Category: मुंबई

Mumbai news

 सद्भावना वृद्धाश्रमात निराधार वृद्धांना मोफत आधार

अंथरुणाला खिळलेल्यांसाठीही विशेष सेवा रमेश औताडे मुंबई : वाढते शहरीकरण, तुटत चाललेली संयुक्त कुटुंब व्यवस्था आणि वृद्धांकडे होणारे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर गुजरातमधील राजकोट येथे उभारण्यात आलेला “सद्भावना वृद्धाश्रम” अनेक निराधार वृद्धांसाठी आशेचा किरण ठरत आहे. “जगातील सर्वात मोठा वृद्धाश्रम” असा दावा करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये निराधार, आजारी, अंथरुणाला खिळलेले तसेच कर्करोग आणि कोमाग्रस्त वृद्धांना पूर्णपणे मोफत निवारा, वैद्यकीय उपचार आणि मानवी आधार दिला जात आहे. विनुभाई बघुभाई नारोळा यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या वृद्धाश्रमात वृद्धांना केवळ राहण्याची सोय नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली जात आहे. तब्बल ४०० खाटांची व्यवस्था असलेल्या या प्रकल्पात सध्या ७०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक राहत असून, अनेक वृद्धांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माणुसकीचा आधार मिळत आहे. वृद्धाश्रमामध्ये नियमित आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, मानसिक समुपदेशन, पौष्टिक आहार, औषधोपचार आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून, प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र सेवा देत आहेत. कर्करोग आणि कोमामध्ये असलेल्या रुग्णांसाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे संस्थेने सांगितले. संस्थेच्या माहितीनुसार, वृद्धाश्रमात धर्म, जात, भाषा किंवा आर्थिक स्थिती न पाहता गरजू वृद्धांना प्रवेश दिला जातो. “प्रत्येक वृद्धाला कुटुंबासारखी वागणूक मिळाली पाहिजे,” या भावनेतून संपूर्ण प्रकल्प उभारण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. या परिसरात मोठे सभागृह, वाचनालय, आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी जागा तसेच विरंगुळ्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वृद्धांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात. समाजातील नागरिकांनी निराधार, असहाय्य किंवा अंथरुणाला खिळलेले वृद्ध आढळल्यास त्यांना सद्भावना वृद्धाश्रमात आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. “कोणीही वृद्ध एकटा राहू नये,” हा संदेश देत हा प्रकल्प सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. 0000000000

मानवतेच्या पवित्र आध्यात्मिक नवीन युगाचा उत्सव

रमेश औताडे मुंबई: अत्यंत भक्ती, आध्यात्मिक आनंद आणि शांत आदराच्या वातावरणात, मुंबईतील बहाई समुदाय २३ मेला सायंकाळी बहाई केंद्रात बाब यांच्या घोषणेचा पवित्र उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमला होता. हा तो क्षण होता ज्याने मानवतेच्या आध्यात्मिक इतिहासात एका नवीन युगाच्या पहाटेची घोषणा केली. या कार्यक्रमात १८४४ सालच्या त्या ऐतिहासिक रात्रीचे स्मरण करण्यात आले, जेव्हा इराणमधील शिराझ येथील एक तरुण व्यापारी असलेल्या बाब यांनी आपले दिव्य कार्य घोषित केले आणि जगातील धर्मांच्या पवित्र ग्रंथांमध्ये सांगितलेले प्रतिज्ञात पुरुष, बहाउल्लाह यांच्या लवकरच होणाऱ्या आगमनाची घोषणा केली. तीव्र छळ, तुरुंगवास आणि अखेरच्या हौतात्म्यानंतरही, त्यांच्या शिकवणींनी मानवतेला बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांच्या आगमनासाठी तयार केले, ज्यांच्या दूरदृष्टीने मानवजातीच्या एकतेची आणि सार्वत्रिक शांततेच्या स्थापनेची मागणी केली. स्त्री-पुरुषांची समानता, विज्ञान आणि धर्माचा सुसंवाद, पूर्वग्रहांचे निर्मूलन, सार्वत्रिक शिक्षण, न्याय आणि सर्व लोक व राष्ट्रांची मूलभूत एकता. सहभागींनी आशा व्यक्त केली की हे आदर्श आजच्या समाजात अधिक सामंजस्य, करुणा आणि सामूहिक कृतीसाठी प्रेरणा देऊ शकतील. जगभरातील बहाईंसाठी, बाब यांची घोषणा ही बहाई दिनदर्शिकेतील नऊ पवित्र दिवसांपैकी एक आहे आणि मानवजातीच्या आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीसाठी समर्पित असलेल्या जागतिक चळवळीची सुरुवात म्हणून याला गहन आध्यात्मिक महत्त्व आहे. मुंबई बहाई समुदाय बहाई केंद्र मुंबई यांच्या वतीने सांगण्यात आले.

पहिल्या नवी मुंबई ग्लोबल समिटची शानदार सांगता

यू बिझनेस मिट ने केले होते आयोजन नवी मुंबई : नवीन मुंबई मधील यू बिझनेस मीट यांच्या वतीने आयोजित नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील उद्योजकांनी उपस्थित रहात या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान व्यापार उद्योजकता वृद्धिंगत व्हावी या हेतूने या बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड या दोन देशातील व्यवसाय निष्णात प्रभुतींच्या चर्चांमधून अनेक नवनवीन उद्योजक आणि व्यापार संधी उदयास येण्याचे यामुळे चिन्ह निर्माण झाली आहेत. विविध व्यवसाय आस्थापनांना व्यवसाय सुलभता प्रदान करण्याच्या हेतून यू बिझनेस मिट ही संस्था काम करत असते. फाउंडर वैभव सोनटक्के आणि को फाउंडर रवींद्र प्रताप गुप्ता,मंदार दोंदे, विवेक पाटील, समृद्धी वाणी यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई ग्लोबल समिट चे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड यांच्यामध्ये द्विदेशीय व्यवसाय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, फार्मसीटीकल्स, लाइफस्टाइल अँड हेल्थकेअर, बँकिंग, इन्शुरन्स, इंटरनॅशनल मीडिया, रिअल इस्टेट,हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी, टुरिझम अशा क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या पॅनल डिस्कशनचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध पत्रकार महेश म्हात्रे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे असिस्टंट एडिटर चित्तरंजन टेंभेकर, सिटी बेल समूह संपादक मंदार दोंदे यांनी मॉडरेटर म्हणून या पॅनल डिस्कशन मध्ये उत्तमरित्या सुसंवाद घडवून आणला. यू बिझनेस मिट यांच्या वतीने व्हर्च्युअल स्टुडिओ, मीटिंग रूम आणि एम ओ यू साईन करण्याकरता लीगल टीम देखील तैनात केली होती. अनेक उद्योजकांना या सुविधांचा लाभ झाला. बेलापूर येथील दि पार्क या तारांकित हॉटेलमध्ये सोमवार दिनांक १८ मे रोजी हे समिट संपन्न झाले. आमदार प्रशांत ठाकूर, निलेश म्हात्रे यांनी आवर्जून उपस्थित रहात नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. थायलंड येथून PEITA सदस्य तथा माजी राजदूत थाराडोल थाँगग्रंग आणि पिटा सदस्य नरेन पियासच्चादेश हे उपस्थित होते तर इंजीनियरिंग इन्स्टिट्यूट ऑफ थायलंडचे संचालक तथा PEITA चे सल्लागार प्रो. डॉ. चियांचुंग ओदि कलायांनामित्र, थायलंड पंतप्रधान कार्यालयातील फॉरेन अफेयर्स सचिव प्रसर्त पियासाचादेश, वर्ल्ड पीस फाउंडेशनच्या संस्थापिका पी.ओरावान हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत होते. एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव असणारे ओमकार हरी माळी यांची चित्तरंजन टेंभेकर यांनी घेतलेली मुलाखत या समिटचे विशेष आकर्षण ठरली. तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट चे अध्यक्ष सतीश शेट्टी यांची रवींद्र प्रताप गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत देखील लक्षवेधी ठरली. ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक डॉक्टर संजय भिडे, ह्यूमन केअर वर्ल्ड वाईड चे डी एस चक्रवर्ती, गोमाता विजन चे विकास कोळी, यू के एस रिसॉर्ट चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संतोष पाटील, तेरणा हॉस्पिटलचे हेल्थकेअर ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट डॉक्टर मनीष राय, निवृत्त महासंचालक यशवंत ठाकरे, विभव इंटरनॅशनल कल्चरल अँड एज्युकेशनल फोरम चे दिलीप ठाणेकर,टेलेक्स चे जितेश पाटील आणि जयेश पाटील, प्लास्टिक सर्जन तथा कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ शंकर सावंत यांनी ग्लोबल समिट आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. यु बिझनेस मीट चे फाउंडर आणि एन्जॉय को वर्किंग स्पेस, वेब प्रिंट सोल्युशन्स या संस्थांचे संचालक असणारे वैभव सोनटक्के यांनी या समिटच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले. तर या ग्लोबल बिझनेस समिट चे आयोजनात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या समृद्धी वाणी यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. ००००००००००००

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०४ धोकादायक इमारतींची यादी जाहीर

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२६-२०२७ या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५०४ इमारती या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६४ अन्वये धोकादायक इमारती…

 झैद – समृद्धीला अग्र मानांकन

 एम सी एफ कॅरम स्पर्धा मुंबई:महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या मान्यतेने २३ ते २५ मे दरम्यान ११ वी एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा…

जलद संवादासाठी टाटा तंत्रज्ञानाची नवी घोषणा

मुंबई / रमेश औताडे टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि जगातील नंबर एक एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्स फोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्स फोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. असे गिरीश हड़कर, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अरुंधती भट्टाचार्य, प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया सेल्सफोर्स आणि मनकिरन चौहान एमडी यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले. या भागीदारीबद्दल संजय दत्त, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे एमडी आणि सीओ यांनी सांगितले की, सेल्सफोर्स सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे आम्हाला डेटा, इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यांना एकाच सिस्टीममध्ये आणता आले. अरुंधती भट्टाचार्य, प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया  सेल्सफोर्स यांनी सांगितले की, कोणतेही तंत्रज्ञान वापरताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की ते खरोखर ग्राहकाला अधिक चांगली सेवा देते का? टाटा रियल्टीच्या बाबतीत याचे उत्तर स्पष्ट आहे. प्रीमियम प्रकल्प आणि ग्राहक-केंद्रित कामासाठी ओळखली जाणारी टीआरआयएल आता आपले कामकाज आणि ग्राहक सेवा आणखी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पुढील टप्प्यात, कंपनी आपल्या कमर्शियल रिअल इस्टेट व्यवसायातही सेल्सफोर्सचा विस्तार करत आहे. तसेच रेसिडेन्शियल विभागात एजंटफोर्स मार्केटिंग आणि डेटा ३6० च्या मदतीने अधिक वैयक्तिकृत सेवा आणि ग्राहकांविषयी सखोल माहिती देण्यावर भर दिला जात आहे.

बेस्टला ‘वेट लीज’ खासगीकरणाचा विळखा

 आठ वर्षांत ९,२८६ कोटींचा तोटा मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमावर आर्थिक संकट अधिकच गडद होत असून, गेल्या आठ वर्षांत झालेला तब्बल ९,२८६ कोटी रुपयांचा तोटा हा नैसर्गिक नसून…

नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट

आमदार प्रशांत ठाकूर यांची समिटला सदिच्छा भेट नवी मुंबई : अशोक गायकवाड नवीन मुंबई मधील यू बिझनेस मीट यांच्या वतीने आयोजित नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान व्यापार उद्योजकता वृद्धिंगत व्हावी या हेतूने या बेलापूरच्या दि पार्क हॉटेल मध्ये बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी या समिटला सदिच्छा भेट देऊन आयोजकांना आगामी वाटचाली करता शुभेच्छा दिल्या तसेच थायलंड येथून आलेले PEITA सदस्य तथा माजी राजदूत थाराडोल थाँगग्रंग आणि पिटा सदस्य नरेन पियासच्चादेश यांना देखील शुभेच्छा दिल्या. या समिटमध्ये विविध व्यवसायिकांच्या पॅनल डिस्कशन साठी मॉडरेटर म्हणून काम पाहणाऱ्या सुप्रसिद्ध पत्रकार महेश म्हात्रे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे असिस्टंट एडिटर चित्तरंजन टेंभेकर यांचे देखील आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले. यू बिझनेस मिट चे फाउंडर वैभव सोनटक्के आणि को फाउंडर रवींद्र प्रताप गुप्ता,पत्रकार मंदार दोंदे, पत्रकार विवेक पाटील, समृद्धी वाणी यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई ग्लोबल समिट चे आयोजन करण्यात आले होते.

शिळफाटा उड्डाणपुलाखालील अतिक्रमण विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

 प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष दिवा : दिवा – मुंब्रा सीमेवर असलेले शिळफाटा तसेच भारत गिअर्स उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंग, लोखंडी केबिनच्या अतिक्रमणा विरोधात समाजसेवक विनोद वास्कर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हॉट्सॲपद्वारे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची प्रशासनाने दखल घेत तक्रार क्रमांक २६०३२२५ नोंदवला असून, संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठवण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. “आपली निवेदन/तक्रार संबंधित विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. सदर तक्रारीवरील कार्यवाहीबाबत अहवाल प्राप्त होताच आपणांस अवगत करण्यात येईल,” असे लेखी उत्तर तक्रारदारास देण्यात आले आहे. शिळफाटा उड्डाणपुलाखाली NHAI च्या नियमानुसार कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा वाहन पार्किंग  करण्यास परवानगी नसतानाही येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग व लोखंडी केबिन उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेथे रोजच्या रोज मोठ्या लक्झरी बसेस, ट्रक, रिक्षा, टुरिस्ट गाड्या, चार चाकी आणि दु चाकी वाहने उभी असल्यामुळे वाहतूक व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासन प्रत्यक्षात कारवाई करते का, अतिक्रमण हटवले जाते का, याकडे आता शिळ- डायघर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. “प्रशासनाने तक्रार क्रमांक देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता संबंधित विभाग उड्डाणपुलाखालील अनधिकृत पार्किंग व केबिनबाबत काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,” अशी प्रतिक्रिया समाजसेवक विनोद वास्कर यांनी दिली.

दिव्यातील दुकानदारांनी दुकानात कचरापेटी ठेवावी- ऍड. आदेश भगत

आरती परब दिवा :  दिवा शहरात वाढत्या शहरीकरणामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक घटकाने जबाबदारी उचलण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी व्यक्त केले आहे. यासाठी शहरातील लहान- मोठ्या दुकानदारांनी आपल्या दुकानात कचरापेटी (डस्टबीन) ठेवणे बंधनकारक करावे, अशी मागणी त्यांनी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिवा शहर हे पंचक्रोशीतील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ बनले असून येथे खरेदीदारांची मोठी वर्दळ असते. वाढत्या ग्राहकसंख्येमुळे शहरात अनेक दुकाने, हॉटेल्स, स्नॅक्स कॉर्नर तसेच गोडाऊन्स उभारण्यात आले आहेत. मात्र बहुतांश दुकानांमध्ये कचरापेटीची व्यवस्था नसल्याने ग्राहकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून निर्माण होणारा कचरा थेट रस्त्यावर फेकला जात असल्याने अस्वच्छतेची समस्या अधिक गंभीर होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. “स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून शहरातील प्रत्येक नागरिक आणि व्यापाऱ्याची आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानात छोटी कचरापेटी ठेवली तर ग्राहक रस्त्यावर कचरा टाकण्याऐवजी त्याचा योग्य वापर करतील,” असे ऍड. आदेश भगत यांनी सांगितले. तसेच, अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच इमारतींच्या मागील भागात कचरा टाकण्याचे प्रकार वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. “नागरिकांनीही उपलब्ध कचरापेटीचाच वापर करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य केले, तर ‘स्वच्छ दिवा, सुंदर दिवा’ हे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते,” असेही त्यांनी म्हटले आहे.