मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांन सहावर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेआहे. एन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे एन निवडणूकीच्या धामधुमीत त्यांना काँग्रेसमुक्त करण्यात आले आहे. देशाला काँग्रेसमुक्त करण्याचा नारा देणाऱ्या भाजपाच्या वळचणीला निरुपम गेल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. दरम्यान संजय निरुपम यांनी आपण निवडणूक लडविणार असल्याचे आज जाहिर केले.
अमोल कीर्तीकर यांना तिकीट दिल्यामुळे नाराज
संजय निरुपम हे काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे नेते होते. गेल्या कित्येक वर्षांपासून ते पक्षाचे काम करत होते. या लोकसभा निवडणुकीत उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती.मात्र ऐनवेळी ही जागा महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात आली. आता या जेगावर अमोल कीर्तीकर यांना तिकीट देण्यात आले आहे. याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते.
6 वर्षांसाठी केले होते निलंबित
मी कोणत्याही परिस्थिती अमोल कीर्तीकर यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने काँग्रेसच्या धोरणांवर टीका करत होते. याच कारणामुळे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या निर्णयानंतर संजय निरुपम यांनीदेखील मोठा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसे पत्र निरुपम यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवले आहे.
संजय निरुपम यांचे खरगेंना खरमरीत पत्र
निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना खरगे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात असलेला मी निर्णय घेत आहे. मी आज माझ्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा. खूप खूप धन्यवाद, असं निरुपम आपल्या पत्रात खरगे यांना उद्देशून म्हणाले आहेत.
