Category: मुंबई

Mumbai news

आरक्षण उपवर्गीकरणासाठी पावसाळी अधिवेशनात एल्गार

रमेश औताडे मुंबई : अनुसूचित जाती आरक्षण ऊपवर्गीकरणाचा निर्णय शासनाने १५ जूनपर्यंत जाहीर न केल्यास पावसाळी अधिवेशनादरम्यान २५ जूनला आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मातंग समाजाचे नेते राज्य समन्वयक बाबुराव मुखेडकर यांनी दिला. मातंग समाजाच्या सोबत इतर जातीना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.आजच्या बैठकीत इतर जातीचे नेते मोठ्या प्रमाणात हजर झाले होते. मातंग समाजाला आरक्षण पाहिजे असा समज सर्वत्र पसरला आहे. मात्र मातंग समाजा बरोबर इतर जातीला आरक्षण पाहिजे असे बाबुराव मुखेडकर यांनी यावेळी सांगितले. सर्वोच्य न्यायालयाने आदेश दिले आहेत. अनेक समित्या नेमल्या आहेत. मग हे आरक्षण संविधानिक नाही कसे? असा सवाल यावेळी करण्यात आला. सरकारने वेळोवेळी आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. आंदोलन तीव्र झाले की शिष्टमंडळाला बोलवायचे व वेळ मारून पुढील वेळी बघू असे आश्वासन दिले की काम झाले. मात्र अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागते. असे किती दिवस चालणार? असा सवाल बाबुराव मुखेडकर यांनी केला. 00000000

ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी प्रवीण तोरणे

रमेश औताडे मुंबई : सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तोरणे  यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ख्रिश्चन सेल प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश निरीक्षक सेलचे अध्यक्ष धनंजय भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब साळवे , खासदार निलेश लंके  जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे, तसेच जनसेवक धामोरकर, संजय भिमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध पक्षीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रवीण तोरणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रवीण तोरणे यांनी समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत जनसामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळी खासदार निलेश लंके म्हणाले की, ख्रिस्ती समाजाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. बाळासाहेब साळवे यांनी ज्या मागण्या चे पत्र दिले आहे त्यासाठी  पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 अपना बाजारच्या ७८ वा वर्धापन दिनानिमित्त मुंबई: अपना बाजारचा ७८ वा वर्धापन दिन रक्तदान शिबिराचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.  मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर पर्यटन  तसेच मुंबईत रक्ताचा तुटवडा…

विकास नियोजन रस्त्यातील बाधित झोपडीधारकांना हक्काची घरे मिळणार

  मदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नांना यश  मुंबई,: मालाड पूर्व कुरार गाव भागातील संस्कार कॉलेज ते जी. जी. महालकरी मार्ग ह्या नवीन नियोजित १८.३० मी विकास नियोजन रस्त्यातील पहिल्या टप्प्यातील…

– सिद्धेश्वर एक्सप्रेस मधील दरोड्याचा प्रयत्न

 मध्य रेल्वे आरपीएफ पथकाने हाणून पाडला- याप्रकरणी ९ महिलांना अटक (राजेंद्र साळसकर) मुंबई- मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने २२ एप्रिलला गाडी क्रमांक १२११५ या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि या गुन्ह्याप्रकरणी…

– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक

 पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज  पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील…

कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनबाहेर कचऱ्याचे साम्राज्य

  मुंबई हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. परंतु रेल्वे स्थानकावर चढताना फलाट क्रमांक दोनच्या बाहेर वर चढताना मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले…

एमटीएनएलचा थरारक विजय

– रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशन टी-२० क्रिकेट स्पर्धा हर्ष घरसून ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ मुंबई :रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित टी-२० टूर्नामेंट २०२५-२६ चा अंतिम सामना एमटीएनएल आणि ऍडव्हान्स क्रिकेट क्लब या दोन बलाढ्य संघांमध्ये…

रघुनाथ भोईर यांच्या दिशादर्शक कविता संग्रहाचे प्रकाशन

  कल्याण: नडगाव गावाचे सुपुत्र तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ बौद्धाचार्य रघुनाथ भोईर यांच्या दिशा दर्शक या कविता संग्रहाचे पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या…

वंद्य वंदे मातरम् पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन

कल्याण: जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्याने अक्षरमंच प्रकाशनचे वतीने डॉ योगेश जोशी लिखित वंद्य वंदे मातरम् या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन प्रा. गजेंद्र दीक्षित, प्रा. शैलेश रेगे आणि लेखक हेमंत नेहते…