Author: bittambatami.com

आंतरजातीय विवाहाच्या रागातून बापाने केली मुलीची हत्या

तीन दिवसांनंतर वडिलांना अटक कल्याण : कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहणाऱ्या विवाहित मुलीची हत्या करून फरार झालेल्या वडिलला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर झालेल्या चौकशीत या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद वसईकर यांनी तीन दिवसांपूर्वी आपली मुलगी गायत्रीची धारदार शस्त्राने हत्या केली होती. लग्नानंतर ती माहेर आली होती. घटनेनंतर विनोद वसईकर हा फरार झाला होता. बाजारपेठ पोलिसांनी शोधमोहीम राबवत अखेर त्याला ताब्यात घेतले. तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे, गायत्रीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन इतर जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला होता. याच गोष्टीचा राग विनोद वसईकर याचा मनात कायम होता. त्यांनी मुलीसाठी दोन वेळा साखरपुड्याची तयारी केली होती, मात्र गायत्रीने ते प्रस्ताव नाकारले होते. त्यानंतर तिने प्रेमविवाह केला. घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील आणि मुलगी यांच्यात या विषयावरून पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी धारदार शस्त्राने गायत्रीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर विनोद वसईकर घटनास्थळावरून पसार झाला. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शोधमोहीम राबवून त्यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांन मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.

परळ येथे एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबीर संपन्न 

०००००००० ०००००००० परळ: फेस्कॉम, मुंबई प्रादेशिक विभागाचे सुरेश ईश्वर पोटे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र, परळ येथे एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत संपन्न झालेल्या या शिबिराचा लाभ ७० ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात यशस्वीपणे पार पडला.  शिबिरासाठी योगेश तोडकर व मनोहर शिंदे यांनी मोलाचे योगदान व मार्गदर्शन केले. स्वामी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात एनसीएमसी नोंदणी शिबिर आयोजित केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सुरेश पोटे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.…

महेंद्रशेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय- रामशेठ ठाकूर

 रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळा साजरा उलवे : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे शुक्रवारी ‘कृतज्ञता सोहळा’ एम. जी. ग्रुपतर्फे दणक्यात साजरा करण्यात आला. रामशेठ हे सुप्रसिद्ध उद्योजक असल्याने त्यांचा भव्य सत्कार बांधकाम व्यावसायातील डेल्टा ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीन गाजीपारा, टुडे ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर ब्रदेशभाई शहा, सोनाली रिअॅलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर मयुरेश चौधरी यांच्या हस्ते एम. जी. ग्रुपचे प्रमुख महेंद्रशेठ घरत यांनी करून दाखवला. यावेळी रामशेठ ठाकूर यांना गुरू समजून आयुष्याची वाटचाल करणारे महेंद्रशेठ घरत यांनी गुरुदक्षिणा म्हणून रोलॅक्सचे अनोखे घड्याळ भेट दिले आणि गुरु-शिष्याचे नाते अनोखे असते हे दाखवून दिले. सत्काराला उत्तर देताना माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, “महेंद्रशेठ  यांनी दातृत्वाचा वसा माझ्याकडून घेतला आहे; परंतु तो एक पाऊल पुढे जाऊन माझ्यापेक्षा वेगळे समाजोपयोगी काम करतोय. घरे, बंगले, गाड्या आपल्या सहकाऱ्यांना देऊन त्यांचेही आयुष्य उजळत आहे. जे मलाही जमले नाही. ‘सुखकर्ता’ बंगल्यावरून दिनदुबळ्यांची, गरजवंतांची तो ज्या पद्धतीने सेवा करतोय, याचा मला रास्त अभिमान आहे. त्याने आज कामगार क्षेत्रात जागतिक पातळीवर आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. बैठका व पर्यटनाच्या माध्यमातून त्याने संपूर्ण जग पालथे घातले आहे. हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे राजकारणात आमचे प्रवाह वेगळे आहेत, पण नातेसंबंधांत ते कधीही आडवे येणार नाहीत, याची काळजी आम्ही दोघांनीही घेतली आहे.” यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत रामशेठ ठाकूर यांच्या जुन्या आठवणींत रमले होते. ते म्हणाले, “रामशेठ ठाकूर हे शेलघरचे जावई आहेत. दिवंगत ज. आ. भगत साहेबांची कन्या शकुंतलाताई त्यांच्या सहचारिणी आहेत. त्यामुळे शेलघर गावावर त्यांचे विशेष प्रेम आहे. भगत साहेबांच्या ओसरीत असलेला रामशेठ ठाकूर साहेबांचा फोटो पाहत मी मोठा झालो. पुढे ते शिक्षक झाले, तेव्हा ते वाशीला राहत होते. त्यावेळी मी त्यांच्या घरी बीएमटीसीने जायचो. प्रशांत आणि परेशही तेव्हा लहान होते. त्यामुळे छान गप्पागोष्टी रंगायच्या. रामशेठ यांनी एकदा आम्हाला चेंबूरला चित्रपट पाहायलाही नेले होते, अशी आठवणही महेंद्रशेठ यांनी यावेळी सांगितली. गेल्या ५० वर्षांपासून त्यांना मी पाहत आलोय. त्यांनी मला अक्षरशः हाताला बोट धरून राजकारणात आणले. माझ्या आजच्या वाटचालीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे ऋण माझ्यावर आहेत. ते सर्वच बाबतीत मोठे आहेत, पण आजही माझे ऐकतात. त्यामुळे राजकीय वादळे कितीही आली तरी आमचे कौटुंबिक संबंध कायमच मधुर राहतील,” असा विश्वासही महेंद्रशेठ घरत यांनी बोलून दाखवला. सध्या मी कामगारांच्या हक्कांच्या लढाईसाठी पूर्वनियोजित बैठकांसाठी जिनिव्हाच्या दौऱ्यावर जात आहे. त्यामुळे २ जून या रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवशी मी प्रत्यक्ष भारतात नाही. त्यामुळे त्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या ‘सुखकर्ता’ विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महेंद्रशेठ घरत जिनिव्हा दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या तीन सहकाऱ्यांना फोर व्हीलर भेट दिल्या. त्यांच्या चाव्या रामशेठ ठाकूर, उद्योजक मयुरेश चौधरी यांच्या हस्ते दिल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर महेंद्रशेठ घरत यांनी हास्य फुलविले. नाना गडकरी यांनी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अॅड. अविनाश ठाकूर, मो. का. मढवी गुरुजी आणि घरत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

डॉ. हेमराज शाह यांच्या प्रेरणेने चार प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांची घोषणा

मुंबई : साहित्य संवर्धक, समाजसेवक आणि बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेमराजभाई शाह यांच्या प्रेरणेने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या चार प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. साहित्य, संशोधन…

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) आणि बेस्टतर्फे जागतिक तंबाखूमुक्त दिन २०२६ निमित्त आयोजित “तंबाखूमुक्त बेस्ट” उपक्रमादरम्यान बेस्टचे चालक आणि वाहक उपस्थित होते. कुलाबा येथील बेस्ट इलेक्ट्रिक हाऊसमध्ये आयोजित या उपक्रमात तंबाखूविरोधी जनजागृती मोहीम, हवन समारंभ, कॅन्सर किड्स अपील, तंबाखूचे व्यसन सोडलेल्या बेस्ट चालक आणि वाहकांचा सत्कार, बेस्ट बसमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती पोस्टर्सचे अनावरण तसेच महिला वाहकांच्या नेतृत्वाखाली प्रभावी फलक मोहीम आयोजित करण्यात आली. या उपक्रमाद्वारे मुंबईच्या सार्वजनिक परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखूमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. ०००००००००

काशिनाथ माटल यांच्या “सावट” कथासंग्रहाला सातार,कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचा ३रा राज्यस्तरीय पुरस्कार!

सातारा दि.३०:ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांच्या “सावट” या कथासंग्रहाला कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.प्रतिष्ठानच्या वतीने कादंबरी,कवितासंग्रह,बाल साहित्य,उत्तेजनार्थ इत्यादी उत्कृष्ट मराठी वांग्मय निर्मितीला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले…

प्राण्यांच्या एकाच दवाखान्यात चोरट्याचा दोन वेळा डल्ला

 पोलिसांकडून फक्त गुन्हा नोंदविण्याचा सोपस्कार ठाणे – ठाणे शहरात प्राण्यांच्या डाॅक्टरला विचित्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या वर्षभरात एकाच चोरट्याकडून दवाखाना फोडून दवाखान्यातील किमती ऐवज लंपास केला जात आहे.…

भारतातील वाढत्या कर्करोगाच्या ओझ्याला चालना देणारे एकमेव व्यसन म्हणजे तंबाखू

 जागतिक तंबाखू निषेध दिन मिरा -भाईंदर :जागतिक तंबाखू निषेध दिन निमित्त वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड तंबाखू आणि निकोटीनच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांविषयी महिनाभरापासून  जनजागृती करत आहे. यावर्षीची संकल्पना “ तंबाखूच्या…

उल्हासनगर स्कायवॉक खाली गांजा विक्री करणाऱ्या इसमावर झडप

 ६६ हजार २०० रुपये किमतीचा ३.३१२ किलो गांजा जप्त सुनिल इंगळे उल्हासनगर : अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांची विठ्ठलवाडी पोलिसांनी धरपकड सुरू केले असून उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉक खाली गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी झडप घालून अटक केली आहे. त्याच्याकडून ३.३१२ किलोग्राम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ सुमारे ६६ हजार २०० रुपये किमतीचा माल जप्त करण्याची कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांची धरपकड मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. ही मोहीम सुरू असताना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोडसे यांना गुप्त बातमीदारांने उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील स्टेशन जवळ स्कायवॉक खाली गांजा या अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली दिली. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास मिसाळ, पोलीस हवालदार दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, पोलीस नाईक भागवत दहिफळे, पोलीस शिपाईगणेश राठोड, चंद्रकांत गायकवाड व सौरभ ठाकूर या पोलीस पथकांनी स्कायवॉक जवळ सापळा लावून रवींद्र नामदेव सैंदाने (३५) या इसमाला झडप घालून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ३.३१२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ सुमारे ६६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी त्याच्या जवळून ताब्यात घेतला. त्याचा दुसरा सहकारी दगडू निकम हा त्या ठिकाणाहून पसार झाला. पोलिसांनी त्याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दिलीप चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात रवींद्र सैदाने व दगडू निकम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दराडे करीत आहेत. अमली पदार्थ विरोधात पोलिसांची ही कारवाई सतत सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

मोरबे धरणात १७ टक्के पाणीसाठा; जुलैअखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहणार – महापौर सुजाता पाटील

पाणी बचतीचे आवाहन; मोरबे धरण व जलशुद्धीकरण व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी नवी मुंबई : मोरबे धरणात सध्या १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून जुलैअखेरपर्यंत नवी मुंबईकरांना पुरेल इतके पाणी उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाणीटंचाईबाबत चिंता…