४ च्या विजयाची पुनरावृत्ती केली. याच मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील लोकनेते एकनाथराव गायकवाड यांनी विजय संपादन केला होता. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपा उमेदवाराचा दणदणित पराभव करत विजय खेचून आणला. यावेळी शिवसेना नेते श्री. अनिल परब, माजी मंत्री अस्लम शेख, डॉ. महेश पेडणेकर, संदीप नाईक, वीजू शिंदे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आयुक्त राव यांनी या भेटीनंतर केले. सरासरी १२००च्या घरात असलेली बाह्यरुग्ण संख्या सध्या २२००च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे. हा जास्तीचा खर्च महापालिका तत्काळ उपलब्ध करून देणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही पदे भरली जातील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, वसतीगृह आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय तसेच महाविद्यालय यांच्याविषयी सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, उपायुक्त (आस्थापना) जी. जी. गोदेपुरे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, डीन डॉ. राकेश बारोट, डॉ. स्वप्नाली कदम आदी उपस्थित होते. रुग्णालयाच्या मजबुतीकरणासाठी राज्य सरकारने ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासोबत, नवीन विद्युत व्यवस्था, ट्रान्सफॉर्मर आदी सुधारणांसाठी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरासाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्या नेमक्या गरजा, त्याचा खर्च यांचा संपूर्ण आढावा घेऊन वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश यावेळी आयुक्त राव यांनी दिले. वाढीव औषधसाठा, अपघात विभागाची क्षमतावृद्धी, अतिदक्षता विभागातील खाटांची वाढ आणि डॉक्टरांची उपलब्धता या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असे आयुक्त राव म्हणाले. तसेच, पार्किंग प्लाझामधील उपलब्ध वैद्यकीय सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर रुग्णालयात करावा त्यासाठी डीन आणि अधीक्षक यांनी पार्किंग प्लाझामधील सामुग्रीची तत्काळ पाहणी करावी, असे निर्देशही आयुक्त राव  यांनी दिले. रुग्णालयावर असलेला अतिरिक्त भार लक्षात घेता डॉक्टर करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल आयुक्त राव यांनी कौतुक केले. रुग्णांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या माहितीचे संगणकीकरण करून ती व्यवस्था अद्ययावत करण्याबाबतही आयुक्त राव यांनी सूचना दिल्या. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या निवासी डॉक्टरांचेही आयुक्त राव यांनी कौतूक केले. उत्तमोत्तम विद्यार्थी या महाविद्यालयात आले तर त्याचा फायदा रुग्णसेवेलाही होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आपल्या अभिमान असल्याचेही राव यांनी सांगितले.