Category: मुंबई

Mumbai news

वेतनाच्या विलंबामुळे कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर काही तासांत आंदोलन मागे कल्याण : वेळेवर वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी खंबाळपाडा परिसरातील हजेरी शेडवर कामबंद आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम झाला आणि हजेरी शेडवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा काम सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील काही  प्रभागांच्या स्वच्छतेचे कंत्राट सुमित एल्कोप्लास्ट कंपनीला दिले आहे. या कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ठरावीक तारखेला वेतन दिले जाते. मात्र, यावेळी वेतन मिळण्यास झालेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी कामबंद आंदोलन छेडले. काही तास चाललेल्या आंदोलनानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग, ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत तोडगा निघाला. वेतन तातडीने देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा स्वच्छता कामाला सुरुवात केली. याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले की, बँकिंग प्रक्रियेतील तांत्रिक कारणामुळे वेतन देण्यास एका दिवसाचा विलंब झाला. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराला कडक सूचना देण्यात आल्या असून, पुन्हा अशी निष्काळजीपणा झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

१९ वर्षाच्या अन्यायाविरोधात रहिवाशांचा म्हाडा कार्यालयावर मोर्चा

मुंबई / रमेश औताडे म्हाडा न्यू पीएमजीपी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मुलुंड (पूर्व) येथील १,३९९ सभासदांचा पुनर्विकास प्रकल्प सन २००७ पासून सुरू असून, तब्बल १९ वर्षे उलटूनही हा प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. आजही ६०६सदनिका व ४७ दुकाने म्हाडा प्रशासनाकडून बांधून पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पातील रहिवासी व सभासद गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या हालअपेष्टा सहन करीत आहेत. गेल्या वर्षभरापासून बाधित रहिवासी सभासदांनी म्हाडा मुख्यालय, बांद्रा येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व उपाध्यक्ष (VP) यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळ देण्यात येत नव्हती. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत जनकल्याण रहिवासी विकास समितीच्या वतीने ९ जूनला म्हाडा मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे २५० हून अधिक बाधित रहिवासी सभासद सहभागी झाले होते. तसेच छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक मा. नामदेवराव जाधव व समितीचे कायदेशीर सल्लागार यांनी या आंदोलनास मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने नागरिक म्हाडा कार्यालयात दाखल झाल्याचे समजताच, नागरिकांच्या भेटीचा दिवस असतानाही संबंधित वरिष्ठ अधिकारी कार्यालयातून निघून गेले. तसेच प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या नागरिकांना इमारतीमध्ये प्रवेश करण्यासही मज्जाव करण्यात आला. यानंतर मा. नामदेवराव जाधव  यांच्या उपस्थितीत काही प्रतिनिधी सभासदांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून बाधित रहिवासी सभासदांची बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात येईल, असे जनकल्याण रहिवासी विकास समितीला आश्वासन देण्यात आले.

 दिवंगत अजित पवार प्रकरणी आझाद मैदानात उपोषण

 रमेश औताडे मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित अलीकडील घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते जगदीश कुमार इंगळे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. इंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संबंधित घटनेमागील वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष तपासणी होऊन सत्य समोर आणावे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, संबंधित घटनेबाबत अधिकृत तपास यंत्रणांकडून कोणताही अंतिम निष्कर्ष जाहीर झालेला नसल्याने, घातपात किंवा अन्य कोणत्याही कारणांबाबत निश्चित दावा करण्यात आलेला नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकले नाही असे सांगत बिगर सातबारा शेतकरी संघटनेने या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बासरीवादक राकेश चौरसिया यांना प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

मुंबई, ११ जून : प्रख्यात बासरीवादक आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते राकेश चौरसिया यांना २०२४-२५ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय रंगकला आणि संगीत क्षेत्रातील हा…

अनिता पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी; सहआरोपी करण्याचीही मागणी

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. अनिता पाटील यांच्या सख्ख्या भावावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. संबंधित घटनेमुळे शहराची प्रतिमा मलिन…

वंदे मातरम टीमतर्फे महा अन्नदान कार्यक्रम संपन्न

मुंबई-वंदे मातरम टीमचे राष्ट्रीय सल्लागार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  सूर्यकांत पांडुरंग मोरे यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबई येथील के. ई. एम. हॉस्पिटल परिसरात भव्य महा अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  समाजातील गरजू, रुग्णांचे…

जनकल्याण रहिवासी विकास समितीचा म्हाडा कार्यालयावर धडक मोर्चा

राजेंद्र साळसकर मुंबई- म्हाडा न्यू पीएमजीपी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मुलुंड (पूर्व) येथील १,३९९ सभासदांचा पुनर्विकास प्रकल्प सन २००७ पासून सुरू असून, तब्बल १९ वर्षे उलटूनही हा प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. आजही ६०६ सदनिका व ४७ दुकाने म्हाडा प्रशासनाकडून बांधून पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पातील रहिवासी व सभासद गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या हालअपेष्टा सहन करीत आहेत. गेल्या वर्षभरापासून बाधित रहिवासी सभासदांनी म्हाडा मुख्यालय, बांद्रा येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व उपाध्यक्ष (VP) यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळ देण्यात येत नव्हती. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत जनकल्याण रहिवासी विकास समितीच्या वतीने ९ जून २०२६ रोजी म्हाडा मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे २५० हून अधिक बाधित रहिवासी सभासद सहभागी झाले होते. तसेच छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक  नामदेवराव जाधव  व समितीचे कायदेशीर सल्लागार यांनी या आंदोलनास मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने नागरिक म्हाडा कार्यालयात दाखल झाल्याचे समजताच, नागरिकांच्या भेटीचा दिवस असतानाही संबंधित वरिष्ठ अधिकारी कार्यालयातून निघून गेले. तसेच प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या नागरिकांना इमारतीमध्ये प्रवेश करण्यासही मज्जाव करण्यात आला. यानंतर नामदेवराव जाधव  यांच्या उपस्थितीत काही प्रतिनिधी सभासदांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून बाधित रहिवासी सभासदांची बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

मोठागाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या

आमदार राजेश मोरे यांची कल्याण डोंबिवली आयुक्तांकडे मागणी आरती परब डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथे दिवा- वसई रेल्वे मार्गावरील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या (ROB) बांधकामासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबवून कामाला गती द्यावी, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली आहे. मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्त गोयल यांना निवेदन सादर करून निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम तसेच शहर अभियंता अनिता परदेशी उपस्थित होत्या. मोठागाव परिसरात मानकोली खाडी पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठागाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वाहन चालकांचा वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. तसेच रेल्वे फाटक ओलांडताना अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाबही समोर येत आहे. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना दररोज या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मंजुरी मिळूनही कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्तांकडे विचारणा केली असता, संबंधित कामाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले. मोठागाव रेल्वे उड्डाण पूल साकार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 भिसेगाव दिशेकडील तिकीट खिडकी आता दोन शिफ्टमध्ये सुरू

कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांचे विशेष प्रयत्न कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश अशोक गायकवाड कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, भिसेगाव बाजूच्या तिकीट बुकिंग खिडकीचे कामकाज शनिवारपासून दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून, तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून कर्जत रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनकडून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना लांबच लांब रांगा, वेळेचा अपव्यय आणि तिकीट मिळवण्यासाठी होणारा त्रास यामुळे ही मागणी अधिक जोर धरत होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अखेर सकारात्मक निर्णय घेतला आहे. यासाठी कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे. या नव्या व्यवस्थेमुळे भिसेगाव परिसरातील तसेच स्थानकाच्या त्या बाजूने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे. तिकीट बुकिंग खिडकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : पहिली शिफ्ट : सकाळी ६.३० ते दुपारी २.३० ️ जेवणाची वेळ : दुपारी १२.१५ ते १२.३५ हिशोबाची वेळ : दुपारी २.३० ते २.४५ ️ दुसरी शिफ्ट : दुपारी २.४५ ते रात्री १०.३० ️ जेवणाची वेळ : रात्री ८.४० ते ९.०० या निर्णयामुळे कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत केले जात आहे. ००००००००

ठाणे शहरातील काही भागात शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए मार्फत आनंदनगर ते साकेत पर्यत एलिव्हेटेड रोडचे कामादरम्यान इंदिरा नगर संपकडे जाणारी ८१३ मि.मी व्यासाची उर्ध्ववाहिनी बाधित होत असल्याने एमएमआरडीएकडून ९०० मि.मी व्यासाची जलवाहिनी…