Author: bittambatami.com

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे हे ३६ वर्षाच्या सेवापूर्ती नंतर नियतवयोमानानुसार निवृत्त झाले. यानिमित्तानं आयोजित सन्मान सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात काल संपन्न झाला. या कार्यक्रमास…

पनवेल जॉब ड्राईव्ह २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

 शेकडो युवक-युवतींना मिळाल्या रोजगाराच्या संधी पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांच्या मालिकेअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकलव्य फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला “पनवेल जॉब ड्राईव्ह २०२६” हा भव्य रोजगार मेळावा आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. शेकडो युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवून रोजगाराच्या संधींचा लाभ घेतला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याला सकाळपासूनच युवक-युवतींची मोठी गर्दी झाली होती. रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि अनुभव यानुसार विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधत मुलाखती दिल्या. या मेळाव्यात बँकिंग, माहिती तंत्रज्ञान (आयटी), आयटीईएस, रिटेल, ग्राहक सेवा, फायनान्स, विमा, बॅक ऑफिस, मानव संसाधन (एचआर) आदी विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. अनेक कंपन्यांनी जागेवरच प्राथमिक मुलाखती घेत पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे सहभागी युवक-युवतींना रोजगारासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध झाले. युवकांना रोजगाराच्या संधी त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देणे, उद्योग क्षेत्र आणि रोजगार शोधणारे युवक यांच्यातील दरी कमी करणे तसेच कौशल्याधारित रोजगाराला चालना देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या उद्देशाला प्रतिसाद देत शेकडो युवक-युवतींनी उत्साहाने सहभाग घेतला. या रोजगार मेळाव्यात ३आय इन्फोटेक लिमिटेड, रिलायन्स, टीमलीज सर्व्हिस, ओटू बीज सर्व्हिसेस, यशस्वी ग्रुप, एस. एच. केळकर लिमिटेड, सुधरलँड, महिंद्रा इंटर्ग्रेटेड बिझनेस सोल्युशन, एचडीएफसी बँक, एनआयआयटी फाऊंडेशन, टाटा कन्स्लटी सर्व्हिसेस, डिजीटाईड सोल्युशन, एचडीबी फायनांशल सर्व्हिसेस, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स, भारती एअरटेल, वेस्टसाईड ट्रेंट लिमिटेड, एसबीआय कॅप सिक्युरिटीज आदी कंपन्यांचा सहभाग होता.  कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, संवाद कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे मुलाखती घेतल्या. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये धावपळ करण्याची गरज भासली नाही. एकाच छताखाली विविध क्षेत्रांतील कंपन्यांशी संपर्क साधण्याची संधी उपलब्ध झाल्याने सहभागी युवक-युवतींनी समाधान व्यक्त केले. रोजगाराभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आयोजकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी कंपन्या, एकलव्य फाउंडेशनचे पदाधिकारी, स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि सर्व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या योगदानाबद्दल आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ००००००००

नवी मुंबईतील जनगणना विषयक कामकाजाचा आढावा

नवी मुंबई : जनगणना २०२७ बाबतच्या कामकाजास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात १५ मे पर्यंत स्वयंगणना केल्यानंतर आता जनगणना विषयक माहिती गोळा करण्याचे काम प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सुरू झाले आहे.…

नवीन पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन

००००००००० पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त सेवाभावी संस्था रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या विद्यमाने ३० वर्षावरील महिलांसाठी कॅन्सर जनजागृती व मोफत कॅन्सर तपासणी…

महावितरणाच्या बेफाम वीज खंडित विरोधात जनआक्रोश

०००००० कल्याण : कल्याण पूर्व ग्रामीण परिसरात महावितरणकडून वारंवार वीज खंडित प्रकार आता नागरिकांसाठी असह्य ठरत आहे. पहाटे नागरिक साखर झोपेत असताना वीज गायब होते, भरदुपारी कडाक्याच्या उष्णतेत कोणतेही ठोस…

नाशिकमध्ये पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर

हरिभाऊ लाखे नाशिक : महापालिकेमार्फत पाथर्डी फाटा- पाथर्डी गाव पिंपळगाव खांब फाटा या महत्त्वाच्या मार्गावरील नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मान्सूनपूर्व तयारीला वेग देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील ओएफसी, महा आयटी सीसीटीव्ही आणि एमएनजीएल गॅस पाइपलाइनची सर्व युटिलिटी कामे शंभर टक्के पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या नवीन नाशिक विभागाअंतर्गत येणारा हा डांबरी रस्ता सुमारे ३.८६२ किलोमीटर लांबीचा असून, ३१ मे २०२६ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. वाढती वाहतूक आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता रस्ते मजबुतीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. सध्या मार्गावरील नादुरुस्त पॅचेसची दुरुस्ती सुरू असून, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. स्टॉर्म वॉटर लाइन अंतर्गत २०० मीटर काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. महापालिका प्रशासनाने ओएफसी, गॅस पाइपलाइन आणि ड्रेनेज कामांमुळे भविष्यात पुन्हा रस्ते खोदकाम होऊ नये यासाठी संबंधित विभागांसोबत समन्वय बैठका घेतल्या आहेत. वाहतुकीवरील परिणाम कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कामांचे नियोजन करण्यात आले असून, दर्जेदार साहित्याचा वापर करून पावसाळ्यात खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी विभागीय पथक सतर्क ठेवण्यात आली असून रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या आणि युटिलिटी नेटवर्कचा एकत्रित आढावा घेऊन कामांना गती देण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. कोट महापालिकेकडून संबंधित विभाग व यंत्रणांच्या समन्वयातून कामांना गती देण्यात येत आहे. मान्सूनपूर्व सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुविधायुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. – मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका, नाशिक

शेतकऱ्यांच्या वेदना आणि श्रद्धेचा संवेदनशील प्रवास; ‘देऊळ बंद २’ ठरतो प्रभावी अनुभव

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक वास्तव आणि अध्यात्म यांचा संगम घडवणारे चित्रपट क्वचितच पाहायला मिळतात. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’मधून श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मानवी संघर्ष यांचा वेगळा…

टिटवाळा इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

  संघर्ष रहिवासी संघटनेचे केडीएमसी, पोलिसांना पत्र कल्याण : टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटना, तसेच इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी संघर्ष…

२५ दिवसीय योग महोत्सवाचा जीवनदीप महाविद्यालयात शुभारंभ

    कल्याण : जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दिनांक २८ मे रोजी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, आरोग्य योगा अँड…