Category: मुंबई

Mumbai news

अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात सभापतींवर कारवाई का नाही?

सय्यद आफरीन यांचा भाजपला प्रश्न मिरा -भाईंदर : काशीमिरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांचे सख्खे भाऊ राजेश चव्हाण यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या दुसऱ्या भावाचे नावही तक्रारीत समोर आले आहे. या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन म्हणाल्या की, “महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या समितीच्या सभापतींच्या निकटवर्तीयांवर अशा गंभीर स्वरूपाचे आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे महिला व बालकल्याण समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी आणि समितीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सभापतींनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा.” तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सन्मान व सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी दिला आहे.

फुगाळे येथील २५ ते ३० कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित असल्याची तक्रार

अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून दर महिन्याला सुमारे २५ ते ३० शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.विशेषतःमे आणि जून २०२६ या दोन महिन्यांचे धान्य अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी शहापूर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली आहे. गावातील शिधापत्रिकाधारकांनी सांगितले की, शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांसाठी वितरित करण्यात येणारे धान्य हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र फुगाळे येथील रास्त भाव दुकानातून अनेक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळा दुकानावर जाऊनही धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते किंवा विविध कारणे देऊन लाभार्थ्यांना परत पाठविले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील काही रेशनधारकांनी प्रत्यक्ष धान्य मिळत नसल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित प्रशासनाकडे पाठविला आहे. या व्हिडिओमध्ये लाभार्थी आपली व्यथा मांडताना दिसत असून अनेक कुटुंबांना धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील अनेक मजूर कुटुंबांना नियमित रोजगार उपलब्ध झालेला नाही. शेतीची कामे अद्याप पूर्णपणे सुरू नसल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत.अशा परिस्थितीत शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य हेच अनेक कुटुंबांसाठी जगण्याचा आधार ठरत असते.मात्र हे धान्य वेळेवर मिळत नसल्याने संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कामकाजाची तातडीने चौकशी करण्यात यावी, मे व जून २०२६ चे थकीत धान्य त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावे आणि भविष्यात कोणतेही कुटुंब धान्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यात यावी. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम राहावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ००००००००००० ००००००००

 शहापुरात बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

 २४ जण पोलिसांच्या ताब्यात, ५६  हजार ६५  रुपयांची रोकड जमा ठाणे :शहापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जुगार अड्डे , मटके  आदी अवैद्य बाबींचा  सुळसुळाट वाढला असल्याचे दिसून येते. पोलीस अधीक्षक (ठाणे ग्रामीणचे) डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे शहापुरातील  स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून शहापूर शहरातील सावंत विहार,कोकणी स्वाद हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या २४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ हजार ६५ रुपये  रोख व जुगार खेळण्याचे साहित्य तसेच तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. शहापूर तालुक्यातील कसारा,किन्हवली,वाशिंद, शहापूर आदी पोलीस ठाण्याच्य हद्दीत बेकायदेशीर धंदे तसेच अवैध भंगार व्यवसाय देखील वाढले असल्याचे दिसून येत आहेत. जुगार व मटके यांना शालेय विद्यार्थी बळी पडत आहेत. या सर्व गोष्टींचा शालेय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरच्या कारवाईत ठाणे पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनयकुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, पोलीस उपनिरीक्षक निरंजन पाटील, पोलीस शिपाई सचिन बोडके, एस.एस.गायकवाड, आर.टी.निवांगुने, आर. एस. मस्करे, एम.आर.तडवी, चालक पोलीस शिपाई ए.पी. हिलगुडे आदींच्या सहभाग होता. तालुक्यातील बेकायदेशीर धंदे कायमचे बंद करण्याचे काम पोलिसांनी हाती घ्यावे अशी जनतेची मागणी आहे.

मुंबई पोर्टमध्ये इंदिरा गोदीच्या खाजगीकरणाविरुद्ध कामगारांची तीव्र निदर्शने

मुंबई : केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या  खाजगीकरणाच्या धोरणानुसार मुंबई पोर्ट प्रशासनाने २१ जानेवारी २०२६ रोजी इंदिरा गोदीच्या खाजगीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावानुसार जून २०२६ पासून इंदिरा गोदीचे दोन…

– विद्यालंकार मुंबई महानगर योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

– आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ ची संकल्पना “Yoga for Healthy Ageing” (निरोगी वृद्धत्वासाठी योग) ही सर्व वयोगटांतील व्यक्तींना निरोगी, सक्रिय आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेरणा…

न्यू इंग्लिश स्कूलच्या शतक महोत्सवाचा समारोप १५ जूनला

 गडकरी रंगायतन येथे होणार भव्य सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे ठाणे : पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, राम मारुती रोड, ठाणे या ऐतिहासिक शाळेच्या शतक महोत्सवी…

नाले सफाईची हाथसफाई करणाऱ्या ठेकेदाराची पालिका अधिकाऱ्याला धमकी

ठेकेदाराविरोधात  पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून कामाचे बिल अदा करू नये स्थायी समिती सदस्यांची  मागणी कल्याण : कल्याण पूर्वेतील पालिकेच्या नाले सफाई कामाच्या ठेकेदाराने नाले सफाई किती याची कोणतीच माहिती संबंधित विभागाच्या…

– बोधगयाच्या धर्तीवर कल्याणच्या बुद्धभूमीचा विकास होणार

 मुंबईतील तीन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत ऐतिहासिक निर्णय; वादावर कायमचा तोडगा कल्याण : कल्याण-बिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून, या जागेचा विकास बिहारमधील जागतिक…

 केडीएमसीच्या कारवाईमुळे १,२०० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच केलेल्या कारवाईमुळे तिसाई शाळेत गोंधळ  कारवाई थांबवण्यासाठी प्रशासक आणि पालकांचे आवाहन कल्याण: कल्याण-बिवली महानगरपालिकेने कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरातील तिसाई शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या तिसाई शाळेची इमारत…

 आठवडी बाजार बंद करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की

केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा कल्याण : आठवडी बाजार तात्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  ‘ई’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आंदोलनात महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना (शिंदे) उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण  तालुका प्रमुख गजानन पाटील  यांनी केले. काळूबाई चौक येथून सुरू झालेला मोर्चा ‘ई’ प्रभाग कार्यालयावर धडकला. मात्र केडीएमसीमध्ये शिवसेना सत्तेत असतांना देखील प्रशासनावर अंकुश नसल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा यामुळे रंगली होती. आंदोलनकर्त्यांनी महापालिका हद्दीतील सर्व आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याची मागणी करत प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला. साप्ताहिक बाजारांमुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले की, गेल्या महिन्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आठवडी बाजार बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. आठवडी बाजारांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ०००००