Category: महाराष्ट्र

Maharashtra News

काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने…!

पेट्रोल -डिझेल -गॅस दरवाढीविरुद्ध सिंधुदुर्ग: पेट्रोल – डिझेल-गॅस दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘रद्द करा, रद्द करा,…

 “राजकारण बाजूला ठेवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा!”

NEET घोटाळा नाशिकमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन हरिभाऊ लाखे नाशिक : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज दिनांक २९ मे २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकचे जिल्हाध्यक्ष मिहिर प्रमोद गजबे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या परीक्षा व्यवस्थेविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतनजी गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा महासचिव विश्वनाथ भालेराव, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष रवी पगारे, दामोदर पगारे, राजू दादा दोत्रे, डॉ. अनिल कुरे, अमोल चंद्रमोरे, दीपक पगारे, युवराज मनारे, ताराचंद मोतमल आदी उपस्थित होते. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने अनिकेत काशीद, आदित्य निरभवणे, सम्यक बच्छाव, श्रेयस अहिरे, विजय सावंत, पूर्वेश, यश जाधव, ऋत्विक जाधव, वैभव वानखेडे, सम्राट संघारे, प्रणव खंडीजोड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी बोलताना मिहिर गजबे म्हणाले, “पेपर फुटीच्या या सत्रामुळे देशातील अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवावा.” आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीने, “हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे आवाहन केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशातील सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा आर्थिक व मानसिक संघर्ष यावर पाणी फेरले गेले असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. NEET ची फेरपरीक्षा तात्काळ जाहीर करून ती पूर्णपणे विनामूल्य घेण्यात यावी. Public Examinations (Prevention of Unfair Means)…

– ५ जून रोजी सोलापुरात होणार राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षा

२ जूनपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने शुक्रवार, ५ जूनला राष्ट्रीय खो-खो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर येथे होणाऱ्या या परीक्षेमुळे राज्य परीक्षा पास झालेल्या पंचांना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या परीक्षेबाबत माहिती दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण पंचांनी राष्ट्रीय परीक्षेला बसावे आणि राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी २ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पूर्ण करावी. यासाठी प्रशांत पाटणकर (मो. क्र. ९९६७५६२४६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने पंचांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. 0000000000

शिरोली बुद्रुकच्या ‘डोळ्यांच्या डॉक्टरबाई’ अनुसयाबाई डबडे यांचे निधन

 शतक महोत्सव चार दिवसांवर असतानाच काळाचा घाला; गावावर शोककळा नारायणगाव : आपल्या अंगभूत कौशल्याने अनेकांच्या डोळ्यात गेलेला कचरा कापसाच्या बोळ्याने सहजतेने व विनामोबदला काढून देणाऱ्या आणि त्यामुळे पंचक्रोशीत ‘डोळ्यांच्या डॉक्टरबाई’…

नाशिक रिंग रोडचा वाद पेटला

भुजबळ फार्मवर शेतकऱ्यांचे आंदोलन हरिभाऊ लाखे नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोडमध्ये एकाही मंत्री वा त्यांचे निकटवर्तीय, बिल्डर्स आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या जमिनी जात नसल्याकडे लक्ष वेधत कुंभमेळ्याच्या नावाखाली बिल्डरांसह हितसंबंधितांच्या फायद्यासाठी रिंग रोड बनवला जात असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांकडून होत आहे. नाशिक रिंग रोडची मोजणी मध्यंतरी वादात सापडली होती. या प्रश्नावर स्थानिक तीनही मंत्र्यांनी भूमिका मांडलेली नाही. बाधित शेतकऱ्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या निवास स्थानासमोर दाद मागो आंदोलन केले. यावर आता मंत्री भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक रिंग रोड आणि एमआयडीसी भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे गोदा काठावर आमरण उपोषण सुरू आहे. दुसऱ्या दिवशी बाधित शेतकऱ्यांनी मंत्री भुजबळ यांच्या निवासस्थानी आंदोलन केले. सकाळपासून भुजबळ फार्म परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. कांदा प्रश्नांसंदर्भातील बैठकीसाठी मंत्री भुजबळ यांना दिल्लीला जावे लागल्याने ते नाशिकमध्ये नव्हते. मात्र, त्यांच्या स्वीय सहाय्यकांसमवेत शेतकरी शिष्ट मंडळाने चर्चा केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीतील सर्व आश्वासनांची पूर्तता शासनाच्या संबंधित विभागांनी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मंत्री भुजबळ यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. भुजबळ हे पालकमंत्री असताना जिल्ह्यात अनेक महामार्ग व मोठे विकास प्रकल्प झाले. त्यामुळे रिंग रोडसारख्या महत्वाच्या प्रकल्पात शेतकरी हित जपून न्याय निर्णय घेण्यासाठी त्यांच्या अनुभवाची शिदोरी वापरावी. नाशिक रिंग रोडच्या संरेखनाच्या पर्यायावर अंतिम निर्णय मंत्री स्तरावर घेतला जाणार आहे. त्यामुळे गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे आणि नरहरी झिरवाळ या चारही मंत्र्यांनी एकत्रितपणे शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, यासाठी आम्ही सर्व मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. आंदोलनात छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, आदींसह बाधित शेतकरी उपस्थित होते. नाशिक रिंग रोड नेमका कुणाच्या फायद्यासाठी होत आहे, असा प्रश्न करण्यात आला. रिंग रोडच्या भू संपादनात शेतकरी भूमिहीन होऊ नये, कोणाची घरे, विहिरी, गोठे व शेती उद्ध्वस्त होणार नाही, याची काळजी घेत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. छगन भुजबळ काय म्हणाले ? या आंदोलनावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. विकास कामे करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, ही महायुती सरकारची भूमिका आहे. नाशिकमधील रिंग रोड विस्ताराच्या संदर्भात प्रशासन शेतकऱ्यांशी योग्य ती चर्चा करत आहे. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, हीच शासनाची भूमिका राहील असे मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले. 000000000

H- नीट नंतर आता मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत प्रचंड गोंधळ

 ऐनवेळी जुन्याच प्रश्नपत्रिका वाटल्याने खळबळ हरिभाऊ लाखे नाशिक : नीट परीक्षेचा विषय देशभर गाजत असताना आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेतील सावळागोंधळ समोर आला आहे. संगणकीय आज्ञावलीतून पाठवलेली…

एसआयआर प्रक्रियेवर लक्ष ठेवा- वर्षा गायकवाड

एकाही मुंबईकराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई : लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्येही घोटाळा करत आहे. विविध राज्यात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेतून मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवू नये, यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारीक नजर ठेवावी व एकाही मुंबईकराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा स्पष्ट सुचना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. राजीव गांधी भवन येथे खासदार वर्षा गायकवाड यांनी एसआयआर प्रक्रियेसंदर्भात मुंबई क्षेत्रातील जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुंबई काँग्रेसच्या फ्रंटल संघटना आणि सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते. बैठकीत शहरातील एसआयआर प्रक्रियेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांना कोणत्याही कारणामुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी बीएलए कार्यकर्ते घेत असलेल्या विविध उपाय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील काळात  संघटित पद्धतीने काम करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. लोकशाही मजबूत ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाचा मताचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने सामान्य माणसाचा आवाज बुलंद केला आहे. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणे आणि सरकारला जाब विचारणे ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडली पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्याबरोबर जनतेच्या प्रश्नावर विविध आंदोलने करण्याच्या सुचनाही खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली. ००००००००

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १२ च्या वतीने प्रभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या प्रयत्नांतून…

‘भाजपमध्ये भीती आणि जनतेमध्ये आक्रोश’

 नाशिक दौऱ्यात आदित्य ठाकरे यांचा घणाघात हरिभाऊ लाखे नाशिक – शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये मागील आठवड्यात शिवसंवाद मेळावा घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आता शिवसेना (उध्दव ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनीही नाशिकचा दौरा करुन कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कोणकोणत्या समस्यांना हात घातला पाहिजे, प्रश्नांचा पाठपुरावा कसा केला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन करतानाच पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशावर टीका केली. कुंभमेळ्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. परंतु, कुंभमेळ्यातील कामांचे कंत्राट कोणाला देण्यात येत आहे, त्याचा नाशिकला काही फायदा आहे काय, याचा विचार करण्याची गरज आहे. नाशिकमध्ये सर्वत्र खोदकाम करुन ठेवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर ही कामे यशस्वी होतील का, याची खात्री सरकार देणार आहे काय, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. जागतिक परिस्थिती वेगळी असली तरी या सरकारने मागील काही वर्षात आर्थिक परिस्थितीवर असे काही करुन ठेवले आहे की, त्याचा परिणाम सर्वाना भोगावा लागत आहे. पैसे नाही दिले तरी कंत्राटदार खोदकाम सोडून देणार नाही, याची हमी सरकार देऊ शकणार आहे काय, असा प्रश्न उपस्थित करुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नसल्याकडे लक्ष वेधले. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये होणाऱ्या रिंगरोडकरिता होणाऱ्या भूसंपादनाविरोधात आवाज उठविणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. संजय राऊत यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे हा मुद्दा मांडला होता. शेतकरी कधीही चांगल्या कामाला विरोध करीत नाही. परंतु, त्याच्या मागण्यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोण होता शिवाजी ? हे पुस्तक वाचले असते तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय शिक्षा दिली होती, याचा या गद्दारांना पळताना चारदा विचार करावा लागला असता. त्यांनी डोकं ठिकाणावर ठेवून देशात आणि राज्यात कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, रोजगार किती आहेत, सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झाली, या सरकारमुळे शहरांची काय अवस्था झाली, या प्रश्नांचा विचार करावयास हवा. असे प्रश्न अधिवेशनात मांडावयास हवेत. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे हेच पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत आहेत. त्यांनी अजून कशाप्रकारे प्रश्नांची मांडणी करावयास हवी, यासंदर्भात नगरसेवकांसह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इतर पक्षांमागे लागतात, तसे भाजप हे काॅक्रोच जनता पार्टीमागे लागले आहेत. काॅक्रोच जनता पार्टीला समाज माध्यमात बंदी घालावीशी भाजप सरकारला वाटले. यावरुन विचार करा त्यांच्यात किती भीती आहे. भाजपमध्ये भीती असल्याचे आणि जनतेमध्ये आक्रोश असल्याचे दिसून आले आहे. भाजपविरोधात कोणी बोलले की लगेच त्याचा पाकिस्तानशी संबंध जोडण्यात येतो, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांनी काॅक्रोच जनता पार्टीशी संबंधित विषयावरुन लोकांमध्ये किती आक्रोश आहे, हे लक्षात येत असल्याचे सांगितले. सरकारमधील मंत्री सर्वत्र पुरेसा इंधन साठा असल्याचा दावा करतात. परंतु, अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद झाले आहेत. इंधन मिळविण्यासाठी कुठे भांडणे होत आहेत. कुठे मारामाऱ्या होत आहेत. रांगा लागल्या आहेत. राज्यातील ही परिस्थिती सरकारमध्ये असूनही जर मंत्र्यांना माहीत नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. कोट “भाजपमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून जनतेमध्ये प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. भाजपविरोधात कोणी आवाज उठवला किंवा सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले की, लगेच त्याचा पाकिस्तानशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.” – आदित्य ठाकरे ०००००००

– राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे खासदार सुरेश म्हात्रे यांनी फिरवली पाठ ?

– राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कल्याण : कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे हे आज दिवसभर कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात उपलब्ध असतांना देखील त्यांनी या आंदोलनात उपस्थित न राहिल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून कार्यकर्त्यांकडून खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. तर खासदार सुरेश म्हात्रे यांनी नुकतेच भाजपा सरपंचांचे आणि शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यातच त्यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.